मराठी विभाग – अमरावती विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत दाते महाविद्यालयाच्या ५ विद्यार्थिनी

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या ५ विद्यार्थिनी : - मार्च २०१८ मधे झालेल्या संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी वाड़मय पारंगत परीक्षेत स्थानिक बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या पाच विद्यार्थीनीना गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले आहे.
उत्कृष्ठ निकालाची परंपरा असलेल्या वाणिज्य महाविद्यालय न्यास द्वारा संचालित बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी वाड़मय पारंगतच्या (१) साधना ज्ञानेश्वर डफर हिने गुणवत्ता यादीत ६ वे (२) सारिका मारोती मेश्राम हिने ७ वे (३) सोनाली सिद्धार्थ भगत हिने ८ वे (४) शीतल अरुण चौधरी हिने ९ वे (५) वर्ष अरुण चौधरी हिने १०वे स्थान प्राप्त करून महाविद्यालयास अभूतपूर्व यश मिळवून दिले.
विद्यार्थीनिनी प्राप्त केलेल्या यशाबद्दल महाविद्यालय व वाणिज्य महाविद्यालय न्यासाचे वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. गुणवत विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या यशाबद्दल अध्यक्ष विनायक दाते, उपाध्यक्ष सतीश फाटक यांनी विद्यार्थिनीचे अभिनंदन करून त्यांना पुस्तके भेट म्हणून दिली. तसेच त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांना माजी विद्यार्थी संघटनेचे मानद सदस्यत्व जाहीर केले. कार्यक्रमास सचिव तथा प्रभारी प्राचार्य प्रेरणा पुराणिक, विश्वस्त सुषमाताई दाते, विवेक देशमुख, हरिदास धुर्व, उपप्राचार्य डॉ. माणिक मेहरे  मराठी विभागप्रमुख डॉ. स्मिता शेंडे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा. ताराचंद कांठाले यांनी केले.

अभिवादन स्पर्धा

भारतीय घटनेचे शिल्पकार,भारतरत्न,विश्वभूषण,क्रांतीसूर्य,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्य "बानाई-नागपूर" द्वारा आयोजित केली जाणारी "अभिवादन स्पर्धा परीक्षा आज दि.६ डिसेंबर २०१८ रोजी आपल्या महाविद्यालयात घेण्यात आली. या परीक्षेला महाविद्यालयातील ६७ विद्यार्थी प्रवेशित होते.

या परीक्षेचे प्रभारी व केंद्र संचालक म्हणून प्रा. विनोद तलांडे व पर्यवेक्षक म्हणून प्रा. हरीश धुर्वे यांनी काम सांभाळले.

तत्पूर्वी महाविद्यालयाचे प्राचार्य मा.प्रेरणा पुराणिक,उपप्राचार्य डॉ.माणिक मेहरे यांनी डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बाबासाहेबांना अभिवादन केले.

या कार्याच्या यशस्वीते करीता मराठी विभाग प्रमुख डॉ.स्मिता शेंडे,रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.ताराचंद कंठाळे, एन.सी.सी.अधिकारी लेप्ट.प्रशांत बागडे, प्रा.अमोल राऊत, सुनिल अतकरी यांचे सहकार्य लाभले.

लाल बहादुर शास्त्री व महात्मा गांधी जयंती संपन्न

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने शास्त्री -गांधी जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्ष स्थानी मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. स्मिता शेंडे या होत्या. पदवी व पदव्युत्तर कला शाखेचे विद्यार्थी राहुल उइके, शुभम खडतकर, शुभांगी डुकरे, रूपाली काले, अक्षय कोरोटी, शिल्पा चचाने, सपना हगवने, समीक्षा भुरे, योगेश तरोणे, अवधुत चव्हान, प्रतीक्षा चांदेकर, डोकरमारे, इ. नी जयंती निमित्य दोन्ही देशनेत्यांच्या जीवनावर विचार व्यक्त केले.
महात्मा गांधी यांचे स्वच्छता, अहिंसा, स्वदेशी, क्षमा व शांती या संबंधी मार्गदर्शन अजूनही देशाला प्रेरणादायक आहे. सर्व-धर्म-समभाव, अस्पृश्यता निवारण आणि सहिष्णुता ही गांधींजींची पंच सूत्रे होती.
श्री लाल बहादुर शास्त्री यांच्या ‘जय जवान जय किसान’ या घोषणेने देशाला नव चैतन्य प्राप्त झाले.
जयंती समारोहाला प्रा. सुचिता ढेरे, प्रा. प्रमोद वैद्य, प्रा. प्रमिला नगराले, इत्यादी प्राध्यापक वृंद उपस्थित होते. संचालन -टिंकल राठोड, प्रास्ताविक -वैशाली अलोणे, तर आभार -माधुरी खेडकर यांनी केले. अश्विनी खडसे, आशिष भुजाडे यांनी कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न केला.

