बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ 

Babaji Datey Kala & Vanijya Mahavidyalaya, Yavatmal

(वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ ट्रस्ट रजि. क्र. ई-३२ द्वारा संचालित)

NAAC Accredited B++ Grade with CGPA 2.82

मराठी विभाग – श्वेता विलास राऊत ही विद्यार्थिनी विद्यापीठाच्या गुणवत्ता(मेरीट) यादीत २ री

शैक्षणिक सत्र २०२१-२०२२ मध्ये मराठी वाड; मय पारंगत ची उन्हाळी परीक्षा २०२२ मधील श्वेता विलास राऊत ही विद्यार्थिनी विद्यापीठाच्या गुणवत्ता(मेरीट) यादीत २ री आली आहे. तीन वर्षे सतत आपल्या विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकून महाविद्यालयाची मान उंचावत आहेत. त्याकरिता मराठी विभागातील अध्यापन करणाऱ्या सर्व प्राध्यापक तसेच श्वेता राऊत हिचे मनःपूर्वक अभिनंदन..

दाते कॉलेज मध्ये ‘कुसुमाग्रज जयंती' आणि 'मराठी राजभाषा गौरव दिन' संपन्न

मराठी वाड;मय अभ्यास मंडळाद्वारा बाबाजी दाते कला व वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ येथे स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ रोजी ‘ कुसुमाग्रज जयंती’ आणि ‘मराठी राजभाषा गौरव दिन' मोठ्या हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून प्रतिमा पूजनाने झाली. "माझा मराठाची बोलू कौतुके" या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या तेराव्या शतकातील अजरामर ओव्यांपासून तर सुरेश भटांपर्यंतचा मायबोलीचा गोडवा अतिशय सुंदररित्या प्रा. वैशाली सोनकुसरे यांनी प्रास्ताविकातून सादर केला. सिद्धेश बसवेश्वर माहुलकर यांनी आपली कविता तर विकी मंगल पवार यांनी कुसुमाग्रजांची 'कणा' ही कविता पहाडी आवाजात सादर करून कार्यक्रमात रंगत भरली.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. विजय गाडगे यांनी मराठी भाषेचे जतन संवर्धन करण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे सांगितले. "मायबोलीचे अस्तित्व टिकविण्यासाठी चालणे, बोलणे, लिहिणे, शिकणे, विचार करणे असे सर्व व्यवहार मातृभाषेतूनच झाले पाहिजे" असे मत त्यांनी व्यक्त केले. प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले डॉ. विवेक देशमुख विचारमंचावरून बोलताना म्हणाले "ज्ञान असून चालत नाही तर भाषेवर आपले प्रभुत्व असावे लागते. मराठी भाषेला लवकरच अभिजात दर्जा मिळेल" अशी आशा त्यांनी बोलताना व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना मा. विनायक दाते म्हणाले की, एकूणच मराठी साहित्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील साहित्यिकांचे मोठे योगदान आहे. यवतमाळचे मराठी शायर भाऊसाहेब पाटणकर यांचा उल्लेख करताना त्यांच्या शायराना अंदाजात त्यांनी मराठी शायरीचे वैशिष्ट्य सांगितले. सर्व व्यवहार मराठी भाषेतूनच व्हावे असा संदेश त्यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना दिला. मंचावर मराठी विभाग प्रमुख डॉ.स्मिता शेंडे विराजमान होत्या.
या कार्यक्रमात महाविद्यालयातील डॉ. ताराचंद कंठाळे, डॉ. सचिन जयस्वाल, डॉ.सचिन तेलखेडे, डॉ. वैशाली मेश्राम तसेच मराठी विभागात कार्यरत असलेले प्रा. स्मिता देशमुख, प्रा. सोनाली देशकर, प्रा. नानकसिंग साबळे, प्रा. वैभव डब्बावार यांची उपस्थिती होती.सर्व मराठी विभागातील प्राध्यापक तसेच अभ्यास मंडळातील विद्यार्थ्यांच्या परिश्रमातुन बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

मराठी वाड;मय पारंगत विभागाने तिसऱ्यांदा दाते कॉलेजचे नाव गुणवत्ता यादीत झळकवले

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ मध्ये असलेल्या मराठी वाड;मय पारंगत या विभागातील विद्यार्थीनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी २०२१च्या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवत्ता यादीत रेणुका प्रभाकर ब्राम्हणाचार्य या विद्यार्थिनीने ६ वी मेरीट येऊन आपले स्थान पटकावले आहे आणि महाविद्यालयाचा गुणवत्ता यादीत येण्याचा उज्वल उपक्रम सातत्याने टिकवून ठेवला आहे. यापूर्वी २०१८ च्या परीक्षेत या महाविद्यालयातील ५ विद्यार्थीनी गुणवत्ता यादीत झळकल्या होत्या; तर २०२० च्या उन्हाळी परीक्षेत २ विद्यार्थीनी गुणवत्ता यादीत आल्या आहेत. हीच उज्वल परंपरा कायम राखत रेणुका प्रभाकर ब्राम्हणाचार्य तिसऱ्यांदा महाविद्यालयाचे नाव गुणवत्ता यादीत नोंदविले गेले.
या विद्यार्थिनीचे कौतुक वाणिज्य न्यासाचे अध्यक्ष मा. श्री विनायक दाते, उपाध्यक्ष मा. श्री. सतीश फाटक व सर्व प्राध्यापक वर्गाने केले.

क्रांतिजोती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ येथे दि. ३ जानेवारी २०२२ ला मराठी वाड;मय अभ्यास मंडळ द्वारा आयोजित सावरकर सभागृहात "क्रांतिजोती सावित्रीबाई फुले जयंती" कार्यक्रम डॉ.स्मिता शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली सम्पन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमा पूजनाने झाली. बी ए प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी कु.चैताली जाधव हिने डिसेंबर २०२१ ला राष्ट्रीय स्तरावरील कराटेपटू म्हणून प्राविण्य प्राप्त केल्याबद्दल तिचा स्मृतिचिन्ह सत्कार करण्यात आला.
प्रमुख वक्ता प्रा.सोनकुसरे यांनी आपण सावित्रीबाई फुले यांच्या विचाराचा वारसा घेऊन आपली प्रगती करून यश संपादन करू शकता असा संदेश दिला. प्रा.सोनाली देशकर यांनी विद्यार्थ्यांना महात्मा जोतिबा फुले यांच्या विचारांचा परिचय करून दिला. अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ.स्मिता शेंडे म्हणाल्या की फुले दाम्पत्यांच्या विचाराचा वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारून प्रत्येकाने निश्चित केलेल्या ध्येयापर्यंत जाऊन पोचता येते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.स्मिता देशमुख यांनी केले तर संचलन मीनाक्षी ढोबळे हिने केले. आभार भारती उईके हिने मानले. महेश सिरसाट, विक्की मंगलपवार, पायल राठोड विभा गावंडे, साक्षी माकोडे, प्रतिभा नागभिडकर या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कर्तृत्वावर गीत आणि मनोगतातून प्रकाश टाकला. साई अडवलवार, कुणाल बेदरे, रोहन टाले, दीपाली लढे, यश मार्कंड यांच्या परिश्रमातुन बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम यशस्वी रीत्या संपन्न झाला.

