दाते महाविद्यालयात पालक सभा संपन्न

यवतमाळ येथील बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात दिनांक 30 मार्च 2019 रोजी  स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात  वरीष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या पालकांची "पालक सभा"  आयोजित केली होती. व्यासपीठावर अध्यक्ष स्थानी मा. श्री. विनायक दाते (अध्यक्ष, वाणिज्य महाविद्यालय न्यास), सौ. सुषमा दाते (विश्वस्त, वाणिज्य महाविद्यालय न्यास),  महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ. प्रेरणा पुराणिक, सौ. इंदूताई साबळे व प्रकाश वरण्य हे पालकांचे प्रतिनिधि म्हणून व्यासपिठावर उपस्थित होते. प्रा. विवेक देशमुख यांनी पालक सभेचे प्रयोजन विषद केले. प्राचार्यानी अशी पालक सभा दरवर्षी आयोजित करून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यात येईल असे सांगितले. कार्यक्रमांचे अध्यक्ष मा.विनायक दाते यांनी पालकांनी दिलेल्या सूचना स्वागतार्ह असून त्या प्रमाणे महाविद्यालयात विविध सुधारणा करण्यात येईल असे आश्वासन दिले. या सभेत पालकांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी, समस्या, व सूचना मांडण्याची संधी देण्यात आली. काही पालकांनी वरीष्ठ महाविद्यालयात पालक सभा घेतल्याबद्दल आनंद व्यक्त करून दरवर्षी अशाच प्रकारचे आयोजन करण्यात यावे अशी सूचना केली. या पालक सभेत पालकांतर्फे सौ. इंदूताई  साबळे, हिरामण कांबळे, शिवानंद दांडेकर, सौ. भाविका, सौ. गौरकर आणि प्रणाली काकडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या सभेस मोठ्या संख्येने पालक महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षक्केतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी आपली उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. डॉ. रविजित गावंडे यांनी केले. संचलन प्रा. डॉ. ताराचंद कंठाळे, प्रास्ताविक प्रा. विवेक देशमुख व आभार प्रदर्शन प्रा. हरिदास धुर्वे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी सहकार्य केले.

दि.२७ जानेवारी २०१९ रोजी माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न

दि.२७ जानेवारी २०१९ रोजी बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ येथे माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, वाणिज्य महाविद्यालय न्यासाचे अध्यक्ष मा. विनायक दाते होते. प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. वसंतराव पुरके - माजी शिक्षण व क्रीडा मंत्री, मा. दिवाकरराव पांडे - माजी शिक्षक आमदार, मा.सुरेश कैपिल्यवार - प्रसिद्ध ज्वेलर्स हे उपस्थित होते. त्याचबरोबर माजी विद्यार्थी संघटनेचे विद्यमान अध्यक्ष मा. सतीश फाटक, तसेच संस्थेचे विश्वस्त मा. सौ.सुषमा दाते, मा. श्री.चंद्रकांत रानडे, मा.विजय कासलीकर, मा. सौ. शर्मिला फाटक, प्राचार्य सौ. प्रेरणा पुराणिक, उपप्राचार्य डॉ. सौ. माणिक मेहरे, सिनेट सदस्य प्रा. विवेक देशमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम माजी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचा संपूर्ण परिसर दाखविण्यात आला. प्रास्ताविकात मा. विवेक देशमुख यांनी माजी विद्यार्थी संघटनेचे ‌महत्व, सदस्यता आणि निवडणुकीबाबत माहिती दिली. यावेळी मोठ्या संख्येने महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी उपस्थित होते व त्यापैकी अनेकांनी उत्स्फूर्तपणे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे बहारदार संचालन डॉ. ताराचंद कंठाळे यांनी केले तर डॉ. वैशाली बेडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. संगीत  विभागाने सरस्वती स्तवन व स्वागतगीत सादर केले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

