बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ 

Babaji Datey Kala & Vanijya Mahavidyalaya, Yavatmal

(वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ ट्रस्ट रजि. क्र. ई-३२ द्वारा संचालित)

NAAC Accredited B++ Grade with CGPA 2.82

NSS – जागतिक महिला दिन साजरा

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.11/3/2024 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान करण्याकरिता कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या प्राचार्या  डॉ. वर्षा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी महिला दिन साजरा करण्यामागची भूमिका स्पष्ट करून महिला ह्या कशा सर्व गुणांनी संपन्न आहेत व त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेतला तसेच उपस्थित अतिथींचा परिचय करून दिला. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या सायकॉलॉजिस्ट तसेच फॉरेन्सिक अधिकारी म्हणून काम करणाऱ्या राही ठाकूर  यांनी विद्यार्थिनींना महिलांविषयी असलेले पूर्वग्रह व समाजामध्ये वावरताना येणाऱ्या अडचणी यावर मात कशी करायची हे सविस्तर सांगितले त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असलेल्या  डॉ. सारिका शहा यांनी विद्यार्थिनींना बदलत्या समाजाच्या अपेक्षा व महिलांची आजची स्थिती याविषयी चर्चा केली त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती  असलेल्या सन्माननिय सौ.सुषमा दाते यांनी पूर्वी पार चालत आलेल्या रूढी परंपरा व आजची सामाजिक स्थिती यावर प्रकाश टाकला तसेच स्त्री व पुरुष दोघेही कमावते असल्यामुळे दोघांनीही घरातील कामाचा भार सांभाळावा असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाच्या प्राचार्या  डॉ. वर्षा कुलकर्णी यांनी आई-वडिलांचा विश्वास हा विद्यार्थी जिवनात कसा संपादन करून  विविध क्षेत्र कसे बळकावता येतात, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले, महिलांनी वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊन नावलौकिक मिळवावे अश्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिषा वाडगुरे हिने तर आभार प्रदर्शन दामिनी बुटले हिने केले.  कार्यक्रमाच्या यशस्वीतते करिता राज्यशास्त्र,गृहअर्थशास्त्र व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

वैराग्यमूर्ती गाडगे महाराज जयंती

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत दिनांक 25/2/24 रोजी वैराग्यमूर्ती गाडगे महाराज जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ.वर्षा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना गाडगे महाराजांच्या जीवन विषयक संकल्पना उलगडून दाखवून त्यांनी केलेले कार्य हे समस्त मानवी जीवनासाठी आदर्श आहेत हे सांगितले, तसेच राष्ट्रीय सेवा  योजना सहकार्यक्रम अधिकारी डॉ.सचिन जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व सांगून परिसर स्वच्छ करून परिसरातील लोकांना गाडगे महाराजांनी सांगितलेल्या  दशसूत्रीचे दैनंदिन जीवनामध्ये पालन केल्यास खऱ्या अर्थाने मानवी जीवन सफल होईल असे सांगून परिसर स्वच्छता करण्यास प्रवृत्त केले.
यावेळी महाविद्यालय परिसर स्वच्छ करून  रस्त्यावरील प्लास्टिक व कचरा गोळा करून परिसरातील नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीतून वेगवेगळे नारे व स्वच्छतेचे संदेश देण्यात आले नागरिकांना गाडगे महाराजांची खरी शिकवण सांगण्यात आली व प्रबोधन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता राष्ट्रीय सेवा योजनेच्या संपूर्ण स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले

मनोरुग्णांची सेवा ही ईश्वर सेवा आहे

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने दि.15/02/2024. रोजी मनोरुग्णांची सेवा करण्यासाठी नंदादीप फाउंडेशन येथे एक दिवशीय भेटीचे आयोजन प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी स्वयंसेवकांना मनोरुग्णांची सेवा ही ईश्वर सेवा आहे असे सांगून मनोरुग्णांना खरी मानवतेची गरज असते असे सांगितले.
रा. से.यो.  स्वयंसेवकांनी  संपूर्ण परिसर स्वच्छ करून मनोरुग्नाशी संवाद साधला तसेच त्याच्या मनोरंजन साठी स्फुर्ती गिते सादर केली  या ठिकाणी असलेल्या एकुण  150 मनोरुग्नाना चिवडा व बिस्कीट चे वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. सचिन जयस्वाल व प्रा. सारिका नंदे यांनी परिश्रम घेतले.

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील राष्ट्रीय सेवा योजना द्वारे विशेष श्रमसंस्कार निवासी सात दिवसीय शिबिर दि.28 जानेवारी 2024 ते 3 फेब्रुअरी 2024 या कालावधीत दत्तक ग्राम चापर्डा ता. कळंब जि. यवतमाळ येथे संपन्न झाले. शिबिराचे  उद्घाटक म्हणून  संस्थेचे अध्यक्ष श्री विनायक दाते प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी, सं.गा.बा.अमरावती विद्यापीठ अमरावती चे व्यवस्थापन कमिटीचे सदस्य डॉ. हरिदास धुर्वे हे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी मागील वर्षात विद्यार्थ्यांनी केलेल्या गौरवपूर्ण कार्याचा आढावा घेऊन शिबिरा अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या उपक्रमाची माहिती सांगितली.
शिबिरातील स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांनी शिबिरादरम्यान पाळल्या जाणाऱ्या शिस्तीचे महत्व सांगितले. तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री विनायक दाते यांनी स्वयंसेवकांना केलेल्या कामाबद्दल प्रशंसा करून या सात दिवसांमध्ये स्वयंसेवकांनी  आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करून 21 व्या शतकाच्या दृष्टीने वाटचाल करावी अशा शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. दिपाली ठाकरे हिने तर आभार प्रदर्शन सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांनी केले.
सायंकाळच्या सत्रामध्ये स्वयंसेवकांसाठी उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले यामध्ये विद्यार्थी प्रतिनिधी रोहन गायकवाड आणि विद्यार्थिनी प्रतिनिधी कु. रश्मी परसराम यांनी स्वयंसेवकांना सात दिवसांमध्ये करावयाच्या विविध उपक्रमांची माहिती सविस्तर सांगून प्रत्येक स्वयंसेवकांनी सहभागी होऊन आपला व्यक्ती महत्त्व विकास करावा असे आवाहन केले. तसेच ग्रामस्थ महिलांसाठी महिला मेळाव्याचे आयोजन करून महिलांना भेटवस्तू देऊन विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यामध्ये ग्रामस्थ महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

दिनांक 29 /01/2024  रोजी योगासनाने दिवसाची सुरुवात झाली, प्रभात फेरी काढून ग्रामस्थांना विविध संदेश देण्यात आले, त्याचप्रमाणे गाव स्वच्छता पथनाट्य सादर करून ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यात आले तसेच श्रमसंस्कार करण्याकरिता रेन वॉटर हार्वेस्टिंग चे उद्घाटन व शोष खड्डा निर्मितीचे नियोजन करण्यात आले, तसेच दुपारच्या सत्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून प्रा. वर्भे सर व रुपेश वानखेडे सर यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रयोगातून अंधश्रद्धा कशी पसरवली जाते व सर्वसामान्य नागरिक त्याला बळी कसा पडतो याचे सविस्तर विवेचन केले यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्या गावात व आजूबाजूच्या परिसरात सुरू असलेली बुवाबाजी याची माहिती सांगून त्यातून मार्ग कसा काढायचा याविषयी सविस्तर चर्चा केली, सायंकाळच्या सत्रामध्ये  राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी डॉ. रविजीत गावंडे यांच्या अध्यक्षते खाली विविध सांस्कृतिक कार्यक्रमांर्गत एकपात्री प्रयोग सादर करण्यात आले यामध्ये शेतकरी, गरीब महिला , विविध नेते व भुताचे कॉमेंट्री करून गावकऱ्यांची मने जिंकली तसेच विविध प्रकारचे नाट्य करून गावागावात चालणारी विविध प्रकारच्या अंधश्रद्धा विषयक बाबींचा पर्दाफाश कसा करायचा व सत्य परिस्थिती कशी ओळखायची याचे सविस्तर  नाट्यीकरण करण्यात आले. वरील सर्व कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकारी डॉ. वैशाली मेश्राम व सहकार्यक्रम अधिकारी  डॉ. सचिन जयस्वाल यांचे मार्गदर्शन लाभले संपूर्ण कार्यक्रमा साठी द शिल्ड गृप ने परिश्रम घेतले .

दि. 30/1/23  रोजी योगासनाने दिवसाची सुरुवात झाली, प्रभात फेरी काढून विविध नारे देवून ग्रामस्थांना विविध संदेश देण्यात आले, त्याचप्रमाणे गाव स्वच्छता पथनाट्य सादर करून ग्रामस्थांचे लक्ष वेधण्यात आले गाडगे महाराजांच्या वेशभुषेत असलेल्या स्वयंसेवकाने सर्व ग्रामस्थांचे लक्ष वेधुन घेतले तसेच श्रमसंस्कार करण्याकरिता  बंधाऱ्यावर पोती तयार करण्यात आली, तसेच दुपारच्या बौद्धीक सत्रामध्ये शेतीवर आधारीत विविध व्यवसायीक संधी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून मृणालिनी दहिकर ह्या मंचावर उपस्थित होत्या त्यानी विद्यार्थ्यांना नौकरीच्या मागे न लागता शेती विषयक व्यवसाय सुरु करून स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करावे असे सुचविले तसेच विविध शेती पिका विषयी सविस्तर चर्चा केली, सायंकाळच्या सत्रामध्ये  राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी डॉ. वैशाली मेश्राम यांच्या अध्यक्षते खाली विविध सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये युवा कवी संमेलन आयोजीत करून गावकऱ्यांची मने जिंकली तसेच मोबाईलचे फायदे व दुष्परिणाम या विषयावर वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली त्यानंतर राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी युवा संसद आयोजित करून विविध विषयावर चर्चा घडवून आणली  सहकार्यक्रम अधिकारी  डॉ. सचिन जयस्वाल यांचे मार्गदर्शन लाभले.

दि. 31/01/23 रोजी योगासन प्राणायम करून दिवसाची सुरुवात झाली, प्रभात फेरी काढून विविध नारे देवून ग्रामस्थांना विविध संदेश देण्यात आले,  गाव स्वच्छता विषयावर पथनाट्य सादर करून ग्रामस्थांना अंधश्रद्धा निर्मुलन व प्लॉस्टीक निर्मुलनाचा संदेश देण्यात आला तसेच श्रमसंस्कार करण्याकरिता  बंधाऱ्यावर काम करण्यात आले, दुपारच्या बौद्धीक सत्रामध्ये व्यक्तीमत्व विकास काळाची गरज  ह्या विषयावर प्रा. प्रिया वाकडे ह्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले  त्यांनी स्वयंसेवकांना व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलु उलगडुन दाखविले. सायंकाळच्या सत्रामध्ये  राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा मोटघरे यांच्या अध्यक्षते खाली विविध सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये प्रबोधनात्मक भजन, भारूड व किर्तन सादर करून गावकऱ्यांना मंत्रमुग्ध केले संत तुकाराम महाराजाच्या वेशभुषेने  गावकऱ्यांची मने जिंकली वरील संपूर्ण कार्यक्रम हा कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम व सहकार्यक्रम अधिकारी  डॉ. सचिन जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आला.

दि. 01/02/2024 रोजी योगासन प्राणायम करून दिवसाची सुरुवात झाली प्रभात फेरी काढून विविध नारे देवून ग्रामस्थांना विविध संदेश देण्यात आले. महिला सुरक्षा विषयावर पथनाट्य सादर करून ग्रामस्थांना सेल्फ डिफेन्स चा संदेश देण्यात आला तसेच  प्लास्टीक निर्मुलन विषयावर पथनाट्य सादर करण्यात, श्रमसंस्कार करण्याकरिता  बंधाऱ्यावर काम करण्यात आले. दुपारच्या बौद्धीक सत्रामध्ये भारतीय संविधान व लोकशाही  ह्या विषयावर श्री. नानाभाऊ रोमतकार  ह्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले  त्यांनी स्वयंसेवकांना भारताचे संविधान स्वयंसेवकासाठी कसे लागु होते यावर विस्तृत मार्गदर्शन केले सायंकाळच्या सत्रामध्ये  राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी डॉ. अमोल राऊत व डॉ. सचिन तेलखडे यांच्या अध्यक्षते खाली विविध सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये  वन मिनीट शो चे आयोजन करून नकला, नृत्य, गायन, मिमीक्री इ. कलाप्रकार  सादर करून गावकऱ्यांना मंत्रमुग्ध केले  वरील  संपूर्ण कार्यक्रमासाठी चॅम्पीयम गृपने   परिश्रम घेतले.

दि. 02/02/ 2024 रोजी योगाभ्यास करून दिवसाची सुरुवात करण्यात आली स्वयंसेवकांनी श्रमदानांतर्गत बंधारा पूर्ण केला तसेच ग्रामस्थांसाठी सांस्कृतीक रॅलीचे आयोजन  करण्यात आले यामध्ये विशेषतः आदिवासी, कोळी, वारकरी, शेतकरी व गवळी संस्कृती चे दर्शन करून देण्यात आले विविध वेशभुषा व नारे देऊन ग्रामस्थाचे लक्ष वेधुन घेण्यात आले  शाळेतील विद्यार्थ्यांना यावेळी विविध संस्कृतीची माहिती देण्यात आली व प्रार्थना घेवून रॅली चे विसर्जन करण्यात आले  दुपारच्या सत्रात स्वयंसेवकांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प पूर्ण केला तसेच शोष खड्ड्याचे काम देखील पूर्णत्वास नेले  त्यानंतर सायंकाळच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची चर्चा करून घेण्यात येणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी केली ही संपूर्ण तयारी विद्यार्थी प्रतिनिधी रोहन गायकवाड व विद्यार्थिनी प्रतिनिधी रश्मी परसराम यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. सायंकाळच्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांसमोर विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम प्रा.संजय त्रिवेदी यांच्या अध्यक्षते खाली आयोजित करून सर्वांची वाह वाह मिळवली यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
या कार्यक्रमाच्या यशस्वी ते करता युनिटी ग्रुप ने परिश्रम घेतले.

