बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ 

Babaji Datey Kala & Vanijya Mahavidyalaya, Yavatmal

(वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ ट्रस्ट रजि. क्र. ई-३२ द्वारा संचालित)

NAAC Accredited B++ Grade with CGPA 2.82

राज्यशास्त्र विभाग – मतदान दिना निमित्त जिल्हा स्तरिय ई-घोषवाक्य व इ-निबंध स्पर्धा

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळच्या राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अंतर्गत जिल्हास्तरीय ई-घोषवाक्य स्पर्धा व इ-निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना “मी जागरूक मतदाता” व “मी मतदार - सशक्त व सुरक्षित" हे विषय स्पर्धेसाठी देण्यात आले होते. दि 22 जानेवारी ते 24 जानेवारी २०२२ चे दरम्यान WhatsApp  वर  इ-घोषवाक्य व इ-निबंध मागविले होते. गुणानुक्रमे प्रथम क्रमांक दादाजी किनंकर,  द्वितीय क्रमांक साक्षी चव्हाण व तृतीय क्रमांक रश्मी परसराम यांना प्राप्त झाला. प्रथम आलेल्या दादाजी किनंकर ह्याचा जिल्हाधिकारी श्री अमोल येडमे ह्यांच्या हस्ते गौरव करून त्याला सन्मान पत्र देण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी  कार्यालयात दि. २५-१-२०२२ रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अवंती होलमाणे, रश्मी परसराम, निशांत मडावी, कोमल काळे, खुशी निंदणवार, साक्षी चव्हाण ह्यांनी सहकार्य केले.

दाते कॉलेजमध्ये रासोयो व राज्यशास्त्र विभागातर्फे ‘राष्ट्रीय मतदान दिन’ साजरा

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दी. २२/१/२०२२ रोजी “मतदार दिन" आयोजित करण्यात आला. "मी माझे मत विकणार नाही” ह्या विषयावर वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. एकूण १० स्पर्धकांनी यात भाग घेतला. गुणानुक्रमे पहिल्या तीन विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली.

कार्यक्रमाला संबोधित  करतांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. वैशाली मेश्राम ह्यांनी विद्यार्थ्यांना लोकशाही मध्ये निवडणुकीचे महत्व व मतदारांची भूमिका स्पष्ट करून सांगितली. राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सचिन जयस्वाल ह्यांनी योग्य व सक्षम लोकप्रतिनिधीं निवडण्याची जबाबदारी मतदारावर आहे, म्हणुन कुठल्याही प्रलोभनाला  बळी न पडता निर्भय निःपक्ष मतदान करावे असे सांगितले, विद्यार्थ्यांनी शपथ ग्रहण केल्यावर कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाच्या यशस्वितेकरता  अवंती होलमाने, साक्षी चव्हाण, नेहा पवार, रश्मी परसराम, निशांत मडावी, खुशी नंदनवार, अक्षय किनकर, कोमल काळे व प्रार्थना इंगोले यांनी विशेष परिश्रम घेतले.

आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत वेबिनर चे आयोजन

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभाग तसेच व्ही. जी. शिवदारे कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स सोलापूर व संविधान जागरूकता मंच महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संविधान धर्म संसद आणि कायद्याचे राज्य’ या विषयावर दि. २८-१२-२०२१ रोजी वेबिनार चे आयोजन करण्यात आले.  प्रमुख वक्ते श्री असीम सरोदे यांनी आपल्या  व्याख्यानातून मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्वे, संविधानिक मूल्य, धर्मसंसद आणि कायद्याचे राज्य यावर विस्तृत विचार मांडले, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वर्षा कुळकर्णी यांनी आपल्या मनोगतातून संविधानाचे महत्व सांगितले आणि असे वेबिनार वारंवार आयोजित केल्या गेले पाहिजेत असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन वैशाली वराडे हिने केले. आभार  वसंत मनुरे यांनी मानले. कार्यक्रमाला 37 विद्यार्थी उपस्थिती होते.