वाड;मय अभ्यास मंडळाचे उद्घाटन आणि संत गाडगेबाबा पुण्यतिथी

बाबाजी दाते कला वाणिज्य महाविद्यालयात "मराठी वाड;मय अभ्यास मंडळाचे उद्घाटन” आणि संत गाडगेबाबा पुण्यतिथी" या कार्यक्रमाचे आयोजन मराठी विभागाचे वतीने दिनांक २०-१२-२०२१ ला सावरकर सभागृहात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी होत्या. अनेक पुरस्कार प्राप्त नव्या दमाचे वऱ्हाडी कवी श्री. जयंत चावरे हे प्रमुख वक्ते होते. कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलन आणि संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. मान्यवरांचे ग्रंथ भेट देऊन स्वागत करण्यात आले. अभ्यास मंडळाचे रितसर उद्घाटन झाल्यावर प्रमुख अतिथी जयंत चावरे यांनी ओघवत्या वऱ्हाडी भाषेतील मन हेलावून टाकणाऱ्या काव्यातून रसिकांच्या डोळ्यात अश्रू आणले, तसेच विनोदी कवितांनी आस्वादकांना खळखळून हसवले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. वैशाली सोनकुसरे तर अतिथीचा परिचय प्रा. स्मिता देशमुख यांनी करून दिला. उत्कृष्ठ संचलन पायल राठोड यांनी केले. मंचावर डॉ. स्मिता शेंडे यांची उपस्थिती होती. तर मराठी विभागातील डॉ. आशालता आसुटकर, प्रा. सोनाली देशकर, प्रा. रेणुका शेंदरे, प्रा.विनोद तलांडे अर्थ शास्त्र विभाग, प्रा.गजानन लांजेवार इतिहास विभाग यांची उपस्थिती लाभली. आभार महेश विरदंडे यांनी मानले. पायल राठोड, कुणाल बेदरे, अजय मांडवकर, साई अडवलवार, रोहन टाले, दीपाली लढे, अवंतिका होनमाणे, यश मार्कंड यांच्या परिश्रमातुन बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

"प्रतिबिंब" वर्षिकांक प्रकाशन सोहळा, सत्र-२०२०-२०२१

शिक्षणमहर्षी श्रद्धेय बाबाजी दाते यांनी स्थापन केलेल्या विशुद्ध विद्यालय शिक्षण संस्था आणि वाणिज्य महाविद्यालय न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला सर्व संस्थेचा एकत्रित शिक्षक दिन व बाबाजी दाते यांची जयंती समारोह विवेकानंद शाळेच्या सभागृहात दि. ५ सप्टेंबर २०२१ ला उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. विनायक दाते यांनी भूषविले.
या कार्यक्रमात दाते महाविद्यालयात "प्रतिबिंब" वार्षिकांकाचे मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. नियमित दरवर्षी निघणारा "वार्षिकांक" मराठी विभाग प्रमुख डॉ. स्मिता शेंडे यांनी शैक्षणिक सत्र २०२०-२०२१ मधील संपादक मंडळाच्या अथक परिश्रमाने, सर्वांच्या सहकार्यातून तयार केला. याप्रसंगी संपादक डॉ.स्मिता शेंडे, सहसंपादक डॉ.ताराचंद कंठाळे यांची उपस्थिती होती.
या वार्षिकांकात विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या विविध विषयांमध्ये विशेषतः कोविड १९ यावर कविता आणि वैचारिक लेखाचा जास्तीत जास्त समावेश आहे. कोविड १९ या जागतिक महामारीचा मानवी जीवनातील सर्वच क्षेत्रावर कसा परिणाम झाला, त्यामुळे मानवी जीवन कसे होरपळून निघाले, याचा आढावा अनेक लेख आणि कवितांमधून घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या वाड;मय निर्मितीची वैविध्यपूर्ण कलाकृतीची मराठी, संस्कृत, इंग्रजी या भाषेतील रचना वाचनीय झालेली आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वातील वाड;मय निर्मितीला पडलेले विविध पैलूंचे प्रकटन यामध्ये अभिव्यक्त झालेले आहे. या नाविन्यपूर्ण वार्षिकांकाचे संपादक मंडळातील सदस्य डॉ. वैशाली बेडेकर, प्रा. रुकेश पंचभाई, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रदीप दरवरे, वेळेत शब्दांकन करून देणाऱ्या सौ. मीरा केळकर या सर्वांच्या सहकार्यातून हा अंक साकार झाला

बाबाजी दाते महाविद्यालयातील वांग्मय पारंगतला मेरिट आलेल्या विद्यार्थीनीचा सत्कार

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ येथे १९९३ पासून एम.ए. मराठी (वांग्मय पारंगत) विभाग सुरू झाला. तेव्हापासून या विभागाने आजपर्यंत बरेच गुणवंत विद्यार्थी दिले आहेत. २०१७-२०१८ या सत्रातील विद्यापीठाच्या २०१८ च्या उन्हाळी परीक्षेत दाते महाविद्यालयातील एकूण ५ विद्यार्थिनीं अनुक्रमे ५ ते १० विद्यापिठाच्या वाड;मय पारंगत मराठी या विषयाच्या गुणवत्ता (मेरिट) यादीत झळकुन महाविद्यालयाचा मान सन्मानाने उंचावला होता. ही घटना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली आहे. एका महाविद्यालयातील एम.ए. मराठीच्या ५ विद्यार्थीनी गुणवत्ता यादीत येऊन नवा इतिहास घडवला. हा सन्मान बाबाजी दाते महाविद्यालयाला मिळाला होता.
२०२० च्या विद्यापिठाच्या उन्हाळी परीक्षेच्या २८ नोव्हेंबर २०२० मध्ये लागलेल्या निकालात दोन विद्यार्थीनी गुणवत्ता यादीत पुन्हा एकदा झळकल्या आहेत. १) ट्विंकल वसराम राठोड ही ७ वी मेरिट आली आहे. तिला ७९.३१% मिळाले आहेत. २) अश्विनी सुरेश खडसे ही १० वी मेरिट आली आहे. ही ७७.३१% गुण घेऊन उत्तीर्ण झाली आहे.
या विद्यार्थिनींचा सत्कार दि ५-९-२०२१ रोजी स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचे आणि एम.ए. मराठीला अध्यापन करणाऱ्या प्राध्यापकांचे अभिनंदन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वाणिज्य महाविद्यालय न्यासाचे अध्यक्ष मा. विनायक दाते हे विराजमान होते, तर मंचावर मा. विद्याताई केळकर, मा. सतीश फाटक, मा. सौ.शर्मिला फाटक, मा. मंगेश केळकर, प्रमुख अतिथी मा. डॉ. शैलजा रानडे, मराठी विभाग प्रमुख डॉ. स्मिता शेंडे यांची उपस्थिती होती.

