वाणिज्य विभाग – पी.एच.डी. रिसर्च सेंटरची मान्यता

यवतमाळ येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती मार्फत बाबाजी दाते महाविद्यालयाला वाणिज्य विषयाकरिता पी.एच.डी. रिसर्च सेंटरची मान्यता प्रदान करण्यात आली.  त्या आधी महाविद्यालयातील सोई सुविधाची तपासणी करिता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती तर्फे वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. दिनेश निचत यांचे अध्यक्षतेखाली कमिटीने महाविद्यालयाला भेट दिली होती.
त्यामुळे महाविद्यालयात वाणिज्य विषयाचे विद्यार्थ्याना संशोधन कार्य करण्याची संधी प्राप्त झाली आहे. तरी वाणिज्य विषयाचे इच्छूक संशोधकांनी महाविद्यालयातील वाणिज्य विद्याशाखेचे विभागप्रमुख व पी.एच.डी. सुपरवायझर प्रा. डॉ. प्रदीप दरवरे यांचेशी त्वरीत संपर्क साधावा असे महाविद्यालयातर्फे सांगितले आहे.

“स्पर्धा परीक्षेत कसे उत्तीर्ण व्हावे ?”

दि.11-02-2019 रोजी महाविद्यालयात “स्पर्धा परीक्षेत कसे उत्तीर्ण व्हावे ?” या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मा. डॉ. जयराज फाटक (माजी आय.ए.एस) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ जयराज फाटक यांनी MPSC, UPSC आणि बँकिंग या परीक्षांची तयारी कशी करावी आणि स्पर्धेच्या युगात त्या साठी कोणत्या बारकाव्याकडे लक्ष द्यावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
ह्या कार्यक्रमास महाविद्यालयातील 300 विद्यार्थी हजर होते. विद्यार्थ्यांना डॉ जयराज फाटक यांचे मार्गदर्शन खूप उपयुक्त वाटले.

‘इमर्जिंग ट्रेंड्स इन कॉमर्स’ या विषयावर राष्ट्रीय सेमिनार

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये ‘इमर्जिंग ट्रेंड्स इन कॉमर्स’ या विषयावर राष्ट्रीय सेमिनार पार पडले. डॉ. दिनेश निचित, अधिष्ठाता, वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखा, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती यांच्या हस्ते या सेमिनारचे उद्घाटन झाले. आपल्या उद्घाटनपर भाषणामध्ये त्यांनी शिक्षणातील बदलत्या प्रवाहाचा आढावा घेतला.
आपल्या भाषणातून डॉ. संदीप वंजारी, आर. बी. अटल महाविद्यालय, गेवराई, बीड यांनी कौशल्य विकास या विषयासंबंधी विस्तृत विवेचन केले. कौशल्य विकासामुळे कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होण्यास मदत झालेली आहे. त्यामुळे अलीकडे वाणिज्य अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा सतत ओढ वाढत आहे. इंजिनीअरिग नंतर सर्वात जास्त  विद्यार्थी वाणिज्य शाखेला महत्व देतात, असे मत त्यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक सेमिनारचे संयोजक प्रा. डॉ. प्रदीप दरवरे यांनी केले. प्राचार्य प्रेरणा पुराणिक संस्थेचे अध्यक्ष विनायक दाते, उपाध्यक्ष सतीश फाटक यांनीही मनोगत व्यक्त केले. तसेच डीलीट पदवी मिळविल्याबद्दल प्रा. डॉ. हरिदास धुर्वे यांचा संस्थाध्यक्षाच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या नंतर झालेल्या च्या अध्यक्षस्थानी केसरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावतीचे प्राचार्य डॉ. विजय भांगडीया तर वक्ते म्हणून प्रा. मार्तंड खुपसे उपस्थित होते. दिवसभर चाललेल्या या सेमिनारचा समारोप महाविद्यालयाचे प्राचार्य प्रेरणा पुराणिक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
सेमिनारचा प्रारंभ महाविद्यालयाच्या संगीत विभागातर्फे सादर केलेल्या अतिशय श्रवणीय ईशस्तवन आणि स्वागतगीताने झाला. तर आभारप्रदर्शन प्रा. डॉ. हरिदास धुर्वे यांनी केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन प्रा. अमोल राउत यांनी केले.

"महाविद्यालयात ग्राहक जागृकता व वित्तीय साक्षरता कार्यक्रम संपन्न"

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ व कन्झ्यूमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडिया, मुंबईच्या संयुक्त विद्यमानाने महाविद्यालयातील  सावरकर सभागृहात  विद्यार्थ्यांकरिता दि.७ सप्टेंबर २०१८ रोजी "ग्राहक जागरूकता व वित्तीय साक्षरता" या विषवार सकाळी ८ ते १.३० या वेळात ३ सत्रामध्ये सेमिनार चे आयोजन करण्यात आले.
या सेमिनार मध्ये "ग्राहक जागरूकता" या विषयावर कन्झ्यूमर गायडन्स सोसायटीच्या प्रोजेक्ट डायरेक्टर सौ. मिलन मेस्त्री यांनी मार्गदर्शन केले तर वित्तीय साक्षरता या विषयावर याच संस्थेच्या सौ. प्राची मयेकर यांनी मार्गदर्शन केले. ग्राहक जागरूकता या विषयावर बोलतांना सौ. मिलन मेस्त्री यांनी विविध अन्न पदार्थांमध्ये केली जाणारी भेसळ या संदर्भातील लघुपट दाखवून तसेच आर्थिक व्यवहारात होणारी फसवणूक या बाबत ग्राहक म्हणून आपण कसे सजग रहावे या विषयाचे महत्व विषद केले.तर सौ. प्राची मयेकर यांनी वित्तीय साक्षरता या विषयावर बोलतांना प्रत्येकांनी आपल्या खर्चाचे नियाजन करून आपल्या उत्पन्नाचा किमान २५ ते ३० भाग बचत करून तो गुंतविला पाहिजे आणि हि गुंतवणूक विविध योजनांमध्ये केली पाहिजे, केवळ बँकामध्ये मुदत ठेवीच्या रूपात पैसे न ठेवता महागाईच्या निर्देशांकावर मात करणारी, किमान परतावा आपणास मिळाला पाहिजे या दृष्टीने म्युच्यूअल फंड, स्टॉक मार्केट, अशा संस्थामध्ये केलेली गुंतवणूक कशी फायदेशीर ठरते या संबधी सविस्तर मार्गदर्शन केले. या सेमिनारमध्ये महाविद्यालयातील ३५० विद्यार्थी व प्राध्यापक सहभागी झाले होते.
सुरूवातीला दिप प्रज्वलन व बाबाजींच्या प्रतिमेला माल्यार्पन करून कार्यक्रमाचे रीतसर उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. प्रेरणा पुराणिक तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्या डॉ.माणिक मेहरे, सिनेट सदस्य तथा इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.विवेक देशमुख, मुंबई संस्थेच्या सौ. मिलन मेस्त्री व सौ. प्राची मयेकर हे मान्यवर उपस्थित होते. प्रा. विवेक देशमुख सरांनी आपल्या भाषणातू या कार्यक्रमाची भूमिका विषद केली. मा.प्राचार्यांनी अध्यक्षीय भाषणातून या विषयाचे महत्व पटवून दिले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.विनोद तलांडे तर आभार प्रदर्शन वाणिज्य विभागाचे प्रा. अमोल राऊत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता डॉ. प्रदिप दरवरे, प्रा.हरिदास धुर्वे, डॉ.सचिन जयस्वाल व डॉ.ताराचंद कंठाळे यांनी सहकार्य केले.

Top