दि.03/02/2024 रोजी प्रार्थना, योगासन घेवून स्वयंसेवकांनी स्वच्छता केली प्रभात फेरी व पथनाट्याव्दारे ग्रामस्थाना प्रबोधन करण्यात आले. समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्तावीक करतांना कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम ह्यांनी मागील 6 दिवस राबविलेल्या उपक्रमाचा आढावा घेतला व स्वयंसेवकानी केलेल्या उत्तम कामाची स्तुती केली त्याचप्रमाणे आलेल्या अतिथींना राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध संधी व उपक्रमाची माहिती दिली कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख मार्गदर्शक व अतिथी श्री शैलेंद्र मोठघरे यांनी राष्ट्रीय सेवा योजना हे स्वयंसेवकांना व्यक्तिमत्व घडविण्याची उत्तम संधी देते असे सांगून स्वयंसेवकांचे कौतुक केले तसेच मंचावर उपस्थित असलेले डॉ. किशोर बनसोड यांनी स्वयंसेवकांनी केलेल्या उपक्रमाची स्तुती करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणामध्ये महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांनी स्वयंसेवकांनी स्तुत्य असे उपक्रम राबवून सर्वांना मंत्रमुग्ध  तर केलेच शिवाय महाविद्यालयाचे नाव राज्यस्तरीय व राष्ट्रस्तरीय स्तरावर भूषविले हे सांगून विद्यार्थी हा महाविद्यालयाच्या नावलौकिकात महत्त्वाचा भाग असतो असे सांगितले सहकार्यक्रम अधिकारी डॉ.सचिन जयस्वाल यांनी यावेळी सात दिवसात विविध उपक्रमामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्वयंसेवकांना मिळालेले पारितोषिक वितरण केले व उत्कृष्ट ग्रुप म्हणून चॅम्पियन ग्रुप व दुसरा शिल्ड ग्रुप याला विशेष गौरवण्यात आले त्याचप्रमाणे उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून मंगेश लोंढे, उत्कृष्ट नृत्यांगना म्हणून रश्मी परसराम, ग्राफिक डिझायनर म्हणून रोहन गायकवाड, उत्कृष्ट ॲक्टर म्हणून आदित्य वेळुकर, उत्कृष्ट गायक म्हणून देवयानी बरडे तर उत्कृष्ठ मनोरंजन करणारा म्हणून तुषार दडांजे त्याचप्रमाणे उत्कृष्ट ढोलकी वादक म्हणून विठ्ठल कुराडकर, यांना मोमेंटो देऊन गौरवण्यात आले ग्रामस्थांनी सारे दिवस आपला सहभाग नोंदविल्यामुळे त्यांना सुद्धा यावेळी गौरवण्यात आले कार्यक्रमालासंपूर्ण प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध स्पर्धा तसेच राष्ट्रस्तरीय व राज्यस्तरीय' शिबिरामध्ये सहभागी विद्यार्थ्यांचा सत्कार

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचा दि. 26/1/2024 प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध स्पर्धा तसेच राष्ट्रस्तरीय व राज्यस्तरीय ' शिबिरामध्ये सहभागी विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री विनायक दाते व प्राचार्या डॉ. वर्षा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मोमेंटों, ट्रॅक सूट व सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात आले राष्ट्रीय सेवा योजनेचे एकूण 14 विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील शिबिरामध्ये सहभागी होऊन महाविद्यालयाचे नावलौकिक केले तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा प्रकारांमध्ये प्राविण्य मिळवून बक्षिसांची लय लूट केली यामध्ये रोहन गायकवाड रश्मी परसराम दिपाली ठाकरे, आदित्य वेळुकर मंगेश लोंढे, सायली प्रधान,  माधुरी अडाळकर, विठ्ठल कुऱ्हाडकर, हर्षदीप कोरंगे, रोशन गायकवाड, सिद्धार्थ पाटील, सिद्धेश माहुलकर इत्यादी विद्यार्थ्यांचा समावेश  होता विशेष म्हणजे यावेळी स्वयंसेवकानी केलेली परेड सर्वांचे लक्ष वेधून घेणारी होती रा.से.यो कार्यक्रमाधिकारी डॉ.वैशाली मेश्राम व सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले

राष्ट्रीय मतदार  दिवस साजरा

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील राष्ट्रीय सेवा योजना आणि गृह अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने  दि. 23/01/2024 रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्याच्या हेतूने रांगोळी व चित्रकला स्पर्धेचे आयोजन प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी व गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वेशाली मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा घेण्यामागचा हेतू सांगून आपल एक मत कसं महत्त्वाचं आहे हे सांगून स्पर्धेसाठी प्रोत्साहित केले.
सहकार्यक्रम अधिकारी व राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सचिन जयस्वाल यांनी मतदान हा लोकशाहीचा पाया आहे व हा पाया आपण आपल्या एका मताद्वारे भक्कम करत असतो असे प्रतिपादन केले व सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
रागोळी स्पर्धेत एकुण 5 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला त्यात प्रथम दिपाली ठाकरे बी.ए.भाग 2, द्वितीय अनिषा वाडगुरे बी.ए.भाग 2 नैना रामदास शेंडे तसेच मतदान जन जागृती साठी चित्रकला आयोजित करण्यात आली यामध्ये स्पर्धेत एकूण 8 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यात प्रथम क्रमांक आदित्य वेळुकार द्वितीय नैना शेंडे  क्रमांक व तृतीय क्रमांक दिपाली ठाकरे यांना प्राप्त झाला.
दोन्ही स्पर्धेचे परीक्षक म्हणुन  प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी व IQAC समन्वयक डॉ. सचिन तेलखडे यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता रोहन गायकवाड ,रश्मी परसराम ,  रोशन गायकवाड , हर्ष कोरांगे वैष्णवी बगमारे यांनी परिश्रम घेतले.

पाणी संवर्धन या विषयावर वक्तृत्व स्पर्धा

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने  दि.05/01/2024 रोजी सावित्री बाई फुले जयंती निमीत्त पाणी संवर्धन या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रा.से.यो. डॉ. वैशाली मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व सांगून स्पर्धा घेण्यामागचा उद्देश सांगितला रा. से.यो. सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्व सांगून पाणी हेच जीवन आहे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना पाणी बचतीचे वेगवेगळे माध्यम सांगून पाण्याची बचत ही काळाची गरज आहे असे सांगितले.
यावेळी महाविद्यालयीन स्तरावर 1) प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी 2) डॉ. वैशाली मेश्राम 3) डॉ. सचिन जयस्वाल यांची निवड करून समितीचे गठन करण्यात आले
तसेच वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. गायत्री जोशी आणि प्रा. हेमा गुल्हाणे यांनी काम पाहाले सदर वक्तृत्व स्पर्धेमध्ये 11 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला यातील प्रथम क्रमांक दिपाली ठाकरे द्वितीय क्रमांक तुषार दडांजे तृतीय क्रमांक स्वीटी वालकोंडे तर प्रोत्साहन पर रोहन गायकवाड यांना प्राप्त झाला.

एच.आय.व्ही. एड्स जनजागृती कार्यक्रम

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने दि. 22/12/2023 रोजी एच.आय.व्ही. एड्स जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना  राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ.वैशाली मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रम आयोजना मागचा हेतू सांगून, कार्यक्रमाची गांभीर्यता  लक्षात आणून दिली. त्याचप्रमाणे सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थी जीवनामध्ये हा कार्यक्रम कसा महत्त्वाचा आहे हे सांगुन विद्यार्थ्यांनी एच.आय.व्ही. प्रति जागरूक  असावे असे सांगितले, प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या डॉक्टर कांबळे  यांनी विद्यार्थ्यांना एच.आय.व्ही.ची लागण कशी होते व त्यापासून बचाव कसा करता येतो हे सविस्तर सांगीतले तसेच मंचावर उपस्थित असलेल्या   डॉ. अर्चना पांडे यांनी विद्यार्थ्यांना एच.आय.व्ही. पासून वाचविण्यासाठी टेस्ट करणे किती महत्त्वाचे आहे हे सांगून लग्नाच्या वेळी कुंडली न पाहता एच.आय.व्ही.चा रिपोर्ट बघावा असा मोलाचा सल्ला दिला.  यावेळी एकूण  50 विद्यार्थ्यांनी एच.आय.व्ही. टेस्ट करून घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  दिपाली ठाकरे हिने तर आभार प्रदर्शन आदित्य वेळुकर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता रोहन,  तुषार, अर्थराज, प्रशिक रश्मी यांनी परिश्रम घेतले.

संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त उद्बोधन कार्यक्रम

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने कर्मयोगी संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त दिनांक 20-12-2023 रोजी उद्बोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रम आयोजना मागचा हेतू सांगून, विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे महत्त्व पटवून सांगितले व उद्बोधनातून प्रेरणा घेण्यास सुचविले.
कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले डॉ. रवीजीत गावंडे यांनी विद्यार्थ्यांना संत गाडगे महाराज यांचे कार्य उलगडून दाखवले व विद्यार्थी जीवनामध्ये त्यांचा संदेश कसा महत्त्वाचा आहे हे सविस्तर सांगितले  तसेच कार्यक्रमाला उपस्थित असलेले रा.से.यो.चे सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांना संत गाडगे महाराज यांचे कार्य प्रत्यक्ष अंगीकृत करावे व विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेमध्ये अंधश्रद्धेपासून दूर राहून विज्ञानवादी दृष्टीकोन बाळगावा असे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वर्षा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचा मंत्र देऊन कृतीतून गाडगे महाराजांचे कार्य आत्मसात करण्याचे आवाहन केले. तुषार दडांजे व सृष्टी येडमे ह्या विद्यार्थ्यांनी संत गाडगे महाराजांच्या स्मृतींना उजाळा देत विचार व्यक्त केले तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परीसर स्वच्छ करून स्वच्छेतेचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली ठाकरे हिने तर आभार रोहण गायकवाड ह्यांने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता  रश्मी परसराम, विठ्ठल कुऱ्हाडकर, अर्थराज राठोड, स्नेहा येंड्रावार, निषा छापेकर, मंगेश, वेदिका भिलाये,  प्रशिक भस्मे ह्यांनी परिश्रम घेतले.

टी.डी.आर.एफ. यांच्यामार्फतआपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे राष्ट्रीय सेवा योजना व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 7/12/23 रोजी टी डी आर एफ यांच्यामार्फतआपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले टी डी आर एफ चे प्रशिक्षक श्री. हरिश्चंद्र राठोड यांनी विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना नैसर्गिकरीत्या व मानवनिर्मित आपत्तीमध्ये बचाव कसा करावा, तसेच पूर,  भूकंप या ठिकाणी प्रथमोपचार कसे करावेत याचे प्रशिक्षण दिले.
प्राचार्य डॉ.वर्षा कुलकर्णी यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात सावध राहून काळजी कशी घ्यावी याविषयी सविस्तर सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रा.से.यो कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी तर आभार प्रदर्शन कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका डॉ. वैशाली बेडेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकानी  परिश्रम घेतले.

कौशल्य विकास अंतर्गत दिवाळी वस्तुची प्रदर्शनी व विक्री

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना व गृहअर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी वस्तुंचे प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे आयोजन दि. 7/11/23 रोजी प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.
प्रदर्शनीचे उद्घाटक म्हणून महाविदयालयाच्या प्राचार्या डॉ. वर्षा कुलकर्णी ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणुन सिनेट सदस्य प्रा हरिदास धुर्वे उपस्थित होते
रा.से. यो. कार्यक्रम अधिकारी व गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वैशाली मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना विविध वस्तु स्वतः तयार करून विकण्यात वेगळा आनंद मिळतो हे सांगुन, स्वयंरोजगाराचे महत्व पटवून दिले. रा.से.यो. सह कार्यक्रम अधिकारी डॉ . सचिन जयस्वाल यांनी प्रदर्शनी लावण्यास मदत करून विक्री कौशल्य शिकवले.
विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराचे महत्व समजण्यासाठी दिवाळी निमित्त वापरण्यात येणाऱ्या विविध वस्तु विद्यार्थ्यांनी बनवुन विक्री केली. यामध्ये आकर्षक दिवे, आकाश दिवे, तोरण, फुलांच्या माळा, रांगोळी, तसेच खाद्य पदार्थांचा समावेश होता.
विद्यार्थ्यांनी विक्री कले द्वारे ग्राहकांना आकर्षित केले. प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी विविध वस्तुची खरेदी करून रा. से. यो. विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
सदर कार्यक्रमासाठी दिपाली ठाकरे ठाकरे रश्मी परसराम, रोहन  गायकवाड, मंगेश लोंढे, वैष्णवी बघमारे, सौजन्या, आदित्य वेळुकार, अर्थराज  राठोड, तुषार दडांजे यांनी परिश्रम घेतले.

