बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ 

Babaji Datey Kala & Vanijya Mahavidyalaya, Yavatmal

(वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ ट्रस्ट रजि. क्र. ई-३२ द्वारा संचालित)

NAAC Accredited B++ Grade with CGPA 2.82

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात पालकसभा संपन्न

स्थानिक बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये शनिवार दिनांक ०६ एप्रिल २०२४  रोजी सावरकर सभागृहामध्ये पालक सभा संपन्न झाली. या  सभेचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वर्षा कुळकर्णी, प्रमुख अतिथी प्रा.डॉ.हरिदास धुर्वे व कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. डॉ. रविजीत गावंडे तर पालक प्रतिनिधी म्हणून संजय वानखडे, सुनील कळसइतकर, व्यासपीठावर उपस्थित होते. प्राचार्य डॉ. वर्षा कुळकर्णी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यार्थांचा सर्वांगीण विकास होण्याकरिता महाविद्यालयात विविध उपक्रम राबविले जातात असे प्रतिपादन केले.
प्रमुख अतिथी अमरावती विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य वाणिज्य विभागाचे प्रा.डॉ. हरिदास धुर्वे यांनी पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये सुसंवाद व्हावा जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाल्यास भविष्यात विद्यार्थ्यांसमोर मोठे आव्हाने किंवा समस्या राहतील त्यांना समर्थपणे त्यांचे निराकरण करण्यात मदत होईल, असे स्पष्ट केले.
पालक प्रतीनिधी म्हणून सुनील वानखडे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना  या महाविद्यालयात प्रवेश घेतल्या नंतर आपल्या मुलीमधे सकारात्मक बदल झाला आहे. त्या मुळे आम्ही समाधानी आहोत, असे सांगीतले.
संजय गायकवाड  यांनी मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयात  तासिका नियमित होतात.   तसेच विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याकरिता ग्रंथालयामधे उत्तम वाचन सुविधा आहे, असे आवर्जून नमूद केले.
कार्यक्रमाच्या प्रास्तविकातून शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये सुसंवाद असणे आवश्यक आहे. विद्यार्थांच्या समस्या जणून घेणे, पालकांना शिक्षकांकडून अध्यापनाबाबत काय अपेक्षित आहे हे समजून घेणे हा या पालक सभेचा उद्देश आहे असे प्रा.डॉ.रविजीत गावंडे यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन बि.ए. भाग २ ची विद्यार्थिनी कु. दिपाली ठाकरे हीने.तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ.रविजीत गावंडे यांनी केले.  या कार्यक्रमाला प्रा.विजय दीक्षित, प्रा.डॉ. ताराचंद कंठाळे, प्रा.डॉ. सचिन जयस्वाल, प्रा.दत्तात्रय जोशी, प्रा.डॉ. सचिन तेलखेडे  प्रा.डॉ. वैशाली मेश्राम, प्रा. गजानन लांजेवार ई. उपस्थित होते.

ग्रामगीता जीवन विकास परीक्षा संपन्न.

अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज आश्रम द्वारा संचालित बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन केंद्र मार्फत 20/02/2024 रोजी महाविद्यालयात ग्रामगीता जीवन विकास परीक्षेचे आयोजन करण्यात आले. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता “आधुनिक युगाची संजीवनी बुटी”
मानल्या जाते.  राष्ट्रसंतांच्या साहित्यावर आधारित ही परीक्षा 2014 पासून महाविद्यालयात आयोजित करण्यात येते. महाविद्यालयाची “बेस्ट प्रॅक्टिस” म्हणून ही परीक्षा अत्यंत उत्साहाने दरवर्षी महाविद्यालयात प्रा. डॉ.ताराचंद कंठाळे, समन्वयक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन केंद्र, यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येते. राष्ट्रसंतांच्या साहित्याचा अधिकाधिक प्रचार आणि प्रसार होण्याच्या दृष्टिकोनातून आणि विद्यार्थ्यांमध्ये मूल्य संस्कारांची रुजवणूक होण्याच्या दृष्टीने ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. राष्ट्रसंत म्हणतात, “ग्रामगीता नव्हे पारायणासि ! वाचता वाट दावी जनासि ! समूळ बदलवी जीवनासि ! मनी घेता अर्थ तिचा !” या अर्थाने  विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रसंतांच्या साहित्याची रुची निर्माण व्हावी या हेतूने सदर परीक्षेला दरवर्षी महाविद्यालयातून विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत असतो. ह्या परीक्षेचे यशस्वीरित्या आयोजन करण्यासाठी प्रा. डॉ. ताराचंद कंठाळे आणि प्रा. डॉ. सचिन तेलखडे यांनी परिश्रम घेतले.

युवा पिढीने समाजभान ठेवण्याची गरज - प्राचार्य डॉ. अविनाश मोहरील

कर्तुत्ववान पिढी घडवायची असेल तर युवकांमध्ये समाजभान असण्याची गरज आहे. स्वतःच्या जीवनात प्रचंड मेहनत, आशावाद, संयम आणि उच्चप्रतीची गुणवत्ता या चतु:सूत्रीचा तरुणांनी अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. अविनाश मोहरील यांनी केले. बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात आयोजित युवा महोत्सव तरुणाई २०२४ चे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
"आई-वडिलांनी आपल्याला लहानाचे मोठे केले, सर्व सुविधा पुरविल्या तसेच गुरुजनांनी दिलेली शिकवण याबद्दल जीवनभर कृतज्ञ असले पाहिजे. या सर्वांचा आदर कसा ठेवावा हे त्यांनी अनेक दाखले देऊन विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांनी महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली आणि विद्यार्थ्यांना शिस्तीचे महत्व पटवून दिले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री विनायक दाते यांनी विद्यार्थ्यांना समयोचित मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने झाली. संगीत विभागा तर्फे सरस्वती स्तवन आणि स्वागत गीत सादर करण्यात आले. व्यासपीठावर विशुद्ध विद्यालय संस्थेचे सचिव श्री विजय कासलीकर, सदस्य श्री महेश जोशी, विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. डॉ. हरिदास धुर्वे, सहसमन्वयक श्री संजय त्रिवेदी आणि विद्यार्थी प्रतिनिधी रोहन गायकवाड उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील नव्याने आचार्य मार्गदर्शक म्हणून नियुक्त झालेल्या प्रा. डॉ. ताराचंद कंठाळे, प्रा. डॉ. प्रशांत बागडे आणि प्रा. डॉ. रवीजीत गावंडे तसेच विशेष पुरस्कार प्राप्त प्रा. डॉ. हरिदास धुर्वे, प्रा. डॉ. सचिन जयस्वाल आणि प्रा. डॉ. वैशाली मेश्राम यांचा शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सर्व विद्यार्थी वर्ग प्रतिनिधींचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवक महोत्सव तरुणाई २०२४ चे समन्वयक प्रा डॉ. ताराचंद कंठाळे यांनी केले उत्कृष्ट संचलन प्रा. वैशाली बेडेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. सचिन तेलखडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता एनएसएस, एनसीसी आणि इतर स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता प्रा. डॉ. स्वाती जोशी यांनी सादर केलेल्या पसायदानाने झाली

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर कार्यशाळा

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ मधील आय. क्यू. ए. सी.  विभागाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२० च्या अंमलबजवणीमुळे होणाऱ्या विद्यार्थी उपयोगी बदलांबाबत विद्यार्थ्यांना माहिती उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने शनिवार, दि. २०/०१/२०२४ रोजी स्वा. सावरकर सभागृहात  School Connect (NEP Connect) हा संपर्क अभियानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने झाली.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वर्षा ध. कुलकर्णी, प्रमुख उपस्थिती व्यवस्थापनाचे प्रतिनिधी वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ ट्रस्टचे अध्यक्ष श्री. विनायक दाते, संस्थेच्या विश्वस्त सौ. सुषमा दाते, विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे सदस्य म्हणून डॉ. हरिदास धुर्वे, व्यवस्थापन परिषद सदस्य, स.गा.बा. अ. विद्यापीठ आणि डॉ. ताराचंद कंठाळे, सदस्य वाणिज्य भाषा मंडळ, आय. क़्यु. ए. सी. समन्वयक डॉ. सचिन तेलखडे उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी विद्यापीठाद्वारे प्रशिक्षित साधन व्यक्ती म्हणून प्रा. डॉ. तुषार कोटक, सहयोगी प्राध्यापक, वाणिज्य एस.पी.एम. सायन्स, गिलानी आर्ट्स, कॉमर्स कॉलेज, घाटंजी हे उपस्थित होते.  त्यांनी विद्यार्थ्यांना एन. ई. पी. बद्दल उत्कृष्ट मार्गदर्शन केले. विद्यार्थांनी एन. ई. पी. बद्दल प्रश्न विचारून शंकानिरसन केले. प्रमुख वक्ते डॉ. तुषार कोटक यांना प्राचार्य व उपस्थितांचे हस्ते Certificate of Appreciation प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचलन डॉ. अमोल राऊत यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. सचिन जैस्वाल यांनी केले.  कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.  कार्यक्रमाला वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील १६४ विद्यार्थी तसेच वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

महाविद्यालयात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ, करियर कौन्सिलिंग अँड प्लेसमेंट सेल, जिल्हा उद्योग केंद्र आणि मिटकॉन यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता सावरकर सभागृहामध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (जनजागृती अभियान) आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वर्षा कुळकर्णी, मार्गदर्शक मा. प्रतीक्षा नक्षणे, व्यवस्थापक, डी. आय. सी. यवतमाळ, मा. श्री संदीप कोरडे, प्रकल्प अधिकारी, मिटकॉन, मा. श्री प्रवीण रंगारी, इन्स्पेक्टर डी. आय. सी.यवतमाळ तथा समन्वयक म्हणून प्रा. डॉ. ताराचंद कंठाळे आणि प्रा. डॉ. सचिन तेलखडे मंचावर उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. स्वागत समारंभा नंतर समन्वयक प्रा. डॉ. सचिन तेलखडे यांनी प्रास्ताविक केले. आज राज्य व केंद्र शासनाच्या वतीने ज्या ज्या योजना राबविण्यात येतात त्या समाजाभिमुख आणि विद्यार्थीभिमुख व्हाव्यात. विद्यार्थ्यांना जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून राबविला जाणाऱ्या योजना अवगत होण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीचा ध्यास न करता रोजगार निर्मिती करून इतरांना रोजगार देण्याचे प्रयत्न करावे असे मनोगत प्राचार्य डॉ. वर्षा कुळकर्णी यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अमोल राऊत तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ. रविजीत गावंडे, शारीरिक शिक्षण संचालक यांनी केले. या कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थी आणि प्राध्यापक वृंद उपस्थित होते.

