बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ 

Babaji Datey Kala & Vanijya Mahavidyalaya, Yavatmal

(वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ ट्रस्ट रजि. क्र. ई-३२ द्वारा संचालित )

गृहअर्थशात्र विभाग – दाते कॉलेज मध्ये गृह अर्थशास्त्र विभागाचा चहा पानाचा कार्यक्रम

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील गृह अर्थशास्त्र विभागाच्या वतीने दि. २०/०४/२०२२ रोजी  चहा पानाचे आयोजन करण्यात आले.
बी.ए भाग ३ सेमीस्टर ६ च्या सत्र कार्यांतर्गत व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शन व विकास ह्या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. कल्पना देशमुख यांनी विद्यार्थ्यांना  व्यक्तिमत्व विकासासाठी अशा कार्यक्रमाची काय भुमिका असते हे सांगितले. गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वैशाली मेश्राम यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाचा उद्देश सांगितला.
सदर कार्यक्रमामध्ये सर्व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांशी हितगुज केले व चहापानाचा आनंद घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता बी.ए. भाग ३ च्या विद्यार्थीनींनी परिश्रम घेतले.

कमवा आणि शिका या योजने अंतर्गत दाते कॉलेज मध्ये आनंद मेळावा

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ, येथे गृहअर्थशास्त्र विभागातर्फे नव वर्षाचे स्वागत म्हणून दिनांक १/०१/२०२२ रोजी गृहअर्थशास्त्र विभागातर्फे कमवा व शिका या योजने अंतर्गत प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
आनंद मेळाव्यामध्ये विविध खाद्यपदार्थ आणि वस्तूंची विक्री करण्यात आली.  विद्यार्थिनींनी बनविलेले पदार्थ कसे पौष्टिक आहेत हे विभाग प्रमुख डॉ.वैशाली मेश्राम यांनी पटवून दिले. विद्यार्थिनींनी शिक्षणातून स्वतःच्या कलागुणांद्वारे कशी प्रगती करता येईल हे सविस्तर सांगून आनंद मेळाव्याची सुरुवात करण्यात आली. मेळाव्याचे उदघाटन प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी आणि प्रा. डॉ. विवेक देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. एकूण 15 stalls लावण्यात आले होते.  विद्यार्थिनी आणि प्राध्यापकानी विविध पदार्थांचा आस्वाद घेतला. विद्यार्थिनींनी बनविलेल्या विविध वस्तू विकत घेवून विद्यार्थिनींना उत्तेजन देण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता खुशी नंदनवार, प्रार्थना इंगोले, रश्मी परसरल, साक्षी चव्हाण, दिव्या डोमे, दिक्षा आडे, ह्यांनी परिश्रम घेतले.

दाते कॉलेजच्या विद्यार्थिनींची वर्धा येथे शैक्षणिक सहल

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ च्या गृहअर्थशास्त्र विभागा तर्फे  एक दिवसीय शैक्षणिक सहलीचे आयोजन वर्धा येथे  दि. २४/१२/२०२१ रोजी करण्यात आले.
शैक्षणिक प्रकल्प भेटी अंतर्गत मगध संग्रालय येथे वस्त्रउदयोगाला भेट देण्यात आली. गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.वैशाली मेश्राम यांनी वस्त्र कसे तयार होते, तसेच प्रिंटिंग व रंगाई कशी केली जाते यांची माहिती दिली. तेथील अश्विनी मॅडम यांनी प्रात्याक्षिक दाखविले. त्यानंतर ग्रामविज्ञान केंद्राला भेट देण्यात आली. तेथील प्रमुख श्री आशिष यांनी ग्रामउदयोग व नैसर्गिक रित्या खत आणि फवारणीसाठी वापरल्या जाणाऱ्या कीटक नाशकांची  निर्मिती प्रक्रिया समजाऊन सांगितली.
कागद निर्मिती, रंग निर्मिती व फेकलेले कापड व कागद यापासून नवीन कागद व पुठ्ठा निर्मितीचे प्रशिक्षण विद्यार्थिनींना देण्यात आले. विद्यार्थिनी मध्ये दयाभाव व सेवावृत्ती निर्माण होण्यासाठी करुणाश्रम येथे भेट देण्यात आली. जखमी वन्यप्राणी दाखविण्यात आले व त्यांचा इलाज झाल्यानंतर त्यांना कशा प्रकारे जंगलात सोडून दिल्या जाते हे तेथील मेघा ताई यांनी समजावून सांगितले.
प्रा. डॉ वैशाली मेश्राम मॅडम व प्रा.सारिका नंदे ह्यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देऊन शैक्षणीक सहलीचे यशस्वी आयोजन केले. या सहली करिता नेहा पवार, रश्मी परसराम, साक्षी चव्हाण, प्रार्थना इंगोले, दिशा आडे, खुशी नंदनवार, दिव्या डोमे,  पूजा डंभारे, यांनी सहकार्य केले.