शेतकऱ्यांसाठी डिजीटल पीक पाहणी व माहिती भरणे

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील राष्ट्रीय योजना अंतर्गत दि.15/10/2023 रोजी विद्यार्थ्यांनी  शेतकऱ्यांना डिजीटल पीक पाहणी व माहिती ॲपद्वारे भरणे  या मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन डॉ. वैशाली मेश्राम व डॉ. सचिन जयस्वाल ह्यांच्या मार्गदर्शनात  करण्यात आले
महाराष्ट्र शासनाने  शेतकऱ्यांसाठी डिजीटल पीक पाहणी व माहिती भरणे मोहिम सुरू केली आहे परंतु अजुनही बऱ्याच शेतकऱ्यांना ही माहिती भरता येत नाही त्यामुळे त्यांना अनेक अडचणी येताना दिसून आल्या राष्ट्रीय सेवा योजनाच्या अंतर्गत शेतकऱ्यांना या सर्व बाबींची माहिती मडकोणा  या गावी देण्यात आली.  प्रत्यक्ष शेतात जावून पाहणी करून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले
प्रशिक्षणा दरम्यान गावाच्या तलाठी आंबेकर तर सरपंच नरेश ढोरे ह्याचे मार्गदर्शन लाभले. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना ग्रामपंचायती कडुन सर्टिफिकेट 1 देवून गौरवण्यात आले
सदर कार्यक्रमा करिता  रोहन गायकवाड, दिपाली ठाकरे, वैष्णवी बगमारे, तुषार दडांजे, विठ्ठल कुऱ्हाडकर, अर्थराज राठोड, रोशन गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविदयालय येथील राष्ट्रीय सेवा योजना व युनिटी फॉउंडेशन तर्फे रस्त्यावरील मोकाट श्वानांन साठी एक मदतीचा हात म्हणून दि 24/9/23 रोजी राष्टीय सेवा योजना वर्धापन दिन वेगळ्या पद्धतीने प्राचार्य डॉ वर्षा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात साजरा करण्यात आला.
रा.से.यो कार्यक्रमाधिकारी डॉ. वैशाली मेश्राम ह्यांनी विद्यार्थ्याना समाजसेवेसोबत मुक्या जनावरांची सेवा हे देखील राष्ट्रीय-सेवा योजनेचे एक व्रत आहे हे सांगुन ही जनावरे आपले मित्र होवू शकतात असे सांगीतले तर सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल ह्यानी विद्यार्थ्यांना मुक्या जनावरांची सेवा म्हणजे खरी ईश्वर सेवा होय हे सांगुन प्रोत्साहित केले.
दाते कॉलेज चौक ते शिवाजी गार्डन परिसरातील सर्व रस्त्यावरील मोकाट श्वानांना एक मदतीचा हात म्हणून त्यांच्या चाऱ्या पाण्याची सोय करण्यात आली,  युनिटी फॉउंडेशनचे अध्यक्ष प्रतीक तराळकर ह्यांनी विद्यार्थ्यांना मुक्या प्राण्यांची सेवा कशी करायची हे प्रात्यक्षिका व्दारे सांगीतले तर सचिव अमृता टेवाणी ह्यांनी विदयार्थ्यांना मुक्या प्राण्यांवर औषधोपचार कसे करायचे हे सांगुन घरच्या घरी करता येणाऱ्या उपचाराची माहिती दिली.
सदर कार्यक्रमा करीता सर्व विद्यार्थ्यानी परिश्रम घेतले.

"मेरी माटी मेरा देश" अंतर्गत "अमृत कलश"

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे राष्ट्रीय सेवा योजना व शारीरिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 'मेरी माटी मेरा देश' या शासकीय उपक्रमांतर्गत माती संकलन कार्यक्रमाचे आयोजन दि. 20/09/2023 रोजी प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना आपापल्या गावांतून माती आणून अमृत कलशामध्ये टाकण्याचे महत्व समजावून सांगितले व प्रत्येक विद्यार्थ्यांना सेल्फी काढून ठराविक संकेतस्थळावर अपलोड करावे असे आवाहन केले.
राष्ट्रीय सेवा योजना सहकार्यक्रम अधिकारी डॉ.सचिन जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांना सेल्फी अपलोड करणाऱ्या संकेतस्थळाची सविस्तर माहिती देऊन संकेतस्थळावरच्या तांत्रिक बाबी समजावून सांगितल्या.
तसेच शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. रवीजीत गावंडे यांनी विद्यार्थ्यांना अमृत कलशामधील माती दिल्लीतील अमृत वाटिका तयार करण्यासाठी काय भूमिका बजावते हे सविस्तर समजावून सांगितले व शिस्तीत कलशात माती टाकण्याचे आवाहन केले.
सदर कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक  व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अमृत कलशामध्ये माती टाकून पंचक्रोशातील मातीचा गौरव केला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

दत्तक ग्राम चापर्डा येथे स्वच्छता आणि वृक्षारोपण

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या चमुने दत्तक ग्राम चापर्डा येथे  दि. 12/09/2023 रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजना दत्तक ग्राम चापर्डा येथे स्वयंसेवकांनी गावाची स्वच्छता करून गावात वृक्षारोपण केले, यावेळी रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना वृक्षारोपण व ग्राम स्वच्छते मागचा  उद्देश  सांगून मेरी माटी मेरा देश मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांना दत्तक ग्रामात राबविल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली व स्वयंसेवकांना विविध उपक्रमांसाठी प्रोत्साहित केले.
जि.प.प्राथमिक मराठी शाळा   चापर्डा येथील इयत्ता १ ते ७ मधल्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी डॉ. स्वाती पाटील व डॉ. सारीका शहा यांनी करून विद्यार्थ्यांना औषधीचे वाटप केले. तसेच शाळेतील गरजु विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले व शाळेतील विद्यार्थ्यांना आणि संबंधित परिसरातील महिलांना पोषक पदार्थ वाटप करून त्याचे महत्त्व सांगण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. डगवार, अंगणवाडी शिक्षिका प्रतिज्ञा मोटघरे, प्राथमिक शिक्षिका प्रेमलता आत्राम, ज्ञानभुमी व्यवस्थापक प्रकाश कांबळे व रा.से.यो. स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन

बाबाजी दाते  कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी वाघाडी परिसर  येथे  दि.10/09/2023 रोजी प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी स्वयंसेवकांना श्रमदानाचे महत्त्व सांगून देशाप्रती त्यांची असलेली भूमिका त्यांना पटवून दिली.  तसेच सह कार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रम घेण्यामागचा हेतू सांगून संबंधित परिसरात करावयाच्या कामाचा आढावा दिला.
संबंधित परिसरामध्ये रा.से.यो. च्या स्वयंसेवकांनी स्वच्छता केली व संबंधित परिसरातील वाघाडी नदीच्या पात्रा मध्ये  दोन ते अडीच हजार मुर्ती चुकिच्या पद्धतीने विसर्जीत झाल्या होत्या. भग्नावस्थेतील मुर्ती, पाण्यात कुजलेले निर्माल्य, प्लास्टीक, कचरा अशा मोठ्या प्रमाणात स्वच्छतेची धुरा राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी पार पडली आणि येत्या काळामध्ये विसर्जनासाठी हौद उभारण्याचे आश्वासन दिले.
सोबतच वाघाडी परिसरामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी सिडबॉल फेकून झाडे लावा झाडे जगवा असा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता प्रा. हेमा गुल्हाणे, रोहन गायकवाड, दिपाली ठाकरे, रश्मी परसराम, तुषार धडांजे, विठ्ठल कुर्हाडकर, ह्यांनी परीश्रम घेतले.

"मेरी माटी मेरा देश" अंतर्गत शहिदो को नमन

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविदयालय यवतमाळ येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या  विद्यार्थ्यांनी दि. 14/8/23 "मेरी माटी मेरा देश" अंतर्गत शहिदो को नमन करण्यासाठी रॅली चे आयोजन प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले, रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी विद्यार्थांना रॅलीमागचा उद्देश सांगुन हे एक सामाजीक कर्तव्य असल्याचे सांगीतले, सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांनी हुतात्म्यांना स्मरण करणे आपले कर्तव्य असुन सर्वांनी देशाप्रती आपली जबाबदारी ओळखावी हे सांगीतले, शाररीक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. रविजीत गावंडे ह्यांनी युवकांनी शिस्तीचे पालन करून देशसेवा हीच इश्वर सेवा मानावी असे आव्हान केले. सदर रॅलीसाठी प्रा. गुल्हाणे प्रा. मेश्राम ह्यानी सहकार्य केले

स्वामी विवेकानंद चरित्र व संदेश आणि व्यक्तिमत्व विकास या विषयावर व्याख्यान

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने दिनांक 12-8-2023 रोजी आंतरराष्ट्रीय युवा दिन निमित्य स्वामी विवेकानंद चरित्र व संदेश आणि व्यक्तिमत्व विकास या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमांचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांनी स्वामी विवेकानंदांनी युवकांना दिलेला संदेश सांगून, पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले श्री दीपक केसकर यांनी विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंदाचे चरित्र उलगडून दाखवून त्यांनी युवा वर्गाला त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव करून दिली. तसेच व्यक्तिमत्व विकासासाठी स्वामींची विचारधारा त्यांची पुस्तके कसे सहाय्य करतात हे सविस्तर सांगितले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित झालेले अॅड. गटलेवार उपाध्यक्ष रामकृष्ण मिशन आश्रम यवतमाळ यांनी विद्यार्थ्यांना पुस्तक रथाची माहिती देऊन पुस्तके व्यक्तिमत्व घडविण्यासाठी कसे उपयोगाची आहे हे सांगितले. तसेच मंचावर अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेल्या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना विवेकानंदांची विचार युवा पिढी घडविण्यासाठी प्रेरक भूमिका बजावत असून विद्यार्थी जीवनात दिशा देण्याचे काम करतात. हे पटवून दिले. संपूर्ण कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांच्या मार्गदर्शनात पार पडला.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली ठाकरे हिने तर आभार प्रदर्शन पायल सुरपाम हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता प्रा. हेमा गुल्हाने, रोहन गायकवाड, रोशन गायकवाड, तुषार दडांजे, प्रशिक भस्मे, गोपाल राठोड यांनी परिश्रम घेतले

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील राष्ट्रीय सेवा योजनाचा उद्बोधन वर्ग दिनांक 02/08/2023 रोजी घेण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना उद्बोधन वर्ग घेण्या मागचा हेतू सांगून मार्गदर्शक पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले अमर अनिल कतोरे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेतून करण्यात येणाऱ्या कार्याच्या विविध संधी व विविध उपक्रमांच्या सविस्तर माहिती देऊन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्य समाज घडवण्यासाठी कसे उपयुक्त आहे हे सांगितले.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून इतिहास विभाग प्रमुख प्रा. गजानन लांजेवार यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी जीवनासाठी एक शिस्त लावण्याचे माध्यम असून त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांची प्रगती साधल्या जाते हे सांगितले . रा.से.यो. सहकार्यक्रम अधिकारी डॉ.सचिन जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेचे नियम समजावून सांगितले मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. हेमा गुल्हाने उपस्थित होत्या.
याच वेळी विविध स्पर्धेमध्ये विजयी स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले तसेच राष्ट्रीय सेवा योजना डायरी व बॅचेस चे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी कोकरे हिने तर आभार प्रदर्शन तनुजा उगेमुगे हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता रश्मी परसराम, दिपाली ठाकरे ,वैष्णवी बगमारे ,भाग्यश्री राठोड , रोहन गायकवाड ,तुषार दंडाजे , विठ्ठल कुऱ्हाडकर यांनी परिश्रम घेतले.

 

"नवीन शैक्षणिक धोरण 2020" या विषयाअंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना यांच्या विद्यमाने दिनांक 24-7-2023 ते 29-7-2023 या कालावधीमध्ये "नवीन शैक्षणिक धोरण 2020" या विषयाअंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.
नवीन शैक्षणिक धोरणावर आधारित घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचा विषय "नव शैक्षणिक धोरण फायद्याचे की तोट्याचे" हा होता. यामध्ये एकूण 23 निबंध प्राप्त झालेले होते. त्यामध्ये प्रथम क्रमांक भारती छापेकर (बीए भाग 3), द्वितीय क्रमांक पायल सुरपाम (बीए भाग २), तृतीय क्रमांक रश्मी परसराम (बीए भाग 3) व प्रोत्साहन पर बक्षीस गायत्री दुबे (बीए भाग 1)हिने पटकावले. पोस्टर स्पर्धेचा विषय "नव शैक्षणिक धोरण" हा होता यामध्ये एकूण 20 स्पर्धकांनी भाग घेतला. त्यामध्ये प्रथम क्रमांक प्रशिक भस्मे (बीए भाग 1), द्वितीय क्रमांक रोहन गायकवाड (बीए भाग 3), तृतीय क्रमांक दिपाली ठाकरे (बीए भाग 2) तर प्रोत्साहन पर बक्षीस देवयानी वानखडे (बीए भाग 1) हिने पटकावला.
वकृत्व स्पर्धेचा विषय "नवीन शैक्षणिक धोरण 2020" हा ठेवण्यात आला होता. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक तुषार हंडाजे (बीए भाग 1), द्वितीय क्रमांक रोहन गायकवाड (बीए भाग 3), आणि तृतीय क्रमांक दिपाली ठाकरे (बीए भाग 2) यांनी पटकावला. वकृत्व स्पर्धेचे परीक्षण प्राध्यापक हेमा गुल्हाने यांनी केले.
त्याचप्रमाणे रिल्स व शॉट व्हिडिओ स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये चॅम्पियन ग्रुपने पारितोषिक पटकावले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी या स्पर्धा घेण्यामागचा उद्देश विद्यार्थ्यांना सांगून स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रेरित केले तर सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरणाविषयी सविस्तर माहिती देऊन स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले. स्पर्धेत विजयी स्पर्धकांना पारितोषिके वितरण करण्यात आली.

