यवतमाळ : PM-USHA व RUSA अंतर्गत बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ येथील अर्थशास्त्र विभागाच्या वतीने ‘ वस्तू सेवा कर’ या विषयावर एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन मंगळवार, दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी विनायकजी दाते (अध्यक्ष, वाणिज्य महाविद्यालय न्यास) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश एन. सिंगरू यांनी भुषविले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी जीएसटी मुळे भारतीय अर्थव्यवस्थेत अमुलाग्र बदल झालेले आहे असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ताराचंद कंठाळे तसेच विभाग प्रमुख प्रा. डॉ. सचिन जयस्वाल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रा. अजय राठोड यांनी कार्यक्रमाचे यशस्वी समन्वयक म्हणून आयोजनाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. व यांनी प्रास्ताविकातून परिसंवादामागील भूमिका स्पष्ट केली.
प्रमुख वक्ते बाबाजी दाते कला व वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ येथील प्रा. राहुल शेंद्रे उपस्थित होते. त्यांनी वस्तू व सेवा कर मधील मूलभूत संकल्पना, , विश्लेषण व वस्तू व सेवा कर भारतीय अर्थव्यवस्थेला किती प्रमाणात आज महत्त्वाचे आहे त्यासोबतच राज्य शासन केंद्र शासन स्थानिक स्वराज्य शासन प्रत्येकासाठी हा कर किती उपयोगी ठरत आहे आणि या कराचे वेगवेगळे भाग याची सर्व माहिती अगदी पायाभूत ते अद्यावत सर्व माहिती सरांनी या सत्रामध्ये दिली, व सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांच्या सखोल आणि अनुभवाधिष्ठित मांडणीमुळे उपस्थित प्राध्यापक विद्यार्थी आणि ज्यांना करा विषयी माहिती हवी होती असे नागरिक या सर्वांना यातून दिशा मिळाली.
प्रश्नोत्तर सत्रात सहभागी विद्यार्थ्यांनी वस्तू सेवा करंबाबत शंका उपस्थित केल्या, त्यांचे समाधानकारक निरसन मार्गदर्शकांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अरुण संकटवार व आभार प्रा. अजय राठोड यांनी मानले. प्राध्यापक वृंद, संशोधक विद्यार्थी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. एकूणच हा परिसंवाद वस्तू व सेवा करा विषयी दिशा स्पष्ट करणारा, मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरला.
अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे उद्घाटन
दिनांक 29/09/2025 सोमवार, रोजी वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ ट्रस्ट द्वारा संचालित बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्व मान्यवरांचे आगमन होऊन दीप प्रज्वलन आणि माल्याअर्पण करून अर्थशास्त्र विभागाचे प्रा. अजय राठोड यांनी अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे प्रास्ताविक सादर केले.
प्रमुख मान्यवरांचे व प्रमुख वक्त्याचे शाल व श्रीफळ देऊन सन्मान केले.
वाणिज्य महाविद्यालय ट्रस्ट यवतमाळ चे अध्यक्ष आदरणीय मा. श्री. विनायक दाते यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी अर्थशास्त्र विषयी जागरूकता बाळगावी आणि चालू घटकावर आधारित असणाऱ्या विषयांमध्ये आपण तत्पर राहणे गरजेचे आहे व स्वतःच्या गुणाचा विकास करताना आत्मविश्वास हा सर्वात महत्त्वाचे आहे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आबासाहेब पारवेकर महाविद्यालय अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. गजानन रहाटे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात तरुण आणि बेरोजगारी याविषयी मत स्पष्ट केले तरुणांनी रोजगार किंवा नोकरी घेणाऱ्या ऐवजी नोकरी किंवा रोजगार निर्माण करणारे व्हावे हे आवाहन केले. प्रमुख उपस्थितीत अर्थशास्त्र विभाग समन्वयक डॉ. सचिन जयस्वाल हे होते त्यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र किती महत्त्वाचा विषय आहे हे समजावून सांगत असताना "जिसके पास हे पैसा उसे लोग पूछते है तू है कैसा" अशा ओळीमध्ये थोडक्यात विषयाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ताराचंद कंठाळे यांनी भूषविले. त्यांच्या भाषणामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अर्थशास्त्र विषयी विषयापुरता मर्यादित नसून वास्तविक जीवनामध्ये त्याचे अनुकरण कराव असे मत व्यक्त केले.
यानंतर अभ्यास मंडळामध्ये पदाधिकारी अध्यक्ष म्हणून निकिता मेश्राम उपाध्यक्ष आदित्य काटपेलवार सचिव पूनम दुधे सहसचिव सौजन्य आपतवार कोषाध्यक्ष कृष्णा लोगो सहकोशाध्यक्ष पूनम खरतडे लेखन सजावट खुशी मस्के प्रसिद्धी प्रमुख प्रगती वसाके आणि सदस्य म्हणून तनुजा मेश्राम वैष्णवी कुंमरे, आचल मंडळे, तेजस्विनी चव्हाण संचिता येवले, नीता धैसकर इत्यादी ची निवड झाली. अभ्यास मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागताचा सोहळा पार पडला.