 

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयचा युवा प्रेरणा शिबिरामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग

महाविद्यालयामधील करिअर कौन्सिलिंग अँड प्लेसमेंट सेल व स्वामी विवेकानंद केंद्र यवतमाळ यांच्यात झालेल्या सामंजस्य करारा अंतर्गत विद्यार्थी विकसन उपक्रम राबविला जातो.  या उपक्रमांतर्गत विद्यार्थी स्वामी विवेकानंदांच्या जीवनावर आयोजित परीक्षेमध्ये तसेच विविध शिबिरांमध्ये दरवर्षी सहभाग घेतात. यावर्षी सुद्धा स्वामी विवेकानंद केंद्र कन्याकुमारी, विदर्भ विभाग द्वारा आयोजित युवा प्रेरणा शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.  हे शिबिर श्री सदानंद मठ सालोड जिल्हा वर्धा येथे ४ ते ७ जानेवारी २०२४ दरम्यान आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कृती, समाज, देश याबद्दल जाणीव निर्माण झाली.  तसेच विविध खेळांमधून विद्यार्थ्यांना सेल्फ मॅनेजमेंट, टीम वर्क कसे करायचे याचे प्रशिक्षण मिळाले.

महाविद्यालयचा युवा महोत्सवामध्ये सक्रिय सहभाग

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांनी, अमरावती विद्यापीठ दि. 10/10/2023 ते 13/10/2023 दरम्यान चाललेल्या युवा महोत्सवामध्ये विविध कार्यक्रमांमध्ये प्राचार्य वर्षा कुलकर्णी तसेच डॉ. वैशाली मेश्राम व डॉ. रविजीत गावंडे यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी  सक्रिय सहभाग नोंदवला.
प्रश्नमंजुषा स्पर्धेत रोहन गायकवाड, दिपाली ठाकरे, आचल वरझडकर व्यंगचित्र व स्पॉट पेंटिंग स्पर्धेत आदित्य वेरूळकर वकृत्व स्पर्धेत तुषार  दडांजे वाद-विवाद स्पर्धेत मयुरी बोंद्रे व अर्थराज राठोड उत्कृष्ट सादरीकरण केले. रांगोळी स्पर्धेत दिपाली ठाकरे तर मेहंदी स्पर्धेत दामिनी बुटले यांनी कलाकृती सादर केली. त्याचप्रमाणे स्कीट, मुकनाट्य व एकांकीका मध्ये आदित्य सोनटक्के ओम जोगदंड मोहीम सय्यद सिद्धेश माहुलकर वैष्णवी बगमारे वेदिका भिलाई यांनी उत्कृष्ट कामगिरी केली तसेच स्थळ स्थापनेमध्ये अविनाश ढेरे व ग्रुप यांनी जन्म या विषयावर प्रतिकृती उभारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तसेच समुहगान मध्ये वैष्णवी व गृपने उत्कृष्ट गायन सादर केले. त्याच प्रमाणे लोकनृत्य स्पर्धेमध्ये रश्मी परसराम आणि ग्रुप यांनी उत्कृष्ट प्रकारे डांगी लोकनृत्य सादर करून सर्वांची वाहवाह मिळवली.

बाबाजी दाते महाविद्यालयात दि. १४/०७/२०२३ रोजी दिक्षारंभ कार्यक्रमाचे आयोजन

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये शुक्रवार दि. १४/०७/२०२३ रोजी सकाळी ०९:०० वाजता दीक्षारंभ कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे संयोजक प्रा. डॉ. हरिदास धुर्वे यांनी आपल्या प्रस्ताविकातून दीक्षारंभ कार्यक्रमा मागील भूमिका स्पष्ट केली. त्यांनी महाविद्यालयातील विविध उपलब्ध सुविधांबद्दल विस्तृत माहिती दिली तसेच शासनाच्या वेगवेगळ्या उपलब्ध शिष्यवृत्तींबद्दल मार्गदर्शन केले. डॉ. सचिन तेलखडे यांनी महाविद्यालयातील विविध विभाग तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा परिचय करून दिला. दीक्षारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्ष, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाच्या विकासासाठी विद्यार्थ्यांची भूमिका कशी महत्त्वाची आहे हे पटवून दिले. तसेच विद्यार्थ्यांना कुठल्याही अडचणी आल्यास त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाला प्रथम वर्षाचे कला आणि वाणिज्य शाखेचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून वाणिज्य शाखेकडून  प्रा. डॉ. हरिदास धुर्वे आणि कला शाखेकडून प्रा. डॉ. सचिन तेलखडे यांनी काम पाहिले. NSS विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. वैशाली मेश्राम तसेच विद्यार्थी यांचे कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन प्रा. डॉ. मंजुश्री नेवल यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. डॉ. रविजीत गावंडे यांनी केले. दीक्षारंभ कार्यक्रम संपल्यानंतर प्रा. गजानन लांजेवार यांनी सर्व विभागांचा परिचय करून दिला तसेच महाविद्यालयाचा परिसर विद्यार्थ्यांना दाखवला. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

स्थानिक बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये गुरुवार दि. ८/१२/२०२२ रोजी सावरकर सभागृहामध्ये पालक सभा संपन्न झाली. पालक सभेचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. कल्पना देशमुख, प्रमुख अतिथी प्रा. डॉ. विवेक देशमुख, कार्यक्रमाचे समन्वयक  प्रा. डॉ. रविजीत गावंडे, सह-समन्वयक प्रा. डॉ.अमोल राऊत तर पालक प्रतिनीधी म्हनुण श्री. ढाले, श्री. चिंते व सौ. रंजना परसराम व्यासपिठावर उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. कल्पना देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये शिक्षण, कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सर्वगुण संपन्न विद्यार्थी कसा घडेल. यासाठी दाते महाविद्यालय नेहमी प्रयत्नरत असते असे विचार व्यक्त करून महाविद्यालयातील सर्व सुविधांचा आढावा घेतला.
प्रमुख वक्ते प्रा. डॉ. विवेक देशमुख यांनी पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये संवाद व्हावा जेणेकरून शिक्षण व्यवस्था अधिक बळकट होईल व विचारू पद्धतीने अध्ययन व अध्यापनाचे काम सोयीस्कर होईल असे विचार व्यक्त केले. श्री. ढाले यांनी महाविद्यालयीन शिक्षण केवळ नोकरीसाठीच नव्हे तर विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व सुसंस्कारी व्हावे यासाठी शिक्षण घेतले पाहिजे. सामाजिक उपक्रमामध्ये दाते महाविद्यालय नेहमीच सहभागी होण्याकरिता अग्रेसर असते, असे मत पालक प्रतिनिधी म्हणून त्यांनी व्यक्त केले. सौ. रंजना परसराम यांनी मानवी मूल्यांची जोपासना करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते, असे प्रतिपादन पालक प्रतिनिधी म्हणून केले.
या कार्यक्रमाच्या प्रास्तविकातून शिक्षक, विद्यार्थी, व्यवस्थापन आणि पालक हे महाविद्यालयाचे महत्त्वाचे आधारस्तंभ असून विद्यार्थ्यावर योग्य संस्कार करण्याकरिता शिक्षकांबरोबरच पालकांची भूमिका तेवढीच महत्त्वाची असते, असे विचार प्रा. डॉ. अमोल राऊत यांनी मांडले. या कार्यक्रमाचे उकृष्ट सूत्र संचलन प्रा. डॉ. सचिन तेलखडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ. रविजीत गावंडे यांनी केले. या कार्यक्रमाला डॉ. हरिदास धुर्वे, डॉ. स्नेहल डहाळे, डॉ. स्मिता शेंडे, प्रा. विनोद तलांडे, प्रा डॉ. सचिन जयस्वाल, प्रा. विजय दीक्षित, प्रा.गजानन लांजेवार प्रा. डॉ. वैशाली मेश्राम तसेच प्रा. डॉ. ताराचंद कंठाळे उपस्थित होते.

