बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ 

Babaji Datey Kala & Vanijya Mahavidyalaya, Yavatmal

(वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ ट्रस्ट रजि. क्र. ई-३२ द्वारा संचालित)

NAAC Accredited B++ Grade with CGPA 2.82

अर्थशास्त्र विभाग – प्रजासत्ताक दिन विशेषांकाचे विमोचन

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील अर्थशास्त्र विभागाच्या वतीने शैक्षणिक सत्र २०२०-२१ च्या विद्यापीठ परीक्षेत महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयात सर्वाधिक गुण प्राप्त गुणवंत विद्यार्थी कानल झोपाटे यांचे हस्ते २६ जानेवारी २०२२ रोजी  प्रजासत्ताक दिन विशेषांक या भिंतीपत्रकाचे विमोचन करण्यात आले. या प्रसंगी इंडियन नेव्हीत नियुक्त माजी विद्यार्थी तथा एन.सी.सी केडेट  अवधूत चव्हाण, माजी विद्यार्थी आरती गोरे, दिनेश कुळसंगे, संकेत ठाकरे, ऋषीकेश राऊत, गौरव बाबरे, गोविंद रिंगणे आणि संपादक मंडळातील विद्यार्थी उपस्थित होते. विभाग प्रमुख प्रा.विनोद तलांडे यांनी या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रीय ग्राहक दिन तथा अर्थशास्त्र अभ्यास मंडळ उद्घाटन समारंभ संपन्न

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ येथील अर्थशास्त्र विभागाच्या वतीने २४ डिसेंबर २०२१ रोजी राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. या समारंभाचे अध्यक्षस्थानी वाणिज्य विभाग प्रमुख मा. डॉ. प्रदिप दरवरे तर उद्घाटक तथा मार्गदर्शक म्हणून लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख आणि गुंतवणूक क्षेत्रातील अभ्यासक मा. प्रा. शैलेंद्र तेलंग हे मान्यवर लाभले होते. मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक सत्र २०२१-२२ करीता गठित केलेल्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळ कार्यकारणीचे रीतसर उद्घाटन करून कार्यकारणी पदाधिकारी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या, तसेच २६ नोव्हेंबर २०२१ रोजी संविधान दिनाच्या निमित्ताने "आर्थिक व सामाजिक विकासा संबंधी भारतीय संविधानातील तरतुदींचा अभ्यास" या विषयावर आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या अनुक्रमे, कु. देवयानी बरडे, महेश सिरसाट, वैभव केमेकार या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी कु.पायल कोवे, कु.साक्षी माकोडे, मयुर तोंडरे, महेश सिरसाट आणि नंदिनी बाकडे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
आपल्या उद्घाटनीय भाषणातून मार्गदर्शन करतांना प्रा.शैलेंद्र तेलंग यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून ग्राहक हक्क व कर्तव्याची जाणीव करून दिली तसेच या बाजाराधिष्ठीत अर्थव्यवस्थेत उपभोक्ता म्हणून व्यवहार करण्यासाठी लागणा-या उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून आपल्याला लाभलेल्या हाताचा आणि बुध्दीचा वापर करून श्रमिक तथा संयोजक म्हणून स्वतःमध्ये कौशल्य निर्माण केले पाहिजे आणि गुंतवणूकीच्या माध्यमातून भांडवल निर्मिती करून आत्मनिर्भर बनले पाहिजे असा सल्ला दिला. अध्यक्षीय भाषणातून डॉ. प्रदीप दरवरे सरांनी अर्थशास्त्र विभागाचे कौतुक करून या अभ्यास मंडळाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करून आपला व्यक्तीमत्व विकास घडवून आणावा अशी अपेक्षा व्यक्त करून मोलाचे मार्गदर्शन केले. प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.विनोद तलांडे, तर संचालन कु. देवयानी बरडे आणि आभार प्रदर्शन वैभव केमेकार यांनी केले.

अर्थशास्त्र विषयाचा ऑनलाइन क्लास सुरू

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ येथील विद्यार्थ्यांचे या बंदच्या काळातील शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी WhatsApp द्वारे त्यांना अर्थशास्त्राचे नोट्स देऊन Zoom App द्वारा online class घेऊन मार्गदर्शन केले जात आहे. तसेच फोन च्या माध्यमातून संपर्क करण्या-या विद्यार्थ्यांच्या शंका व शैक्षणिक अडचणी चे निराकरण केले जात आहे.
यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा अशी अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.विनोद तलांडे यांचे तर्फे आग्रहाची सूचना आहे.