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ - मराठी पदव्युत्तर विभागाच्या दोन विद्यार्थिनी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी २०२०च्या घेण्यात आलेल्या परीक्षेत अनुक्रमे कु. टिंकल वसराम राठोड सातवी मेरिट तर कु. अश्विनी सुरेशराव खडसे दहावी मेरिट येऊन महाविद्यालयाच्या गुणवत्तेत येण्याची परंपरा कायम राखत महाविद्यालयाच्या नावलौकीकात मानाचा तुरा खोवला. दोन्हीही विद्यार्थिनिंनी प्राप्त केलेल्या यशाकरिता वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ ट्रस्टचे अध्यक्ष मा. श्री. विनायक दाते उपाध्यक्ष मा. श्री. सतीश फाटक आणि सर्व सदस्य तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप दरवरे मराठी विभाग प्रमुख डॉ. स्मिता शेंडे तसेच डॉ. आशालता आसुटकर डॉ. अशोक खंडारे डॉ. सुचिता ढेरे प्रा. अशोक साळवे प्रा. दीपाली राऊत या सर्वांनी अभिनंदनासह कौतुक केले.

दाते कॉलेजमध्ये मराठी विषयाचे online वर्ग

कोरोना या महामारीच्या काळात विद्यापीठाच्या अनिश्चित काळासाठी लांबलेल्या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये तसेच त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून बाबाजी दाते कला आणि वाणिज्य या महाविद्यालयातील मराठी विभागाने विद्यार्थ्यांकरिता Zoom Online Classes दि.१५/०४/२०२० पासून  नियमीत सुरू केलेले आहेत . याकरिता विद्यार्थ्यांना अभ्यासवर्गाचे वेळापत्रक दिलेले आहे. त्यानुसार बी.ए. व बी.कॉम. या वर्गाचे मराठी अनिवार्य आणि मराठी वाड;मय या विषयाचे  Online अभ्यासवर्ग नियमित सुरू आहेत. या अभ्यासवर्गात विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकविले जातात. मराठीच्या विविध विषयांवर प्रा डॉ. स्मिता शेंडे व प्रा डॉ. आसुटकर यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग उल्लेखनीय आहे.

दाते कॉलेज मध्ये मराठी राजभाषा गौरव दिन संपन्न

मराठी राजभाषा गौरव दिन, कवी कुसुमाग्रज यांची जयंती  या कार्यक्रमाचे आयोजन दि.27/02/2020 ला मराठी वाङ्मय अभ्यास मंडळाद्वारे करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. माणिक मेहरे होत्या. कार्यक्रमाची सुरवात प्रतिमा पुजन करून करण्यात आली. अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ. माणिक मेहरे म्हणाल्या की विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा वापर व्यवहारात नियमित करायला पाहिजे तरच ती टिकेल. प्रमुख वक्त्या प्रा.वैशाली सोनकुसरे यांनी मार्गदर्शन करताना मराठी भाषेचे आपल्या जीवनात असलेले महत्त्व पटवून सांगितले. भाषा ही आपल्या संस्कृतीचे दर्शन घडविण्याचे महत्वपूर्ण कार्य करते. खरच आपल्याला मराठी भाषा जगवायची असेल तर मराठी माणसाने  मराठी   भाषेशी इमान राखले पाहिजे तरच आपल्याला मराठी भाषेची अस्मिता टिकवून ठेवता येईल असे स्पष्ट मत मांडले. साहित्यिक प्रा. माधव सरकुंडे यांनी  आपल्या मनोगतातून  मातृभाषा हिचे मानवी जीवनात किती महत्व आहे यावर सखोल मार्गदर्शन केले तसेच आज जगातील  भाषा कशा झपाट्याने मृतप्राय होत चालल्या याकडे लक्ष वेधले. विदयार्थ्यांनी कवी कुसुमाग्रजांच्या कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघर्ष शेंडे यांनी, संचलन महेश सिरसाट तर आभार अवंती  होनमाने या विद्यार्थ्यांनी मानले. मंचावर डॉ. स्मिता शेंडे, डॉ. आशालता आसुटकर, प्रा. भाग्यश्री अंबाडकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिन भित्तिपत्रक

२६ जानेवारी २०२० प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मराठी विभागातील विद्यार्थ्याने प्रजासत्ताक दिनाच्या विषयीची माहिती भित्तिपत्रकात लिहिली आहे. भारतीय संविधान, त्याची निर्मिती प्रक्रिया, त्यातील उद्देशिका, मुलभूत तत्वे   स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय  याचा स्विकार भारताने केला आहे.  त्यामुळे आपल्या देशात लोकशाही यशस्वी पणे अस्तित्वात आहे. या विषयावर तयार केलेल्या 'आकांक्षा' या भित्तीपत्रकाचे विमोचन संस्थाध्यक्ष मा. विनायक दाते, विश्वस्त सौ. सुषमा दाते, महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. माणिक मेहरे यांच्या हस्ते  करण्यात आले.

'प्रतिबिंब' वार्षिकांकाचे प्रकाशन

दि. २५ जानेवारी २०२० रोजी युवक महोत्सव दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाचा वार्षिकांक ‘प्रतिबिंब’ चा प्रकाशन सोहळा मराठी विभागाच्या वतीने यवतमाळ येथील प्रथितयश सनदी लेखाधिकारी तथा आमच्या महाविद्यालयाचे गुणवंत माजी विद्यार्थी श्री प्रविण गांधी यांच्या हस्ते करण्यात आला.
शैक्षणिक वर्षात निघणाऱ्या ‘प्रतिबिंब’ साठी विद्यार्थ्यांनी आपले विचार शब्दरूपात मांडले आहेत. वार्षिकांकाच्या मुखपृष्ठा करिता विद्यार्थ्यांची स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत प्रथम क्रमांक आकाश कैलास उईके, द्वितीय क्रमांक संघर्ष विजय शेंडे, तृतीय क्रमांक निहाल चव्हाण या विद्यार्थ्यांनी प्राप्त केला. त्याबद्दल महाविद्यालयाच्या युवा महोत्सवात  त्यांना विश्वस्त मा. सुषमा दाते यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. संपादक मंडळाकडून विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन

'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' अंतर्गत 'लोकनृत्य-पथनाट्य'