मानवी जीवनात आत्मिक सुख फार मोलाचे : डॉ. हमीद खान

विज्ञान आणि तंत्रज्ञान या विद्याशाखेने मानवी जीवनात भौतिक साधन-सुविधा देण्यासाठी मोठी कामगिरी केली आहे, यात शंका नाही. त्याला आत्मिक सुखाची जोड अत्यंत आवश्यक असते. हे आत्मिक सुख मिळविण्यासाठी मानव्य विद्याशाखेची भूमिका अत्यंत महत्वाची आहे, असे प्रतिपादन मौलाना अ. कलाम आझाद अध्यासन, औरंगाबादचे प्रमुख डॉ हमीद खान यांनी केले.
स्थानिक बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात आयोजित इमर्जिंग ट्रेंड्स इन ह्युमोनिटीज या सेमिनारमध्ये ते बोलत होते. महाविद्यालयाची वर्गखोली ही जगाकडे बघण्याची एक खिडकी आहे. त्यामुळे शिक्षकांनी वर्गामध्ये जाण्यापूर्वी अतिशय तयारीने जाण्याची गरज असते. शिकण्यापूर्वी सखोल चिंतनाची गरज आहे. त्यासाठी भरपूर वाचन हा एकमेव पर्याय आहे., असेही उद्गार डॉ. हामीद यांनी आपल्या अत्यंत प्रभावाशाली भाषणामध्ये काढले.
तत्पूर्वी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर यांनी सेमिनारचे उद्घाटन केले. आपल्या भाषणामध्ये त्यांनी विद्यापीठाद्वारे चालविणारे अभ्यासक्रम, त्यात वेळेनुसार झालेले बदल व इतर उपक्रमाची थोडक्यात माहिती दिली. महाविद्यालयाच्या  प्राचार्य सौ प्रेरणा सं. पुराणिक, संस्थेचे अध्यक्ष श्री विनायक दाते, उपाध्यक्ष श्री सतीष फाटक यांचीही समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेमिनारचे संयोजक प्रा. प्रशांत बागडे यांनी तर पाहुण्यांचा परिचय ज्येष्ठ सिनेट सदस्य प्रा. विवेक देशमुख यांनी करून दिला. कार्यक्रमाच्या सुरवातीला दीप प्रज्वलन आणि संगीत विभागातर्फे अतिशय सुरेख ईशस्तवन आणि स्वागत गीत सादर करण्यात आले. यानंतर दिवसभर विविध विषयांतर्गत शोधनिबंध सादर करण्यात आले. प्रा. डॉ. दि. व्य. जहागीरदार प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. संचालक प्रा. डॉ. ताराचंद कठाळे यांनी तर आभार डॉ. कल्पना देशमुख यांनी मानले. ज्येष्ठ पत्रकार राज्यशास्त्राचे अभ्यासक प्रा. न. मा. जोशी यांच्या अतिशय उद्बोधक आणि बहारदार भाषणाने सेमिनारचा समारोप झाला.

युवक महोत्सव १७ ते १९ जानेवारी २०१९

स्थानिक बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात दिनांक १७ जानेवारी ते १९ जानेवारी २०१९ या काळामध्ये मोठ्या उत्साहात युवक महोस्तव संपन्न झाला. “आधुनिक काळामध्ये महिला या प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असून या युवक महोस्तवच्या सहाय्याने सर्व विद्यार्थांच्या सुप्तगुणांना वाव मिळतो महिला सशक्ती करणाच्या दृष्टीनेही असे कार्यक्रम अत्यंत उपयुक्त आहे” असे उद्गार सौ. कांचनताई बाळासाहेब चौधरी यांनी काढले, युवा महोस्तवाचा उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. नगराध्यक्ष म्हणून यवतमाळ मध्ये सुरु असलेल्या अनेक उपक्रमाची माहिती त्यांनी दिली शहर स्वच्छतेसाठी तसेच युवकांच्या मतदान हक्काबद्दल त्यांनी विषेश मार्गदर्शन केले. नगराध्यक्ष म्हणून शहराच्या प्रगती साठी आपण सर्व मिळून प्रयत्न करूया असे भावनीक आवाहन त्यांनी केले
अध्यक्ष पदावरून बोलतांना संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. विनायक  दाते यांनी अभ्यासाबरोबरच इतर कलागुणांमध्ये विद्यार्थांनी सहभागी होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. सतीष फाटक यांनी महाविद्यालयात होत असलेल्या सुधारणान विषयी माहिती दिली. या कार्यक्रमाला प्रभारी प्राचार्य सौ. प्रेरणा पुराणिक यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर संस्थेच्या विश्वस्त सौ. सुषमा दाते, प्रा. विवेक देशमुख, डॉ. हरिदास धुर्वे, उपप्राचार्य डॉ. माणिक मेहरे, डॉ. स्वाती जोशी, श्री. विजय कासलीकर, श्री. चंद्रकांत रानडे, युवक महोस्तवाचे समन्वयक प्रा. डॉ. रविजीत गावंडे उपस्थित होते.

या तीन दिवसीय स्नेहसंमेलनात रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, डीश डेकोरेशन, या स्पर्धांना विद्यार्थी-विद्यार्थिनींनी भरभरून प्रतिसाद दिला. याशिवाय काव्यगायन, नृत्य स्पर्धा, वेशभूषा, भावगीत स्पर्धा आणि वादविवाद स्पर्धा, बचाव स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. दि १७ व १८ जानेवारी रोजी दुपारी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये नृत्य, नाटिका, नकला, वेशभूषा, ट्वीन्स अशा विविधरंगी स्पर्धांना सुरवात झाली. या स्पर्धांना विद्यार्थ्यांनी भरगच्च उपस्थिती दर्शवली, या सर्व कलाकारांना मनसोक्त दाद देताना विद्यार्थ्यांच्या उत्साहाला उधाण आले होते. युवक महोत्सवाचा उत्तरार्ध आनंदमेळ्याने झाला. विविध खेळ आणि रुचकर खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर आस्वाद घेण्यासाठी खवैयांची झुंबड उडाली. या सर्व विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थी विद्यर्थीनिनी चढाओढीने सहभाग नोंदविला. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्रे देऊन गौरव करण्यात आला.
२०१९ च्या या युवक महोत्सवाच्या समन्वयक प्रा. डॉ. रविजीत गावंडे होते. सर्व संस्थाचालकांचा सक्रीय सहभाग, कार्यक्रमांचे काटेकोर नियोजन आणि प्राध्यापकांचे तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पूर्ण नियंत्रण  याबरोबरच  विद्यार्थ्यांची अलोट गर्दी, उस्फुर्त प्रतिसाद, अमाप उत्साह हि वैशिष्ट्ये असलेल्या या युवक महोत्सवातील शिस्त वाखाणण्यासारखी होती या गोष्टींचा सर्व प्रमुख अतिथींनी केलेला उल्लेख ही या महोत्सवाची आणखी एक जमेची बाजू.