 

राष्ट्रीय सेवा योजनेची ओवी ट्रस्ट ला भेट

रा.से.यो. विद्यार्थ्यांना सामाजिक कार्याचे महत्त्व समजावून सांगण्याकरिता दि२८/३/२०२३  रोजी प्राचार्य डॉ. विवेक देशमुख यांच्या मार्गदर्शनात धनगरवाडी येथे ओवी ट्रस्ट चालवत असलेल्या बालनगरी या सामाजिक उपक्रमाला भेट आयोजीत करण्यात आली व ज्ञानरचनावादातून शिक्षण कसे दिले जाते हे विद्यार्थ्यांनी समजून घेतले तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व फळांचे वाटप करण्यात आले.  ओवी ट्रस्ट च्या संचालिका प्रणाली बोंदाडे यांनी विद्यार्थ्यांना ट्रस्ट स्थापनेमागचे उद्दिष्टे सांगितले व ज्ञानरचनावादातून विद्यार्थ्यांना कसे ज्ञान दिले जाते याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. तसेच धम्मानंद सर यांनी विद्यार्थ्यांना विविध खेळा द्वारे शिक्षण कसे दिले जाते हे सांगितले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना भेटी मागचा उद्देश सांगून प्रत्येकाने अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम  आपल्या गाव स्तरावर राबवावे असा संदेश दिला, सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांना हा उपक्रम राबविण्यासाठी प्रेरणा देऊन खेळातून शिक्षण ही संकल्पना समजवून सांगीतली, तसेच प्रा. सारिका नंदे यांनी विद्यार्थ्यांना आशा उपक्रमाद्वारे समाजामध्ये मानाचे स्थान कसे मिळू शकते हे सविस्तर समजावून सांगितले.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी या भेटीतुन स्फूर्ती घेऊन असे उपक्रम राबवण्याचे आश्वासन देऊन धनगर वाडीचा निरोप घेतला.
कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता रोहन गायकवाड, रश्मी परसराम, सृष्टी येडमे, दिपाली ठाकरे, उल्हास चव्हाण, सिद्देश माहुलकर यांनी परिश्रम घेतले.

सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमाचे आयोजन

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील राष्ट्रीय सेवा योजना व गृहअर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमाचे आयोजन दि. 03/01/ 2023 रोजी प्राचार्य डॉ कल्पना देशमुख यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी व गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वैशाली मेश्राम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यांवर प्रकाश टाकला व विद्यार्थ्यांना त्यांनी केलेल्या संघर्षाची माहिती देवून शिक्षणाचा मूलमंत्र जपावा असा संदेश दिला.
प्रमुख वक्ता म्हणून बोलताना इतिहास विभाग प्रमुख प्रा.गजानन लांजेवार यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांनी उभारलेल्या पहिल्या शाळेचा इतिहास उलगडून सांगितला व विद्यार्थ्यांनी त्यांनी केलेल्या परिश्रमाचे फलित करावे असे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषण करतांना रा.से.यो. सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांनी विद्यार्थिनींनी विविध क्षेत्र काबीज करून सावित्रीबाई फुले यांचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार केले असे म्हणून महिलांना समाजामध्ये कसे विशेष स्थान आहे हे विविध उदाहरणांनी उलगडून सांगितले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तनुजा उगेमुगे हिने तर आभार प्रदर्शन काजल पोहनकर हिने केले. कार्यक्रमाचे यशस्वीते  करिता रोहन गायकवाड, मंगेश लोंढे, रंजित वाघमारे, निर्जला द्विवेदी, प्रत्युशा पाटील व वैष्णवी बुल्ले यांनी परिश्रम घेतले.

मानवाधिकार दिनाचे आयोजन

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 10/12/2022 रोजी मानवाधिकार दिन प्राचार्य डॉ. कल्पना देशमुख यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आला  मानवाधिकार दिनानिमित्य राज्यशास्त्र अभ्यास मंडळ उद्घाटन व अमरावती विद्यापीठात निवडुन आलेल्या डॉ. हरीदास धुर्वे व डॉ. ताराचंद कंठाळे याचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना राज्यशास्त्र विभाग प्रमुख व रा.से. यो. सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास मंडळ स्थापनेमागचे उद्दीष्टये सांगुन मानवाला असलेले अधिकार या बद्दल सविस्तर माहिती दिली.
सत्कारमुर्ती वाणिज्य विभागातील व अमरावती विद्यापीठ सिनेटवर निवडून आलेले डॉ. हरिदास धुर्वे यांनी  विद्यार्थ्यांना ध्येय निश्चिती कशी करायची हे सांगुन विद्यार्थी  जीवनात आचरणात येणाऱ्या विविध  गोष्टींची माहिती दिली तसेच दुसरे सत्कार मुर्ती अमरावती विद्यापीठ कॉमर्स भाषा अभ्यास मंडळावर निवडून आलेले डॉ. ताराचंद कंठाळे यांनी विद्यार्थ्यांना मानवता धर्म कसा आचरणात आणता येईल हे सांगुन विविध उदाहरणाद्वारे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेल्या राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना अधिकार व कर्तव्ये ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असुन विद्यार्थ्यांनी त्या प्रति जागरूक रहावे व संवीधानिक अधिकार  माहिती करून घ्यावे असे आवाहन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी माकोडे हिने तर आभार प्रदर्शन सौरभ जाधव याने केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता  NSS दाते वॉरियर्स या ग्रुप ने परिश्रम घेतले.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचा सशस्त्र सेना ध्वज दिनी सहभाग

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचा सशस्त्र सेना ध्वज दिनी सहभाग.
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय  यवतमाळ यांच्यावतीने श्री सत्य साई क्रिडा रंजन सभागृह नंदुरकर विद्यालय यवतमाळ येथे  सशस्त्र सेना ध्वज दिन समारोहाचे आयोजन दि. 07/12/2022 रोजी करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री. अमोल येडगे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमांमध्ये माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात युद्ध विधवा वीर माता यांचा सत्कार करण्यात आला.  सदर कार्यक्रम हा वर्षातून एकदाच राष्ट्रीय स्तरावर साजरा करण्यात येत असतो. राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकारी डॉ. वैशाली मेश्राम व सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे  नियोजन करून मोलाचा हातभार लावला. त्याकरिता उपस्थित माजी सैनिकांनी व आयोजकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
सदर कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये परिश्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांनमध्ये सृष्टी येडमे, अंजू गारगाटे, नेहा खरात, ओम जोगदंड, ज्योती मेश्राम, कृतिका भगत यांचा समावेश होता

संविधान दिनाचे आयोजन

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 26/11/2022 रोजी संविधान दिन प्राचार्य डॉ. कल्पना देशमुख  यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी संविधान दिनाचे महत्त्व सांगून तो साजरा करण्यामागची भूमिका स्पष्ट केली प्रमुख मार्गदर्शक म्हणुन लाभलेले प्राध्यापक सुरेश आडे यांनी विद्यार्थ्यांना संविधानातील विविध घटक स्पष्ट केले. तसेच संविधान तयार होण्यामागचा इतिहास समजावून सांगितला, व विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व सांगितले.
अध्यक्षीय भाषणामध्ये रा.से.यो. सह कार्यक्रम अधिकारी व राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सचिन जयस्वाल यांनी संविधांनाच्या उद्देशिके मध्ये असलेल्या विविध बाबीचा उलगडा केला व उद्देशिकेचे वाचन करून शपथ देण्यात आली.
रा.से.यो चा विद्यार्थी सुमित आत्राम याने उद्देशिकेवर आधारित गीत सादर केले तसेच स्वयं सेवकांना उत्कृष्ट कार्याबददल प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता पब्लिक सर्व्हेन्ट ग्रुप यानी परिश्रम घेतले.

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत प्लास्टिक कचरा जनजागृती

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय  यवतमाळ राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत महाविद्यालय परिसर व महाविद्यालयाच्या आजुबाजुच्या परिसरातील  प्लास्टिक कचरा जनजागृती व प्लास्टीक कचरा गोळा करण्याचे अभियान दि. २०/१०/ २०२२ रोजी राबवण्यात आले.
सदर संकलनात एकूण ३० ते ३५ किलोग्रॅम  प्लास्टिक कचरा संकलन करण्यात येऊन नगरपरिषद यवतमाळ कचरा व्यवस्थापन यंत्रणेकडे योग्य विल्हेवाट करण्याकरिता सोपविण्यात आला. परिसरातील   स्थानिक नागरिक व दुकानदारांमध्ये प्लास्टिक पिशवी विक्री व विल्हेवाट याबाबत जाणीव जागृती करण्यात आली. यावेळी परिसरातील नागरिक रा. से.यो.चे कार्यक्रमाधिकारी डॉ. वैशाली मेश्राम सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल मंगेश लोंढे, रोहन गायकवाड, सृष्टी येडमे, सपना चव्हाण, करण भांगे, अभिषेक टेंबरे समवेत एकुण ३६ राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकानी सक्रिय सहभाग नोंदविला.

महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री जयंती साजरी

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने दिनांक 02 / 10/ 2022 रोजी मातोश्री वृद्धाश्रम येथे गांधी जयंती व लाल बहादुर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली
मातोश्री वृद्धाश्रम निळोना येथे महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पन करून रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी स्वयंसेवकांना म.गांधी व लाल बहादुर शास्त्री यांच्या जिवनाचे ध्येय व उद्दिष्टे सांगुन रा.से.यो. स्वयंसेवकांना स्वच्छतेचा संदेश दिला.
रा.से.यो. सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांनी वृद्धाश्रम भेटीचे उद्दीष्ट्ये सांगुन 2 ऑक्टोबर ला स्वच्छता मोहीम राबवून म. गांधी व लाल बहादुर शास्त्री यांची खरी जयंती साजरी करता येईल हे स्पष्ट केले व सर्वांना स्वच्छतेची शपथ दिली.
रा.से.यो. स्वयंसेवकांनी संपूर्ण वृद्धाश्रम स्वच्छ करून वृद्धांच्या व्यथा जाणुन घेतल्या व वृद्धांना जेवू  घातले. या वेळी शासन अधिकारी श्री. ढेंगे, डॉ. सारंग मेश्राम यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले
संपूर्ण कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतुन यशस्वी झाला. यासाठी रोहन गायकवाड, तेजस राउत, अयान, वैष्णवी कोकरे, मोहीन सैय्यद, प्रार्थना इंगोले, दिपाली ठाकरे, राखी मैंद, रश्मी परसराम, खुशी नंदनवार, ओम जोगदंड, आदित्य सोनटक्के यांनी परिश्रम घेतले.

राष्ट्रीय सेवा योजनाच्या अंतर्गत व्यसन मुक्ती जनजागृती

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील राष्ट्रीय सेवा योजनाच्या अंतर्गत दिनांक 30/09/2022 रोजी व्यसन मुक्ती जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना डॉ. सचिन जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांना व्यसन अधोगतीला कसे कारणीभुत ठरते व विद्यार्थी जीवनात त्याचे कसे पडसाद उमटतात हे सांगुन मार्गदर्शन केले व कार्यक्रमाची भुमिका काय आहे हे सांगितले
प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले मानसिक रोगतज्ञ  डॉ. जाधव यांनी विद्यार्थ्यांना व्यसन कसे लागु नये व लागल्यास कसे सोडवावे याचे सविस्तर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांशी हितगुज करून समस्या जाणुन घेतल्या. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या डॉ. शहा मॅडम यांनी विद्यार्थ्यांना वेळीच सावध होण्याचा मंत्र देऊन व्यसन लागु न देण्यासाठी कसे परावृत्त व्हावे हे सांगितले व विद्यार्थ्यांना विविध उदाहरणे देऊन व्यसन मुक्तीचा मार्ग अवलंबण्याचे विद्यार्थ्यांकडून आश्वासन घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी कोकरे हिने तर आभार प्रदर्शन मोहीन सैय्यद यांने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता आदित्य सोनटक्के, ओम जोगदंड, गौरव पाटील, सिद्धेश माहुलकर, परिंदा भगत, प्रांजली लढे, तेजस नाईक, नेहा शेखापुरे, निशा बेंदेवार यांनी परिश्रम घेतले.

 

रान भाजी, वन औषधी व पोषक अन्न प्रदर्शनी

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील गृहअर्थशास्त्र विभाग व राष्ट्रीय योजना यांच्या संयुक्त विद्यमाने पोषण महिन्या अंतर्गत दि. 30/09/2022 रोजी रान भाजी, वन औषधी व पोषक अन्न प्रदर्शनी व माहिती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
रा. से.यो.कार्यक्रम अधिकारी तथा गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वैशाली मेश्राम यांनी विद्यार्थी व आलेल्या पाहुण्यांना रान भाज्यांचे महत्व तसेच वन औषधी घेतल्याने कसा फायदा होतो हे सांगुन प्रदर्शना मागची भुमिका स्पष्ट केली. रा.से.यो. सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांना सुदृढ राहण्यासाठी सकस आहार कसा गरजेचा आहे हे सांगुन विद्यार्थ्यांनी लावलेल्या प्रदर्शनीचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता दिपाली ठाकरे, राखी मैंद, रश्मी परसराम, प्रार्थना इंगोले, संपना निमसरकार, प्रेरणा पाटील, सृष्टी येडमे, खुशी नंदनवार, पलक भगत यांनी परिश्रम घेतले.