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ येथे 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' अंतर्गत 'लोकनृत्य आणि पथनाट्य' या दोन स्पर्धेचे दि.१५/०१/२०२० ला मराठी विभागा कडून आयोजन करण्यात आले.
'लोकनृत्य 'या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. स्नेहल डहाळे या होत्या. परिक्षक म्हणून डॉ.वर्षा कुळकर्णी प्रा. प्रशांत बागडे यांनी जबाबदारी पार पाडली. नृत्यस्पर्धेत १३स्पर्धक  सहभागी झाले होते.  लोकनृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक हर्षदा राऊत(लावणी), द्वितीय क्रमांक समीर शेंडे व समूह (आदिवासी नृत्य) तृतीय क्रमांक ललित नेवारे व समूह (गोंडी नृत्य) प्रोत्साहनपर प्रतिक्षा कांबळे, रविना लढे(लावणी) यांनी पटकावला. कार्यक्रमाचे संचलन दादाजी किनकर, आभार प्रतिक्षा कांबळे या विद्यार्थ्यांनी केले.
'पथनाट्य' स्पर्धा - या स्पर्धेचे अध्यक्ष डॉ. वर्षा कुलकर्णी या होत्या तर परिक्षक म्हणून डॉ. कल्पना देशमुख, प्रा. दत्तात्रय जोशी यांनी जबाबदारी पार पाडली. स्पर्धेत ०६ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेत प्रथम क्रमांक पायल किनाके व समूह(आंदोलन एक परिस्थिती), द्वितीय क्रमांक संघर्ष शेंडे व समूह(बुद्ध मूर्तीचे उध्वस्तिकरण), तृतीय क्रमांक योगेश तरोने व समूह(व्यसन मुक्ती)  , प्रोत्साहनपर    जिशान मेश्राम व समूह(आजची तरुण पिढी) या विद्यार्थ्यांनी पटकाविला.  कार्यक्रमाचे संचलन पूजा मानकर तर आभार रविना लढे या विद्यार्थ्यांनी मानले. मंचावर डॉ. स्मिता शेंडे,डॉ. आशालता आसुटकर यांची उपस्थिती होती. मराठी अभ्यास मंडळातील पदाधिकारी आणि सदस्य यांच्या परिश्रमातून या स्पर्धा यशस्वीपणे सम्पन्न झाल्या.

'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' अंतर्गत 'काव्यस्पर्धा-परिसंवाद'

दाते महाविद्यालयात 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' अंतर्गत 'काव्यस्पर्धा आणि परिसंवाद' या दोन स्पर्धेचे दि.१४/०१/२०२० ला आयोजन करण्यात आले.
'काव्यस्पर्धा' या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. हरिदास धुर्वे व परिक्षक म्हणून प्रा. विनोद तलांडे आणि प्रा. वैशाली कांबळे यांनी जबाबदारी पार पाडली. काव्यस्पर्धेत १८ स्पर्धक  सहभागी झाले होते.  काव्यस्पर्धेत प्रथम क्रमांक महेश शिरसाट, द्वितीय क्रमांक जिशान मेश्राम, तृतीय क्रमांक प्रतिक्षा कांबळे, प्रोत्साहनपर जयश्री मानकर यांनी पटकावला. कार्यक्रमाचे संचलन संघर्ष शेंडे, आभार पूजा सोनूले या विद्यार्थ्यांनी केले.
परिसंवाद स्पर्धा – विषय:-'आजचा तरुण आणि त्याचे समोरील आव्हाने' या विषयावर आयोजित केली होती. या स्पर्धेचे अध्यक्ष प्रा. गोपाल सामृतवार हे होते तर परिक्षक म्हणून डॉ. हरिदास धुर्वे, प्रा. अमोल राऊत यांनी जबाबदारी पार पाडली. स्पर्धेत १० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेत प्रथम क्रमांक पायल किनाके, द्वितीय क्रमांक प्रतिक्षा चांदेकर, तृतीय क्रमांक शैलेश राऊत, प्रोत्साहनपर संघर्ष शेंडे या विद्यार्थ्यांनी मिळविले. कार्यक्रमाचे संचलन पूजा मानकर तर आभार रविना लढे या विद्यार्थ्यांनी मानले.

'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' अंतर्गत 'मराठी भाषा प्रसार व प्रचार'

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ येथे 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' अंतर्गत 'मराठी भाषा प्रचार  व प्रसार' या विषयावर मार्गदर्शन या कार्यक्रमाचे आयोजन दि.१३/०१/२०२० ला करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. माणिक मेहरे, प्रमुख  मार्गदर्शक म्हणून प्रा. श्रद्धा धवने यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलन, प्रतिमा पूजन करून झाली. प्रमुख मार्गदर्शक प्रा. श्रद्धा धवने या नवोदित कवयित्रीचे स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नुकताच प्रकाशित झालेला 'उंबरठा ओलांडताना' हा कविता संग्रह  याच्या ५ प्रती  प्रा. धवने मॅडम यांनी मराठी विभाग आणि उपप्राचार्य यांना ग्रंथालयाकरिता भेट म्हणून दिल्या.
मार्गदर्शक म्हणून बोलताना प्रा. धवने म्हणतात की, व्यवहारातील भाषेच्या वापराबाबत प्रत्येकाने जागरुक असणे महत्त्वाचे आहे. मराठी भाषेवर आपले प्रभुत्व असल्यास आपल्याला नोकरीत प्राधान्य मिळविता येते. जीवनातील भाषेचे महत्व हे अनन्य साधारण आहे अशी जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली. अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. माणिक मेहरे म्हणाल्या की, आपण मराठी या विषयाला महत्व द्यायला पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय डॉ. स्मिता शेंडे मराठी विभाग प्रमुख यांनी करून दिला. संचलन आकाश उईके यांनी तर आभार रविना लढे या विद्यार्थ्याने केले. मंचावर डॉ. आशालता आसुटकर यांची उपस्थिती होती. मराठी अभ्यास मंडळ आणि मराठी विभाग यांच्या परिश्रमातून कार्यक्रम संपन्न झाला.

'काव्य लेखन, वाचन कार्यशाळा'

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ येथे दि.12/09/2019 ला मराठी अभ्यास मंडळ अंतर्गत 'काव्य लेखन, वाचन कार्यशाळा' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. गणेश सांगोळकर, सहादेव भुते कला महाविद्यालय साळवा ता. कुही जि. नागपूर लाभले होते. कवी सांगोळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की कविता ही प्रत्येक मनात दडलेली असते; पण ती कागदावर शब्दरूप घेऊन उतरतेच असे नाही. प्रत्येक माणूस हा कविमनाचा असतो. कवितेचा जन्म व्हायला मानवी संवेदना जीवंत असाव्या लागतात. व्यक्तिला दुःखातून बाहेर पडण्याची ताकद कविता देत असते. कविता निर्मिती, प्रेरणा यावर बोलताना कवितेचे वाचन तर काही कविता गाऊन दाखविल्या. त्यांच्या सुरेल आवाजाने विद्यार्थ्यांच्या मनाला भूरळ घातली
मराठी विभाग प्रमुख डॉ. स्मिता शेंडे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. विद्यार्थ्यांच्या परिश्रमातून आणि बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न झाली.

"मानवाधिकार आणि त्याची प्रासंगिकता"

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ येथे "मानवाधिकार आणि त्याची प्रासंगिकता"  या विषयावर दि.29/08/2019  ला  कार्यक्रम घेण्यात  आला. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. मानवाधिकार  परिषद  मुंबई  आणि दाते महाविद्यालय  यांच्या संयुक्त  विद्यमाने  झाले. कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलन, प्रतिमा पूजन आणि वृक्ष-रोप देऊन मान्यवरांचे स्वागत करून झाली.