‘संविधानिक मूल्ये’ यावर संवाद

बाबाजी दाते कला व वाणिज्य महाविद्यालय येथे दिनांक २३/१२/२०२१ गुरुवार रोजी राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संवाद संविधानाचा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
प्रमुख वक्ते राजवैभव रामचंद्र हे कोल्हापुर येथून खास संविधानाचा संवाद विद्यार्थ्यांशी साधण्यासाठी आले होते. त्यांनी ‘संविधानिक मूल्ये’  भारुडातून व थेट संवाद साधून लोकभाषेत समजून सांगितली. ओवी ट्रस्ट च्या प्रणाली जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी सामाजिक सेवेतून संविधानिक मूल्ये कशी जोपासली जातील हे विद्यार्थ्यांना सांगितले.
सहकार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.सचिन जयस्वाल यांनी संविधान राज्यशास्त्राचा कसा अविभाज्य भाग आहे हे सांगून संविधानिक  मूल्ये कशी जोपासली जातील हे सांगितले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. वैशाली मेश्राम यांनी ओवी ट्रस्ट सोबत सामाजिक बांधिलकी म्हणून लहान मुलांच्या शिक्षणात राष्ट्रीय सेवा योजना सहकार्य करेल अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादाजी किनकर तर आभार प्रदर्शन निशांत मडावी यांनी केले. मनीषा मोकाशे, अवंतिका होनमाने, गायत्री खरकटे,जान्हवी उरकूडे, प्रज्वल मेश्राम यांनी कार्यक्रमाच्या संयोजनासाठी परिश्रम घेतले.

संविधान दिन साजरा

26 नोव्हेंबर 2021 रोजी बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात येथे राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ वर्षा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ वैशाली मेश्राम तर प्रमुख वक्ते डॉ सचिन जयस्वाल होते सर्वप्रथम उद्देशपत्रिकेचे वाचन करण्यात आले प्रमुख वक्त्यांनी आपल्या भाषणात म्हटले की संविधान प्रत्येक विद्यार्थ्यांने वाचले पाहिजे संविधान जाणून घेणे प्रत्यकाचे कर्तव्य आहे भारतीय संविधान निर्मिती कार्य होऊन आज 72 वर्षे झाली तरीही जनतेमध्ये संविधाना बद्दल जाणीव आणि जागृती नाही  ही जाणीव जागृती होणे गरजेचे आहे सोबतच संविधानात कोणत्या तरतुदी आहे आपले अधिकार व कर्तव्य या संदर्भात आढावा घेऊन संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले.
प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा स्मिता देशमुख व प्रा वैशाली सोनकुसरे होते कार्यक्रमा च्या यशस्वीते साठी कु रश्मी परशराम ,प्रार्थना इंगोले ,कल्याणी कुडमते, रोहन गायकवाड,रोशन पारधी यांनी परिश्रम घेतले

संविधानिक नैतिकता ओंनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रम

पाथ फाऊडेशन व बाबाजी दाते कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्या सयुंक्त विद्यमाने आयोजित संविधानिक नैतिकता ओंनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
विद्यार्थ्यांना भारतीय संविधांतील मुल्ये, तत्वज्ञान व संविधानिक नैतिकतेची ओळख व्हावी. या उद्देशाने पाथ फौंडेशनने यवतमाळ येथील बाबाजी दाते कला व वाणिज्य महविद्यालय यांच्या सोबत मिळून ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन दि १० जुलै ते १७ जुलै २०२१ या काळात केले होते.
ह्या अभ्यासक्रमास संपूर्ण महाराष्ट्रातून ६५५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या अभ्यासक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. विनायक दाते यांनी केले. ह्या उद्धटनाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रिटा दांडेकर मॅडम व बाबाजी दाते कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राध्यापक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना आपल्या हक्कांची आपल्या कर्तव्यांची जाणीव व्हावी जेणेकरून ह्याचा उपयोग ते आपले भविष्य घडवताना करून घेऊ शकतील. ह्याच उद्देश्याने हा अभ्यासक्रम आम्ही आमच्या महाविद्यालयातर्फे राबविला असे अभ्यासक्रमाचे प्रमुख संयोजक डॉ. सचिन जैस्वाल यांनी सांगितले.
या ऑनलाईन सत्रांमध्ये अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सलग आठ दिवस चाललेल्या या अभ्यासक्रमात मार्गदर्शक म्हणून कॉन्स्टिट्यूशन ऍण्ड रेस्पॉन्सिबल सिटीझन च्या संस्थापक भक्ती भावे, पाथ फॉउंडेशन चे संस्थापक ऍड. वैष्णव इंगोले व बोधी रामटेके, नागपूर खंडपीठ येथे वकील ऍड. प्रणव देशमुख, ऍड. दीपक चटप, टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्स येथील पदवीधर ऍड. विक्रांत खरे, श्री. पवनकुमार शिंदे, ऍड. निखिल अडसुळे यांनी संविधानातील विविध पैलूंवर विद्यर्थ्यांना मार्गदर्शन केले.
या अभ्यासक्रमाचे नियोजन बाबाजी दाते कॉलेज चे प्राध्यापक डॉ. सचिन जैस्वाल व पाथ फॉउंडेशन चे ऍड. प्रणव देशमुख व ऍड. वैष्णव इंगोले यांनी केली होते. हा अभ्यासक्रम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी पाथ फॉउंडेशन च्या सभासदांनी आणि बाबाजी दाते कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

