राष्ट्रीय सेवा योजना – सरदार पटेल अखंड भारताचे शिल्पकार -डॉ. नितीन खर्चे

आज दिनांक ३१ ऑक्टोबर ला स्थानिक बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महा. येथे सरदार वल्लभ भाई पटेल  यांची जयंती अर्थात राष्ट्रीय ऐक्य दिवस तसेच दिवंगत पंतप्रधान प्रियदर्शिनी इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. लोहपुरुष सरदार पटेल यांनी गृहमंत्री असताना अनेक देशोपयोगी निर्णय घेतलेत तसेच ५५० संस्थानिकांना भारतात विलीन  करून भारताला अखंड ठेवण्याचा  प्रण पूर्ण केला.असे प्रतिपादन प्रमुख वक्ते मा. डॉ. नितीन  खर्चे यांनी केले. त्यांनी सरदार पटेल यांच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकला. इंदिरा गांधी यांनी कठीण काळात देशाच्या हितासाठी हौतात्म्य पत्करले असे उद्गार प्रमुख पाहुणे क्षेत्रीय समन्वयक प्रा. डॉ. सरकटे  यांनी काढले. देश सरदार पटेल यांचा त्याग विसरू शकत नाही.तरुणांनी या दोन्ही देशभक्त नेत्यांच्या जीवन चरित्रातून बोध घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. अध्यक्ष प्राचार्य प्रेरणा पुराणिक होत्या.प्रास्ताविक सह कार्यक्रम अधिकारी  प्रा. डॉ. आशालता आसुटकर  यांनी तर संचलन कु.  गोडसे हिने केले. आभार शुभम राऊत याने केले व राष्ट्र वंदना म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.

आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन

स्थानिक बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ येथे आज दिनांक १३ ऑक्टोबरला राष्ट्रीय सेवा योजना  विभागामार्फत आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य सौ. प्रेरणा पुराणिक कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे श्री सतीश फाटक ,प्रसिद्ध वास्तुशिल्पी  तथा उपाध्यक्ष वाणिज्य महाविद्यालय न्यास, यवतमाळ तर प्रमुख मार्गदर्शक  म्हणून प्रा. विवेक देशमुख, इंग्रजी विभाग प्रमुख तथा सदस्य, विद्वद परिषद, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती हे उपस्थित होते.
जीवनात वेळ काळ कुणालाच सांगून येत नसते. तेव्हा वैयक्तिक, सामाजिक वा राष्ट्रीय आपत्ती असो माणसाने नियोजन हे केलेच पाहिजे. आपत्ती हा जीवनाचा एक भागच आहे. त्यामुळे खचून न जाता जो धैर्याने आपत्तीचा सामना करतो तोच खरा रासेयो स्वयमसेवक म्हणता येईल. तामिळनाडू मधील एका राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीमती अंजू  जॉर्ज यांनी किती कौशल्याने प्रशासन सांभाळले व काय काय प्राथमिक जबाबदाऱ्या आपत्ती ग्रस्तांना उपलब्ध करून दिल्या या वर प्रा.विवेक देशमुख यांनी  प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. श्री सतीश फाटक यांनी मार्गदर्शनात सांगितले की राष्ट्रीय सेवा योजनेचे ब्रीदवाक्य हे सेवा आहे. तेव्हा या देशावर जेव्हा जेव्हा राष्ट्रीय आपत्ती आली तेव्हा  तेव्हा रासेयो, एन .सी .सी. सारख्या शासनेतर संस्थांनी नेहमी सेवा प्रदान करून सामाजिक बांधीलकीचा व संवेदनेचा परिचय दिला आहे. सरकार् म्हणजे  दुसरे तिसरे कुणीच नसून आपणच आहोत हि भावना मनाशी बाळगून त्सुनामी, किल्लाराचा भूकंप, गुजरात, अलीकडील पुणे येथील घटना   व इतर अनेक संकट  वेळी  स्वयम सेवकांनी पुढाकार घेतला याचा इतिहास साक्षी आहे. असे प्रतिपादन प्राचार्य पुराणिक यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ आशालता आसुटकर यांनी तर पाहुण्यांचा परिचय व “खरा तो एकची धर्म ,जगाला प्रेम अर्पावे” हे रासेयो गीत कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. ताराचंद कंठाळे  यांनी केले. संचलन कु.धनश्री कापशीकर बी .ए .भाग २ तर आभार कु.आरती जिभकाटे हिने केले.

राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस आचारसंहिता दिन

दिनांक २४/९/१८ ला राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन  साजरा करण्यात आला. अध्यक्ष स्थानी प्रा. डॉ. माणिक मेहरे तर प्रमुख अतिथी जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. कमल राठोड होते.  प्रमुख वक्ते प्रा. डॉ. कमल राठोड यांनी खालील माहिती दिली.

राष्ट्रीय सेवा योजना स्थापना  दिन २४/९/१९६९ ला संपूर्ण भारतभर  महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दी  वर्षापासून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. महाविद्यालयीन विद्यार्थी हे सेवाभावी व्हावे व त्यायोगे त्यांच्यात नेतृत्व गुणाचा विकास व्हावा या उदात्त हेतूने रासेयो ची स्थापना करण्यात आली. समाजसेवेचे काम हे ग्रामीण भागात  रासेयोचे विद्यार्थी स्वच्छता दूत म्हणून काम करतील अशी प्रांजळ अपेक्षा विद्यापीठ आयोगाचे अध्यक्ष डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी केली होती. २४/९/१९६९ ला तत्कालीन शिक्षणमंत्री डॉ. व्ही. के. राव यांनी राष्ट्रीय सेवा योजना सुरू केल्याची घोषणा केली.

आर्मी मध्ये सेवा करणे ही सर्वोच्च देशसेवा-- कर्नल अभय पटवर्धन

दिनांक 19 सप्टेंबरला स्थानिक बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे कर्नल अभय पटवर्धन, नागपूर यांनी आर्मी मध्ये युवकांना सेवेची संधी या विषयावर उपयुक्त मार्गदर्शन केले . राष्ट्रीय सेवा योजना  मार्फत आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

कर्नल अभय पटवर्धन म्हणाले की आर्मी मध्ये सेवा करण्यासाठी विद्यार्थ्यानी पुढाकार घ्यावा. आर्मी मध्ये कुशाग्र बुद्धिमत्तेची आवश्यकता नसते तर कॉमन सेन्स व लॉजिकची फार गरज असते. आर्मी मध्ये सिलेक्शन होण्यासाठी मुलाखतीची तयारी कशी करावी व प्रश्न पत्रिकेचे स्वरूप कसे असते या वर त्यांनी प्रकाश टाकला. आर्मी मध्ये  वेतन व रजेच्या उत्तम सुविधा असतात. मुली सुद्धा आर्मी मध्ये प्रवेश घेऊ शकतात. UPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत मुलाखत देऊन आपण पदोन्नतीच्या कर्नल पदापर्यंत पोहचू शकतो.

"अवयव दान:युवकांची भूमिका"

 दिनांक 6/9/18 यवतमाळ - अवयव दान महा दान--डॉ. सारिका शहा
स्थानिक बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजने द्वारा आयोजीत *अवयव दान:युवकांची भूमिका*  या विषयावर कार्यक्रम संपन्न झाला  अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य सौ प्रेरणा पुराणिक तर अतिथी डॉ मनोज पवार,राज्यस्तरीय प्रशिक्षक तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ सारिका शहा उपस्थित होत्या .  अवयव दान केल्याने मरणोत्तर जीवन जगण्याची संधी प्राप्त होते असे डॉ शहा म्हणाल्या. प्राचार्य पुराणिक मॅडम यांनी सुद्धा यावेळी विद्यार्थ्याना  संबोधित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहकार्यक्रम अधिकारी डॉ आशालता आसुटकर यांनी तर आभार कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ ताराचंद कंठाळे यांनी केले

राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे उदबोधन वर्ग

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने उदबोधन वर्गाचे आयोजन  दिनांक 29 सप्टेंबरला करण्यात आले. अध्यक्ष म्हणून प्राचार्य  प्रेरणा पुराणिक तर प्रमुख पाहुणे  म्हणून  वाणिज्य महाविद्यालय न्यासाचे  अध्यक्ष  श्री विनायक दाते होते.