अध्यक्षीय  भाषणात  डॉ. माणिक मेहरे म्हणाल्या की, आपल्याला  आपल्या नैतिक  कर्तव्याची  जाणीव  असली  पाहिजे आणि ती जीवनात कृतीत  उतरवू  लागलो  की मानवतेची  प्रचिती  आणि ओळख  व्हायला  लागते. सदभावना निर्माण  होतात. प्रमुख वक्त्या गो.सि.गावंडे महाविद्यालय, उमरखेड  येथील अर्थशास्त्र  विभाग प्रमुख  डॉ.उषा पाटील यांनी सांगितले की  स्त्री-पुरुष, मुले  सर्वाना  सन्मानपूर्वक  जीवन प्राप्त व्हावे याकरिता  मानवी अधिकाराचे जतन शासनाला  करता आले पाहिजे. स्वान्त सुखाय जीवन जगण्याचा  मानवी अधिकार  हा प्रत्येकालाच जन्मताच  नैसर्गिकरित्या  प्राप्त झालेला  आहे. त्याची अमंलबजावणी होण्यासाठी  प्रत्येकानेच  जागरूक  राहिले  पाहिजे.

डॉ.स्मिता शेंडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि प्रमुख वक्ता यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे  संचालन प्रा. प्रमिला नगराळे तर आभार संघर्ष शेंडे यांनी केले. स्वागतगीत संगीत  विभागाच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. मराठी वांड्मय अभ्यास मंडळाच्या सर्व सभासदांच्या परिश्रमातून कार्यक्रम संपन्न झाला.

'मराठी भाषा कौशल्य आणि उपयोजन' यावर कार्यशाळा

दि.24/08/2019  ला बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ येथे मराठी विभाग प्रमुख डॉ. स्मिता शेंडे यांनी आयोजित  केलेली 'मराठी भाषा कौशल्य  आणि उपयोजन'  या विषयावरील  कार्यशाळा सावरकर सभागृहात सकाळी 10.00 ते 12.00 या वेळेत  संपन्न झाली. कार्यशाळेला प्रमुख वक्ता म्हणून डॉ.विश्वजीत कांबळे, मोघे  महाविद्यालय पांढरकवडा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.मार्गदर्शन  करताना विद्यार्थ्यांनी जीवनात स्वतःचे  व्यक्तिमत्व  विकसित  करण्याकरिता संवाद  कौशल्य, भाषण  कौशल्य, लेखन कौशल्य याला  विशेष महत्व  द्यावे असे सांगितले, तसेच हेच कौशल्य तुम्हाला रोजगाराच्या  संधी  उपलब्ध करून देऊ  शकते अशी ग्वाही  दिली.  कार्यशाळेचे उदघाटन डॉ. माणिक मेहरे यांनी केले व त्यांनी डॉ. विश्वजीत कांबळे यांचा स्मृतिचिन्ह  देऊन सन्मान  केला. प्रा. प्रमिला नगराळे यांनी प्रास्ताविक  आणि प्रमुख पाहुण्यांचा परिचय  करून दिला. कार्यक्रमाचे संचालन  आकाश  उईके, उदय जाधव यांनी तर आभार आकाश मुंगले यांनी मानले.

'आकांक्षा' या भित्तिपत्रकाचा 'स्वातंत्र्य दिन' विशेषांक

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ येथे 15 ऑगस्ट  2019 च्या निमित्ताने   मराठी विभागा कडून   'आकांक्षा'  या भित्तिपत्रकाचा   'स्वातंत्र्य  दिन' विशेषांक डॉ. स्मिता शेंडे मराठी विभाग प्रमुख यांच्या मार्गदर्शनात  तयार  करून लावण्यात आला. या भित्तिपत्रकाचे महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. माणिक मेहरे  यांच्या हस्ते  विमोचन  करण्यात आले. सोबत डॉ. हरिदास  धुर्वे, प्रा. विवेक  देशमुख, डॉ. सचिन  जयस्वाल, प्रा. प्रमिला  नगराळे यांची उपस्थिती  होती. तसेच  मराठी अभ्यास  मंडळातील सर्व सदस्य  उपस्थित होते.

या भित्तिपत्रकात स्वातंत्र्य दिनाचे  महत्व काय आहे हे सांगून  आज भारतात अस्तित्वात असलेले स्वातंत्र्याचे स्वरूप कसे आहे या विषयाची  माहिती लिहिली आहे. कवी कुसुमाग्रजांच्या कवितेतील काव्य ओळीतुन देशप्रेम विषयक निष्ठा कशी व्यक्त झाली आहे हे लिहिले आहे. बी.ए. भाग-3  या विद्यार्थ्याच्या परिश्रमातून  हा अंक साकार  झाला आहे.

लोकमान्य टिळक पुण्यतिथी तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

स्थानिक, बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात दि. ०१ ऑगस्ट, गुरुवार रोजी मराठी विभागाच्या वतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथी तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विभाग प्रमुख डॉ. स्मिता शेंडे, प्रमुख वक्ते म्हणून श्री शिवाजी विद्यालय यवतमाळ येथील प्रा.प्रवीण भोयर तसेच प्रा.मंजुश्री नेव्हल या वक्त्यांनी उपरोक्त थोर पुरुष्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. अण्णाभाऊंचे जीवन वारणेच्या खोऱ्यासारखेच संघर्षमय होते. त्यांनी दलित, कष्टकरी, शेतकरी, यांच्या जीवनातील धडगती आग आपल्या साहित्यातून सिलगावली. त्यांच्या साहित्याने जगातील अनेक भाषांत आपल्या रुपस्वरुपाचा प्रभाव टाकला. शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणतो तोच शेतकरी उपाशी राहतो नि शेवटी फेट्यांचाच फास गळ्याभोवती आवळतो. जिवंत जाणिवेचं साहित्य निर्माण करणारे अण्णाभाऊ साठे हे युगप्रवर्तक साहित्यिक होते. या शब्दात प्रा.प्रवीण भोयर यांनी आपले विचार व्यक्त केले.

प्रा.मंजुश्री नेव्हल यांनी लोकमान्य टिळकांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकतांना टिळक हे जहाल राजकीय विचारांनी प्रेरित देशाभिमान जागृत ठेवणारे देशभक्त होते. त्यांनी गीतारहस्य सारखा ग्रंथ लिहून नवीन अन्वयार्थ देऊन ग्रंथ लोकाभिमुख केला असे मत व्यक्त केले. तर अध्यक्षीय भाषणातून डॉ.स्मिता शेंडे  म्हणाल्या ‘कल्पकतेचे कृत्रिम डोळे लाऊन कुणालाही जीवनातील सत्य दिसत नसते. ते सत्य हृदयाने मिळवावे लागत’ अण्णाभाऊ साठे शाळेत शिकले नाही पण लोकजीवन विद्यालयाचे ते जाणकार होते. वेदना, विद्रोह, नकार, त्यांच्या साहित्यातील शब्दाशब्दातून काळीज पिळून काढतो. अण्णाभाऊ हे शाहिरी काव्यातून चेतना जागविणारे लोकशाहीर होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रमिला नगराळे यांनी केले. तर कार्यक्रमाला मराठी विभागाच्या डॉ.आशालता आसुटकर प्रमुख्याने उपस्थित होत्या.

