अर्थशास्त्र विभाग – स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन व सत्कार समारंभ संपन्न

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ  येथील अर्थशास्त्र अभ्यास मंडळाच्या वतीने दि.१४ जानेवारी २०१९ रोजी  मा.उपप्राचार्य डॉ.सौ.माणिक मेहरे यांचे अध्यक्षतेखाली स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व सत्कार समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा जिज्ञासा करीअर अकादमीचे अकॅडमीचे संचालक व मार्गदर्शक श्री गजेन्द्र ठाकूर लाभले होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून २०१८ च्या उन्हाळी परिक्षेत अर्थशास्त्र विषयात विद्यापीठातून प्रथम क्रमांकाचे  रौप्यपदक विजेती कु. पूजा पुंडलिकराव गावंडे यांचाही  भावपूर्ण सत्कार आयोजित करण्यात आला. या प्रसंगी २०१२ च्या विद्यापीठ परिक्षेत अर्थशास्त्र विषयात प्रथम क्रमांक व ८ वा सामान्य मेरिट प्राप्त माजी विद्यार्थीनी कु. नमिता हांडे (ट्रेझरी ऑफीस, वाशिम) प्रमुख अतिथी म्हणून लाभल्या होत्या.
या तिन्ही माजी गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यार्थी जीवनातील अनुभव कथन करून या स्पर्धेच्या युगात परिस्थितीची जाणीव ठेवून व स्वतःला ओळखून सिध्द होण्याच्या संदर्भात बहुमोल मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे गौरव करत त्यांनी सांगितलेले अनुभव ऐकून उपस्थित विद्यार्थी भारावून गेले. मा. उपप्राचार्य डॉ.मेहरे मँडम यांनी अध्यक्षीय भाषणातून गुणवंताचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, विभाग प्रमुख प्रा.विनोद तलांडे यांनी केले तर सुत्रसंचलन कु.पूजा मानकर  व आभारप्रदर्शन कु.जयश्री जाधव यांनी केले.

अर्थशास्त्र विषयात विद्यापीठात प्रथम क्रमांक

कु.पूजा पुंडलिकराव गावंडे
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी २०१८- बी.ए.च्या परिक्षेत महाविद्यालयातील विद्यार्थीनी कु.पूजा पुंडलिकराव गावंडे ही अर्थशास्त्र विषयात विद्यापीठात प्रथम क्रमांक प्राप्त करून स्व.भिमरावजी श्रावणजी यावले स्मृती रौप्यपदकाची मानकरी ठरली. अतिशय चिकाटी व जिद्दीने हे यश मिळवून महाविद्यालयाच्या यशाच्या उज्वल परंपरेत मानाचा तुरा रोवणा-या पूजा गावंडे या गुणवंत विद्यार्थीनीचा संस्थेच्या वतीने भावपूर्ण सत्कार सोहळा दि.२१ डिसेंबर २०१८ रोजी महाविद्यालयात संस्थेचे अध्यक्ष मा.विनायकजी दाते यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष मा.सतिषजी फाटक, विश्वस्त सौ सुषमाताई दाते, बाबाजी दाते महिला सहकारी बँकेच्या अध्यक्षा मा.विद्याताई केळकर, मा.विजयराव कासलीकर, मा.प्राचार्य सौ.प्रेरणा पुराणिक, उपप्राचार्य डॉ.माणिक मेहरे, सिनेट सदस्य प्रा.विवेक देशमुख हे मान्यवर व महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजा गावंडेचा सत्कार केल्यानंतर पूजाने आपले मनोगत व्यक्त करतांना,१२ वी सायन्सची असणारी मी विद्यार्थीनी मोठ्या विश्वासाने बाबाजी दातेंच्या महाविद्यालयात बी.ए.ला प्रवेश घेतला आणि या महाविद्यालयातील प्राध्यापकांनी माझा हा विश्वास सार्थ ठरविला. विषयाची ओळख नसणारा व इतरांनाही कठीण वाटणारा अर्थशास्त्र हा विषय सरांच्या मार्गदर्शनातून माझ्या जिव्हाळ्याचा झाला या महाविद्यालयाच्या संस्कारामुळेच मी हे यश संपादन करू शकले ,असे भावपूर्ण विचार मांडले.
मा.अध्यक्ष व उपाध्यक्ष साहेबांनी गुणवंत विद्यार्थीनीचे व म:नपूर्वक अभिनंदन,कौतुक करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.विनोद तलांडे यांनी केले.

Top