दाते कॉलेज मध्ये २०२२ युवक महोत्सव साजरा

गुरुवार  दि.२८/०४/२०२२ रोजी युवक महोत्सवाचे विधिवत उद्घाटन करण्यात आले. उद्घाटक म्हणून यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक मा. डॉ. दिलीप पाटील भुजबळ लाभले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. विनायक दाते तर प्रमुख अतिथी म्हणून श्री. सतिश फाटक, मा. सौ. सुषमा दाते, सौ. शर्मिलाताई फाटक, श्री. विजय कासलीकर उपस्थित होते. तसेच प्राचार्य डॉ. कल्पना देशमुख, प्रा. डॉ. विवेक देशमुख, प्रा. डॉ. हरिदास धुर्वे, प्रा. दत्तात्रय जोशी, समन्वयक, युवक महोत्सव तसेच महेश शिरसाट, अध्यक्ष, विद्यार्थी परिषद यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या  प्रारंभी संगीत विभागाच्या चमूने शारदा स्तवन आणि स्वागत गीत सादर केले. महाविद्यालयाची प्रार्थना “पसायदान”  प्रा.डॉ. स्वाती जोशी यांनी सादर केली. याच समारंभामध्ये दरवर्षी प्रकाशित होत असलेल्या “प्रतिबिंब” या वार्षिकांकाचे प्रकाशन मा. उद्घाटक डॉ. दिलीप पाटील भुजबळ आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थांनी आपल्या समोर उदात्त ध्येय ठेवावे व त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करून यशाचे शिखर गाठावे” असे प्रतिपादन डॉ. दिलीप पाटील भुजबळ,जिल्हा पोलीस अधिक्षक, यांनी केले. प्रा.डॉ.कल्पना देशमुख यांनी विद्यार्थ्यांना युवक महोत्सवाचा मनमुराद आनंद लुटावा परंतु जीवनातील लक्ष्मण रेषेचे कायम पालन करावे असे आवाहन केले. संस्थेचे उपाध्यक्ष श्री. सतीश फाटक यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये जीवनामध्ये यशाचा कुठलाही शॅार्टकट नाही, तर चिकाटी आणि कठोर परिश्रम याला पर्याय नाही, हे पटवून दिले. सिनेट सदस्य प्रा.डॉ. विवेक देशमुख यांनी आपल्या शेरोशायरीयुक्त भाषणामधून विद्यार्थ्यांनी  सातत्य आणि चिकाटीने प्रगतीचे गौरीशंकर गाठावे, असे आवाहन केले. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये मा. श्री. विनायक दाते यांनी विद्यार्थ्यांना जीवनात अभ्यास, व्यायाम आणि शिस्तपालन कसे आवश्यक आहे, हे हसत खेळत पटवून दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक प्रा. दत्तात्रय जोशी, संचालन प्रा.डॉ. ताराचंद कंठाळे तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. सचिन तेलखडे यांनी केले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

दि. २७/०४/२०२२ रोजी रांगोळी स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये पोस्टर डिझाईन, संस्कारभारती व थेंबाची रांगोळी इत्यादी प्रकारच्या रांगोळ्यांचा समावेश होता. दिनांक २८ रोजी घेण्यात आलेल्या डिश डेकोरेशन, आणि पुष्परचनेचे उद्घाटन यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक मा. डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.
याच दिवशी भावगीत स्पर्धा आणि बचाव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

शुक्रवार दि. २९/०४/२०२२ रोजी ट्वीन्स स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळे कला प्रकार सादर केले. ग्रुप डान्स, रिमिक्स डान्स, पथनाट्य , ड्युयेट डान्स, गोंडी डान्स, लघुनाटिका, गोंधळ, मसा नृत्य , पंजाबी नृत्य, लावणी नृत्य आणि योगानृत्य  इत्यादी सादर करण्यात आले.
शनिवार दि. ३०/०४/२०२२ रोजी  कविसंमेलन, वादविवाद स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वादविवाद स्पर्धेचा विषय:-  सभागृहाच्या मते, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात भ्रमणध्वनी  (मोबाईल) चे स्थान मोलाचे आहे” हा होता.
रविवार दि. ०१/०५/२०२२ रोजी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अनेक विद्यार्थ्यांनी यामध्ये स्टॉल्स लावले. महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांनी आनंद  मेळाव्याला प्रतिसाद दिला.
आनंद मेळाव्यानंतर विविध स्पर्धेतील विजेत्यांना  मान्यवरांच्या हस्ते स्मृती चिन्ह व प्रशस्ती पत्रक देऊन गौरविण्यात आले. बक्षीस  वितरणाने  या युवक महोत्सवाची सांगता झाली.

करीयर कट्टा कार्यक्रमा अंतर्गत “विद्यार्थी विकास कार्यशाळा”

२९-०३-२०२२ रोजी बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ प्राचार्य डॉ.कल्पना देशमुख यांचे सहकार्याने करीयर कट्टा कार्यक्रमा अंतर्गत “विद्यार्थी विकास कार्यशाळा” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक श्री यशवंत जी शितोळे हे होते त्यांनी IAS आपल्या भेटीला, व आपल्या भेटीला, ह्या दोन्ही संकल्पना समजावून सांगितल्या. तसेच यामध्ये कोणी पात्र होऊ शकत नसेल त्यांच्या साठी दोन तीन महिन्याचे प्रमाणपत्र कोर्स on line प्रशिषण घेऊन स्वतः उद्योग करू शकतो. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ अमोल राऊत यांनी भूषविले.संचालन डॉ.ताराचंद कंथाले यांनी केले प्रमुख उपस्थिती .डॉ.सौ. जीवने मॅडम, डॉ.रोहित वणकर, डॉ.विवेक देशमुख, डॉ.सचिन तेलखडे होते. आभार प्रदर्शन डॉ. हरिदास धुर्वे यांनी केले.कार्यक्रमास ७४ विद्यार्थी उपस्थित होते

दाते कॉलेज मध्ये १९७३ च्या batch च्या माजी विद्यार्थ्याचे स्नेहमीलन

दि. ११ मार्च २०२२ रोजी बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ च्या  १९७३ batch च्या वाणिज्य शाखेच्या माजी विद्यार्थ्यांनी  स्वा. सावरकर सभागृहात स्नेहमीलनाचे आयोजन केले होते. त्यावेळी एकूण ५० माजी विद्यार्थी कुटुंबियांसह उपस्थित होते. हे स्नेहमीलन आयोजित करण्यात माजी विद्दार्थी श्री प्रकाश देठे आणि श्री रमेश राउत यांनी विशेष पुढाकार घेतला होता.
कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री. विनायक दाते, सचिव श्री. सतीश फाटक, विश्वस्त सौ. सुषमाताई दाते, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.कल्पना देशमुख हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून श्रद्धेय बाबाजींच्या आठवणींना उजाळा दिला व त्यांच्यामुळेच आम्ही घडलो असे आवर्जून सांगितले. बाबाजींचा वक्तशीरपणा, कडक शिस्त, विद्यार्थ्यां संबंधी तळमळ यांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. बाबाजींमुळे आम्ही घडलो असे सर्व विद्यार्थ्यांनी आवर्जुन सांगितले.
अध्यक्ष श्री विनायक दाते यांनी त्यांच्या काही घरगुती आठवणी सांगितल्या. बाहेर बाबाजी कितीही रागीट व कडक असले तरी घरी अतिशय शांत व प्रेमळ होते असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व सध्या महाविद्यालयातच कार्यरत असणा-या प्रा. डॉ.सचिन जयस्वाल, प्रा. डॉ. प्रशांत बागडे, प्रा. डॉ. वैशाली बेडेकर- जोशी तसेच श्री आशीष यादव यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमानंतर स्नेहभोजन होऊन कार्यक्रम संपन्न झाला.

शिवणकला आणि फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे उद्घाटन

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, रोटरी क्लब ऑफ यवतमाळ व सिंगर इंडिया लिमिटेड यांच्या सौजन्याने शिवणकला आणि फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे उद्घाटन दि. 2 मार्च 2022 रोजी करण्यात आले.
रोटरी क्लब यवतमाळच्या अध्यक्षा डॉ. माणिक मेहरे ह्यांनी या उपक्रमाद्वारे कशा प्रकारे विद्यार्थिनींना  सक्षम करता येईल हे सांगितले व जास्तीत जास्त विद्यार्थिनींनी  या उपक्रमात सहभागी व्हावे असे आव्हान केले.   महाविद्यालयाचे उपाध्यक्ष व रोटरी क्लब यवतमाळचे सदस्य श्री सतीश फाटक यांनी हा प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यामागची भूमिका सांगितली. रोटरी क्लब झोन 15 चे ए.जी. राजेश गडीकर ह्यांनी रोटरी क्लबची भूमिका व समाजकार्य ह्यांचा सहसंबंध सांगून हा उपक्रम कसा यशस्वी करता येईल हे सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाणिज्य महाविद्याल न्यासाचे अध्यक्ष श्री विनायक दाते हे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना स्वयं रोजगार मिळवण्यासाठी हे केंद्र कसे सहाय्य करेल हे विषद केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.वैशाली मेश्राम ह्यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.सारिका नंदे ह्यांनी केले.

