संस्कृत विभाग – भंडारा येथील संस्कृत विदर्भप्रान्त संमेलनात दाते महाविद्यालयाचा सहभाग

भंडारा येथील स्प्रिंग डेल स्कुल मध्ये  2 व 3 फरवरीला झालेल्या या  संमेलनाचे उद्घाटन भंडारा नगरीचे  आमदार श्री. रामचन्द्र अवसरे यांनी केले. यावेळी  कु. भक्ती जोशी व कु. हर्षा कातकडे यांनी संस्कृत सरस्वती वंदनेचे सुस्वर गायन केले. बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय व संस्कृतभारती यवतमाळ शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने संस्कृत वस्तुप्रदर्शिनी व विज्ञानप्रदर्शिनीचे आयोजन  प्रा. मंजुश्री नेव्हल व श्री मोरेश्वर पुंड यांनी केले. संस्कृत विषयाच्या प्रा. डॉ. वैशाली बेडेकर-जोशी यांनी आचार्य पदवी प्राप्त केल्याबद्दल यांचा भंडारा नगरीचे मा. नगराध्यक्ष श्री मेंढे यांच्या हस्ते व संस्कृत भारती यवतमाळ शाखेच्या विद्यमान अध्यक्ष व महाविद्यालयाच्या निवृत्त प्राध्यापिका डॉ. शैलजा रानडे यांचा महाराष्ट्र शासनाचा कवि कुलगुरु कालिदास  संस्कृत साधना पुरस्कार मिळाल्या बद्दल विदर्भप्रान्ताचे उपाध्यक्ष श्रीनिवास वर्णेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ह्या सम्मेलनात महाविद्यालयातील संस्कृत विषयाचे विद्यार्थी प्रसाद तऱ्हाळकर, भक्ती जोशी, हर्षा कातकडे या शिवाय प्रा.मंजुश्री नेव्हल व डॉ. वैशाली बेडेकर-जोशी यांचा सहभाग होता.

संस्कृत वस्तुप्रदर्शनाचे आयोजन

भारतीयसंविधानाच्या आठव्या अनुसूचीत क्रमांक 14 वर संस्कृत भाषेचा उल्लेख आहे. दैनंदिन वापरातील वस्तुंचा परिचय संस्कृत भाषेतून व्हावा यासाठी 26 जानेवारी 2019 ला बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील संस्कृत विभागाने वस्तुप्रदर्शनाचे आयोजन केले. यात धान्य, सुकामेवा, मसाल्याचे पदार्थ, प्राणी, अलंकार, वाहने, कार्यालयीन कामकाजाच्या वस्तु, फळे, नित्य वापरातील वस्तु, संस्कृत विवाह पत्रिका अशा 225 वस्तुंचा परिचय आणि संस्कृतोपलब्धी, मुस्लिमसंस्कृत सेवक, प्रकाशित होणाऱ्या  संस्कृत पत्रिकांचा परिचय भित्तीपत्रकांच्या माध्यमातून करून देण्यात आला.
ह्या प्रदर्शनीचे उद्घाटन वाणिज्य महाविद्यालय न्यासाचे अध्यक्ष मा. श्री. विनायक दाते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. सतीश फाटक, मा. सौ. सुषमाताई दाते, मा. सौ. फाटक, मा. श्री. मंगेश केळकर, प्राचार्य सौ. प्रेरणा पुराणिक, विश्वस्त प्रा. विवेक देशमुख, उपप्राचार्य डॉ. माणिक मेहरे, प्राध्यापक वृन्द आणि विद्यार्थी समुदाय उपस्थित होता. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा.मंजुश्री श्री.नेव्हल, प्रा.डॉ.वैशाली बेडेकर, प्रा.मंजिरी गंजीवाले,प्रा.शिल्पा धर्मे आणि विद्यार्थी शुभम् राऊत, गौरव बावने, रामेश्वर राऊत, ऋतु सव्वालाखे, कु. भक्ती जोशी, कु. हर्षा कातकडे, प्रसाद तऱ्हाळकर  यांनी प्रयत्न केले

सौ.वैशाली बेडेकर-जोशी यांना आचार्य पदवी प्राप्त

दि.२१ डिसेंबर २०१८ रोजी बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ येथील कनिष्ठ विभागातील संस्कृत विषयाच्या अध्यापिका सौ.वैशाली बेडेकर-जोशी यांचा आचार्य पदवी प्राप्त केल्याबद्दल संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.त्यांच्या प्रबंधाचा विषय "आर्षमहाकाव्ये व पंचमहाकाव्यातील शासनविषयक विचारांची वर्तमानकालीन उपादेयता: एक चिकित्सक अध्ययन "हा आहे. नुकत्याच झालेल्या दीक्षांत समारंभात त्यांनाही पदवी प्रदान करण्यात आली. संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या सत्कारप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.विनायक दाते, उपाध्यक्ष मा.श्री.सतीश फाटक, प्राचार्या सौ. पुराणिक, मा.सौ.सुषमा दाते, मा. विद्याताई केळकर, मा.श्री.कासलीकर, प्रा.विवेक देशमुख अश्या विश्वस्तांसह महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग उपस्थित होता. डॉ.वैशाली बेडेकर यांनी आपल्या यशाचे श्रेय त्यांचे कुटुंबीय, मार्गदर्शिका डॉ.सौ.शैलजा रानडे, संस्थेचे पदाधिकारी व सहकारी प्राध्यापकांना दिले आहे.