राष्ट्रीय सेवा योजनेचा वर्धापन दिन

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील राष्ट्रीय योजनेचा वर्धापन दिन कार्यक्रम दिनांक 27/09/ 2022 रोजी आयोजित करण्यात आला कार्यक्रमाला प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या शिवशक्ती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रतिभा चौधरी यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेचा हेतु व नियमित कार्यक्रम व शिबिरा अंतर्गत उपक्रम याची सविस्तर माहिती दिली व व्यक्तीमत्व विकास घडविण्यासाठी विद्यार्थी जिवनामध्ये सातत्य व परिश्रम आवश्यक आहे हे सागितले .
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना  वर्धापन दिन साजरा करण्यामागचा हेतु सांगुन वर्षभर समाज सेवा कशी करावी हे सांगितले तर अध्यक्षीय भाषणातून डॉ. सचिन जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना व्यक्तीमत्व विकासासाठी कशी आवश्यक आहे व त्यातुन सामाजिक बांधिलकी कशी जपता येईल हे समजावून सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली ठाकरे हिने तर आभार प्रदर्शन रश्मी परसराम हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोहन गायकवाड, पलक तेलंग,  प्रार्थना इंगोले, सुजल खंडारकर, सौरभ जाधव, ओम जोगदंड, कोमल काळे, उल्हास चव्हाण यांनी परिश्रम घेतले

नेहरू युवा केंद्र यवतमाळ यांच्या मार्फत आयोजित जिल्हास्तरीय युवा मोहत्सवमध्ये सहभाग

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील राष्ट्रीय योजनेच्या विद्यार्थ्यांचा नेहरू युवा केंद्र यवतमाळ यांच्या मार्फत दिनांक 24/09/2022 रोजी आयोजित जिल्हास्तरीय युवा मोहत्सवमध्ये विविध स्पर्धेत सहभाग. वकृत्व स्पर्धेत तन्मय पुरके, चित्रकला स्पर्धेत दिपाली ठाकरे, मोबईल फोटोग्राफी मध्ये संध्या किनाके, कविता स्पर्धेत, योगेश महाजनकार व प्राची आडे तर युवा संवाद मध्ये सृष्टी येडमे यांनी सहभाग नोदवला.
जिल्हास्तरीय लोकनृत्य स्पर्धेत सहभागी चमुने तिसरा क्रमांक पटकावत स्मृती चिन्ह व रोख परीतोषिक पटकावले.
मोहत्सवाला उपस्थित असलेले जिल्हधिकारी श्री. अमोल येडगे, राज्यमंत्री संजय राठोड, माननीय आमदार मदन भाऊ येरावार, नेहरू युवा केंद्राचे प्रमुख अनिल ढेंगे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
युवा मोहत्सव यशस्वी करण्याकरिता वैष्णवी बुल्ले , मंगेश लोंडे , प्रिया दोणाडकर , राखी मैंद, उल्हास चव्हाण , साहिल घोडेस्वार, अभय उलमाले इत्यादींनी परिश्रम घेतले.

नेहरू युवा केंद्र यवतमाळ यांच्या मार्फत आयोजित जिल्हास्तरीय युवा मोहत्सवमध्ये सहभाग

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील राष्ट्रीय योजनेच्या विद्यार्थ्यांचा नेहरू युवा केंद्र यवतमाळ यांच्या मार्फत दिनांक 24/09/2022 रोजी आयोजित जिल्हास्तरीय युवा मोहत्सवमध्ये विविध स्पर्धेत सहभाग. वकृत्व स्पर्धेत तन्मय पुरके, चित्रकला स्पर्धेत दिपाली ठाकरे, मोबईल फोटोग्राफी मध्ये संध्या किनाके, कविता स्पर्धेत, योगेश महाजनकार व प्राची आडे तर युवा संवाद मध्ये सृष्टी येडमे यांनी सहभाग नोदवला.
जिल्हास्तरीय लोकनृत्य स्पर्धेत सहभागी चमुने तिसरा क्रमांक पटकावत स्मृती चिन्ह व रोख परीतोषिक पटकावले.
मोहत्सवाला उपस्थित असलेले जिल्हधिकारी श्री. अमोल येडगे, राज्यमंत्री संजय राठोड, माननीय आमदार मदन भाऊ येरावार, नेहरू युवा केंद्राचे प्रमुख अनिल ढेंगे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
युवा मोहत्सव यशस्वी करण्याकरिता वैष्णवी बुल्ले , मंगेश लोंडे , प्रिया दोणाडकर , राखी मैंद, उल्हास चव्हाण , साहिल घोडेस्वार, अभय उलमाले इत्यादींनी परिश्रम घेतले.

नेहरू युवा केंद्र यवतमाळ यांच्या मार्फत आयोजित जिल्हास्तरीय युवा मोहत्सवमध्ये सहभाग

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील राष्ट्रीय योजनेच्या विद्यार्थ्यांचा नेहरू युवा केंद्र यवतमाळ यांच्या मार्फत दिनांक 24/09/2022 रोजी आयोजित जिल्हास्तरीय युवा मोहत्सवमध्ये विविध स्पर्धेत सहभाग. वकृत्व स्पर्धेत तन्मय पुरके, चित्रकला स्पर्धेत दिपाली ठाकरे, मोबईल फोटोग्राफी मध्ये संध्या किनाके, कविता स्पर्धेत, योगेश महाजनकार व प्राची आडे तर युवा संवाद मध्ये सृष्टी येडमे यांनी सहभाग नोदवला.
जिल्हास्तरीय लोकनृत्य स्पर्धेत सहभागी चमुने तिसरा क्रमांक पटकावत स्मृती चिन्ह व रोख परीतोषिक पटकावले.
मोहत्सवाला उपस्थित असलेले जिल्हधिकारी श्री. अमोल येडगे, राज्यमंत्री संजय राठोड, माननीय आमदार मदन भाऊ येरावार, नेहरू युवा केंद्राचे प्रमुख अनिल ढेंगे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
युवा मोहत्सव यशस्वी करण्याकरिता वैष्णवी बुल्ले , मंगेश लोंडे , प्रिया दोणाडकर , राखी मैंद, उल्हास चव्हाण , साहिल घोडेस्वार, अभय उलमाले इत्यादींनी परिश्रम घेतले.

शेतकऱ्यांना डिजीटल पीक पाहणी व माहिती ॲपद्वारे भरणे

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील राष्ट्रीय योजना अंतर्गत दि.17/9/22 रोजी विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना डिजीटल पीक पाहणी व माहिती ॲपद्वारे भरणे या मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन डॉ. वैशाली मेश्राम व डॉ. सचिन जयस्वाल ह्यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले
महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी डिजीटल पीक पाहणी व माहिती भरणे मोहिम सुरू केली आहे परंतु अजुनही बऱ्याच शेतकऱ्यांना ही माहिती भरता येत नाही त्यामुळे त्यांना अनेक अडचणी येताना दिसून आल्या राष्ट्रीय सेवा योजनाच्या अंतर्गत शेतकऱ्यांना या सर्व बाबींची माहिती मडकोणा या गावी देण्यात आली.  प्रत्यक्ष शेतात जावून पाहणी करून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले
प्रशिक्षणा दरम्यान गावाच्या तलाठी आंबेकर तर सरपंच नरेश ढोरे ह्याचे मार्गदर्शन लाभले. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना ग्रामपंचायती कडुन सर्टिफिकेट देवून गौरवण्यात आले. सदर कार्यक्रमा करिता दिपाली ठाकरे, राखी मैंद, शिल्पा तालेकर, ओम जोगदंड, अभय उलमाले यांनी परिश्रम घेतले.

राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत लसीकरण शिबीर

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत लसीकरण शिबीराचे आयोजन दि. 24/08/2022 रोजी प्राचार्य डॉ. कल्पना देशमुख यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.
या शिबीरामध्ये महाविद्यालयीन  विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना  कोव्हॅक्सीन , कोवीशील्ड व बुस्टर डोस देण्यात आला. शिबीरामध्ये  २०० लोकांचे लसीकरण करण्यात आले.
शिबीराच्या यशस्वीतेकरिता रा. से.यो.कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम , सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थांनी परिश्रम घेतले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव - हर घर तिरंगा

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नीत बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविदयालय यवतमाळ येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने दि 13/8/22 रोजी आजादी का अमृत महोत्सव व हर घर तिरंगा घर घर तिरंगा या अभियानात यवतमाळ शहरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी व्दारा आयोजीत रॅलीने देशप्रेमाचा संदेश यवतमाळकरांना देण्यात आला.
रॅली मध्ये विद्यार्थानी संत गाडगेबाबां, महात्मा गांधी,  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कस्तुरबा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, अशा विविध वेषभूषेतुन देशभक्तीचा संदेश जनतेला देण्यात आला तसेच चौकाचौकात नृत्यांतुन हरघर तिरंगा संदेश देवून जनतेचे लक्ष वेधण्यात आले.
हजारोच्या संख्येने विद्यार्थी वर्ग स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपल्या संपूर्ण शक्तीने साजरा करण्यासाठी एकत्रित आला होता. जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे ह्यानी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला तसेच यवतमाळ जिल्ह्याचे रा से. यो जिल्हा समन्वयक डॉ. रत्नदिप गंगाळे ह्यांनी रॅलीचे नेतृत्व केले यावेळी संपूर्ण महाविद्यालयातील रा.से. यो कार्यक्रम अधिकारी, सहकार्यक्रम अधिकारी उपस्थित होते
दी १२/८/२०२२ रोजी वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली वकृत्व स्पर्धेचा विषय “देशाप्रती माझी असलेली भूमिका” हा होता. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त पणे सहभाग नोंदविला कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कार्यक्रम अधिकारी डॉ वैशाली मेश्राम ह्यांनी स्पर्धा मागचा हेतू सांगून विद्यार्थ्यानी देशाप्रती आपले कर्तव्य अविरत पणे पार पाडावे असे प्रतिपादन केले प्रमुख अतिथी व परीक्षक म्हणून बोलताना रा.से.यो. सह कार्यक्रम अधिकारी डॉ सचिन जयस्वाल ह्यांनी विद्यार्थ्यांना विविध समाज सेवकांचे कार्य सांगून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी त्यांना स्मरण करणे प्रत्येक विद्यार्थ्यांचे कर्तव्य आहे असे सांगितले वकृत्व स्पर्धे मधून तीन क्रमांक काढण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वी ते करीता वैष्णवी कर्णेवार, दिपाली ठाकरे, खुशी नदंनवार यांनी परिश्रम घेतले.
९/८/२०२२ रोजी विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम जागृत करण्यासाठी देशभक्तीपर “पोस्टर बनाओ” स्पर्धा आयोजित करण्यात आली
या स्पर्धांमध्ये महाविद्यालयातील  विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवीला, आलेल्या पोस्टर मधून तीन क्रमांक काढण्यात आले ,राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम ह्यांनी विद्यार्थ्यांना पोस्टर तयार करण्यामागचा हेतू सांगून देशा प्रती विद्यार्थ्यांची असलेली भूमिका स्पष्ट केली,  विद्यार्थ्यांनी प्रत्येक घरी तिरंगा लावावा व थोर नेत्यांची स्वातंत्र्या मागची भूमिका जाणून घ्यावी असे आवाहन रा.से.यो. सहकार्यक्रम अधिकारी डॉ सचिन जयस्वाल  ह्यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्विते करीता निखिल होलगरे ,सुज्वल खंडाळकर, प्रार्थना इंगोले, नेहा पवार,स्नेहल मडगुलवार, रश्मी परसराम, यांनी परिश्रम घेतले

दाते कॉलेज मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ येथे दि. 21/06/2022 रोजी शारीरिक शिक्षण विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री विनायक दाते हे होते त्यांनी योगाभ्यास व प्राणायाम दैनंदिन जीवनासाठी कसे आवश्यक आहे हे सांगून योगाभ्यासाचे महत्त्व स्पष्ट करून सांगितले. शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. रविजीत गावंडे यांनी प्राणायाम तसेच योगाभ्यास घेतला. प्रस्तुत कार्यक्रमाला शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता रोहन गायकवाड , उमेश कांबळे, कोमल काळे , निशांत मडावी यांनी परिश्रम घेतले.

दाते कॉलेज मध्ये शिवस्वराज्य दिन साजरा

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील राष्ट्रीय सेवा योजना व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 06/06/2022 रोजी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त शिवस्वराज्य दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम या होत्या. त्यांनी प्रास्ताविकातून शिवस्वराज्य दिनाची भूमिका स्पष्ट करून विद्यार्थ्यांना शिवरायांचे कार्य सर्वसामान्य जनतेसाठी कसे प्रेरक होते हे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून लाभलेले श्री सुनील भीष्म यांनी विद्यार्थ्यांना इतिहास कालीन प्रसंगाचे स्मरण करून विविध घटना जिवंत केल्या व पुस्तक वाचून ज्ञान वृद्धिंगत करण्याचा संकल्प दिला.
इतिहास विभाग प्रमुख प्रा. गजानन लांजेवार यांनी विद्यार्थ्यांना इतिहास कालीन बाबींचे स्मरण करून देऊन इतिहासातील विविध स्मारके व किल्ले यांचे जतन करून नवीन पिढीला त्यांचा प्राचीन वारसा जपण्याचा संदेश दिला.  शिवस्वराज्य दिनानिमित्त घेण्यात आलेल्या किल्ले बनाओ व शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील स्केच स्पर्धेत बक्षीस प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना शिल देवून गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्पिता खोब्रागडे हिने केले तर आभार  प्रार्थना इंगोले हिने मानले . कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता साक्षी चव्हाण,  रोहन गायकवाड, मनिषा मोकासे, दिशा आडे, माहेश्वरी आत्राम, सृष्टी येडमे, दादाजी किनकर, रश्मी परसराम, निशांत मडावी, प्रज्वल मेश्राम, शितल पोटे, खुशी नंदनवार यांनी परिश्रम घेतले.