दाते महाविद्यालयामध्ये करीयर कट्ट्याचे उद्घाटन

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करीयर कट्टा या उपक्रमाचे उद्घाटन दि. १८-१२-२०२१ रोजी झाले. या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.वर्षा कुळकर्णी व महाविद्यालयाच्या करीयर काँसिलींग सेलचे  प्रमुख तसेच करीयर कट्टा समन्वयक प्रा. डॉ. हरिदास धुर्वे उपस्थित होते. सदर उपक्रम हा रोजगाराभिमुख असून या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करीयर संदर्भात असलेल्या विविध संधींची माहिती उपलब्ध होणार आहे. करीयर कट्टा या उपक्रमाच्या माध्यमातून आय.ए.एस. आपल्या भेटीला तसेच उद्योजक आपल्या भेटीला असे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त व नियमित मार्गदर्शनपर वर्ग अगदी नाममात्र शुल्कात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.  ऑनलाईन उपक्रमाद्वारे उत्तम मार्गदर्शकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

"आझादी का अम्रुत महोत्सव"

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.12 नोव्हेंबर 2021 रोजी कायदे विषयक प्रबोधन शिबीर संपन्न झाले. "आझादी का अम्रुत महोत्सव" निमित्त पँन इंडिया अंतर्गत सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
अमोलकचंद विधी महाविद्यालयाचे प्रा.डॉ. संदिप नगराळे यांनी. " मूलभूत कर्तव्य तसेच कामगार कायदा"  या विषयावर अभ्यासपूर्ण विवेचन केले.आपण आपल्या हक्काची जशी जाणीव ठेवतो तशीच कर्तव्याची सुद्धा ठेवली पाहिजे. कर्तव्याचा आपल्याला अनेकदा विसर पडत असल्यामुळे संविधानात त्यांचा अंतर्भाव करावा लागला, असे प्रतिपादन त्यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश मा.एम.आर.ए.शेख यांनी सेवा प्राधिकरणा द्वारे दिल्या जाणाऱ्या विविध सेवांची उपयुक्त माहिती दिली. गरीब व्यक्ती सुद्धा न्यायापासून वंचित राहू नये, त्याला सर्वतोपरी मदत मिळावी या साठी विनाशुल्क अनेक सेवा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षपदावरून बोलतांना प्राचार्य डॉ. सौ.वर्षा कुळकर्णी यांनी विद्यार्थ्यांना आपले कर्तव्य चोख पार पाडण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. प्रारंभी संयोजक विजय दीक्षित यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला.प्रा.डॉ. सचिन तेलखडे यांनी सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला.

 

दाते महाविद्यालयामध्ये दीक्षारंभ कार्यक्रम

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये दि. २८ ऑक्टोंबर २०२१ रोजी दीक्षारंभ कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पाडला. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून वाणिज्य महाविद्यालय न्यासाचे अध्यक्ष मा. श्री. विनायक दाते तर प्रमुख पाहुण्या म्हणून विश्वस्त सौ. सुषमाताई दाते लाभल्या होत्या.
कार्यक्रमाचे संयोजक प्रा.डॉ. विवेक देशमुख यांनी आपल्या प्रास्तविकातून दीक्षारंभ कार्यक्रमा मागील भूमिका स्पष्ट केली. महाविद्यालयातील विविध विभाग तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांचा परिचय करून दिला. महाविद्यालयाच्या एकूण विकासासाठी व्यवस्थापन, शिक्षक आणि विद्यार्थी यांचा उत्तम समन्वय असणे किती आवश्यक आहे, हे त्यांनी सोदाहरण पटवून दिले. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होईल अशा विविध शैक्षणिक आणि सांस्कृतिक व्यासपीठांची ओळख प्रा.डॉ. विवेक देशमुख यांनी करून दिली. उद्घाटनपर भाषणात अध्यक्ष मा. विनायक दाते यांनी विद्यार्थ्यांना निर्व्यसनी तसेच स्वच्छतेचा संदेश दिला. शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकासासाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक सुविधा शिक्षक आणि विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जातील, याबद्दल आश्वस्त केले.
प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून कोविड काळात सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ज्या प्रकारे सहकार्य केले त्याबद्दल कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांना कुठल्याही अडचणी आल्यास त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाला प्रथम वर्षाचे कला आणि वाणिज्य शाखेचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. डॉ. हरिदास धुर्वे यांनी केले कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन प्रा. डॉ. ताराचंद कंठाळे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. विजय दीक्षित यांनी केले कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते.

दाते महाविद्यालयामध्ये कोविड -१९ लसीकरण शिबीर

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे विद्यार्थ्यांसाठी  लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. मंगळावर दिनांक: २६-१०-२०२१   रोजी  महाविद्यालय परिसरामध्ये शिबीर संपन्न झाले.  कोविशिल्ड चे दोन्ही डोज उपलब्ध होते. विद्यार्थ्यांनी या शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद दिला. एकूण १०१ विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला.
आरोग्य विभागाचे डॉ. संजना लाल, परिचारिका  सुरेखा रेडडी, आरोग्य सेविका  वंदना पवार,वर्षा कुडमते,आरोग्य सेवक अभय पोलादे, अजय जोगदंड ही आरोय विभागाची चमू लसीकरण साठी उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्या सौ. सुषमा दाते यांनी डॉ. संजना लाल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. महाविद्यालयाच्या  प्राचार्य. प्रा.डॉ. वर्षा कुलकर्णी यांनी आरोग्य सेवक अभय पोलादे तर प्रा.डॉ. राविजीत गावंडे यांनी परिचारिका सुरेखा रेडडी यांचे  पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शिबिराचे आयोन  शा.शि. संचालक प्रा.डॉ. राविजीत गावंडे यांनी केले.

विशुद्ध विद्यालय व वाणिज्य महाविद्यालय यांचेतर्फे शिक्षक दिन तथा बाबाजी दाते जयंती साजरी

शिक्षणमहर्षी श्रद्धेय बाबाजी दाते यांनी स्थापन केलेल्या विशुद्ध विद्यालय शिक्षण संस्थे अंतर्गत सर्व घटक संस्थांचा एकत्रित शिक्षक दिन तथा बाबाजी दाते जयंती समारोह यवतमाळ येथे दि. ५ सप्टेंबर २०२१ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. विवेकानंद विद्यालयाच्या सभागृहात या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री. विनायक दाते होते. संस्थेच्या उपाध्यक्षा विद्याताई केळकर, सचिव सतीश फाटक, सहसचिव शर्मिला फाटक, कोषाध्यक्ष मंगेश केळकर, प्रमुख अतिथी डॉ. शैलजा रानडे प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
संस्थेच्या संचालक सौ. सुषमा दाते, श्री. विजय कासलीकर, डॉ. सौ. रजनी कंचलवार, सौ. मीरा केळकर यांच्यासह वाणिज्य महाविद्यालय न्यासाचे प्रा. विवेक देशमुख, डॉ. कल्पना देशमुख, डॉ. हरिदास धुर्वे यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा कालिदास सन्मान प्राप्त झाल्याबद्दल संस्थेतील माजी प्राध्यापक डॉ. शैलजा रानडे यांचा तसेच आचार्य पदवी प्राप्त झाल्याबद्दल अध्यापन पदविका शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत पर्बत,  डॉ. अचल गुजलवार व बाबाजी दाते कला व वाणिज्य महाविद्यालयातील प्रा. डॉ. सचिन तेलखेडे यांचा सत्कार करण्यात आला. अमरावती विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत झळकल्याबद्दल दाते महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी टिंकल राठोड व अश्विनी खडसे यांनाही सन्मानित करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना डॉ. श्रीकांत पर्बत यांनी या संस्थेमुळे आपण घडलो असे म्हटले.
प्रास्ताविक भाषणात संस्थेचे सचिव श्री. सतीश फाटक म्हणाले, बाबाजींनी मोठ्या कष्टाने ही संस्था उभारली. ती पुढे नेताना अधिकाधिक दर्जेदार शिक्षण देणे हीच बाबाजींनी पाहिलेल्या स्वप्नांची पूर्ती ठरेल. त्या दृष्टीने पुढील पाच वर्षाचे संस्था नियोजन करीत असल्याचेही ते म्हणाले.
प्रमुख वक्त्या म्हणून बोलताना डॉ. शैलजा रानडे म्हणाल्या, सूर्य ज्याप्रमाणे जमिनीवरील थोडे पाणी घेतो आणि पावसाचे रुपात अधिक प्रदान करतो तसेच शिक्षकांचेही असते. प्लेटोने म्हटल्याप्रमाणे तत्त्वज्ञ हा देशाचा राजा झाल्याचे भारतात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या राष्ट्रपतिपदाच्या रूपाने पाहता आले. राधाकृष्णन् व बाबाजींचा जन्मदिवस एकाच दिवशी येतो, हा दुग्धशर्करा योग होय. बाबाजींनी शिक्षणाचा मार्ग गोरगरीब विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला. लोकमान्य टिळक व स्वातंत्र्यवीर सावरकर हे त्यांचे आदर्श त्यांच्याकडे होते. त्यांचं जीवन संघर्षमय होतं. आव्हानांचे अस्तर लावलेलं बाबाजींचा जीवन आपल्या सगळ्यांना संस्थेसाठी काही करण्याची प्रेरणा देत राहील, असे त्या म्हणाल्या.
संस्थेचे अध्यक्ष श्री. विनायक दाते यांनी यावेळी बोलताना चांगला गुरू मिळणं ते दुर्मिळ असते, तो मिळाला तर नराचा नारायण आणि वाल्याचा वाल्मिकी झाल्याशिवाय राहत नाही. कुठला मार्ग निवडावा असा संदेह निर्माण झाल्यावर चांगला शिक्षकच मार्गदर्शन करू शकतो. यावेळी दाते महाविद्यालयाच्या प्रतिबिंब अंकाचे विमोचन करण्यात आले. अंकाचे संपादन डॉ. स्मिता शेंडे व  डॉ. ताराचंद कंठाळे यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन झाले. यावेळी राणी लक्ष्मीबाई व विवेकानंद विद्यालयातील संगीत विभागाच्या वतीने सरस्वती स्तवन तथा स्वागत गीत सादर झाले. संचालन प्रा. राजेश चव्हाण व सौ. वैशाली ठाकरे यांनी केले. वंदेमातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी दाते महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वर्षा कुळकर्णी, दाते बीपीएड्चे प्राचार्य डॉ. राजेंद्र क्षीरसागर, विवेकानंदच्या मुख्याध्यापक मीनाक्षी काळे, पर्यवेक्षक स्वाती जोशी, राणी लक्ष्मीबाईच्या मुख्याध्यापक डॉ. कल्पना पांडे, पर्यवेक्षक प्रशांत सिंगरू, व्यंकटेश विद्यालय घोडखिंडीचे मुख्याध्यापक मुकुंद बावणे, ध्रुव प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बळवंत सहस्रबुद्धे बाबाजी दाते इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापक अस्मिता पळसोकर यांच्यासह शिक्षक, शिक्षिका, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ मध्ये १५ ऑगस्ट २०२१ रविवार रोजी भारताचा ७४ वा स्वातंत्र दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ ट्रस्ट चे अध्यक्ष मा. श्री. विनायक दाते उपस्तीत होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात पसायदानाने झाली. त्या नंतर राष्ट्रगीत झाले भारतीय व संविधान उद्देशिकाचे वाचन करण्यात आले व कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीताने झाली. कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. सतीष फाटक, सौ. सुषमाताई दाते, सौ. शर्मिलाताई फाटक हे उपस्तीत होते. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिकेत्तर कर्मचारी आवर्जून उपस्तीत होते. कार्यक्रमाचे संचालन शा. शि. विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. राविजीत गावंडे यांनी केले.