दाते कॉलेजमध्ये ‘भारतीय शेतीची वर्तमान स्थिती’ यावर चर्चासत्र

बाबाजी दाते कला व वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ येथील अर्थशास्त्र विभागाचे वतीने दि.०७/०३/२०२० रोजी "भारतीय शेतीची वर्तमान स्थिती" या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले.
या चर्चासत्रात संतोष चौधरी, यवन कावलकर आणि आदेश राठोड या विद्यार्थ्यांनी विषयाची मांडणी केली. कृषी अभ्यासक म्हणून ख्याती असलेले चर्चासत्राचे वक्ते डॉ. करमसिंग राजपूत यांनी शेती व शेतकऱ्यांच्या समस्याचे विवेचन करून किमान उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव, वाजवी दरात कृषी पतपुरवठा व कृषीमालाच्या आयात-निर्यात धोरणातील प्रशुल्क निती व सबसिडी धोरणात बदल केल्याशिवाय शेतीच्या व शेतकऱ्यांच्या समस्या सुटणार नाहीत असे विचार व्यक्त केले.
या प्रसंगी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ उन्हाळी २०१९ परीक्षेत बी.ए.च्या अर्थशास्त्र विषयात प्रथम क्रमांक प्राप्त करून रौप्यपदकाची मानकरी ठरलेली गुणवंत विद्यार्थीनी कु.वैशाली सिद्धार्थ भगत यांचा अर्थशास्त्र विभागाचे वतीने मान्यवरांच्या शुभहस्ते भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
आपल्या अध्यक्षीय भाषणातून मा.विनायक दाते यांनी गुणवंत विद्यार्थिनी कु.वैशाली भगत व महाविद्यालयाला तब्बल तिन वेळा हा सन्मान मिळवून देणा-या अर्थशास्त्र विभागाचे कौतुक केले. यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून अग्रेसर असणे ही बाब निश्चितच भूषणावह नसून चिंतेची आहे असे ते म्हणाले.
या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ.माणिक मेहरे व सिनेट सदस्य प्रा. विवेक देशमुख या मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा विनोद तलांडे,  सुत्रसंचलन कु.पूजा मानकर व आभार प्रदर्शन आदेश राठोड यांनी केले.

अर्थशास्त्र विषयावर गेस्ट लेक्चर

कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नवापूर जि.नंदुरबार येथील अर्थशास्त्र विभागातील सहा.प्राध्यापक डॉ.सुदाम कोरडे यांचे दि १६ डिसेंबर २०१९ रोजी महाविद्यालयातील अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे वतीने गेस्ट लेक्चर आयोजित करण्यात आले. या वेळी डॉ कोरडे सरांनी "रोजगार व स्वयंरोजगारात अर्थशास्त्राचे महत्त्व" विषद करून स्पर्धा परीक्षे संबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, विद्यार्थ्यांच्याही यात प्रतीसाद मिळाला.

प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.विनोद तलांडे यांनी केले.

अर्थशास्त्र विषयाचा राज्यस्तरीय परिसंवाद संपन्न

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ येथे रविवार दि.१ डिसेंबर २०१९ रोजी अर्थशास्त्र प्रबोधन मंडळ व बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने विदर्भ अर्थशास्त्र परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमा निमित्ताने आयोजित अर्थशास्त्र विषयावरील राज्यस्तरीय परिसंवाद संपन्न झाला.
उद्घाटनीय सत्रात वाणिज्य महाविद्यालय ट्रस्ट चे अध्यक्ष मा.विनायकजी दाते यांचे अध्यक्षतेखाली नामवंत अर्थतज्ज्ञ डॉ.श्रीनिवास खांदेवाले यांचे "मंदि निवारण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवरील उपाय" या विषयावर बिजभाषण झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन नामवंत डॉ.दि.व्यं.जहागिरदार यांचे हस्ते झाले. या प्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मा.कुलगुरू डॉ.मृणालिनी फडणवीस, प्रभारी प्राचार्य डॉ.माणिक मेहरे यांची उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भांडवलकर तर मनोगत विदर्भ अर्थशास्त्र परिषदचे कार्याध्यक्ष प्रा..निवृत्ती पिस्तुलकर यांनी केले सुत्रसंचलन डॉ.प्रतिभा काळमेघ व आभार प्रदर्शन प्रा.विनोद तलांडे यांनी केले.
दुसऱ्या सत्रात डॉ.आर.वाय.माहोरे यांचे अध्यक्षतेखाली, वाणिज्य महाविद्यालय ट्रस्ट चे सदस्य प्रा.विवेक देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ.दि.व्य.जहागीरदार यांचे "नोबेल पारितोषिक प्राप्त अभिजित बेनर्जी यांचे आर्थिक विचार" या विषयावर व्याख्यान झाले.या सत्राचे सुत्रसंचलन प्रा.गजानन रहाटे तर आभारप्रदर्शन प्रा.अजय तगडपेल्लेवार यांनी केले.