प्रमुख मार्गदर्शक म्हणून जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयचे  प्राचार्य डॉ अविनाश कोल्हटकर उपस्थित होते. मार्गदर्शनपर भाषणात ते म्हणाले राष्ट्रीय सेवा योजना हे त्याग व समर्पण चे व्यासपीठ आहे. व्यक्तिमत्त्व विकास घडविण्याची पाठशाळा राष्ट्रीय सेवा योजना आहे. अतिशय सोप्या आणि सुंदररित्या राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्व त्यांनी विद्यार्थ्यांना समजवून सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ ताराचंद कंठाळे यांनी केले तसेच सुत्रसंचलन कु. नंदिनी बनकर  तर आभार कु. पायल किनाके हिने केले. डॉ माणिक मेहरे यांनी  पसायदानाने कार्यक्रमाची सांगता केली

वृक्षारोपण कार्यक्रम

राष्ट्रीय सेवा योजनेचा कौतुकास्पद उपक्रम :- दिनांक 20 जुलै २०१८ला बाबाजी दाते कला आणि वाणिज्य  महाविद्यालय  येथे राष्ट्रीय सेवा योजना मार्फत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष विनायक दाते, सदस्या सुषमा दाते, प्रभारी प्राचार्य प्रेरणा पुराणिक, कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. ताराचंद कंठाळे तसेच अनेक प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. सर्व झाडे जगवण्याची व वाढविण्याची जबाबदारी प्राध्यापकानी घेतली असून प्रत्येक प्राध्यापकानी एका झाडाचे पालकत्व स्वीकारले आहे.

कु.गायत्री देवराव माने - महाविद्यालयातील बी.ए. भाग २ ची विद्यार्थिनी व राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेवक कु. गायत्री देवराव माने हिची मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन संचलन -२०१८ करीता निवड झालेली आहे.  महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे तिचे हार्दिक अभिनंदन.

विषबाधित शेतकऱ्यांची विचारपुस - यवतमाळ जिल्ह्यात कीटक नाशक फवारणीत अनेक शेतकरी विषबाधित झाले. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार चालु आहेत. दाते कॉलेजच्या रासेयो विभागाने प्रा. डॉ. कल्पना देशमुख व प्रा. अमोल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय रुग्णालयात जाऊन विष बाधित रुग्णांची विचारपुस केली व त्यांना चादरी व फळे यांचे वाटप केले. संस्थेच्या व्यवस्थापनाने या उपक्रमाबद्दल  विद्यार्थ्यांचे व प्राध्यापकांचे अभिनंदन केले.

वाचन प्रेरणादिन साजरा - भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थे त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणादिन म्हणून रासेयोतर्फे साजरा करण्यात आला. प्रा. डॉ. कल्पना देशमुख यांनी प्रास्ताविकात या कार्यक्रमाचे महत्व सांगितले. काही विद्यार्थ्यानी त्यांचे विचार व्यक्त केले. आयुष्यातील एकटेपणा दूर करायचा असेल तर वाचन हा एक चांगला छंद आहे असे मत प्रमुख अतिथी सुषमा दाते यांनी व्यक्त केले. प्रमुख वक्ते श्री. विवेक कवठेकर यांनी आयुष्यात प्रेरणा मिळवण्यासाठी वाचनाचे महत्व सांगितले. संस्थेचे अध्यक्ष श्री. विनायक दाते यांनी सांगितले की ज्ञान मिळविण्यासाठी अनेक साधने आहेत त्यात वाचन हे महत्वाचे साधन आहे. प्रा. अमोल राऊत यांनी आभार मानले.

स्वच्छता उपक्रम - दाते महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या प्रसंगी रासेयोच्या स्वयंसेवकांनी महाविद्यालयाच्या मैदानावरील गाजर गवत कापणे, प्लास्टिक केरकचरा याची विल्हेवाट लावणे, रोपट्यांना पाणी घालणे इत्यादी कामे मोठ्या उत्साहात पार पाडली. प्राचार्य डॉ. निस्ताने यांच्या मार्गदर्शनात रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. अमोल राऊत सहकार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. कल्पना देशमुख यांनी स्वच्छता मोहिमेचे नेतृत्व केले.

Top