पदवीदान समारंभ - शैक्षणिक वर्ष २०१९-२०

दिनांक २० जुलै २०२१ रोजी महाविद्यालयात आभासी पद्धतीने पदवीदान समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्री विनायक दाते अध्यक्ष, वाणिज्य महाविद्यालय न्यास तसेच प्रमुख पाहुणे व उदघाटक म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष श्री सतीशजी फाटक, व्यवस्थापन समितीच्या सभासद सौ सुषमा दाते आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप दरवरे व्यासपीठावर उपस्थित होते.
शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना यावेळी पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. प्रदीप दरवरे यांनी केले. प्रमुख पाहुणे श्री सतीशजी फाटक यांनी सर्व पदवी प्राप्त विद्यार्त्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विनायक दाते यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना स्वकर्तृत्वाचा सल्ला दिला.
कोविड - १९ च्या प्रादुर्भावामुळे कार्यक्रमाला प्रातिनिधिक स्वरूपात काहीच गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी उपस्थित होते ईतर विद्यार्थ्यांनी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून उपस्थिती दर्शवली. महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाची तांत्रिक व्यवस्था डॉ. प्रशांत बागडे यांनी पाहली, कार्यक्रमाचे संचालन डॉ. सचिन तेलखडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. गजानन लांजेवार यांनी केले.

 

मा. आमदार डॉ. रणजीत पाटील यांचेकडून लेसर प्रिंटर भेट.

मा. आमदार डॉ. रणजीत पाटील यांच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रम 2020-21 निधींमधून ऑल इन वन लेसर प्रिंटर बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयाला प्राप्त झाले.
दि. 13 जून 2021 रोजी हा प्रिंटर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप दरवरे यांना सुपूर्द करण्यात आला.

शिक्षक दिन व संस्थेचे संस्थापक बाबाजी दाते यांची जयंती साजरी

दिनांक - 5 सप्टेंबर 2020 रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन तसेच विशुध्द विद्यालय संस्थेचे संस्थापक बाबाजी दाते यांच्या जयंतीनिमित्त विशुध्द विद्यालय न्यास व वाणिज्य महाविद्यालय न्यास यांचे संयुक्त विद्यमाने 'शिक्षक दिन’ हा कार्यक्रम संस्थेअंतर्गत येणाऱ्या राणी लक्ष्मीबाई विद्यालयात संस्थेचे अध्यक्ष श्री. विनायक दाते तसेच श्रीमती विदयाताई केळकर, श्री सतीश फाटक, सौ सविता फाटक, श्री मंगेश केळकर तसेच इतर संचालक यांच्या प्रमुख उपस्थितीत कोविद १९ मुळे साधेपणाने परंतु उत्साहात संपन्न झाला. प्रतिमा पूजनानंतर मंचावरील सर्व मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी 10 वी 12 वी च्या गुणवत्ताप्राप्त विदयार्थ्यांचे पुष्पगुच्छ व पुस्तक स्वरुपात भेटवस्तू देऊन जाहीर कौतुक करण्यात आले. त्याचप्रमाणे घटक संस्थांमधील पी.एच डी प्राप्त प्राध्यापक डॉ. विवेक देशमुख, डॉ. अमोल राऊत आणि डॉ. प्रशांत बागडे तसेच M.Phil प्राप्त प्राध्यापक श्रीकांत पर्बत व सौ नीता देवतळे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. डॉ राजेंद्र क्षीरसागर यांची विद्यापीठात डीन म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
आपल्या मनोगतातून विदयाताईंनी बाबाजींच्या शिक्षण क्षेत्रातील आणि सामाजिक क्षेत्रातील विवीध उपक्रमांची माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात विनायक दाते यांनी बाबाजींची शिस्त, जिद्द आणि चिकाटी हया गुणांचे प्रत्यय आणून देणारे विविध अनुभव सांगितले. आभार प्रदर्शनानंतर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

दाते महाविद्यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, स्पर्धा परीक्षा विभाग तसेच ग्लोबल अॅकॅडमी नागपूर यांच्या संयुक्त विद्ममाने दि. ३-३-२०२० रोजी महाविद्यालयातील सावरकर सभागृहात सकाळी १० वाजता विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमांचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. माणिक मेहरे, प्रमुख वक्ते प्रा. अंकुश मराठे, संचालक, ग्लोबल अॅकॅडमी नागपूर, प्रा. गजानन पाटील, प्रमुख मार्गदर्शक, ग्लोबल अॅकॅडमी नागपूर, डॉ. हरिदास धुर्वे समन्वयक, स्पर्धा परीक्षा विभाग, बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय हे उपस्थित होते. स्पर्धा परीक्षेची तयारी कारणा-या उमेदवारासाठी आर्थिक, सामाजिक पाठबळाची व्यवस्था करणे गरजेचे आहे. असे मत डॉ. माणिक मेहरे यांनी व्यक्त केले. अपुरी माहिती, भिती, न्यूनगंड आणि गैरसमज, MPSC आणि UPSC परीक्षेचा बदलेला पॅटर्न यामुळे ग्रामीण भागातील उमेदवारामध्ये निर्माण झालेला संभ्रम अश्या मार्गदर्शन कार्यशाळेमधून दूर करता येतो असे मत व्यक्त केले. स्पर्धा परीक्षेच्या मुलाखतीला जाताना कश्या प्रकारची तयारी करावी. याबाबतचे मार्गदर्शन प्रा. गजानन पाटील यांनी केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. अमोल राऊत यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ. हरिदास धुर्वे यांनी केले. डॉ. रविजित गावंडे तसेच १८३ विद्यार्थी मार्गदर्शन कार्यशाळेला उपस्थित होते.

दाते महाविद्यात रंगभरणे व चित्रकला स्पर्धा

दिनांक ९ फेब्रुवारी रोजी ललित कलांच्या संवर्धनार्थ कार्यरत संस्कार भारती या कलावंत व कलारसिकांच्या संस्थेच्या वतीने तसेच येथील बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या सहयोगाने महाविद्यालय परिसरात घेण्यात आलेल्या रंगभरण व चित्रकला स्पर्धेला दणदणीत प्रतिसाद मिळाला.
संस्कार भारतीचे संस्थापक तथा जागतिक वारसा म्हणून प्रसिद्ध असलेले भीमबेटका येथील शैलचित्रांचे संशोधक पद्मश्री हरिभाऊ वाकणकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. वर्ग १ ते ४ चा 'अ' गट आणि ५ ते ७ च्या 'ब' गटातील विद्यार्थ्यांकरता रंगभरण स्पर्धा घेण्यात आली.  वर्ग ८ ते १० करिता असलेल्या चित्रकला स्पर्धेत 'निसर्ग चित्र' विषय देण्यात आला तर खुल्या गटाकरिता 'ऐतिहासिक व्यक्तिरेखा' चितारायची होती.
या सर्व गटातील सोळाशे स्पर्धकांनी दाते महाविद्यालयाचा परिसर फुलून गेला होता. स्पर्धेचा प्रारंभ वाणिज्य महाविद्यालय न्यासाचे अध्यक्ष विनायक दाते, उपाध्यक्ष सतीश फाटक आणि उपप्राचार्य डॉ. सौ. माणिक मेहरे तसेच संस्कार भारतीचे प्रांत सहमंत्री विवेक कवठेकर, यवतमाळचे अध्यक्ष दत्तात्रय देशपांडे, विभाग प्रमुख डॉ. ताराचंद कंठाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन व नटराज पूजन करून झाला. विनायक दाते यांनी विद्यार्थ्यांच्या प्रचंड प्रतिसादाबद्दल त्यांचे कौतुक करून पालकांच्या प्रोत्साहनाबद्दल त्यांचेही अभिनंदन केले. या काळात सर्जनशीलतेला अत्यंत महत्त्व असून कला ही विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता रुजविते असे ते म्हणाले.
सकाळी ९ वाजता स्पर्धेला सुरुवात करायची होती. विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था व त्यांना स्पर्धेसंबंधीच्या सूचना संस्कार भारती चित्रकला विधाचे अरुण लोणारकर, प्रदीप गज्जलवार, संजय सांबाजवार, अभिजित भीष्म, शेखर वांढरे, भूषण मानेकर, रवींद्र क्षीरसागर, मीरा तिवसकर यांनी केल्या. जीवन कडू, चंद्रशेखर सवाने, प्राची बनगीनवार, शारदा घोटकर,  ऐश्वर्या बैस यांच्यासह स्पर्धकांचे पालक व विविध शाळांतील चित्रकला शिक्षक व्यवस्थेमध्ये सहयोग देत होते. चित्र काढताना मुलांच्या चेहऱ्यावर अपूर्व आनंद विलसत होता.
या स्पर्धेचे मूल्यांकन करून बक्षीस वितरणाचा दिनांक शाळांना कळविला जाणार आहे. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिली जाणार आहेत. स्पर्धेच्या यशस्वितेकरिता बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी तथा संस्कार भारतीचे पदाधिकारी व सदस्य यांनी प्रचंड परिश्रम घेतले.