‘सावरकरांची हिंदू राष्ट्रवादाची संकल्पना’ यावर Online lecture

दिनांक ५ मे २०२० रोजी बाबाजी दाते महाविद्यालय यवतमाळ येथे राज्यशास्त्र विभागाच्या माध्यमातून ‘विनायक दामोदर सावरकर यांचे राष्ट्रवादासंबंधी विचार’ या विषयावर Online lecture संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्रशांत विघे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, भारतीय महाविद्यालय अमरावती हे होते. प्रमुख उपस्थिती  यांची होती. प्रमुख वक्ते प्राचार्य डॉक्टर धर्मेंद्र तेलगोट यांनी विनायक दामोदर सावरकर यांचा राष्ट्रवादासंबंधीचा विचार  यावर त्यांचे विचार मांडले.
या वेबिनार मध्ये  संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील डॉक्टर सुनील चकवे, डॉक्टर विनायक भटकर, डॉक्टर प्रदीप वाकोडे आशिष काळे,  प्राध्यापक दीपक राऊत,  प्राध्यापक विलास टाले, प्राध्यापक लक्ष्मण शिराळे,  डॉक्टर भगवान गरुडे, प्राध्यापक अमोल बंड  प्राध्यापक  प्रशांत सातपुते प्राध्यापक विकास जुनघरे आदी उपस्थित होते. आभार डॉ.सचिन जयस्वाल, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, दाते कॉलेज, यांनी मानले. या व्याख्यानासाठी 60 विद्यार्थी ऑनलाइन  online सहभागी झाले होते.


दाते कॉलेजमध्ये राज्य शास्त्र विभागातर्फे सामान्य ज्ञान स्पर्धा

महाराष्ट्र दिन व आंतर राष्ट्रीय कामगार दिन याचे औचित्य साधून दि. १-५-२०२० रोजी बाबाजी दाते कला आणि वाणिज्य  महाविद्यालय, राज्यशास्त्र विभागातर्फे राजकीय विषयांवर ऑन लाईन पद्धतीने सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विविध राजकीय विषयांवर २० प्रश्न विचारले होते व त्याची ऑन लाईन उत्तरे द्यावयाची होती.
राज्यशास्त्र विषयाच्या प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी हि स्पर्धा खुली होती. एकूण १७७ स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. अनेक विद्यार्थांनी या स्पर्धेत उत्तम गुण मिळविले. या स्पर्धेत मिळालेल्या गुणांचा तक्ता (pie chart) बाजूला आहे.
हि स्पर्धा प्रा डॉ सचिन जयस्वाल यांनी आयोजित केली होती. सर्व स्पर्धकांचे श्री विनायक दाते, अध्यक्ष, वाणिज्य महाविद्यालय न्यास, श्री सतीश फाटक, ऊपाध्यक्ष, वाणिज्य महाविद्यालय न्यास, सर्व सदस्य वाणिज्य महाविद्यालय न्यास, सौ प्रेरणा पुराणिक, प्राचार्य व सौ माणिक मेहेरे, उपप्राचार्य यांनी अभिनंदन केले.


पंचायत राज व्यवस्था, ग्रामीण विकासाची संजिविनी या विषयावर दाते कॉलेजमध्ये ऑनलाईन चर्चासत्र

दिनांक १८ एप्रिल २०२० रोजी विद्यापीठातील राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे सन्माननीय सदस्य डॉ. सुनील चकवे, मुंगसाजी  महाराज महाविद्यालय दारव्हा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले, त्यांनी  पंचायत राज योजनेची पार्श्वभूमी उदय आणि विकास,  हा विषय घेऊन, ७३ वी  आणि ७४ वी घटनादुरुस्ती  आणि पंचायत राज ही ग्रामीण भागाच्या विकासा करिता संजविनी आहे. या  संपूर्ण विषयावर प्रकाश टाकला, सोबत विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षा आणि अभ्यासक्रम संबंधीची भीती या बाबत सुध्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सरते शेवटी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांचे संपूर्ण समाधान केले, या ऑनलाईन व्याख्याना बाबत विद्यार्थ्यांनी आपले अभिप्राय सुद्धा दिले, वक्त्यांचे आणि विद्यार्थ्यांचे  आभार  डॉ. जयस्वाल यांनी मानले. ह्या ऑनलाईन व्याख्यानाला  48 विद्यार्थी उपस्थित होते.


जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुरक्षा परिषदेची भूमिका महत्वाची - डॉ.प्रशांत विघे

स्थानिक बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे राज्यशास्त्र विभागाच्या माध्यमातून दिनांक १५ एप्रिल २०२० रोजी Online lecture संपन्न झाले, कार्यक्रमाचे अध्यक्ष विनायक दाते, प्रमुख वक्ते डॉ. प्रशांत विघे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, भारतीय महाविद्यालय अमरावती, प्रमुख उपस्थिती प्राचार्य डॉ. धर्मेंद्र तेलगोटे आयोजक डॉ.सचिन जयस्वाल राज्यशास्त्र विभाग प्रमुख उपस्थित होते
कोरोना या जागतिक समस्या मुळे सर्व जगात सोबतच भारतातील शासन-प्रशासन, कार्यालय, शाळा, महाविद्यालय भीतीमुळे बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम पूर्ण व्हावा, यादृष्टीने ऑनलाइन लेक्चर्स (online lecture) सुरू केले आहे. त्यासाठी आज "सुरक्षा परिषदेची भूमिका आणि कार्य" या विषयावर डॉ.प्रशांत विघे यांचे व्याख्यान होते.
डॉ.प्रशांत विघे सुरक्षा परिषदेची रचना, अधिकार, कार्य, पार्श्वभूमी स्पष्ट करून संयुक्त राष्ट्र संघामध्ये स्थायी सदस्य राष्ट्र अमेरिका, ग्रेट ब्रिटन, रशिया, फ्रान्स, चीन कशा पद्धतीने राजकारण करतात, त्याचा परिणाम स्थायी समितीने काम करताना सातत्याने दिसून येतो, हे स्पष्ट करून नवोदित देशांना स्थायी समितीमध्ये सभासदत्व देण्यासंदर्भात कशा पद्धतीने सध्याचं वास्तव आहे या संदर्भामध्ये जी-4 भारत, जपान, जर्मनी, ब्राझिल याना विरोध करण्यासाठी कॉपी गट इटली व इतर देशाचा कशा पद्धतीने राजकारण सुरू आहे या विषयावर उहापोहा करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. शेवटी समारोप करताना म्हणाले, जगामध्ये सुरक्षा परिषदेत राजकारण न आणले तर जागतिक स्तरावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुरक्षा परिषद महत्वाची भूमिका पार पाडू शकते असा विचार मांडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष विनायक दाते, उपस्थिती प्राचार्य धर्मेंद्र तेलगोटे त्यांनीसुद्धा या उपक्रमाला शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. आभार डॉ.सचिन जयस्वाल यांनी मानले. या व्याख्यानासाठी 50 विद्यार्थी ऑनलाइन online सहभागी झाले होते.


राज्यशास्त्र या विषयावर zoom वापरून इ- लेक्चर

राज्यशास्त्र या विषयावर १० एप्रिल २०२० पासून वेळापत्रकानुसार on line lectures चालू झाले आहेत, विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा.

राज्यशास्त्र या विषयावर zoom वापरून इ- लेक्चर

राज्यशास्त्र या विषयावर zoom वापरून इ- लेक्चर दि. ९ एप्रिल २०२० रोजी दुपारी १२ वाजता यशस्वीरीतीने घेण्यात आले. ५५ विद्यार्थी सहभागी झाले. या उपक्रमा बद्दल डॉ. सचिन जयस्वाल यांचे अभिनंदन.

Live Class With Students on 9 April 2020 at 12.00 p.m.

मोबाइल किंवा computer वरील zoom app द्वारे आपण सहभागी यात होऊ शकता. त्यासाठी विद्यार्थ्यांना कळवलेला पास वर्ड वापरावा. करोना मुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून हा उपक्रम दाते कॉलेजमध्ये चालु केलेला आहे. विद्यार्थ्यांनी याचा अवश्य फायदा घ्यावा.


सरप्राइज टेस्टचे आयोजन

स्वतंत्रता दिवसाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट २०१९ रोजी राज्यशास्त्र विभागातर्फे सरप्राइज टेस्टचे आयोजन करण्यात आले. हया माध्यमातून विद्यार्थ्यांचे देशाच्या राजकीय इतिहासाबद्दल,  चळवळीबद्दल, क्रांतिकारक यांचे बद्दल माहिती घेतली. ह्या उपक्रमास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. सहकार्य भक्ती जोशी, निहाल चव्हाण तर मार्गदर्शन विभाग प्रमुख डॉ. सचिन एस.जयस्वाल यांनी केले.


