बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ 

Babaji Datey Kala & Vanijya Mahavidyalaya, Yavatmal

(वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ ट्रस्ट रजि. क्र. ई-३२ द्वारा संचालित)

NAAC Accredited B++ Grade with CGPA 2.82

इतिहास विभाग – मध्ययुगीन भारतातील अवतरणे आणि इतिहास लेखन यावर व्याख्यान

मध्ययुगीन भारतातील अवतरणे आणि इतिहास लेखन, या विषयांवर नानकीबाई वाधवाणी महाविद्यालय यवतमाळ येथील इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. सिद्धार्थ जाधव सर यांचे ५ एप्रिल २०२४ रोजी व्याख्यान संपन्न झाले. बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ येथे झालेल्या ऐतिहासिक व्याख्यानाला पदवी व पदव्युत्तर इतिहास विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यवतमाळ जिल्ह्यातील उत्खनीत स्थळांमध्ये कोणकोणत्या वस्तू सापडल्या यावर त्यांनी प्रकाश टाकला. शिवाय सुल्तानकालिन घटना व इतिहास पीपीटी प्रेझेन्टेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इतिहासातील संदर्भा सुलभ पद्धतीने समजावून सांगितले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. वर्षा कुळकर्णी मॅडम, विभाग प्रमुख गजानन लांजेवार आणि विद्यार्थी यांनी प्रयत्न केले.  ५ एप्रिलला आज उन्हाळ्याची दाहकता तीव्र असूनही स्वा. सावरकर सभागृहातील विद्यार्थी तल्लीन झाले होते.    गजानन लांजेवार, इतिहास विभाग प्रमुख.

दाते कॉलेज मध्ये “इतिहास काल आज आणि उद्या” या विषयावर व्याख्यान संपन्न

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात दिनांक १५ मार्च २०२४ रोजी इतिहास विभागाच्या वतीने “इतिहास काल आज आणि उद्या” या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.  प्रमुख वक्ते म्हणून प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती अभ्यासक, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते प्रा. डॉ. अशोक राणा उपस्थित होते.
प्रा. डॉ. अशोक राणा यांनी सांस्कृतिक इतिहास मांडताना विदर्भ हा देश होता व त्यांचे पौराणिक महत्त्व विशद करतांना श्रीकृष्ण रुख्मिणी आख्यायिका, विदर्भातील पुरातत्वीय स्थळे, यवतमाळ जिल्ह्याचा इतिहास इ. घटकांवर प्रकाश टाकण्यात आला. शिवाय विदर्भाच्या इतिहासावर लिखाण करणाऱ्या या.मा.काळे, शारदाश्रमाचे संस्थापक यशवंत खुशाल देशपांडे यांच्या संशोधन कार्य आणि हस्तलिखित शोधताना कशा हाल अपेष्टा सोसल्या यावर थोडक्यात प्रकाश टाकण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. वर्षा कुळकर्णी, संगाबा अमरावती विद्यापीठ व्यवस्थापण परिषद सदस्य प्रा. हरीदास धुर्वे उपस्थित होते.

दाते कॉलेज मध्ये शिवस्वराज्य दिन साजरा

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील राष्ट्रीय सेवा योजना व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 06/06/2022 रोजी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त शिवस्वराज्य दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम या होत्या. त्यांनी प्रास्ताविकातून शिवस्वराज्य दिनाची भूमिका स्पष्ट करून विद्यार्थ्यांना शिवरायांचे कार्य सर्वसामान्य जनतेसाठी कसे प्रेरक होते हे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून लाभलेले श्री सुनील भीष्म यांनी विद्यार्थ्यांना इतिहास कालीन प्रसंगाचे स्मरण करून विविध घटना जिवंत केल्या व पुस्तक वाचून ज्ञान वृद्धिंगत करण्याचा संकल्प दिला.
इतिहास विभाग प्रमुख प्रा. गजानन लांजेवार यांनी विद्यार्थ्यांना इतिहास कालीन बाबींचे स्मरण करून देऊन इतिहासातील विविध स्मारके व किल्ले यांचे जतन करून नवीन पिढीला त्यांचा प्राचीन वारसा जपण्याचा संदेश दिला .
शिवस्वराज्य दिनानिमित्त घेण्यात आलेल्या किल्ले बनाओ व शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील स्केच स्पर्धेत बक्षीस प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना शिल देवून गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्पिता खोब्रागडे हिने केले तर आभार प्रार्थना इंगोले हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता साक्षी चव्हाण, रोहन गायकवाड, मनिषा मोकासे, दिशा आडे, माहेश्वरी आत्राम, सृष्टी येडमे, दादाजी किनकर, रश्मी परसराम, निशांत मडावी, प्रज्वल मेश्राम, शितल पोटे, खुशी नंदनवार यांनी परिश्रम घेतले.