कार्याक्रमाचे संचालन संघर्ष शेंडे, आभार रविना लढे, या विद्यार्थ्यांनी केले. मराठी भाषा, वाड;मय अभ्यास मंडळाचे आध्यक्ष  आकाश उईके सह प्रतीक्षा कांबळे, दीपाली लढे, पूजा जाधव, निहाल चव्हाण, तनु लढी, प्रसिद्धी प्रमुख सागर कुरमिलकर, उदय जाधव. इ. विद्यार्थ्यांच्या परिश्रमातून कार्यक्रम यशस्वी झाला. महाविद्यालयातील विद्यार्थी बहुसंखेने उपस्थित होते.

दिवंगत साहित्यिकांना आदरांजली दरवळत राहील

स्थानिक, बाबाजी दाते कला वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ येथे तूर्तास दिवंगत झालेल्या मराठी साहित्यिकांना मराठी विभागाकडून आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिवंगत साहित्यिक समीक्षक म. सू. पाटील, डॉ. गिरीश कर्नाड, राजा दले, वऱ्हाडी कादंबरीकार पुरुषोत्तम बोरकर ई. ना आदरांजली अर्पित करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विभाग प्रमुख डॉ. स्मिता शेंडे या तर प्रमुख उपस्थितीत डॉ. आशालता आसुटकर, प्रमिला नगराळे यांनी विचारमंचावर आपले स्थान भूषविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा आंबेडकरवादी चळवळीचे खंदे कार्यकर्ते व विचारवंत राजा ढाले तसेच समीक्षक म. सू. पाटील यांच्या मराठी साहित्यातील भरीव कार्य आणि साहित्याबद्दल प्रा. प्रमिला नगराळे यांनी आपले विचार व्यक्त करीत त्यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला. डॉ. आशालता आसुटकर यांनी आपल्या  प्रमुख मार्गदर्शनात डॉ. गिरीश कर्नाड आणि  पुरुषोत्तम बोरकर यांच्या एकूण साहित्याच्या आढावा घेतला. कर्नाड हे  बहुआयामी व्यक्तिमत्व होते. त्यांच्या अभिनय, दिग्दर्शक, नाटककार असे अनेकानेक रूपांना स्पर्श करीत आपल्यातील कलावंत, साहित्यिक शेवटपर्यंत जीवंत ठेवला व याचा अस्सल अनुभव सदोदित देत राहतील या भावनांसह आदरांजली आर्पित केली. पुरुषोत्तम बोरकर यांच्या ‘मेड इन इंडिया’या कादंबरीने  परिचित असलेले, तसेच  वऱ्हाडी भाषेला एक उंची आणि श्रेष्ठत्व बहाल करून, वऱ्हाडी ठसका खरेतर गोड करून हे व्यक्तिमत्व वऱ्हाडी माणसासह सर्वानाच भुरळ घालणारे होते. असे मत आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ.स्मिता शेंडे यांनी व्यक्त केले. या चारही साहित्यिक, समीक्षक, नाटककार,  कादंबरीकारांचा आपल्या साहित्य प्रकारातील उंची व श्रेष्ठत्वाचा अनुभव विषद केला. जीवनवादी जाणीवेच्या कलावंतानी तिन्ही काळाचा वेध घेत पुढे येणाऱ्या जगाची सृजनशील मांडणी करून जिवंत माणसाच्या मानुसपनाच्या जाणिवेच्या पुरोगामी विचारांचा झरा, सदोदित प्रवाहित केला. यांच्या जाण्याने मराठी साहित्य जगात मोठी पोकळी निर्माण झाली असली तरी त्याचे साहित्य सदोदित सर्वाना प्रेरक विचार देत राहून त्यांच्या साहित्यातून सदोदित कीर्तीगंध दरवळत राहिल. या स्मृती जीवंत राहतील, अशा भावपूर्ण शब्दात आदरांजली अर्पित केली.
संचालन –पूजा मानकर, आभार – संघर्ष शेंडे बी.ए. भाग ३ च्या विद्यार्थ्यांनी केले. आकाश उईके, उदय जाधव, निहाल चव्हाण, सागर कुर्मिलकर, रविना लढे, प्रतीक्षा कांबळे, दिपाली लढे, ई, विद्यार्थ्यांनी कार्यक्रमास योगदान देऊन आदरांजली आर्पित केली.

प्रकाशन सोहळ्याकरिता विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन  आकाश उईके. भक्ती पचगाडे तर आभार संचिता डांगे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात आणि सांगता मराठी अभिमान गौरव गीताने करण्यात आली.

वार्षिकांक ‘प्रतिबिंब’ चा मराठी राजभाषा दिनी प्रकाशन सोहळा संपन्न

दि. २७ फेब्रुवारी २०१९ रोजी बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय येथे कवी कुसुमाग्रजांची जयंती तथा मराठी राजभाषा गौरव दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाचा वार्षिकांक ‘प्रतिबिंब’ चा प्रकाशन सोहळा मराठी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य मा. प्रा. प्रेरणा पुराणिक होत्या. तर प्रमुख उपस्थितीत उपप्राचार्य डॉ. माणिक मेहरे, मुख्य संपादक मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. स्मिता शेंडे होत्या.
अध्यक्षांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन, हारार्पण तसेच प्रतिबिंब वार्षिकांकाचे मोठ्या उत्साहात प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक प्रा. अशोक खंडारे यांनी केले. प्रकाशनानंतर डॉ.स्मिता शेंडे यांनी मुख्य संपादक या नात्याने प्रतिबिंब वर प्रकाश टाकताना प्रकाशक, संपादक मंडळ यांचे सहकार्य विद्यार्थ्याचा उत्स्फूर्त सहभाग आणि मोलाचा वाटा असलेल्या मीरा केळकर ज्यांनी अथक परिश्रमातून ‘प्रतिबिंब’ ची नियोजित वेळेपर्यंत बांधणी करून उत्कृष्ट अशी मुद्राप्रत हाती दिली. तसेच सुबक, सुंदर, मुखपृष्ठाची संकल्पना रेखाटनाऱ्या रेखा मनवर या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. राजेश खरजे या विद्यार्थ्याने कवी कुसुमाग्रजांवर विचार व्यक्त केले. दर्शना डोकरमारे या विद्यार्थिनीने ‘कणा’ या कवितेचे वाचन करून आपल्यावर येणाऱ्या अरीष्ठाने खचून न जाता स्वाभिमानाने पुन्हा लढण्यास सिद्ध व्हावे हा आशय व्यक्त केला. तसेच विद्यार्थ्यांनी पुढील शैक्षणिक वर्षात निघणाऱ्या ‘प्रतिबिंब’ साठी आतापासूनच आपल्या विचार भावनांना शब्दरूप द्यायला लागा अशी निर्मितीप्रवण प्रेरणा देत शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयात निरनिराळ्या स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांना अध्यक्षांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.