युवक महोत्सव ९ ते ११ जानेवारी २०१८

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय येथे दि. ९, १० व ११ जानेवारी २०१८ या कालावधीत युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.राजेश जयपूरकर उद्घाटक म्हणून उपस्थित होते. वाणिज्य महाविद्यालय न्यासचे अध्यक्ष मा.विनायक दाते यांच्या अध्यक्षते खाली विद्द्यार्थ्यांच्या प्रचंड उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. वाणिज्य महाविद्यालयाचे उपाध्यक्ष मा.सतीश फाटक, न्यासच्या सदस्य सौ.सुषमा दाते, श्री मंगेश केळकर, सौ मीरा केळकर, सौ.शर्मिला फाटक, श्री विजय कासलीकर, चद्रकांत रानडे, प्राचार्य प्रेरणा पुराणिक, वरिष्ठ महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय व एम.सी.व्ही.सी.चे प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मा.प्र-कुलगुरूंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वर्ग १२ वी मध्ये यवतमाळ जिल्ह्यातून गुणानुक्रमे प्रथम आलेली कु.भक्ती जोशी, राष्ट्रीय सेवा योजनेतून मुंबई येथे २६ जानेवारी च्या आर.डी. परेड साठी निवड झालेली कु.गायत्री माने, थलसैनिक कॅम्पसाठी दिल्ली येथे निवड झालेला एनसीसी कॅडेट मनोज भेंडारकर या विद्यार्थ्याना गौरवण्यात आले.
याप्रसंगी विवध क्षेत्रात कर्तुत्व गाजवणाऱ्या प्राध्यापकांचा देखील गौरव करण्यात आला. या मध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेटवर निवडून आलेले प्रा.विवेक देशमुख, अमरावती विद्यापीठाच्या राष्ट्रीय पातळीवरच्या आर्चरी टीमचे नेतृत्व करणारे डॉ.रविजीत गावंडे, उत्कृष्ट एनसीसी युनिट म्हणून प्रा.प्रशांत बागडे, पी.एचडी.मार्गदर्शक झाल्याबद्दल डॉ.स्नेहल डहाळे यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.

या तीन दिवसीय स्नेहसंमेलनात रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, डीश डेकोरेशन, या स्पर्धांना विद्यार्थी-विद्यार्थिनींनी भरभरून प्रतिसाद दिला. याशिवाय काव्यगायन, नृत्य स्पर्धा, वेशभूषा, भावगीत स्पर्धा आणि वादविवाद स्पर्धा,. बचाव स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. दि ९ व १० जानेवारी रोजी दुपारी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये नृत्य, नाटिका, नकला, वेशभूषा, ट्वीन्स अशा विविधरंगी स्पर्धांना सुरवात झाली. या स्पर्धांना विद्यार्थ्यांनी भरगच्च उपस्थिती दर्शवली, या सर्व कलाकारांना मनसोक्त दाद देताना विद्यार्थ्यांच्या उत्साहाला उधाण आले होते.युवक महोत्सवाचा उत्तरार्ध आनंदमेळ्याने झाला. विविध खेळ आणि रुचकर खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर आस्वाद घेण्यासाठी खवैयांची झुंबड उडाली. या सर्व विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थी विद्यर्थीनिनी चढाओढीने सहभाग नोंदविला. सुमारे ८६  स्पर्धकांनी  बक्षिसे पटकाविली. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्रे देऊन गौरव करण्यात आला.

२०१८ च्या या युवक महोत्सवाच्या समन्वयक भूगोल विभागप्रमुख प्रा. डॉ. कल्पना देशमुख होत्या. मा. प्राचार्य डॉ. प्रेरणा पुराणिक यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व संस्थाचालकांचा सक्रीय सहभाग, कार्यक्रमांचे काटेकोर नियोजन आणि प्राध्यापकांचे तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पूर्ण नियंत्रण  याबरोबरच  विद्यार्थ्यांची अलोट गर्दी, उस्फुर्त प्रतिसाद, अमाप उत्साह हि वैशिष्ट्ये असलेल्या या युवक महोत्सवातील शिस्त वाखाणण्यासारखी होती या गोष्टींचा सर्व प्रमुख अतिथींनी केलेला उल्लेख ही या महोत्सवाची आणखी एक जमेची बाजू.

Top