बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ 

Babaji Datey Kala & Vanijya Mahavidyalaya, Yavatmal

(वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ ट्रस्ट रजि. क्र. ई-३२ द्वारा संचालित)

NAAC Accredited B++ Grade with CGPA 2.82

Home Science

गृहअर्थशास्त्र विभाग

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय गृहअर्थ शास्त्र विभागाची सुसज्ज अशी प्रयोगशाळा आहे. ३० बाय ४० चौरस फूट अशा या विभागात एका भागामध्ये कुकिंग तर दुसऱ्या भागात वर्ग खोलीचे कार्य केले जाते. प्रा. डॉ. वैशाली मेश्राम या विभागप्रमुख आहेत.

विद्यार्थिनी मधील कला गुणांचा विकास व्हावा म्हणून पाकशास्त्र, भरतकाम, शिवणकाम, इत्यादी बाबत विभागाद्वारे मार्गदर्शन केले जाते. तसेच आहारशास्त्र, स्वास्थ्य संबंध, गृह्व्यवस्थापन, गृह योजना, मानव विकास, बालविकास, ह्या संबंधीचे ज्ञान दिले जाते.

प्रयोगशाळेतील प्रयोगासाठी लागणारे सर्व साहित्य जसे, gas शेगडी, मायक्रोवेव्ह ओव्हन, मिक्सर, फ्रीज, कुकिंग रेंज तसेच laptop, टी.व्ही., टेपरेकॉर्डर, कॅमेरा असे आधुनिक साहित्य उपलब्ध आहे.

विद्यार्थिनींच्या ज्ञानात भर पडावी म्हणून विभागाद्वारे तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन तसेच पुष्परचना, हिमोग्लोबिन चाचणी इत्यादीचे कार्यक्रम राबविले जातात. बचतगट, वृद्धाश्रम, नर्सरी इत्यादी ठिकाणी भेटी दिल्या जातात. विद्यार्थिनीनकडून वेगवेगळ्या संबधित विषयांवर Posters Flip Cards, Baby Kits तसेच भरतकामाचे प्रकार तयार करून घेतले जातात.

गृहअर्थशास्त्र विभागाचा निकाल उत्कृष्ट लागतो. काही विद्यार्थिनींनी  विद्यापीठाच्या गुणवत्ता यादित देखील स्थान प्राप्त केलेले आहे.