दाते महाविद्यालया मध्ये युवक महोत्सव २५ ते २७ जानेवारी २०२०

स्थानिक बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय येथे दिनांक 25, 26 व 27 जानेवारी 2020 ला युवक महोत्सव संपन्न झाला. तारुण्याचे दिवस हे खऱ्या अर्थाने  गौरवाचे दिवस असतात. तसेच हा काळ मंतरलेला असतो. हे दिवस सर्वांनी जगले तर पाहिजेतच  पण ह्या स्मृती सदैव स्मरणात ठेवायच्या असतात असे गौरवोद्गार युवक महोत्सवाचे प्रमुख पाहुणे यवतमाळ येथील प्रथितयश सनदी लेखाधिकारी तथा आमच्या महाविद्यालयाचे गुणवंत माजी विद्यार्थी श्री प्रविण गांधी  यांनी  उद्घाटन प्रसंगी काढले. या स्नेहसंमेलनाचे अध्यक्ष वाणिज्य महाविद्यालय न्यासाचे अध्यक्ष श्री विनायक दाते होते. मंचावर संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती सिनेट सदस्य प्रा.विवेक देशमुख, विश्वस्त सौ.सुषमा दाते, प्रा.डॉ.हरिदास धुर्वें, प्रा. डॉ.कल्पना देशमुख, युवक महोत्सव समन्वयक प्रा.विजय गाडगे तथा सर्व वर्ग प्रतिनिधी उपस्थित होते.
युवक महोत्सव दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाचा वार्षिकांक ‘प्रतिबिंब’ चा प्रकाशन सोहळा मराठी विभागाच्या वतीने यवतमाळ येथील प्रथितयश सनदी लेखाधिकारी तथा आमच्या महाविद्यालयाचे गुणवंत माजी विद्यार्थी श्री प्रविण गांधी यांच्या हस्ते करण्यात आला
पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक प्रा.विवेक देशमुख यांनी तर संचालन प्रा. डॉ.ताराचंद कंठाळे यांनी केले. सुरुवातीला दीपप्रज्वलन करून  संगीत विभागाच्या वतीने शारदा स्तवन व स्वागत गीत सादर करण्यात आले व  नंतर मान्यवरांचा  सत्कार करण्यात आला. प्रा.गाडगे यांनी आभारप्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली.

दिनांक 25, 26 व 27 जानेवारीला बचाव स्पर्धा, वेश भूषा स्पर्धा, ट्विंस स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, भावगीत स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
दिनांक २७ जानेवारी ला युवक महोत्सव बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला.  ज्या विद्यार्थ्यांना पारितोषिके मिळाली त्यांचा प्रमाणपत्र, मेमेंटो देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला सौ सुषमा दाते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. मंचावर उपप्राचार्य डॉ.माणिक मेहरे, प्रा.विवेक देशमुख ,डॉ कल्पना देशमुख, डॉ हरिदास धूर वे, समन्वयक प्रा.विजय गाडगे प्रामुख्याने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी  व स्वयम् सेवकांनी खूप सहकार्य केले त्याबद्दल संचलन कर्ता प्रा.अमोल राऊत यांनी त्यांचे कौतुक केले. शेवटी समन्वयक प्रा.विजय गाडगे यांनी सर्वांचे आभार मानले.

दाते महाविद्यालया मध्ये पालक सभा संपन्न

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात दिनांक 20 सप्टेंबर 2019  ला पालक सभेचे आयोजन करण्यात आले. या पालक सभेला अध्यक्ष म्हणून वाणिज्य महाविद्यालय न्यासाचे  अध्यक्ष मा. श्री. विनायक दाते तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष श्री सतिष फाटक साहेब, तसेच विश्वस्त सौ. सुषमा दाते व प्रा. विवेक देशमुख मंचावर उपस्थित होते. व्यवस्थापन, प्राध्यापक, पालक आणि विद्यार्थी हे महाविद्यालयाचे 4 आधार स्तंभ आहेत. पालकांनी महाविद्यालयाशी संपर्क ठेवणे आवश्यक आहे, असे श्री विनायक दाते यांनी सांगितले. श्री सतिष फाटक यांनी संस्थेमधे झालेला आमूलाग्र बदल सांगितला व भविष्यातही विद्यार्थ्यांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी महाविद्यालय कटिबद्ध आहे, असे सांगितले.
प्राध्यापकांचे प्रतिनिधी म्हणून भूगोल विभाग प्रमुख तसेच नॅकच्या समन्वयक डॉ .कल्पना देशमुख यांनी नॅक करत असतांना पालक, विद्यार्थी व प्राध्यापक यांची काय भूमिका असते यावर भाष्य केले. पालकांचे प्रतिनिधी म्हणून मंचावर उपस्थित प्रा.डॉ. स्वाती जोशी, सौ.अर्चना राऊत, सौ.विणा राऊत व इतर पालकांनी यांनी महाविद्यालयाचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीकोनातून अनेक प्रकारच्या मौलिक सूचना केल्या व महाविद्यालयाच्या विद्यमान दर्जावर समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  पालक सभेचे आयोजक प्रा. डॉ. रविजित गावंडे यांनी केले या पालक सभेचे संचालन प्रा. ताराचंद कंठाळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. अमोल राऊत यांनी केले. सभेला पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

दाते महाविद्यालय - शिक्षक दिन उत्साहात साजरा

विशुद्ध विद्यालयाच्या सर्व घटक संस्थांचा संयुक्त शिक्षण दिन १३ सप्टेंबर २०१९ रोजी विवेकानंद महाविद्यालय सभागृहात साजरा झाला. या कार्यक्रमात बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, दाते शारीरिक प्रशिक्षण महाविद्यालय, अध्यापन पदविका महविद्यालय, विवेकानंद राणी लक्ष्मीबाई विद्यालय, ध्रुव प्राथमिक शाळा, व्यंकटेश विद्यालय घोडखिंडी, रामगोपाल बाजोरिया इंग्लिश मिडीयम स्कूल व बाबाजी दाते इंग्लिश मिडीयम स्कूलचे सर्व शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संस्थेचे सचिव सतीश फाटक यांनी प्रास्ताविकातून सर्वाना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देऊन या कार्यक्रमाबद्दल संस्थेची भूमिका विशद केली. बाबाजी दाते हे शिक्षणसम्राट नव्हे तर शिक्षणमहर्षी होते असे ते म्हणाले. या वेळी घटक संस्थातील १६ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याचा संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ स्मृती चिन्ह व गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला. विशुद्ध विद्यालय व वाणिज्य महाविद्यालय या संस्थांचे अध्यक्ष विनायक दाते यांनी सांगितले की निसर्ग हा पहिला शिक्षक आहे. त्यानंतर आई, वडील व मित्र हे शिक्षक असतात. त्यानंतर शाळेतील व महाविद्यालयातील शिक्षक हे विदयार्थ्यांना घडवतात. बाबाजी दाते हे खरे हाडाचे शिक्षक होते. बाबाजी दाते आपल्या विद्यार्थांना समजेपर्यंत शिकवणारे शिक्षक होते.
संथेच्या उपाध्यक्षा विद्या केळकर, सचिव सतीश फाटक, सहसचिव शर्मिला फाटक व कोषाध्यक्ष मंगेश केळकर मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते. विवेकानंद विद्यालायाचे मुख्याध्यापक पुरुषोत्तम बोबडे यांनी सर्वांचे आभार मानले.

HSC Result 2019

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाचा उत्कृष्ट निकाल - बाबाजी दाते कला आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी १२ वी २०१९ परीक्षेच्या निकालात आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम राखलेली आहे.

१२वी  व्यवसाय अभ्यासक्रमाचा निकाल ८२.७५ टक्के

उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमातून ०१ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले असून ४२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

इलेक्ट्रिकल टेक्नोलॉजी शाखेतून संदेश एस. विधाते याने ७१.५३ टक्के गुण प्राप्त करून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.

ऑटो इंजिनीरिंग टेक्नोलॉजी शाखेतून प्रथमेश सुहास कावलकर याने ७०.६१ टक्के गुण प्राप्त करीत प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.