हे कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अर्थशास्त्र विभागाचे प्रा. अरुण सुंकटवार व अर्थशास्त्र अभ्यास मंडळातील विद्यार्थ्यांनी यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा लुगुन आणि पूनम दुधे यांनी केले. आभार प्रदर्शन निकिता मेश्राम हिनी केले.
GOEC विषय माहिती मार्गदर्शन वर्गाचे आयोजन
बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे अर्थशास्त्र विभागा अंतर्गत दि. 11 सप्टेंबर 2025 रोजी B.Sc भाग. 1 सेम 1 व B.COM भाग 1 सेम 1 च्या विद्यार्थ्यांना नविन शैक्षणीक धोरणा वर आधारीत GOEC विषय माहिती मार्गदर्शन वर्गाचे आयोजन प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. यावेळी अर्थशास्र विभागाचे प्रा. अजय राठोड ह्यांनी नविन शैक्षणिक धोरणाची माहिती देवून Generic open elective course विषयाची माहिती समजून सांगण्यात आली. प्रा. अजय राठोड ह्यांनी GOEC च्या अनुषंगाने सिल्याबस स्कीम, टायटल, विषयाचे क्रेडिट, विषयाचे अंतर्गत गुण, प्रोजेक्ट, याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. नवीन शैक्षणिक धोरणानुसार शाखेची मर्यादा न राहता आपल्या शाखे व्यतिरिक्त दुसऱ्या शाखेतून विषय शिकता यावा यासाठी GOEC अंतर्गत वाणिज्य आणि विज्ञान शाखेतून कलाशाखेतला अर्थशास्त्र हा विषय विद्यार्थ्यांनी निवडला त्या संदर्भात विद्यार्थ्यांना आपल्या समस्यांचे चर्चेतून निराकरण केले. यावेळी प्रा. अरुण सुंकटवार यांनी विद्यार्थ्यांना विषयांतर्गत येणाऱ्या विविध कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रश्न उत्तरांचा भाग आयोजित करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विज्ञान विभागाच्या प्रा. गाढवे, प्रा. बोबडे यांचे सहकार्य लाभले व अर्थशास्त्र विषयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शनपर वर्ग
अर्थशास्त्र विभागांतर्गत दिनांक 28/08/2025 रोजी सकाळी 9.00 वाजता IQAC हॉल येथे, आदरणीय प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू यांच्या मार्गदर्शनात, प्राध्यापक अजय राठोड यांनी पावर पॉइंट प्रेझेंटेशन (PPT) च्या माध्यमातून अर्थशास्त्र विषयातील करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शनपर वर्ग घेण्यात आला. यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्यांनी निवडलेल्या अर्थशास्त्र विषयांमध्ये भविष्यामध्ये कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत, यासंबंधी परिपूर्ण मार्गदर्शन अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक अजय राठोड यांनी केले, हा विषय सादर करीत असताना या विषयाचे महत्त्व आणि सोबतच या विषयाच्या असलेल्या सरकारी क्षेत्र तसेच खाजगी क्षेत्र, कॉर्पोरेट क्षेत्र, बँकिंग क्षेत्र यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत, याची परिपूर्ण माहिती देण्यात आली. शासकीय स्तरावरच्या असणाऱ्या महत्त्वाच्या परीक्षा पैकी भारतीय आर्थिक सेवा (IES) या महत्त्वाच्या परीक्षेची सुद्धा माहिती विशेष विश्लेषण स्वरूपामध्ये देण्यात आली, सोबतच रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या संधी अर्थशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना कशाप्रकारे उपलब्ध असतात याची सुद्धा सविस्तर माहिती देण्यात आली. सोबतच वित्तीय संस्थेमध्ये विशेष करून भारतामध्ये असणाऱ्या विविध संशोधनाच्या संस्था यामध्ये कशा पद्धतीच्या संधी उपलब्ध आहेत, याची सविस्तर माहिती देण्यात आली. या मार्गदर्शन वर्गाला बीए भाग I बीए भाग II, बीए भाग III च्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शविला होता. हा वर्ग यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी अर्थशास्त्र विभागाचे विद्यार्थी आणि प्राध्यापक अरुण सुंकटवार सर यांचे सहकार्य लाभले.
प्रजासत्ताक दिन विशेषांकाचे विमोचन
बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील अर्थशास्त्र विभागाच्या वतीने शैक्षणिक सत्र २०२०-२१ च्या विद्यापीठ परीक्षेत महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयात सर्वाधिक गुण प्राप्त गुणवंत विद्यार्थी कानल झोपाटे यांचे हस्ते २६ जानेवारी २०२२ रोजी प्रजासत्ताक दिन विशेषांक या भिंतीपत्रकाचे विमोचन करण्यात आले. या प्रसंगी इंडियन नेव्हीत नियुक्त माजी विद्यार्थी तथा एन.सी.सी केडेट अवधूत चव्हाण, माजी विद्यार्थी आरती गोरे, दिनेश कुळसंगे, संकेत ठाकरे, ऋषीकेश राऊत, गौरव बाबरे, गोविंद रिंगणे आणि संपादक मंडळातील विद्यार्थी उपस्थित होते. विभाग प्रमुख प्रा.विनोद तलांडे यांनी या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.