दाते कॉलेज मध्ये पर्यावरण जनजागृती स्वच्छता सप्ताह समारोप कार्यक्रम

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत पर्यावरण जनजागृती स्वच्छता सप्ताह  साजरा करण्यात आला.  सप्ताहाचे उद्‌घाटन दि. 31/05/2022 रोजी प्राचार्य डॉ. कल्पना देशमुख यांच्या हस्ते झाले. सप्ताहाचे अंतर्गत रोज महाविद्यालयातील विविध भागांची स्वच्छता करण्यात आली व स्वच्छतेचा संदेश सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आला. सप्ताहाचा समारोप कार्यक्रम हा दि. ५/६/२०२२ रोजी प्रयासवन येथे सिडबॉल प्रशिक्षण कार्यशाळेत सहभाग नोंदवून करण्यात आला.
सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन मुख्याधिकारी नगरपरिषद  सौ. मडावी या होत्या तर सिडबॉल प्रशिक्षक म्हणून सौ. अमृता खंडेराव या होत्या. त्यांनी विद्याथर्यांना सिड्सबॉल चे प्रशिक्षण देऊन प्रवास करतांना ते बॉल्स जंगलात दऱ्या खोऱ्यात फेकुन पर्यावरण संवर्धनासाठी झाडे लावण्याचा संदेश दिला. मुख्याधिकारी सौ. मडावी यांनी सर्व सामन्य जनतेला व विद्यार्थांना घन कचरा निर्मुलनासाठी प्रवृत्त करून घरच्या घरी घन कचऱ्याचे व्यवस्थापन कसे करावे हे सांगितले.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे एकुण १००० सिड्स बॉल्स तयार करून येणाऱ्या जुन-जुलै महिण्यामध्ये जंगल परिसरामध्ये फेकण्याचा संकल्प केला.
संपूर्ण कार्यक्रम हा राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम व सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांच्या मागदर्शनात झाला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता साक्षी चव्हाण, रोहन गायकवाड, सृष्टी येडमे, नेहा पवार, प्रथमेश उमरे, निशांत मडावी, प्रार्थना इंगोले, रश्मी परसराम, निरज नेवारे यांनी परिश्रम घेतले.

दाते कॉलेज मध्ये पर्यावरण जनजागृती स्वच्छता सप्ताह

दिनांक 30/05/ 2022 ते 5/ 06 / 2022 या कालावधीत ‘पर्यावरण जनजागृती व स्वच्छता सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ येथे राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत पर्यावरण जनजागृती स्वच्छता सप्ताहाचे उद्‌घाटन 31/05/2022 रोजी प्राचार्य डॉ. कल्पना देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्‌घाटन कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना प्रास्ताविकातुन पर्यावरण संवर्धन म्हणजे काय व हा सप्ताह राबवण्या मागची भुमिका विस्तृत स्वरूपात कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी स्पष्ट करून सांगितली व पुढील सप्ताह भर परिसर स्वच्छ करण्याचा संदेश दिला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या डॉ. आशालता आसुटकर यांनी विद्यार्थांना प्रदुषणामुळे पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास हा चिंतेचा विषय आहे असे सांगुन “झाडे लावा झाडे जगवा” असा संदेश देवून समोरच्या कार्यासाठी प्रोत्साहन दिले.
सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांनी विद्यार्थांना सप्ताह अंतर्गत करण्याच्या कामाची रुपरेषा सांगुन झाडे लावण्याचा व परिसर स्वच्छता करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सृष्टी येडमे हिने केले तर आभार प्रदर्शन रोहन गायकवाड याने केले .
कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी साक्षी चव्हाण, कोमल काळे, मनिषा मोकासे, रश्मी परसराम, प्रार्थना इंगोले, खुशी नंदनवार, दादाजी किनकर, अवंतिका होलमाने यांनी परिश्रम घेतले.

दाते कॉलेज मध्ये पुस्तकांचे प्रदर्शन व पुस्तक दिन साजरा

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे दि. २३-४-२०२२ रोजी जागतिक पुस्तक दिनानिमित्त पुस्तकांचे व दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शन भरवण्यात आले व कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्तविक करतांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी जागतिक पुस्तक दिनाचे महत्त्व सांगून जगभरात तो कसा साजरा केला जातो हे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करतांना ग्रंथालय प्रमुख श्री विजय दीक्षित यांनी पीपीटी द्वारे दाते कॉलेजच्या ग्रंथालयाची माहिती देऊन ग्रंथ कशाप्रकारे पाहायचे व विविध पुस्तके ऑनलाईन कशा पद्धतीने वाचायचे हे सविस्तर सांगितले. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. कल्पना देशमुख यांनी पुस्तकाचे विद्यार्थी जीवनामध्ये असलेले महत्त्व सांगितले. राष्ट्रीय सेवा योजनेचे सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांनी ई बुक कसे वाचायचे व विविध वेबसाईट ची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहन गायकवाड ह्याने केले तर आभार प्रदर्शन खुशी नंदनवार हिने केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता ऋतुजा सोडगीर, अवंतिका होनमाने ,दादाजी  किनकर,  साक्षी चव्हाण, मनीषा मोकासे, प्रथमेश उमरे या यांनी परिश्रम घेतले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दि.१०/०४/२०२२ रोजी प्राचार्य  डॉ. कल्पना देशमुख यांच्या मार्गदर्शनात रॅलीचे (शोभा यात्रा) आयोजन करून जनजागृतीपर प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांना  भारत सरकारच्या विविध शिष्यवृत्तींची माहिती देऊन शैक्षणिक प्रगती कशी साधावी याची माहिती दिली. त्यानंतर रॅलीला सुरुवात करण्यात आली. रॅली ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ गेल्या नंतर परिसर स्वच्छता करण्यात आली. शासकीय वसतिगृहे, शिष्यवृत्ती , रमाई आवास योजना , सबळीकरण, स्वाभिमान योजना व स्वाधार योजना यावर पथनाट्य व लघुनाटिकेतून जन जागृतीपर प्रबोधन करण्यात आले तसेच जागर गीत ,विविध घोषवाक्य , राष्ट्रीय सेवा योजना गीतातून जन प्रबोधन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

 

चापर्डा येथे दाते कॉलेज तर्फे राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसांचे विशेष शिबिर

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीर दत्तक ग्राम चापर्डा येथे १९ मार्च ते २५ मार्च २०२२ दरम्यान संपन्न झाले.
दि. २५-३-२०२२ रोजी समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष श्री सतिश फाटक होते. त्यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना हे व्यक्तिमत्व घडविण्याचे व्यासपीठ आहे असे सांगून विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध उपक्रमाचे कौतुक केले. जिल्हा समन्वयक डॉ. रत्नदीप गंगाळे  यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेचा हेतू स्पष्ट करून सांगितला व जे विविध उपक्रम राबविले गेले त्याचे कौतुक केले. प्रमुख अतिथी म्हणून संबोधन करतांना संत गाडगे बाबा विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. विवेक देशमुख यांनी विद्यार्थ्यांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून स्वतःच्या कला गुणांची माहिती होऊन पुढे व्यक्तिमत्व विकासात भर पडेल असे सांगितले. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्राचार्य डॉ. कल्पना देशमुख यांनी विद्यार्थ्यांना हे कलागुण असेच जोपासून शिबिरातून जे संस्कार मिळतील ते कायम ठेवून आपली एक वेगळी ओळख निर्माण करावी असे सांगितले.
प्रस्तुत शिबिरामध्ये राबविलेल्या विविध उपक्रमाची माहिती प्रास्ताविकातून कार्यक्रम अधिकारी डॉ.वैशाली मेश्राम यांनी देतांना विद्यार्थ्यांनी श्रमदानातून  बंधारा उभारणे, ट्रॅकिंग, ग्रामस्थासाठी शोषखड्डे, वृक्षारोपण, इत्यादींची माहिती दिली.
शिबिराच्या काळात  पथनाटय, घोषवाक्य, स्फुर्ती गीते, जागर गीते व सांस्कृतिक कार्यक्रमातून ग्रामस्थांना विविध संदेश देण्यात आले. तसेच आरोग्य शिबिराद्वारे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या सिकलसेल, थायराइड, शुगर, बी.पी., एच.आय.व्ही., रक्तगट तपासणी करण्यात आली. अंधश्रद्धा निर्मूलनाचे विविध प्रयोग ग्रामस्थांना दाखवून प्रबोधन करण्यात आले.
विविध बौद्धिक सत्रांद्वारे व्यक्तिमत्व विकास, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, जाऊ आनंदाच्या गावा, Career Options after Graduation, इत्यादी विषयांवर सविस्तर मागदर्शन करून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यात आले.
विद्यार्थ्यांनी शिबीरास्थळी स्वतः स्वयंपाक करून सहभोजनाचा मनमुराद आनंद लुटला.
दि. २५-३-२०२२ च्या समारोपीय कार्यक्रमात विविध बक्षिसे देऊन सह कार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला. आभार प्रदर्शन करतांना डॉ. जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या विशेष कामाचा उल्लेख केला व समस्थ ग्रामस्थाचे सहकार्य असेच लाभो ही अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशांत मडावी ह्याने केले.
विविध कार्यक्रमामध्ये डॉ. ताराचंद कंठाळे , डॉ. सौ. स्नेहल डहाळे, श्री विनोद तलांडे, श्री हरिदास धुर्वे, श्री दत्तात्रय जोशी, डॉ. अमोल राऊत, डॉ. रविजीत गावंडे. डॉ. सचिन तेलखडे या प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

चापर्डा येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबिराचे उदघाटन

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नीत  राष्ट्रीय सेवा योजने द्वारा सात दिवसीय विशेष शिबिराचे आयोजन चापर्डा येथे १९ ते २५ मार्च दरम्यान करण्यात आले आहे. या शिबिरात ५० चे वर विद्यार्थांनी भाग घेतला आहे.
या शिबिराचे उदघाटन शनिवार दि.१९/३/२०२२ रोजी झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कल्पना देशमुख यांनी भूषवले. उदघाटन जिल्हा परिषद शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष मैनाताई उईके यांनी केले. त्यांनी विद्यार्थांना समाज  सेवा करणे हा राष्ट्रीय सेवा योजनेचा उद्देश असुन विद्यार्थांनी त्यासाठी सतत प्रयत्नरत राहिले पाहिजे असे आवाहन केले. प्राचार्य डॉ. कल्पना देशमुख यांनी अध्यक्षीय भाषणातून रा.से.यो.  सेवकांनी या सात दिवसीय विशेष शिबिरामध्ये विविध उपक्रम कसे राबवायचे हे सांगितले.
जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती जमदाळे यांनी सेवा भावाचा अर्थ स्पष्ट करून प्रत्येकाच्या अंगी हा सेवा भाव कसा रुजविता येईल हे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दादाजी किनकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. वैशाली मेश्राम यांनी केले. आभार प्रदर्शन अवंतिका होनमाने हिने केले.

‘डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महिला विषयक कार्य' या विषयावर कार्य शाळा

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महिला विषयक कार्य"  या विषयावर कार्यशाळा दि. १४/३/२०२२ रोजी संपन्न झाली.
महाविद्यालयातील तसेच  परिसरातील विविध महाविद्यालयामधून १३० विद्यार्थी सहभागी झाले होते.
उद्घाटक तथा प्रमुख वक्त्या म्हणून मार्गदर्शन करताना लोकमान्य महाविद्यालय वणीच्या मा. डॉ. रेखा बडोदेकर  यांनी महिलांची आजची स्थिती विषद केली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी महिलांसाठी केलेले कार्य कसे प्रेरणादायी आहे हे सविस्तर सांगितले. प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या ओवी ट्रस्टच्या संचालिका प्रणाली जाधव यांनी महिला विविध क्षेत्रात कशा यश प्राप्त करू शकतात व त्यांना   स्वयंरोजगाराच्या संधी देऊन कसे सक्षम करता येईल हे सांगितले. अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य डॉ. कल्पना देशमुख यांनी जागतिक महिला दिन साजरी करण्या मागची भूमिका व स्त्रियांचे आजचे स्थान विस्तृत करून सांगितले.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळा आयोजनामागची भूमिका स्पष्ट करून सांगितली. सह कार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांनी राष्ट्रीय सेवा योजना आपल्या कार्यातून महिलांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन रुजविण्यासाठी सतत पेरणा देत असते असे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी विद्यार्थांना प्रमाणपत्रे वाटण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादाजी किनकर यांनी तर आभार प्रदर्शन अवंतिका होलमाने हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नेहा पवार, साक्षी चव्हाण, रश्मी परसराम, प्रार्थना इंगोले, कोमल काळे, ऋतुजा सोडगीर, योगिता सहारे, जानवी उरकुडे, गायत्री खरकाटे यांनी परिश्रम घेतले.