संभाषण वर्ग

दि. २७ ऑगस्ट २०१८ रोजी स्थानिक बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय व संस्कृत भारती, यवतमाळ शाखेच्या संयुक्त विद्यमाने संस्कृत-संभाषण वर्गाचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून वाणिज्य महाविद्यालय न्यासाचे अध्यश मा. श्री. विनायक दाते, विशेष अतिथी  म्हणून वाणिज्य महाविद्यालय न्यासाच्या सदस्या मा. सौ. सुषमा दाते, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्कृत भारतीय यवतमाळ शाखेच्या अध्यक्ष मा. प्रा. डॉ. सौ. रानडे, उपस्थित होत्या.
संस्कृत हि अनेक भाषाची जननी आहे. या भाषेला पुनरुज्जीवित करून ती राष्ट्रभाषा व्हावी याकरिता संस्कृत प्रेमींनी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मत मा. श्री. विनायक दाते यांनी मांडले मा. सौ. सुषमा दाते यांनी संस्कृत विषयात रुची निर्माण करण्यात शिक्षकाचे योगदान किती महत्वाचे असते हे सांगून संभाषण वर्गासाठी शुभेच्छा दिल्या. अध्यक्ष मा. डॉ. सौ. रानडे यांनी सुरवाणी म्हणून गौरविल्या गेलेल्या संस्कृत भाषेचे अनन्यसाधारण महत्व कथन केले. संस्कृत शिकण्यासाठी विद्यार्थिनी श्रवण, वाचन, लेखन व संभाषण हि चारही कौशल्ये आत्मसात करावी असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, कला स्नातक दिव्तीय वर्षाची विद्यार्थिनी कु. भक्ती महेश जोशी हिने केले संभाषण वर्गाच्या आयोजिका प्रा. वैशाली बेडेकर यांनी प्रास्ताविक केले तर आभार प्रदर्शन प्रा. शिल्पा धर्मे यांनी केले. संभाषण वर्गाचे संचालन प्रा. मंजुश्री नेव्हल करणार आहेत.

“सरलमानकसंस्कृत” एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय,रामटेक, संस्कृत संवर्धन प्रतिष्ठान नवी दिल्ली व संस्कृत  भरती यांच्या संयुक्त विघमाने स्थानिक बाबाजी दाते काला आणि वाणिज्य महाविद्यालयात  “सरलमानकसंस्कृत” कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. हि कार्यशाळा दिनांक १० आगस्ट २०१८ ला संपन्न झली. कार्यक्रमाचे उद्घाटक वाणिज्य महाविद्यालय न्यासाचे उपाध्यक्ष श्री सतीशजी फाटक होते. मार्गदर्शक म्हणून सी.पी. आणि बेरार महाविद्यालय, नागपूर संस्कृत विभाग प्रमुख डॉ विभा क्षीरसागर आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, नागपूरचे व्याकरणविभाग प्रमुख डॉ विजयकुमार मेनन होते. मंचावर संस्कृतभारती यवतमाळ शाखेच्या अध्यक्षा डॉ शैलजा रानडे, अध्यक्षस्थानी सौ प्राचार्य पुराणिक, उपप्राचार्य डॉ माणिक मेहरे, समारोपीय सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ अनुपमा डोंगरे व मंच्चावर डा. कल्पना देशमुख, होते.

जनगणनेनुसार भारतात संस्कृत भाषा ही बोलणारे लोक असल्याचे लक्षात आले. ही भाषा केवळ पूजापठनाची नाही तर विज्ञानाची आहे. असे उद्घाटकीय भाषण करतांना संस्थेचे उपाध्यक्ष मा श्री. सतीशजी फाटक म्हणाले. आजीच्या बटव्याप्रमाणे ज्ञानाचा खजिना असणारी ही भाषा आहे. अध्यन करणारे युवक हे धर्मसंसकृतीचे दीपशिखावाहक आहेत अशी संस्कृतची माहिती मान्यवरांनी आपल्या शब्दात सांगितली. उद्याघटसत्राचे स्त्रचालन प्रा. मंजुश्री श्रीपाद नेव्हल यांनी केले. तर आभारप्रदर्शन संस्कृतभरतीचे जिल्हा संयोजक श्री. मोरेश्वर पुंड यांनी केले.

संस्कृतभाषेचे सरल व पौढ असे दोन मुख आहेत. संपूर्ण देशातील समानता जाणण्यासाठी भाषांवर असणाऱ्या संस्कृतच्या प्रभावाचे अवलोकन करण्यासाठी, भाषास्तरीय राहासाच्या निवारणासाठी, लेखन आणि भाषण यातील एकरूपता साधण्यासाठी सरल संस्कृतचा उपयोग आपल्या अध्ययनाध्यापनात आवर्जून करावा असे प्रतिपादन सत्राचे प्रमुख वक्ते डॉ  विजयकुमार मेनन यांनी केले. तर सी.पी. आणि  बेरार महाविद्यालय, नागपूरच्या संस्कृत विभाग प्रमुख डॉ विभा श्रीरसागर ह्यांनी सरलसंस्कृतचा उपयोग करतांना सरल व्याकरणाचा कसा उपयोग करावा ह्याचे बारकावे सांगितले.

यशस्वी आयोगन महाविद्यालयतील संस्कृत विभागातील प्रा. मंजुश्री नेव्हाल, प्रा. वैशाली बेडेकर, प्रा. वैदेही मोहरीत, प्रा. मंजिरी गंजीवाले व प्रा. शिल्पा धर्मे यांनी केले.

Top