राष्ट्रीय चर्चासत्रात ' स्त्रीवाद 'या विषयावर विचार मंथन

२४ जानेवारी २०१९ रोजी स्थानिक बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय येथे एक दिवशीय  चर्चासत्राचे आयोजन केले होते. त्यामध्ये १८ शोधनिबंध प्रकाशित झाले. या चर्चासत्राचे  अध्यक्ष आंबेडकरवादी  विचारवंत, कवी प्रा. डॉ. अशोक नामदेव पळवेकर हे होते. प्रमुख अतिथी संत  गाडगे  बाबा  अमरावती  विद्यापीठ  अमरावती येथील  मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. भास्कर पाटील हे होते. अध्यक्ष स्थानावरून बोलताना स्त्री-पुरुष या़ंच्यातील संबंध आणि सत्तासंघर्षाची राजकीय जाणीव असून त्यात पुरुषसत्ताक व्यवस्थेने नाकारलेल्या मानवी जीवनाचा शोध आहे. त्यामुळे स्त्रीवादाचा विरोध पुरुष-वर्गाला नाही तर पुरुषसत्ताक व्यवस्थेला आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. अशोक नामदेव पळवेकर यांनी केले.
'Feminism' (स्त्रीवाद) या विषयावर बोलत असताना मानवाधिकाराच्या वैश्विक जाहीरनाम्यातील उद्देश-पत्रिकेच्या- 'All human beings are born free and equal in dignity and rights’ या पहिल्याच विधानाच्या आधारावर 'स्त्रीवाद' या विषयाची सविस्तर मांडणी करताना डॉ. पळवेकर पुढे असे म्हणाले की, भारतीय 'स्त्री'बद्दल मी जेव्हा विचार करतो, तेव्हा माझ्या मनात इथले धर्मग्रंथ, संस्कृती, समाजव्यवस्था आणि भारतीयांची श्रद्धाशील, तितकीच गुलाम मने ह्या बाबीं प्रामुख्याने माझ्या नजरेपुढे येतात आणि त्यातून आकारत गेलेली पुरुषसत्ताक व्यवस्थेची चौकट व स्त्रियांची अस्तित्वरुपे यांचे अंत:संबंध अधिक स्पष्ट होत जातात. आपल्या समाजव्यवस्थेत 'स्त्री'ला आपण एका बाजूला सांस्कृतिकरणाच्या उदात्तरुपाने पाहतो, तर दुसऱ्या बाजूला सामाजीकरणाच्या अत्यंत न्यूनत्वदर्शक अभिरुपाचे अस्तित्वरुप तिला बहाल करत असतो. या प्रक्रियेत स्त्रीला व्यक्तिरूप नव्हे, तर वस्तुरूप प्राप होते. हे वास्तव जगभरातील सर्वच समाजसमुहात आपल्याला पाहायला मिळते, असे सांगत त्यांनी सिमॉन द बोव्हा यांनी केलेली स्त्रीवादाची मांडणी तसेच ज्यूलिएट मिचेल यांनी कुटुंब संरचनेचे केलेले वर्णन व त्याच्या बदलाची अपरिहार्यता आपण सुबुद्ध मनाने समजून घेण्याची गरज आहे, असेही प्रतिपादन केले. म्हणूनच, नैसर्गिक पातळीवर स्त्री आणि पुरुष ह्या दोनही घटकांची अभिव्यक्ती वेगळी असली तरी ती विरोधी नाही पूरक आहे, हेही आपण समजून घेतले पाहिजे, असे ते यावेळी म्हणाले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून   डॉ भास्कर पाटील आपले विचार व्यक्त करताना असे म्हणाले की भारतीय स्त्रीवाद  यांची  पाळमुळ मला बुद्धाच्या तत्वज्ञानात दिसतात. तिथुनच पुढे  या स्त्रीवादाचा  विचार आपण मराठी साहित्यात   स्वीकारला  आहे.
चर्चासत्राच्या समन्वयक डॉ. स्मिता शेंडे मराठी विभाग प्रमुख  यांनी कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली. पाहुण्यांचा परिचय प्रा.अशोक खंडारे यांनी करून दिला .याप्रसंगी  डॉ. शांतरक्षित गावंडे यांनी स्त्रीवादा   संबधी काही प्रश्न  उपस्थित केले. व डॉ. विश्वजित कांबळे यांनीही प्रस्तुत विषयावर भाष्य  करताना बुद्ध साहित्यातच  स्त्रीवादाची बीज आहेत असे स्पष्ट त्यांचे मत मांडले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे सूत्रसंचालन प्रा. प्रमिला नगराळे  आणि केले. आभार प्रदर्शन प्रा.डॉआशालता आसुटकर यांनी मानले.चर्चासत्राला बहुसंख्य प्राध्यापक व मराठी विषयाचे पदव्युत्तर वर्गाचे विद्यार्थी उपस्थित होते.

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या ५ विद्यार्थिनी : - मार्च २०१८ मधे झालेल्या संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी वाड़मय पारंगत परीक्षेत स्थानिक बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या पाच विद्यार्थीनीना गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले आहे.
उत्कृष्ठ निकालाची परंपरा असलेल्या वाणिज्य महाविद्यालय न्यास द्वारा संचालित बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी वाड़मय पारंगतच्या (१) साधना ज्ञानेश्वर डफर हिने गुणवत्ता यादीत ६ वे (२) सारिका मारोती मेश्राम हिने ७ वे (३) सोनाली सिद्धार्थ भगत हिने ८ वे (४) शीतल अरुण चौधरी हिने ९ वे (५) वर्ष अरुण चौधरी हिने १०वे स्थान प्राप्त करून महाविद्यालयास अभूतपूर्व यश मिळवून दिले.
विद्यार्थीनिनी प्राप्त केलेल्या यशाबद्दल महाविद्यालय व वाणिज्य महाविद्यालय न्यासाचे वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. गुणवत विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या यशाबद्दल अध्यक्ष विनायक दाते, उपाध्यक्ष सतीश फाटक यांनी विद्यार्थिनीचे अभिनंदन करून त्यांना पुस्तके भेट म्हणून दिली. तसेच त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांना माजी विद्यार्थी संघटनेचे मानद सदस्यत्व जाहीर केले. कार्यक्रमास सचिव तथा प्रभारी प्राचार्य प्रेरणा पुराणिक, विश्वस्त सुषमाताई दाते, विवेक देशमुख, हरिदास धुर्व, उपप्राचार्य डॉ. माणिक मेहरे  मराठी विभागप्रमुख डॉ. स्मिता शेंडे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा. ताराचंद कांठाले यांनी केले.

अभिवादन स्पर्धा

भारतीय घटनेचे शिल्पकार,भारतरत्न,विश्वभूषण,क्रांतीसूर्य,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्य "बानाई-नागपूर" द्वारा आयोजित केली जाणारी "अभिवादन स्पर्धा परीक्षा आज दि.६ डिसेंबर २०१८ रोजी आपल्या महाविद्यालयात घेण्यात आली. या परीक्षेला महाविद्यालयातील ६७ विद्यार्थी प्रवेशित होते.