कविता महाजन यांना आदरांजली ‘आव्हानांचे अत्तर लाऊन जगलेली कविता’

प्रसिध्द लेखिका व कवयित्री कविता महाजन यांचे दि २७/९/२०१८ ला अकाली निधन झाले. ‘ब्र’ आणि ‘भिन्न’ या त्यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत. बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात दि २९/९/२०१८ रोजी आयोजित केलेल्या शोकसभेत,‘ब्र’कार कविता महाजन यांना आदरांजली अर्पित करण्यात आली.
मराठी भाषा वाङ्मय अभ्यास मंडळाच्या वतीने आयोजित आदरांजलीपर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. स्मिता शेंडे विचार व्यक्त करताना म्हणाल्या की, समाजातील दांभिक, बेगडी असत्य ओरबाडून लेखनिच्या टोकाला आव्हानांचे अत्तर लावून जगलेली बंडखोर लेखिका म्हणजे कविता महाजन.
प्रमुख मार्गदर्शक प्रा. प्रमिला नगराळे यांनी कविता महाजन यांच्या साहित्यावर प्रकाश टाकत समयोचित विचार व्यक्त केले. प्रा. प्रमोद वैद्य यांनीही त्यांच्या साहित्यविषयक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कु. दर्शना डोकरमारे या विद्यार्थिनीने कविच्या कवितेचे वाचन केले. कार्यक्रमाचे संचालन रुपाली काळे, प्रास्ताविक आशिष भुजाडे तर आभार प्रदर्शन वैशाली राठोड या वाङ्मय पारंगत मराठी भाग १ च्या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाला बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. आयोजक अमित भगत संघर्ष शेंडे यांनी फलक लेखन करुन कार्यक्रमाची धुरा सांभाळली.

“शिक्षण व्यवस्था आणि आजचा विद्यार्थी” वक्तृत्व स्पर्धा २०१८

दिनांक १२/९/२०१८ ला बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे, मराठी वाङ्मय अभ्यास मंडळा तर्फे वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेचा विषय – “शिक्षण व्यवस्था आणि आजचा विद्यार्थी” हा होता,

या स्पर्धेत एकुण १० विद्यार्थी सहभागी झाले व त्यांनी शिक्षण व्यवस्था आणि आजचा विद्यार्थी या विषयावर आपले विचार मांडले. स्पर्धकांना प्रत्येकी १० मिनीटाचा अवधी देण्यात आला होता.
वक्तृत्व स्पर्धा २०१८ पारीतोषिक विजेते विद्यार्थी :- प्रथम क्रमांक - कु. करुणा कांबळे, बी कॉम भाग ३, व्दितीय क्रमांक - कु. रुपाली पेंदोर, एम ए भाग २, तृतीय क्रमांक – रुपाली काळे, एम ए भाग १, प्रोत्साहनपर बक्षिस – दर्शना डोकरमारे, बी ए भाग ३.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन प्रा. डॉ. स्मिता शेंडे यांची उपस्थिती लाभली, तसेच कार्यक्रमाचे परिक्षक म्हणुन, प्रा. प्रमोद वैद्य आणि प्रा. अशोक साळवे यांनी जबाबदारी पार पाडली. या कार्यक्रमाचे मराठी विभागाच्या प्रा. प्रमिला नगराळे यांनी सुत्रसंचालन केले…

कार्यक्रमाला बी ए भाग १, २ आणि ३ चे तसेच वाङ्मय पारंगत मराठी भाग १ व २ चे विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाङ्मय पारंगत मराठी आणि बी ए च्या विद्यार्थ्यानी हातभार लावला.

दिनांक.11.09.2018 "केशवसुत काव्यस्पर्धा"

केशवसुत यांची जयंती ११ सप्टेम्बर रोजी साजरी होत असते. तसेच विश्वबंधुत्व दिवसही ११ सप्टेम्बरलाच असतो.  यानिमित्ताने अमरावती विद्यापीठ मराठी विभाग गेल्या 5 वर्षा पासून एकत्रित कार्यक्रम आयोजित करीत असते.  विद्य्यापिठातर्फे तीन पारितोषिके दिली जातात. या वेळी कवी केशवसुत काव्यस्पर्धा आयोजित केली होती.

या स्पर्धेत प्रत्येक महाविद्यालयातर्फे दोन विदयार्थी सहभागी होऊ शतकात. आपल्या विद्यालयातील (१)रुपाली पेंदोर-एम.ए-२ मराठी, (२) दर्शना डोकरमारे-बी. ए-3 या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेत विविध महाविद्यालयातील 72 विद्यार्थी सहभागी होते.

 

Top