दाते कॉलेज मध्ये इतिहास अभ्यास मंडळाचे उद्घाटन

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ येथे दि. 8 जानेवारी, 2022 रोजी इतिहास अभ्यास मंडळाचा उदघाटन समारंभ संपन्न झाला. प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख गजानन लांजेवार यांनी केले. अभ्यास मंडळाचे उद्घाटन करतांना श्री विनायक दाते, अध्यक्ष, वाणिज्य महाविद्यालय न्यास यांनी सामाजिक जीवनात इतिहासाचे महत्व विषद केले. प्रमुख अतिथी शिवशक्ती महाविद्यालय बाभुळगांव येथील प्रा. डॉ. चंद्रकांत सरदार हांनी देशाचा व राज्याचा इतिहास ज्याप्रमाणे महत्त्वाचा आहे त्याचप्रमाणे स्थानिक इतिहासही महत्त्वाचा आहे हे सांगितले. राजकीय इतिहासाचा अभ्यास होतो तसा सामाजिक इतिहासाचा अभ्यास होणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगतले. महाविद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. विवेक देशमुख यांनी विद्यार्थ्यांना यवतमाळ परिसराच्या इतिहासाचा अभ्यास करण्याचे आवाहन केले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वर्षा कुळकर्णी यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात इतिहास अभ्यास मंडळाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभ्यास मंडळाचे अध्यक्ष दादाजी कीनकर यांनी केले.  आभार कु. पायल कोवे हिने केले. इतिहास विषयाचे पदवी व पदव्युत्तर वर्गातील अनेक विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते.

"पदव्युत्तर इतिहास अभ्यास मंडळाची" स्थापना

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे, "पदव्युत्तर इतिहास अभ्यास मंडळाची" स्थापना दिनांक १०/१०/२०१९ रोजी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री विनायक दाते (बाबाजी दाते महाविद्यालयाचे अध्यक्ष) उपस्थित होते. उद्घघाटक म्हणून  डॉ. तातेड मॅडम (इतिहास विभाग प्रमुख,  बापूजी  अणे महिला महाविद्यालय यवतमाळ) तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ सुषमा दाते, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. मेहेरे, प्रा. श्री विवेक  देशमुख, प्रा. तलांडे व   पदव्युत्तर इतिहास विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष उपस्थितांना मार्गदर्शन करीत असताना म्हणाले,  आपण  स्थानिक इतिहासाला महत्त्व दिले पाहिजे. आपण यवतमाळ  शहराचा इतिहास जाणून घेतला पाहिजे. तसेच  ऐतिहासिक स्थळांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांचा इतिहास जाणून घ्यावा. कार्यक्रमाचे उद्घाघाटक उद्घाघाटनिय मार्गदर्शनात म्हटले होते की, इतिहासाचे विश्लेषण, पुनर्मूल्यांकन आणि पुनर्लेखन करावे.  इतिहासाचे अभ्यासकांनी समोर  येऊन जबाबदारी स्वीकारावी असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. किशोर अगुवार तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. मोनिका बुरबुरे व विद्या जाधव यांनी केले. उपस्थितांचे आभार शुभम गाते यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. जुमळे, प्रा. राऊत मॅडम, प्रा.  लांजेवार सर आणि विध्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.