या परीक्षेचे प्रभारी व केंद्र संचालक म्हणून प्रा. विनोद तलांडे व पर्यवेक्षक म्हणून प्रा. हरीश धुर्वे यांनी काम सांभाळले.

तत्पूर्वी महाविद्यालयाचे प्राचार्य मा.प्रेरणा पुराणिक,उपप्राचार्य डॉ.माणिक मेहरे यांनी डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बाबासाहेबांना अभिवादन केले.

या कार्याच्या यशस्वीते करीता मराठी विभाग प्रमुख डॉ.स्मिता शेंडे,रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.ताराचंद कंठाळे, एन.सी.सी.अधिकारी लेप्ट.प्रशांत बागडे, प्रा.अमोल राऊत, सुनिल अतकरी यांचे सहकार्य लाभले.

लाल बहादुर शास्त्री व महात्मा गांधी जयंती संपन्न

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने शास्त्री -गांधी जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्ष स्थानी मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. स्मिता शेंडे या होत्या. पदवी व पदव्युत्तर कला शाखेचे विद्यार्थी राहुल उइके, शुभम खडतकर, शुभांगी डुकरे, रूपाली काले, अक्षय कोरोटी, शिल्पा चचाने, सपना हगवने, समीक्षा भुरे, योगेश तरोणे, अवधुत चव्हान, प्रतीक्षा चांदेकर, डोकरमारे, इ. नी जयंती निमित्य दोन्ही देशनेत्यांच्या जीवनावर विचार व्यक्त केले.
महात्मा गांधी यांचे स्वच्छता, अहिंसा, स्वदेशी, क्षमा व शांती या संबंधी मार्गदर्शन अजूनही देशाला प्रेरणादायक आहे. सर्व-धर्म-समभाव, अस्पृश्यता निवारण आणि सहिष्णुता ही गांधींजींची पंच सूत्रे होती.
श्री लाल बहादुर शास्त्री यांच्या ‘जय जवान जय किसान’ या घोषणेने देशाला नव चैतन्य प्राप्त झाले.
जयंती समारोहाला प्रा. सुचिता ढेरे, प्रा. प्रमोद वैद्य, प्रा. प्रमिला नगराले, इत्यादी प्राध्यापक वृंद उपस्थित होते. संचालन -टिंकल राठोड, प्रास्ताविक -वैशाली अलोणे, तर आभार -माधुरी खेडकर यांनी केले. अश्विनी खडसे, आशिष भुजाडे यांनी कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न केला.

कविता महाजन यांना आदरांजली ‘आव्हानांचे अत्तर लाऊन जगलेली कविता’

प्रसिध्द लेखिका व कवयित्री कविता महाजन यांचे दि २७/९/२०१८ ला अकाली निधन झाले. ‘ब्र’ आणि ‘भिन्न’ या त्यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत. बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात दि २९/९/२०१८ रोजी आयोजित केलेल्या शोकसभेत,‘ब्र’कार कविता महाजन यांना आदरांजली अर्पित करण्यात आली.
मराठी भाषा वाङ्मय अभ्यास मंडळाच्या वतीने आयोजित आदरांजलीपर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. स्मिता शेंडे विचार व्यक्त करताना म्हणाल्या की, समाजातील दांभिक, बेगडी असत्य ओरबाडून लेखनिच्या टोकाला आव्हानांचे अत्तर लावून जगलेली बंडखोर लेखिका म्हणजे कविता महाजन.
प्रमुख मार्गदर्शक प्रा. प्रमिला नगराळे यांनी कविता महाजन यांच्या साहित्यावर प्रकाश टाकत समयोचित विचार व्यक्त केले. प्रा. प्रमोद वैद्य यांनीही त्यांच्या साहित्यविषयक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कु. दर्शना डोकरमारे या विद्यार्थिनीने कविच्या कवितेचे वाचन केले. कार्यक्रमाचे संचालन रुपाली काळे, प्रास्ताविक आशिष भुजाडे तर आभार प्रदर्शन वैशाली राठोड या वाङ्मय पारंगत मराठी भाग १ च्या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाला बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. आयोजक अमित भगत संघर्ष शेंडे यांनी फलक लेखन करुन कार्यक्रमाची धुरा सांभाळली.

“शिक्षण व्यवस्था आणि आजचा विद्यार्थी” वक्तृत्व स्पर्धा २०१८

दिनांक १२/९/२०१८ ला बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे, मराठी वाङ्मय अभ्यास मंडळा तर्फे वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेचा विषय – “शिक्षण व्यवस्था आणि आजचा विद्यार्थी” हा होता,
या स्पर्धेत एकुण १० विद्यार्थी सहभागी झाले व त्यांनी शिक्षण व्यवस्था आणि आजचा विद्यार्थी या विषयावर आपले विचार मांडले. स्पर्धकांना प्रत्येकी १० मिनीटाचा अवधी देण्यात आला होता.
वक्तृत्व स्पर्धा २०१८ पारीतोषिक विजेते विद्यार्थी :- प्रथम क्रमांक - कु. करुणा कांबळे, बी कॉम भाग ३, व्दितीय क्रमांक - कु. रुपाली पेंदोर, एम ए भाग २, तृतीय क्रमांक – रुपाली काळे, एम ए भाग १, प्रोत्साहनपर बक्षिस – दर्शना डोकरमारे, बी ए भाग ३.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन प्रा. डॉ. स्मिता शेंडे यांची उपस्थिती लाभली, तसेच कार्यक्रमाचे परिक्षक म्हणुन, प्रा. प्रमोद वैद्य आणि प्रा. अशोक साळवे यांनी जबाबदारी पार पाडली. या कार्यक्रमाचे मराठी विभागाच्या प्रा. प्रमिला नगराळे यांनी सुत्रसंचालन केले…
कार्यक्रमाला बी ए भाग १, २ आणि ३ चे तसेच वाङ्मय पारंगत मराठी भाग १ व २ चे विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाङ्मय पारंगत मराठी आणि बी ए च्या विद्यार्थ्यानी हातभार लावला.

दिनांक.11.09.2018 "केशवसुत काव्यस्पर्धा"

केशवसुत यांची जयंती ११ सप्टेम्बर रोजी साजरी होत असते. तसेच विश्वबंधुत्व दिवसही ११ सप्टेम्बरलाच असतो.  यानिमित्ताने अमरावती विद्यापीठ मराठी विभाग गेल्या 5 वर्षा पासून एकत्रित कार्यक्रम आयोजित करीत असते.  विद्य्यापिठातर्फे तीन पारितोषिके दिली जातात. या वेळी कवी केशवसुत काव्यस्पर्धा आयोजित केली होती.

या स्पर्धेत प्रत्येक महाविद्यालयातर्फे दोन विदयार्थी सहभागी होऊ शतकात. आपल्या विद्यालयातील (१)रुपाली पेंदोर-एम.ए-२ मराठी, (२) दर्शना डोकरमारे-बी. ए-3 या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेत विविध महाविद्यालयातील 72 विद्यार्थी सहभागी होते.