दाते कॉलेज मधे एक दिवसीय पुष्परचना कार्यशाळेचे आयोजन

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे १० डिसेंबर २०२१ रोजी एक दिवसीय पुष्परचना कार्यशाळेचे आयोजन गृह अर्थशास्त्र व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमान करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी होत्या. अध्यक्षीय भाषणात सौन्दर्य निर्मितीसाठी पुष्परचना कशी महत्वाची आहे यावर प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.  गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी महाविद्यालयात कार्यक्रमासाठी बुके आणि हार लागतात त्यावर विद्यार्थ्यांनी बनविलेले बुके वापरून वर्षभराचा खर्च कसा वाचवता येईल, तसेच टाकावू सामानांपासून सुंदर पुष्परचना कशा तयार करता येतील हे प्रशिक्षणाद्वारे शिकविले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कनिष्ठ महाविद्यालय गृहअर्थशास्त्रच्या प्रा. सारिका नंदे उपस्थित होत्या.  कु. प्रणाली अगलधरे यांनी पुष्परचना आणि बुके विकून स्वयंरोजगार कसा करता येईल याचे सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे आयोजक व मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे सह कार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांनी परिश्रम घेतले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी रश्मी परसराम, दिव्या भगत, साक्षी चव्हाण, कोमल काळे, स्नेहल किनाके यांनी परिश्रम घेतले.

अभ्यास मंडळ अंतर्गत उदघाटन व व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमाचे आयोजन...

३ डिसेंबर २०२१ रोजी स्थानिक बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ येथे गृहअर्थशास्त्र विभागाच्या वतीने गृहअर्थशास्त्र अभ्यासमंडळाची स्थापना, उदघाटन आणि व्यक्तिमत्व विकास उद्बोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
स्थानिक बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयमध्ये शैक्षणिक दृष्टीकोनातून वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते ज्या मधून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले जाते. व्यक्तिमत्व विकासासाठी कोणते कला गुण अंगी असावे तसेच कलागुण जोपासण्यासाठी काय प्रयत्न करावे यावर कार्यक्रमाचे उद्घाटक तसेच मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आयोजन तथा गृहशास्त्रविभाग प्रमुख डॉ. वैशाली मेश्राम यांनी अभ्यासमंडळाची आवश्यकता आणि अभ्यासमंडळाची उद्दिष्ट्ये सांगितली तसेच व्यक्तिमत्व विकास करताना प्रामुख्याने कोणत्या बाबींकडे लक्ष द्यावे ह्या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले
गृहअर्थशास्त्र अभ्यासमंडळामध्ये अध्यक्ष दिव्या भगत, उपाध्यक्ष स्नेहल किन्नांके, सचिव साक्षी चव्हाण, कोषाध्यक्ष कोमल काळे आणि 10 मुलींची सदस्या  म्हणून निवड करून बॅनरचे रीतसर उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रश्मी परसराम हिने तसेच आभारप्रदर्शन देवयानी बरडे हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता खुशी नंदनवार, लतीका लुटे, पूजा डंभारे व अंकिता वांडरे आदींनी परिश्रम घेतले आहे

महिलाची दिशा आणि दशा

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य माहाविद्यालय गृह अर्थशास्त्र विभाग यांच्या माध्यमातुन महिलाची दिशा आणि दशा या विषयावर  बी. ए. भाग एक च्या विद्यार्थीनीसाठी डॉ. कल्पना कोरडे, शिवशक्ती कॉलेज बाभुळगाव यांचे मागादर्शन पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ कोरडे यांनी अत्याचाराला प्रतिबंध कसा करावा. गरज पडल्यास दामिनी पथकाची कशी मदत घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले.  मित्र असावा परन्तु मित्राचा आई वडिलां सोबत परिचय करून द्यावा असे त्यांनी सांगितले. मित्रांना गैरफायदा घेऊ देऊ नये. नोकरीच्या मागे न लागता स्वंयरोजगार कसा करावा यासाठी सरकारी योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाला प्रभारी प्राचार्य प्रा.पुराणिक  अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या.
आचार्य पदवी प्राप्त केल्याबद्दल डॉ .कल्पना कोरडे  आणि डॉ. सरिता देशमुख यांचा  गृह अर्थशास्त्र विभागातर्फे  प्राचार्य प्रा.पुराणिक यांनी पुष्पगुच्छ आणि भेट देऊन सत्कार केला. या कार्यक्रमाला प्रा. प्रणिता थुल तसेच डॉ सरिता देशमुख या उपस्थित होत्या.

“आरोग्य आणि किशोर अवस्थेतील विविध समस्या”

दिनांक 26 नोव्हेंबर २०१८ रोजी गृहअर्थशात्र विभागा तर्फे माध्यामिक शाळेतील विद्यार्थिनींसाठी “आरोग्य आणि किशोर अवस्थेतील विविध समस्या” या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. सौ. विजया दाते ह्यांनी मागदर्शन केले. त्यांनी सांगितले की स्त्री ही अबला नाही. सरस्वतीदेवी, दुर्गामाता, लक्ष्मीदेवी इत्यादी उदाहरणे देऊन स्त्री पूर्णपणे सक्षम आहे हे पटवून दिले. डॉ विजया दाते यांनी विद्यार्थिनींना त्यांच्या पौंगडावस्थेत होणाऱ्या शारीरिक व मानसिक बदलाची माहिती सांगितली. Good touch व Bad touch यामधील फरक सांगितला व Bad touch ला विरोध करायला शिकविले. या वयात हार्मोन्स मधील होणारे बदलाची माहिती सांगितली. विद्यार्थिनींना संपूर्ण माहिती खूपच उपयुक्त वाटली.
अध्यक्षस्थानी विभाग प्रमुख व प्रभारी प्राचार्य प्रेरणा पुराणिक, संस्थेच्या विश्वस्त सौ. सुषमा दाते उपस्थित होत्या.