"कौशल्य विकास व करिअर मार्गदर्शन" चर्चा सत्र संपन्न

दाते महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग व करिअर गाईडन्स सेल च्या वतीने दि.२७/०९/२०१९ रोजी आयोजित करण्यात आलेले "कौशल्य विकास व करिअर गाईडन्स" चर्चा सत्र वाणिज्य महाविद्यालय न्यास या संस्थेचे उपाध्यक्ष मा.सतिश फाटक यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाले.
केंद्र सरकारच्या रोजगार आणि प्रशिक्षण निदेशालय अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या "मॉडेल करिअर सेंटरचे" Young Professional Counselor पदावर कार्यरत असलेले मा. श्री. प्रफुल्ल दास यांचे समुदेशनात हे चर्चा सत्र संपन्न झाले. मा.दास यांनी विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगार करीता ऑन लाईन रजिस्ट्रेशन, करिअर निवड, कल चाचणी, मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया अशा महत्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन केले. जिल्हा समन्वयक मा. वैभव काकडे यांचेही या विषयावर मार्गदर्शन मिळाले.
या प्रसंगी सिनेट सदस्य, संस्थेचे विश्वस्त मा. प्रा. विवेक देशमुख, उपप्राचार्य डॉ. सौ.माणिक मेहरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा. डॉ.हरिदास धुर्वे, व संचालन प्रा विनोद तलांडे यांनी केले. प्रा. डॉ ताराचंद कंठाळे, प्रा. सचिन जयस्वाल व प्रा. प्रशांत बागडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

अर्थमंथनचा स्वातंत्र्य दिन विशेषांकाचे विमोचन

अर्थशास्त्र विभागाचे वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमाअंतर्गत "अर्थमंथन" या सदराखाली संपादक मंडळाने "स्वातंत्र्य दिन विशेषांक" हे भित्ती पत्रक तयार करून स्वातंत्र्य दिनी १५-८-२०१९ रोजी मा. प्रा. विवेक देशमुख यांचे हस्ते प्रकाशित करण्यात आले.  या अंकात भारताच्या अर्थ व्यवस्थेची वैशिष्ट्ये, मंदीची कारणे आणि भारताचा अर्थसंकल्प या विषयांवर अभ्यासपूर्ण लेखांचा समावेश होता. या प्रसंगी प्रभारी प्राचार्य डॉ.सौ माणिक मेहरे, डॉ.हरीष धुर्वे, डॉ.ताराचंद कंठाळे, विभाग प्रमुख प्रा.विनोद तलांडे व संपादक मंडळ उपस्थित होते.

अर्थशास्त्र अभ्यास मंडळ व संपादक मंडळाचा उद्घाटन सोहळा संपन्

शैक्षणिक सत्र २०१९-२० करिता अर्थशास्त्र विभागाचे वतीने आयोजित करण्यात येणारे उपक्रम पार पाडण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळ व संपादक मंडळांचे उद्घाटन दि.१४/०८/२०१९ रोजी श्री म. द. भारती महाविद्यालय आर्णि येथील अर्थशास्त्र विभाग प्रमुख तथा विदर्भ विद्यापीठ अर्थशास्त्र शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.निवृत्ती पिस्तुलकर यांचे शुभहस्ते संपन्न झाले. या प्रसंगी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ.सौ.माणिक मेहरे तर प्रमुख अतिथी म्हणून माजी अधिष्ठाता, सिनेट सदस्य, इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.विवेक देशमुख व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख प्रा.विनोद तलांडे, सुत्रसंचलन कु.पुजा मानकर व आभारप्रदर्शन कु.प्रतिक्षा बुटले यांनी केले. या प्रसंगी कु. जयश्री मानकर, संतोष चौधरी, यवन कावलकर या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना विषयावर मार्गदर्शन केले.