सावित्रीबाई फुले स्मृती दिन साजरा

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ येथे राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिना निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. कल्पना देशमुख यांच्या मार्गदर्शनात दि. १०/३/२०२२ रोजी करण्यात आले.
प्रस्तुत कार्यक्रमाकरिता महिला शिवण वर्गाच्या प्रशिक्षिका स्वाती चव्हाण ह्या प्रमुख अतिथी होत्या. त्यांनी महिला आज कशा सक्षम झाल्या व त्यांचे कर्तृत्व सातासमुद्रा पलीकडे कसे गेले हे सांगितले.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी सावित्रीबाईंच्या विचारांची आज खरी गरज असून प्रत्येक महिला ही सक्षम बनली पाहिजे व स्वतःच्या अस्तिवाची जाणीव झाली पाहिजे व यासाठी रोजगार एक माध्यम आहे असे मत व्यक्त केले.
प्रार्थना इंगोले, योगेश्वरी ढगे, साक्षी चव्हाण, रशमि परसराम, ह्यांनी आपले मत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्र संचलन अवंतिका होलमाने हिने तर आभार प्रदर्शन योगिता साहारे हिने केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता नेहा पवार, निशांत मडावी, दादाजी किनकर, ऋतुजा सोडगिर, ह्यांनी परिश्रम घेतले.

जागतिक महिला दिन

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ येथे दि. ८/३/२०२२ रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने जागतिक महिला दिन आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कार्यक्रम अधिकारी डॉ.वैशाली मेश्राम  यांनी जागतिक महिला दिनाची  पार्श्वभूमी सांगून महिलांना कर्तुत्ववान व सक्षम करण्यासाठी जागतिक महिला दिन एक विशेष भूमिका बजावते तसेच आपआपल्या क्षेत्रात कर्तुत्व सिद्ध केलेल्या महिलांचा गौरव करण्याचा हक्काचा दिवस म्हणून जागतिक महिला दिन जगभरात साजरा केला जातो असे  सांगितले. प्रमुख वक्त्या व अतिथी म्हणून मंचावर उपस्थित असलेल्या उपजिल्हाधिकारी डॉ.स्नेहल कानिंचे ह्यांनी स्त्रिया ह्या कर्तृत्ववान आहेत व उच्च स्थानी विराजमान असून त्यांची भूमिका ही सर्व क्षेत्रात उज्वल आहे असे सांगितले, स्पर्धा परीक्षेतून उतुंग भरारी कशी घेता येईल हे सांगून MPSC स्पर्धा परीक्षेसंबंधी मार्गदर्शन केले.
संस्थेचे अध्यक्ष श्री विनायक दाते ह्यांनी सांगितले की महिला ‘दीन’ होत्या म्हणून ‘महिला दिन’ साजरा करण्याची वेळ आली होती. परंतु आता महिला सक्षम होत आहेत त्यामुळे लवकरच ‘महिला दिन’ साजरा करण्याची आवश्यकता भासणार नाही. अध्यक्षीय भाषणामध्ये महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.कल्पना देशमुख ह्यांनी महिला  ह्या विश्वाच्या  सृजनकर्त्या असून त्याचे क्षेत्र विशाल व भव्य आहे असे सांगून महिलांच्या कर्तुत्वावर प्रकाश टाकला.  या कार्यक्रमामध्ये ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत झालेल्या विविध स्पर्धांमध्ये यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ताराचंद कंठाळे ह्यांनी तर आभारप्रदर्शन डॉ.सचिन जयस्वाल ह्यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दादाजी किनकर, साक्षी चव्हाण, निशांत मडावी, कोमल काळे, रश्मी परसराम, अवंतिका होनमाने, जुई काळे, योगिता सहारे, जानव्ही उरकुडे, प्रार्थना इंगोले, सौरव जाधव, ऋतुजा सोडगीर, गायत्री खरकाटे ह्यांनी परिश्रम घेतले.

 

दाते कॉलेज मध्ये संत गाडगेबाबा जयंती साजरी

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत संत गाडगेबाबा जयंती दि. २३/२/२०२२ रोजी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी  विभागाच्या प्रा.डॉ आशालता आसुटकर होत्या. त्यांनी विद्यार्थांना गाडगे बाबानी जी सेवावृती जोपासली ती प्रत्येक विद्यार्थ्यांने जोपासून जनसेवेचा वसा घ्यावा असे आवाहन केले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ. वैशाली मेश्राम यांनी स्वच्छ्ता व गाडगेबाबा यांचा सहसबंध समजून देत कचऱ्याचे व्यवस्थापन कसे करावे हे सांगितले. सहकार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ सचिन जयस्वाल ह्यांनी विद्यार्थ्यांना गाडगेबाबांनी कीर्तनाच्या माध्यमातून कशा प्रकारे प्रबोधन केले हे सांगत  विविध उदाहरणे दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अवंती होलगरे हिने तर आभारप्रदर्शन कोमल काळे हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता  सौरव जाधव, राहुल लसवंते, दिशा आडे, नेहा नागरिकर, दिशा काळसरपे, जुई काळे, यांनी परिश्रम घेतले.

जिल्हा स्तरीय युवा सांसद स्पर्धेत सुयश

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी दादाजी नियोजीत किनकर ह्यांनी दी.१९/२/२०२२ रोजी ऑनलाईन  घेतलेल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती अंतर्गत आयोजित युवा सांसद मध्ये “अतुल्य भारत” या विषयावर आपले विचार व्यक्त केले.

यामध्ये भारतीय संस्कृती नितीमुल्यांची ओळख हा विषय मांडून पुढील फेरीसाठी आपले स्थान निश्चित केले.

त्याने मिळवलेल्या यशाबद्दल कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल व सर्व प्राध्यापक वृदांनी कौतुक केले.

दाते कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांना नेहरू युवा केंद्रातर्फे मार्गदर्शन

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत नेहरू युवा केंद्र यवतमाळ, महाराष्ट्र शासनाच्या वतीने युवकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन दि. १६/२/२०२२ रोजी करण्यात आले.
यूथ ओरिएनटेशन प्रोग्राम मधे युवकांचे मानसिंक स्वास्थ्य, एड्स जागरूकता व बेटी बाचाओ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
नेहरू युवा केंद्राचे अधिकारी श्री. अनिल ढेंगे यांनी नेहरू युवा केंद्राची भुमिका स्पष्ट करून खेड्यात युवा गटा द्वारे रोजगाराच्या संधी यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले श्री. सौदागर सर यांनी मानसिक आरोग्य म्हणजे काय व ते चांगले राखण्यासाठीची भूमिका स्पष्ट केली. आरोग्य विभागाच्या दास मॅडम यांनी  ऐड्स विषयी माहिती देऊन समज, गैरसमज स्पष्ट करून सांगितले.  सौ पूनम यांनी गर्भलिंग  परीक्षण करणे कसे चुकीचे आहे व केल्यास काय शिक्षा होऊ शकते हे सांगितले.
राष्ट्रिय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ.वैशाली मेश्राम ह्यांनी युवा वर्ग या सर्व कार्यात कशी भूमिका बजावतो हे सांगून राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी सर्व उपक्रमामध्ये युवा केंद्रा सोबत सक्रिय सहभाग नोंदवतील अशी ग्वाही दिली. राष्ट्रिय सेवा योजनेचे सहकार्यक्रम  अधिकारी डॉ.सचिन जयस्वाल यांनी युवकांना विविध रोजगार संधी नेहरू युवा केंद्रा मार्फत कशा उपलब्ध होतील हे सविस्तर सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्र संचलन शुभम राऊत याने तर आभारप्रदर्शन  गौरव जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अजय मांडवकर, सुरक्षा गेडाम, कल्याणी राऊत, चैताली मराठे, स्न्हेल कणाके व पल्लवी आत्राम यांनी परिश्रम घेतले.

लसीकरण शिबिराचे आयोजन

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे, राष्ट्रीय सेवा योजना व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दी.२७/१/२०२२ ते २८/१/२०२२ असे २ दिवस १५ ते २५ वयो गटासाठी लसीकरण  शिबिर आयोजित करण्यात आले.

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम ह्यांनी लसीकरणाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले तर सहकार्यक्रम अधिकारी डॉ.जयस्वाल ह्यांनी लसीकरणाचे फायदे सांगून लस घेण्याचे आव्हान केले.

कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.पंचभाई ह्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थी लसीकरणाला येतील यांची व्यवस्था करून लसीकरण कोविड पासून वाचण्याचे कसे सुरक्षा कवच आहे हे सांगितले.

जिल्हा परिषद आरोग्य विभागा तर्फे डॉ. शिवराज दरारे, नर्स दिक्षा डंभारे, व मेरी कोरील, प्रोजेक्ट कॉरडीनेटर संदिप घोडे या कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले  तर राष्ट्रीय सेवा योजनेच्या निशांत मडावी, कोमल काळे, मनीषा मोकाशे, खुशी नंदनवार, साक्षी चव्हाण, रश्मी परसराम, कुणाल बेंद्रे ह्यांनी सहकार्य केले.

लसीकरण शिबिराचे आयोजन

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे, राष्ट्रीय सेवा योजना व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दी.२७/१/२०२२ ते २८/१/२०२२ असे २ दिवस १५ ते २५ वयो गटासाठी लसीकरण  शिबिर आयोजित करण्यात आले.

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम ह्यांनी लसीकरणाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले तर सहकार्यक्रम अधिकारी डॉ.जयस्वाल ह्यांनी लसीकरणाचे फायदे सांगून लस घेण्याचे आव्हान केले.

कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.पंचभाई ह्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थी लसीकरणाला येतील यांची व्यवस्था करून लसीकरण कोविड पासून वाचण्याचे कसे सुरक्षा कवच आहे हे सांगितले.

जिल्हा परिषद आरोग्य विभागा तर्फे डॉ. शिवराज दरारे, नर्स दिक्षा डंभारे, व मेरी कोरील, प्रोजेक्ट कॉरडीनेटर संदिप घोडे या कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले  तर राष्ट्रीय सेवा योजनेच्या निशांत मडावी, कोमल काळे, मनीषा मोकाशे, खुशी नंदनवार, साक्षी चव्हाण, रश्मी परसराम, कुणाल बेंद्रे ह्यांनी सहकार्य केले.

मतदान दिना निमित्त जिल्हा स्तरिय ई-घोषवाक्य व इ-निबंध स्पर्धा

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळच्या राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत जिल्हास्तरीय ई-घोषवाक्य स्पर्धा व इ-निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना “मी जागरूक मतदाता” व “मी मतदार - सशक्त व सुरक्षित" हे विषय स्पर्धेसाठी देण्यात आले होते. दि 22 जानेवारी ते 24 जानेवारी २०२२ चे दरम्यान WhatsApp  वर  इ-घोषवाक्य व इ-निबंध मागविले होते.

गुणानुक्रमे प्रथम क्रमांक दादाजी किनंकर,  द्वितीय क्रमांक साक्षी चव्हाण व तृतीय क्रमांक रश्मी परसराम यांना प्राप्त झाला. प्रथम आलेल्या दादाजी किनंकर ह्याचा जिल्हाधिकारी श्री अमोल येडमे ह्यांच्या हस्ते गौरव करून त्याला सन्मान पत्र देण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी  कार्यालयात दि. २५-१-२०२२ रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अवंती होलमाणे, रश्मी परसराम, निशांत मडावी, कोमल काळे, खुशी निंदणवार, साक्षी चव्हाण ह्यांनी सहकार्य केले.

दाते कॉलेजमध्ये रासोयो व राज्यशास्त्र विभागातर्फे "राष्ट्रीय मतदान दिन" साजरा

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दी. २२/१/२०२२ रोजी “मतदार दिन" आयोजित करण्यात आला. "मी माझे मत विकणार नाही” ह्या विषयावर वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. एकूण १० स्पर्धकांनी यात भाग घेतला. गुणानुक्रमे पहिल्या तीन विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली.

कार्यक्रमाला संबोधित  करतांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. वैशाली मेश्राम ह्यांनी विद्यार्थ्यांना लोकशाही मध्ये निवडणुकीचे महत्व व मतदारांची भूमिका स्पष्ट करून सांगितली. राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सचिन जयस्वाल ह्यांनी योग्य व सक्षम लोकप्रतिनिधीं निवडण्याची जबाबदारी मतदारावर आहे, म्हणुन कुठल्याही प्रलोभनाला  बळी न पडता निर्भय निःपक्ष मतदान करावे असे सांगितले, विद्यार्थ्यांनी शपथ ग्रहण केल्यावर कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाच्या यशस्वितेकरता  अवंती होलमाने, साक्षी चव्हाण, नेहा पवार, रश्मी परसराम, निशांत मडावी, खुशी नंदनवार, अक्षय किनकर, कोमल काळे व प्रार्थना इंगोले यांनी विशेष परिश्रम घेतले.

स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती साजरी

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ, राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती ऑनलाईन पद्धतीने साजरी करण्यात आली.
विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा यवतमाळ, राष्ट्रीय सेवा योजना, स्कूल ऑफ स्कॉलर तसेच बालाजी स्पोर्टस अकाडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १२/१/२०२२ हा युवा दिन म्हणुन ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आला.
विवेकानंद केंद्राचे श्री. सुरेंद्र नार्लावार यांनी प्रास्ताविकातून केंदाची भुमिका तसेच कार्यक्रम आयोजनाचा हेतू युवा वर्गाला सविस्तर सांगितला. प्रमुख वक्ते म्हणून बोलताना प्रा. अमोलजी गठीकर यांनी विवेकानंदांनी तसेच जिजाऊनी जिजाबाईंनी संस्कार कशाप्रकारे दिले व या संस्काराची शिदोरी आपण कशा प्रकारे समोर घेऊन गेलो पाहिजे हे उदाहरणासहित स्पष्ट केले.
आभार प्रदर्शन करतांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी विवेकानंदांच्या विचाराची  आज खरी गरज असून केंद्रा अशा उपक्रमात  NSS युनिट सदैव सहकार्य करेल अशी ग्वाही दिली, व सर्व आयोजकांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता  राष्ट्रीय सेवा योजनेचे सह कार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल, यवतमाळ शाखेचे युवा प्रमुख अभिजित पवार, दादाजी किणकर, कुणाल बेंद्रे, नेहा पवार, राधा जाधव, रशमी परसराम, साक्षी चव्हाण, यांनी सहकार्य केले.