Skill -India कार्यक्रम संपन्न

दिनांक 07/03/20119 रोजी राज्यशास्त्र विभागातर्फे भारत सरकारच्या कौशल विभाग उपक्रमाच्या अंतर्गत कौशल भारत - कुशल भारत हया विषयावर विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती, समुपदेशन आणि प्रशिक्षण करण्याबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली. योजनेचा उद्देश नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी करणे तसेच विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होणे असा होता. ह्या कार्यशाळेला विभागा मार्फत आलेले सुमित चव्हाण, पूजा डहाके, प्रशांत काळे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ सचिन जयस्वाल उपस्थित होते. महाविद्यालयातील सदर कार्यक्रमात ५४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.


Online सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात राज्यशास्त्र अभ्यास मंडल तर्फे on line सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ह्या स्पर्धेत विध्यार्थीनी आपल्या मोबाईल वर on line परीक्षा दिली प्रचंड उत्साहात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला 114 विध्यार्थी उपस्थित होते


"सत्र पध्दतीमध्ये राज्यशास्त्र विषयाचा बदलता अभ्यासक्रम"

स्थानिक बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात “राज्यशास्त्र विषयाच्याबदलत्या अभ्यासक्रम सत्र पद्धती “ या विषयावर विद्यापीठ स्तर्रीय एकदिवसीय कार्यशाळl दिनांक १३/०८/२०१८ ला संपन्न झाली कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे  श्री सतीश फाटक, उपाध्यक्ष वाणिज्य महाविद्यालय न्यास, उद्घाटक श्री न.मा.जोशी, जेष्ट पत्रकार तथा राज्यशात्राचे गाडे अभ्यासक, प्राचार्य प्रेरणा पुराणिक तथा कार्यशाळेचे समन्वयक डॉ.सचिन जयस्वाल उपस्थित होते. सर्वप्रथम बाबाजीच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व मान्यवराचे स्वागत करण्र्यात आले

या कार्यशाळेच्या निमित्ताने स.गा.बा.अमरावती विद्यापीठ अमरावती राज्यशास्त्र अभ्यास मंडळावर निवडून आल्याबद्दल डॉ.सुभाष गवई, डॉ.सुनील चकवे याचा सत्कार करण्यात आला व डॉ.प्रशांत विघे, डॉ कायंदे, डॉ धुर्वे याच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

उद्घाटन भाषणात न.मा.जोशी म्हणाले की अभ्यासक्रम हा बदलणारा असतो त्यामध्ये नवीनता व सर्जनशीलता निर्माणकरणे हे अभ्यासमंडळ चे कार्य असते. अध्यक्षीय भाषणात फाटकसर म्हणाले की तंत्रज्ञानाचा समावेश अभ्यासक्रमात  करून परंपरागत अभ्यास पद्धतीला फाटा देणे गरजेचे आहे. उद्घाटन कार्याक्रमाचे संचालन प्रा.ताराचंद कंठाळे तर आभार प्रा.अमोल राऊत यांनी मानले

प्रथम सत्राचे अध्यक्ष डॉ. तेलगोटे, प्राचाये बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय पारवा तर प्रमुख वक्ते डॉ.सुभाष गवई आणि प्रा.राम बुटले होते डॉ गवई म्हणाले की अभ्याक्रम निवडताना सर्व विद्यार्थ्याना लक्षात घेतले जाते व विद्यार्थ्याना विषयाचे प्राथमिक ज्ञान झाले पाहिजे अशी अपेक्षा असते.

कार्याशाळेच्या प्रथम सत्रातखुली चर्चा घेऊन सहभागी डॉ.प्रतिभा भोरजार, डॉ. बबिता येंवले, डॉ.विभा चौबे, डॉ.जोगदंड डॉ.अजय जाधव इ.नि भाग घेउन अभ्याक्रमा बाबत त्रुटी बाबत मत मांडले

दुसरे सत्रात डॉ सुनील चकवे यांनी खुल्या चर्चेला उत्तर देताना म्हणाले कि राज्यशास्त्र विषयाच्या सर्व प्राध्यापकानि आम्हला सूचना कराव्या त्यानुसार अभ्यास क्रमात शक्य असेल तो बदल करण्याचा अभ्यास मंडळ प्रयत्न करेन असे मत मांडले.

समारोपीय  सत्रात अध्यक्ष डॉ.यावले, डॉ. विनायक भटकर, डॉ.प्रतिभा भोरजार, समन्वयक डॉ.जयस्वाल उपस्थित होते या सर्व मान्यवरानि अभ्यासक्रमा बाबत आपले मत मांडले संचलन डॉ. प्रशांत विघे, डॉ. कायंदे तर आभार डॉ.सचिन जयस्वाल यांनी मानले