स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन व सत्कार समारंभ संपन्न

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ  येथील अर्थशास्त्र अभ्यास मंडळाच्या वतीने दि.१४ जानेवारी २०१९ रोजी  मा.उपप्राचार्य डॉ.सौ.माणिक मेहरे यांचे अध्यक्षतेखाली स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व सत्कार समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा जिज्ञासा करीअर अकादमीचे अकॅडमीचे संचालक व मार्गदर्शक श्री गजेन्द्र ठाकूर लाभले होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून २०१८ च्या उन्हाळी परिक्षेत अर्थशास्त्र विषयात विद्यापीठातून प्रथम क्रमांकाचे  रौप्यपदक विजेती कु. पूजा पुंडलिकराव गावंडे यांचाही  भावपूर्ण सत्कार आयोजित करण्यात आला. या प्रसंगी २०१२ च्या विद्यापीठ परिक्षेत अर्थशास्त्र विषयात प्रथम क्रमांक व ८ वा सामान्य मेरिट प्राप्त माजी विद्यार्थीनी कु. नमिता हांडे (ट्रेझरी ऑफीस, वाशिम) प्रमुख अतिथी म्हणून लाभल्या होत्या.
या तिन्ही माजी गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यार्थी जीवनातील अनुभव कथन करून या स्पर्धेच्या युगात परिस्थितीची जाणीव ठेवून व स्वतःला ओळखून सिध्द होण्याच्या संदर्भात बहुमोल मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे गौरव करत त्यांनी सांगितलेले अनुभव ऐकून उपस्थित विद्यार्थी भारावून गेले. मा. उपप्राचार्य डॉ.मेहरे मँडम यांनी अध्यक्षीय भाषणातून गुणवंताचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, विभाग प्रमुख प्रा.विनोद तलांडे यांनी केले तर सुत्रसंचलन कु.पूजा मानकर  व आभारप्रदर्शन कु.जयश्री जाधव यांनी केले.

अर्थशास्त्र विषयात विद्यापीठात प्रथम क्रमांक

कु.पूजा पुंडलिकराव गावंडे
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी २०१८- बी.ए.च्या परिक्षेत महाविद्यालयातील विद्यार्थीनी कु.पूजा पुंडलिकराव गावंडे ही अर्थशास्त्र विषयात विद्यापीठात प्रथम क्रमांक प्राप्त करून स्व.भिमरावजी श्रावणजी यावले स्मृती रौप्यपदकाची मानकरी ठरली. अतिशय चिकाटी व जिद्दीने हे यश मिळवून महाविद्यालयाच्या यशाच्या उज्वल परंपरेत मानाचा तुरा रोवणा-या पूजा गावंडे या गुणवंत विद्यार्थीनीचा संस्थेच्या वतीने भावपूर्ण सत्कार सोहळा दि.२१ डिसेंबर २०१८ रोजी महाविद्यालयात संस्थेचे अध्यक्ष मा.विनायकजी दाते यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष मा.सतिषजी फाटक, विश्वस्त सौ सुषमाताई दाते, बाबाजी दाते महिला सहकारी बँकेच्या अध्यक्षा मा.विद्याताई केळकर, मा.विजयराव कासलीकर, मा.प्राचार्य सौ.प्रेरणा पुराणिक, उपप्राचार्य डॉ.माणिक मेहरे, सिनेट सदस्य प्रा.विवेक देशमुख हे मान्यवर व महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजा गावंडेचा सत्कार केल्यानंतर पूजाने आपले मनोगत व्यक्त करतांना,१२ वी सायन्सची असणारी मी विद्यार्थीनी मोठ्या विश्वासाने बाबाजी दातेंच्या महाविद्यालयात बी.ए.ला प्रवेश घेतला आणि या महाविद्यालयातील प्राध्यापकांनी माझा हा विश्वास सार्थ ठरविला. विषयाची ओळख नसणारा व इतरांनाही कठीण वाटणारा अर्थशास्त्र हा विषय सरांच्या मार्गदर्शनातून माझ्या जिव्हाळ्याचा झाला या महाविद्यालयाच्या संस्कारामुळेच मी हे यश संपादन करू शकले ,असे भावपूर्ण विचार मांडले.
मा.अध्यक्ष व उपाध्यक्ष साहेबांनी गुणवंत विद्यार्थीनीचे व म:नपूर्वक अभिनंदन,कौतुक करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.विनोद तलांडे यांनी केले.