सिंधुताई सकपाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ, येथील राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत  दिनांक ५/०१/२०२२ रोजी संविधान चौक येथे अनाथांची माय असलेल्या सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ.वेशाली मेश्राम यांनी सिंधुताईच्या जीवनपटावर प्रकाश टाकून त्याच्या समाज कार्याचे अनुकरण सर्व समाजाचे करणे गरजेचे आहे असे सांगितले. सहकार्यक्रम अधिकारी सचिन जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांना सिंधुताई समाजासाठी अनाथासाठी कशाप्रकारे माय झाल्या हे सांगितले.
अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुनयना यवतकर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळ नगर परिषदच्या CEO माधुरी मडावी ह्या  उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दादाजी किणकर, प्रार्थना इंगोले, नेहा पवार, निशांत मडावी, रश्मी परसराम, आशिष बेंद्रे, प्रज्वल मेश्राम, व साक्षी चव्हाण ह्यांनी परिश्रम घेतले.

सावित्रीबाई फुले जयंती निमित्त दाते कॉलेज तर्फे पारधी बेड्यावर शैक्षणिक साहित्याचे वाटप

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे दिनांक ०३/०१/२०२२ रोजी सावित्रीबाई फुले जयंती निमित्त राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेला मालार्पण करून पारधी बेडा येथे स्वच्छता व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी खेड्यावरील लोकांना शिक्षण हें जीवनाचा अविभाज्य भाग असून शिक्षण घेतल्याने तुम्ही आणि तुमचे मुले, चांगले जीवन जगून मुख्य प्रवाहात येवू शकता  असे आवाहन केले.  सहकार्यक्रम अधिकारी डॉ.सचिन जयस्वाल यांनी मुलींना शाळेत पाठवणे किती गरजेचे आहे हे सांगितले व स्वच्छता आणि आरोग्य यांचा संबंध समजून शाळेत जाण्याचे आवाहन केले.
विद्यार्थ्यांनी सर्वांशी संवाद साधून लहान मुलांना आणि वृद्धांना फलाहार देवून शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता कुणाल बेदरे, निशांत मडावी, दादाजी किनकर, प्रार्थना इंगोले, दिव्या डोमे, रश्मी परसराम, खुशी नंदनवार, अवंती होलमाणे, ऋतूजा सोडगिर, प्रनोती हसतबांधे, साक्षी चव्हाण यांनी परिश्रम घेतले.

दाते कॉलेज तर्फे नववर्षा निमित्त गरजूंना अन्न किटचे वाटप

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य  महाविद्यालय यवतमाळ येथे राष्ट्रीय सेवा योजना यांच्या अंतर्गत नववर्ष  निमित्त दि. १-१-२०२२ रोजी  शहरातील विविध गरजू व्यक्तींना मिठाई  व खाद्य पदार्थांचे  वाटप प्राचार्य वर्षा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ वैशाली मेश्राम यांनी विद्यार्थिनिंना अन्न दानाचे महत्त्व विषद केले व सेवा हा राष्ट्रीय सेवा योजनेचा मुलमंत्र आहे असे सांगितले. सहकार्यक्रम अधिकारी डॉ सचिन जयस्वाल ह्यांनी मानवता हाच एक धर्म असून विद्यार्थ्यांनी तो जोपासला पाहिजे असे आवाहन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता निशांत मडावी, कुणाल बेंदे, रश्मी परसकर, दिव्या डोमे, प्रार्थना इंगोले, प्रणौती हसातबांधे, खुशी नंदनवार, साक्षी चव्हाण,  ह्यांनी परिश्रम घेतले.

‘संविधान धर्म संसद आणि कायद्याचे राज्य’ या विषयावर वेबिनार

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभाग तसेच व्ही. जी. शिवदारे कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स सोलापूर व संविधान जागरूकता मंच महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संविधान धर्म संसद आणि कायद्याचे राज्य’ या विषयावर दि. २८-१२-२०२१ रोजी वेबिनार चे आयोजन करण्यात आले. प्रमुख वक्ते श्री असीम सरोदे यांनी आपल्या व्याख्यानातून मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्वे, संविधानिक मूल्य, धर्मसंसद आणि कायद्याचे राज्य यावर विस्तृत विचार मांडले, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वर्षा कुळकर्णी यांनी आपल्या मनोगतातून संविधानाचे महत्व सांगितले आणि असे वेबिनार वारंवार आयोजित केल्या गेले पाहिजेत असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन वैशाली वराडे हिने केले. आभार वसंत मनुरे यांनी मानले. कार्यक्रमाला 37 विद्यार्थी उपस्थिती होते.

दाते कॉलेज मध्ये ‘संविधानिक मूल्ये’ यावर संवाद

बाबाजी दाते कला व वाणिज्य महाविद्यालय येथे दिनांक २३/१२/२०२१ गुरुवार रोजी राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संवाद संविधानाचा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
प्रमुख वक्ते राजवैभव रामचंद्र हे कोल्हापुर येथून खास संविधानाचा संवाद विद्यार्थ्यांशी साधण्यासाठी आले होते. त्यांनी ‘संविधानिक मूल्ये’  भारुडातून व थेट संवाद साधून लोकभाषेत समजून सांगितली. ओवी ट्रस्ट च्या प्रणाली जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी सामाजिक सेवेतून संविधानिक मूल्ये कशी जोपासली जातील हे विद्यार्थ्यांना सांगितले.
सहकार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.सचिन जयस्वाल यांनी संविधान राज्यशास्त्राचा कसा अविभाज्य भाग आहे हे सांगून संविधानिक  मूल्ये कशी जोपासली जातील हे सांगितले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. वैशाली मेश्राम यांनी ओवी ट्रस्ट सोबत सामाजिक बांधिलकी म्हणून लहान मुलांच्या शिक्षणात राष्ट्रीय सेवा योजना सहकार्य करेल अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादाजी किनकर तर आभार प्रदर्शन निशांत मडावी यांनी केले. मनीषा मोकाशे, अवंतिका होनमाने, गायत्री खरकटे,जान्हवी उरकूडे, प्रज्वल मेश्राम यांनी कार्यक्रमाच्या संयोजनासाठी परिश्रम घेतले.

दाते कॉलेज मध्ये संत गाडगेबाबा स्मृती दिनानिमित्त स्वच्छता जनजागृती रॅलीचे आयोजन

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे दिनांक २०/१२/२०२१ रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने स्वच्छता जनजागृती रॅलीचे आयोजन प्राचार्य डॉ.वर्षा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.
संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून राष्ट्रीय योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी स्वच्छतेचे महत्व भुकेल्याला अन्न, तहानलेल्याना पाणी आणि अंधश्रद्धेची काजळी दुर करून डोळस श्रध्दा वाढवण्यासाठी संत गाडगेबाबा झटले तसे आपण समाजसेवक म्हणून झटले पाहिजे असे उद्बोधन रॅलीला केले. सह कार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांनी अज्ञान अस्वच्छता अंधश्रद्धा यांना दूर ठेवून समाज सुधारण्याचे व्रत हाती घ्यावे असे आव्हाहन केले. या निमित्ताने एक रॅली काढण्यात आली
विद्यार्थ्यांनी घोषणा आणि  नारे देउन नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला. रस्ते व परिसर स्वच्छ केला तसेच महाविद्यालय व आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता कुणाल बेंद्रे, साक्षी चव्हाण, प्रायना इंगोले, साई अडवलवार, महेश विरदंडे, यश मार्कंड  यांनी परिश्रम घेतले.

दाते कॉलेज मधे एक दिवसीय पुष्परचना कार्यशाळेचे आयोजन

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे १० डिसेंबर २०२१ रोजी एक दिवसीय पुष्परचना कार्यशाळेचे आयोजन गृह अर्थशास्त्र व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमान करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी होत्या. अध्यक्षीय भाषणात सौन्दर्य निर्मितीसाठी पुष्परचना कशी महत्वाची आहे यावर प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.  गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी महाविद्यालयात कार्यक्रमासाठी बुके आणि हार लागतात त्यावर विद्यार्थ्यांनी बनविलेले बुके वापरून वर्षभराचा खर्च कसा वाचवता येईल, तसेच टाकावू सामानांपासून सुंदर पुष्परचना कशा तयार करता येतील हे प्रशिक्षणाद्वारे शिकविले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कनिष्ठ महाविद्यालय गृहअर्थशास्त्रच्या प्रा. सारिका नंदे उपस्थित होत्या.  कु. प्रणाली अगलधरे यांनी पुष्परचना आणि बुके विकून स्वयंरोजगार कसा करता येईल याचे सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे आयोजक व मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे सह कार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांनी परिश्रम घेतले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी रश्मी परसराम, दिव्या भगत, साक्षी चव्हाण, कोमल काळे, स्नेहल किनाके यांनी परिश्रम घेतले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त अभिवादन :-

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संचालित द्वारा संचलित बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त ६ डिसेंबर २०२१ रोजी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे सह कार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल होते तर प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना संविधानाने दिलेलं हक्क, मूलभूत अधिकार, स्त्रीसशक्ती करणं, आणि राष्ट्रीय सेवा योजनेत त्यांची भूमिका विशद केली राष्ट्र विकासासाठी युवा शक्तीचे असलेले महत्व या विषयावर प्रतिपादन केले. तर अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनाराष्ट्रीयसेवा योजनेमार्फत विविध कलागुण कसे जोपासता येतील आपल्या सर्वांगीण विकासासाठी कोणत्या गोष्टी पूरक आहेत, सामाजिक जीवनात आणि विद्यार्थी जीवनात काय भूमिका असावी, विद्यार्थ्यांनी स्वतःला कस घडवाव आणि त्याचा उपयोग राष्ट्रहितासाठीच कसा करता येईल यावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाला यशस्वी पार पाडण्यासाठी कोमल काळे, दिशा आडे, सृष्टी येडमे, निलेश चव्हाण, तसेच उमेश काळे यांनी परिश्रम घेतले

संविधान दिन साजरा

26 नोव्हेंबर 2021 रोजी बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात येथे राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ वर्षा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ वैशाली मेश्राम तर प्रमुख वक्ते डॉ सचिन जयस्वाल होते सर्वप्रथम उद्देशपत्रिकेचे वाचन करण्यात आले प्रमुख वक्त्यांनी आपल्या भाषणात म्हटले की संविधान प्रत्येक विद्यार्थ्यांने वाचले पाहिजे संविधान जाणून घेणे प्रत्यकाचे कर्तव्य आहे भारतीय संविधान निर्मिती कार्य होऊन आज 72 वर्षे झाली तरीही जनतेमध्ये संविधाना बद्दल जाणीव आणि जागृती नाही  ही जाणीव जागृती होणे गरजेचे आहे सोबतच संविधानात कोणत्या तरतुदी आहे आपले अधिकार व कर्तव्य या संदर्भात आढावा घेऊन संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले
प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा स्मिता देशमुख व प्रा वैशाली सोनकुसरे होते कार्यक्रमा च्या यशस्वीते साठी कु रश्मी परशराम ,प्रार्थना इंगोले ,कल्याणी कुडमते, रोहन गायकवाड,रोशन पारधी यांनी परिश्रम घेतले

नागरिकांना रक्तदानाचे आवाहन

महाराष्ट्र शासनाच्या  आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. तेव्हा राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत नागरिकांना रक्तदान करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. महाविद्यालयाच्या वतीने कॉलेज प्रांगणात तसेच बस स्टँड वर दर्शनीय ठिकाणी अशाप्रकारचे  बॅनर लागले आहेत.
डॉ बाबासाहेब आंबेडकर - महापरिनिर्वाण दिन
बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत ६ डिसेंबर २०२०, महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करताना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. ताराचंद कंठाळे

संविधान एक आदर्श आचारसंहिता -प्रा.डॉ.गजानन हेरोळे

दिनांक 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय  राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत संविधान दिवस आभासी पद्धतीने साजरा करण्यात आला. कार्यक्रमात प्रा. डॉ.गजानन हेरोळे व मराठी विभाग प्रमुख कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालय, दर्यापूर हे प्रमुख मार्गदर्शक तर अध्यक्ष कार्यकारी प्राचार्य डॉ प्रदीप दरवरे होते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्षमय इतिहास वाचून प्रेरणा घ्यावी. भारतीय संविधान एक आदर्श आचारसंहिता आहे तिचे पालन होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन डॉ. हेरोळे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. दरवरे म्हणाले की भारत हा बहुधर्मीय देश असून केवळ संविधानाने एका सूत्रात बांधल्या गेला आहे. सुरुवातीला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधान ग्रंथांचे पूजन करून हारार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन  व आभारप्रदर्शन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.ताराचंद कंठाळे  यांनी केले. कार्यक्रमास बहुसंख्य रासेयो स्वयंसेवक उपस्थित होते.