बँकिंग फायनान्शियल सर्विस अंड इन्वेस्टमेंट शाखेतून कु. अमिषा सुदर्शन पटेल हिने ७६.०० टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

१२वी वाणिज्य मराठी शाखेचा निकाल ९३.१४ टक्के
१२ वी वाणिज्य मराठी माध्यम शाखेचा निकाल ९३.१४ टक्के लागलेला असून कु. दीक्षा प्रभाकर वाढई हिने ८६.९२ टक्के गुण प्राप्त करीत १२ वी वाणिज्य मराठी माध्यमातून महाविद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. वाणिज्य शाखेत २५ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले असून ४५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
१२वी वाणिज्य इंग्रजी माध्यमाचा निकाल ८८.१४ टक्के
१२ वी वाणिज्य इंग्रजी माध्यमाचा निकाल ८८.१४ टक्के लागलेला असून महाविद्यालयातून  कु. पूजा महेश पलकंडवार हिने ८०.७६ टक्के गुण प्राप्त करीत महाविद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. १२ वी वाणिज्य इंग्रजी माध्यमातून ०६ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले असून ३८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
१२वी  कला शाखेचा निकाल ५९.१५ टक्के
१२वी कला शाखेचा निकाल ५९.१५ टक्के लागलेला असून महेश उकुंडराव शिरसाट याने ८७.०७ टक्के गुण प्राप्त करीत महाविद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. कला शाखेत २ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले असून ३० विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

दाते महाविद्यालयात पालक सभा संपन्न

यवतमाळ येथील बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात दिनांक 30 मार्च 2019 रोजी  स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात  वरीष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या पालकांची "पालक सभा"  आयोजित केली होती. व्यासपीठावर अध्यक्ष स्थानी मा. श्री. विनायक दाते (अध्यक्ष, वाणिज्य महाविद्यालय न्यास), सौ. सुषमा दाते (विश्वस्त, वाणिज्य महाविद्यालय न्यास),  महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ. प्रेरणा पुराणिक, सौ. इंदूताई साबळे व प्रकाश वरण्य हे पालकांचे प्रतिनिधि म्हणून व्यासपिठावर उपस्थित होते. प्रा. विवेक देशमुख यांनी पालक सभेचे प्रयोजन विषद केले. प्राचार्यानी अशी पालक सभा दरवर्षी आयोजित करून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यात येईल असे सांगितले. कार्यक्रमांचे अध्यक्ष मा.विनायक दाते यांनी पालकांनी दिलेल्या सूचना स्वागतार्ह असून त्या प्रमाणे महाविद्यालयात विविध सुधारणा करण्यात येईल असे आश्वासन दिले. या सभेत पालकांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी, समस्या, व सूचना मांडण्याची संधी देण्यात आली. काही पालकांनी वरीष्ठ महाविद्यालयात पालक सभा घेतल्याबद्दल आनंद व्यक्त करून दरवर्षी अशाच प्रकारचे आयोजन करण्यात यावे अशी सूचना केली. या पालक सभेत पालकांतर्फे सौ. इंदूताई  साबळे, हिरामण कांबळे, शिवानंद दांडेकर, सौ. भाविका, सौ. गौरकर आणि प्रणाली काकडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या सभेस मोठ्या संख्येने पालक महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षक्केतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी आपली उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. डॉ. रविजित गावंडे यांनी केले. संचलन प्रा. डॉ. ताराचंद कंठाळे, प्रास्ताविक प्रा. विवेक देशमुख व आभार प्रदर्शन प्रा. हरिदास धुर्वे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी सहकार्य केले.

दि.२७ जानेवारी २०१९ रोजी माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न

दि.२७ जानेवारी २०१९ रोजी बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ येथे माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, वाणिज्य महाविद्यालय न्यासाचे अध्यक्ष मा. विनायक दाते होते. प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. वसंतराव पुरके - माजी शिक्षण व क्रीडा मंत्री, मा. दिवाकरराव पांडे - माजी शिक्षक आमदार, मा.सुरेश कैपिल्यवार - प्रसिद्ध ज्वेलर्स हे उपस्थित होते. त्याचबरोबर माजी विद्यार्थी संघटनेचे विद्यमान अध्यक्ष मा. सतीश फाटक, तसेच संस्थेचे विश्वस्त मा. सौ.सुषमा दाते, मा. श्री.चंद्रकांत रानडे, मा.विजय कासलीकर, मा. सौ. शर्मिला फाटक, प्राचार्य सौ. प्रेरणा पुराणिक, उपप्राचार्य डॉ. सौ. माणिक मेहरे, सिनेट सदस्य प्रा. विवेक देशमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम माजी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचा संपूर्ण परिसर दाखविण्यात आला. प्रास्ताविकात मा. विवेक देशमुख यांनी माजी विद्यार्थी संघटनेचे ‌महत्व, सदस्यता आणि निवडणुकीबाबत माहिती दिली. यावेळी मोठ्या संख्येने महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी उपस्थित होते व त्यापैकी अनेकांनी उत्स्फूर्तपणे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे बहारदार संचालन डॉ. ताराचंद कंठाळे यांनी केले तर डॉ. वैशाली बेडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. संगीत  विभागाने सरस्वती स्तवन व स्वागतगीत सादर केले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

मानवी जीवनात आत्मिक सुख फार मोलाचे : डॉ. हमीद खान

विज्ञान आणि तंत्रज्ञान या विद्याशाखेने मानवी जीवनात भौतिक साधन-सुविधा देण्यासाठी मोठी कामगिरी केली आहे, यात शंका नाही. त्याला आत्मिक सुखाची जोड अत्यंत आवश्यक असते. हे आत्मिक सुख मिळविण्यासाठी मानव्य विद्याशाखेची भूमिका अत्यंत महत्वाची आहे, असे प्रतिपादन मौलाना अ. कलाम आझाद अध्यासन, औरंगाबादचे प्रमुख डॉ हमीद खान यांनी केले.
स्थानिक बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात आयोजित इमर्जिंग ट्रेंड्स इन ह्युमोनिटीज या सेमिनारमध्ये ते बोलत होते. महाविद्यालयाची वर्गखोली ही जगाकडे बघण्याची एक खिडकी आहे. त्यामुळे शिक्षकांनी वर्गामध्ये जाण्यापूर्वी अतिशय तयारीने जाण्याची गरज असते. शिकण्यापूर्वी सखोल चिंतनाची गरज आहे. त्यासाठी भरपूर वाचन हा एकमेव पर्याय आहे., असेही उद्गार डॉ. हामीद यांनी आपल्या अत्यंत प्रभावाशाली भाषणामध्ये काढले.
तत्पूर्वी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर यांनी सेमिनारचे उद्घाटन केले. आपल्या भाषणामध्ये त्यांनी विद्यापीठाद्वारे चालविणारे अभ्यासक्रम, त्यात वेळेनुसार झालेले बदल व इतर उपक्रमाची थोडक्यात माहिती दिली. महाविद्यालयाच्या  प्राचार्य सौ प्रेरणा सं. पुराणिक, संस्थेचे अध्यक्ष श्री विनायक दाते, उपाध्यक्ष श्री सतीष फाटक यांचीही समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेमिनारचे संयोजक प्रा. प्रशांत बागडे यांनी तर पाहुण्यांचा परिचय ज्येष्ठ सिनेट सदस्य प्रा. विवेक देशमुख यांनी करून दिला. कार्यक्रमाच्या सुरवातीला दीप प्रज्वलन आणि संगीत विभागातर्फे अतिशय सुरेख ईशस्तवन आणि स्वागत गीत सादर करण्यात आले. यानंतर दिवसभर विविध विषयांतर्गत शोधनिबंध सादर करण्यात आले. प्रा. डॉ. दि. व्य. जहागीरदार प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. संचालक प्रा. डॉ. ताराचंद कठाळे यांनी तर आभार डॉ. कल्पना देशमुख यांनी मानले. ज्येष्ठ पत्रकार राज्यशास्त्राचे अभ्यासक प्रा. न. मा. जोशी यांच्या अतिशय उद्बोधक आणि बहारदार भाषणाने सेमिनारचा समारोप झाला.

या सेमिनार मध्ये इतर महाविद्यालयातील जवळपास २०० वेगवेगळ्या विषयाच्या प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला. तसेच १८५ प्राध्यापकाचे शोधनिबंध प्राप्त होऊन ते विद्यापीठ अनुदान आयोग लीस्टेट जर्नल मध्ये शोधपुस्तीकेद्वारे ६ खंडामध्ये महाविद्यालयाच्या वतीने प्रकाशित करण्यात आले.

युवक महोत्सव १७ ते १९ जानेवारी २०१९

स्थानिक बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात दिनांक १७ जानेवारी ते १९ जानेवारी २०१९ या काळामध्ये मोठ्या उत्साहात युवक महोस्तव संपन्न झाला. “आधुनिक काळामध्ये महिला या प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असून या युवक महोस्तवच्या सहाय्याने सर्व विद्यार्थांच्या सुप्तगुणांना वाव मिळतो महिला सशक्ती करणाच्या दृष्टीनेही असे कार्यक्रम अत्यंत उपयुक्त आहे” असे उद्गार सौ. कांचनताई बाळासाहेब चौधरी यांनी काढले, युवा महोस्तवाचा उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. नगराध्यक्ष म्हणून यवतमाळ मध्ये सुरु असलेल्या अनेक उपक्रमाची माहिती त्यांनी दिली शहर स्वच्छतेसाठी तसेच युवकांच्या मतदान हक्काबद्दल त्यांनी विषेश मार्गदर्शन केले. नगराध्यक्ष म्हणून शहराच्या प्रगती साठी आपण सर्व मिळून प्रयत्न करूया असे भावनीक आवाहन त्यांनी केले
अध्यक्ष पदावरून बोलतांना संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. विनायक  दाते यांनी अभ्यासाबरोबरच इतर कलागुणांमध्ये विद्यार्थांनी सहभागी होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. सतीष फाटक यांनी महाविद्यालयात होत असलेल्या सुधारणान विषयी माहिती दिली. या कार्यक्रमाला प्रभारी प्राचार्य सौ. प्रेरणा पुराणिक यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर संस्थेच्या विश्वस्त सौ. सुषमा दाते, प्रा. विवेक देशमुख, डॉ. हरिदास धुर्वे, उपप्राचार्य डॉ. माणिक मेहरे, डॉ. स्वाती जोशी, श्री. विजय कासलीकर, श्री. चंद्रकांत रानडे, युवक महोस्तवाचे समन्वयक प्रा. डॉ. रविजीत गावंडे उपस्थित होते.

५ सप्टेंबर २०१८ रोजी शिक्षक दिन तथा बाबाजी दाते जयंती कार्यक्रम उत्साहात साजरा :

विशुद्ध विद्यालय ट्रस्ट व वाणिज्य महाविद्यालय ट्रस्ट यांचा संयुक्त शिक्षक दिन तथा बाबाजी दाते जयंती कार्यक्रम उत्साहात पार पडला. भारताचे द्वितीय राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा जन्मदिवस ५ सप्टेंबर हा शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो. विशुद्ध संस्थेचे संस्थापक श्रीकृष्ण दत्तात्रेय उपाख्य बाबाजी दाते यांचाही जन्मदिन ५ सप्टेंबर. या दोन्ही दिनविशेषांच्या अनुषंगाने संस्थेच्या वतीने दरवर्षी ९ घटक संस्थांतील विद्यार्थी व शिक्षकांचा संयुक्त कार्यक्रम घेतला जातो.
यंदाच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी संस्थेच्या उपाध्यक्ष तथा बाबाजी दाते महिला बॅकेच्या अध्यक्ष सौ. विद्याताई केळकर होत्या. त्यांनी आपल्या भाषणात बाबाजींच्या जीवनात तत्त्वाला किती महत्त्व होतं ते सांगताना संपूर्ण वंदे मातरम्, पसायदान, शिस्त इत्यादी बाबतीतील आग्रह प्रतिपादन केला.
मुख्य अतिथी म्हणून शहरातील प्रसिद्ध स्वर्ण व्यवसायी श्री. सुरेश कैपिल्यवार होते. बाबाजींच्या काॅलेजमध्ये शिक्षण घेतले असल्याने आपल्या व्यावसायिक जीवनालाही उत्तम वळण लागल्याचे त्यांनी कृतज्ञतेने सांगितले. संस्थेच्या वतीने त्यांचा यावेळी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिह्न देऊन गौरव करण्यात आला.
संस्थेचे सचिव श्री. सतीश फाटक यांनी प्रास्ताविकात बाबाजींचा शिक्षणाचा वारसा चालविताना संस्था राबवित असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली.
संस्थेच्या वतीने शिक्षक दिना निमित्त बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. प्रेरणा पुराणिक, उप प्राचार्य डॉ. सौ. माणिक मेहरे, पर्यवेक्षक डाॅ. सौ. स्वाती जोशी, दाते शारीरिक प्रशिक्षण महाविद्यालयाचे प्रा. डाॅ. मार्कस लाकडे, अध्यापन पदविका प्रशिक्षण महाविद्यालयाचे प्रा. कैलास बोके, राणी लक्ष्मीबाई विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. प्रशांत सिंगरू, विवेकानंद विद्यालयाचे श्री. देविदास भगत, व्यंकटेश विद्यालयाचे श्री. मारोती जाधव, ध्रुव प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. बळवंत सहस्रबुद्धे व रामगोपाल बाजोरिया इं. मि. स्कूलच्या मुख्याध्यापक सौ. संगीता मोहिते यांचा सत्कार करण्यात आला.
श्री. चंद्रकांत रानडे यांनी आभार प्रदर्शन केले. सौ. ज्योती देशपांडे, श्री. मोहन केळापुरे, प्राचार्य डाॅ. राजेंद्र क्षीरसागर, प्राचार्य श्रीकांत पर्बत, श्री. मुकुंद बावणे, श्री. पुरुषोत्तम बोबडे, सौ. अस्मिता पळसोकर यांनी स्वागत केले. विवेकानंदच्या विद्यार्थ्यांनी शारदा स्तवन तर रालविच्या मुलींनी स्वागत गीत म्हटले. प्रा. डाॅ. सौ. माणिक मेहरे यांच्या वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता झाली.

या तीन दिवसीय स्नेहसंमेलनात रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, डीश डेकोरेशन, या स्पर्धांना विद्यार्थी-विद्यार्थिनींनी भरभरून प्रतिसाद दिला. याशिवाय काव्यगायन, नृत्य स्पर्धा, वेशभूषा, भावगीत स्पर्धा आणि वादविवाद स्पर्धा, बचाव स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. दि १७ व १८ जानेवारी रोजी दुपारी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये नृत्य, नाटिका, नकला, वेशभूषा, ट्वीन्स अशा विविधरंगी स्पर्धांना सुरवात झाली. या स्पर्धांना विद्यार्थ्यांनी भरगच्च उपस्थिती दर्शवली, या सर्व कलाकारांना मनसोक्त दाद देताना विद्यार्थ्यांच्या उत्साहाला उधाण आले होते. युवक महोत्सवाचा उत्तरार्ध आनंदमेळ्याने झाला. विविध खेळ आणि रुचकर खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर आस्वाद घेण्यासाठी खवैयांची झुंबड उडाली. या सर्व विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थी विद्यर्थीनिनी चढाओढीने सहभाग नोंदविला. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्रे देऊन गौरव करण्यात आला.
२०१९ च्या या युवक महोत्सवाच्या समन्वयक प्रा. डॉ. रविजीत गावंडे होते. सर्व संस्थाचालकांचा सक्रीय सहभाग, कार्यक्रमांचे काटेकोर नियोजन आणि प्राध्यापकांचे तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पूर्ण नियंत्रण  याबरोबरच  विद्यार्थ्यांची अलोट गर्दी, उस्फुर्त प्रतिसाद, अमाप उत्साह हि वैशिष्ट्ये असलेल्या या युवक महोत्सवातील शिस्त वाखाणण्यासारखी होती या गोष्टींचा सर्व प्रमुख अतिथींनी केलेला उल्लेख ही या महोत्सवाची आणखी एक जमेची बाजू.

युवक महोत्सव ९ ते ११ जानेवारी २०१८

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय येथे दि. ९, १० व ११ जानेवारी २०१८ या कालावधीत युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.राजेश जयपूरकर उद्घाटक म्हणून उपस्थित होते. वाणिज्य महाविद्यालय न्यासचे अध्यक्ष मा.विनायक दाते यांच्या अध्यक्षते खाली विद्द्यार्थ्यांच्या प्रचंड उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. वाणिज्य महाविद्यालयाचे उपाध्यक्ष मा.सतीश फाटक, न्यासच्या सदस्य सौ.सुषमा दाते, श्री मंगेश केळकर, सौ मीरा केळकर, सौ.शर्मिला फाटक, श्री विजय कासलीकर, चद्रकांत रानडे, प्राचार्य प्रेरणा पुराणिक, वरिष्ठ महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय व एम.सी.व्ही.सी.चे प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मा.प्र-कुलगुरूंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वर्ग १२ वी मध्ये यवतमाळ जिल्ह्यातून गुणानुक्रमे प्रथम आलेली कु.भक्ती जोशी, राष्ट्रीय सेवा योजनेतून मुंबई येथे २६ जानेवारी च्या आर.डी. परेड साठी निवड झालेली कु.गायत्री माने, थलसैनिक कॅम्पसाठी दिल्ली येथे निवड झालेला एनसीसी कॅडेट मनोज भेंडारकर या विद्यार्थ्याना गौरवण्यात आले.
याप्रसंगी विवध क्षेत्रात कर्तुत्व गाजवणाऱ्या प्राध्यापकांचा देखील गौरव करण्यात आला. या मध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेटवर निवडून आलेले प्रा.विवेक देशमुख, अमरावती विद्यापीठाच्या राष्ट्रीय पातळीवरच्या आर्चरी टीमचे नेतृत्व करणारे डॉ.रविजीत गावंडे, उत्कृष्ट एनसीसी युनिट म्हणून प्रा.प्रशांत बागडे, पी.एचडी.मार्गदर्शक झाल्याबद्दल डॉ.स्नेहल डहाळे यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.

या तीन दिवसीय स्नेहसंमेलनात रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, डीश डेकोरेशन, या स्पर्धांना विद्यार्थी-विद्यार्थिनींनी भरभरून प्रतिसाद दिला. याशिवाय काव्यगायन, नृत्य स्पर्धा, वेशभूषा, भावगीत स्पर्धा आणि वादविवाद स्पर्धा,. बचाव स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. दि ९ व १० जानेवारी रोजी दुपारी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये नृत्य, नाटिका, नकला, वेशभूषा, ट्वीन्स अशा विविधरंगी स्पर्धांना सुरवात झाली. या स्पर्धांना विद्यार्थ्यांनी भरगच्च उपस्थिती दर्शवली, या सर्व कलाकारांना मनसोक्त दाद देताना विद्यार्थ्यांच्या उत्साहाला उधाण आले होते.युवक महोत्सवाचा उत्तरार्ध आनंदमेळ्याने झाला. विविध खेळ आणि रुचकर खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर आस्वाद घेण्यासाठी खवैयांची झुंबड उडाली. या सर्व विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थी विद्यर्थीनिनी चढाओढीने सहभाग नोंदविला. सुमारे ८६  स्पर्धकांनी  बक्षिसे पटकाविली. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्रे देऊन गौरव करण्यात आला.

२०१८ च्या या युवक महोत्सवाच्या समन्वयक भूगोल विभागप्रमुख प्रा. डॉ. कल्पना देशमुख होत्या. मा. प्राचार्य डॉ. प्रेरणा पुराणिक यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व संस्थाचालकांचा सक्रीय सहभाग, कार्यक्रमांचे काटेकोर नियोजन आणि प्राध्यापकांचे तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पूर्ण नियंत्रण  याबरोबरच  विद्यार्थ्यांची अलोट गर्दी, उस्फुर्त प्रतिसाद, अमाप उत्साह हि वैशिष्ट्ये असलेल्या या युवक महोत्सवातील शिस्त वाखाणण्यासारखी होती या गोष्टींचा सर्व प्रमुख अतिथींनी केलेला उल्लेख ही या महोत्सवाची आणखी एक जमेची बाजू.