बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ 

Babaji Datey Kala & Vanijya Mahavidyalaya, Yavatmal

(वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ ट्रस्ट रजि. क्र. ई-३२ द्वारा संचालित)

NAAC Accredited B++ Grade with CGPA 2.82

भूगोल विभाग – “Making of Digital Graph” कार्यशाळा आयोजित

भूगोल विभागाने आयोजित केलेल्या "Making of Digital Graph" कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा प्रतिसात
दि. 09 व 25/09/2025 रोजी भूगोल विभागाने प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू यांच्या मार्गदर्शनात प्रा. यशवंत राठोड व प्रा. वैभव किनाके यांनी "Making of Digital Graph" या विषयावर कार्यशाळा आयोजित केली. NEP-2020 च्या धोरणानुसार बी. ए. भाग I सेम I च्या भूगोल विषयाच्या अभ्यासक्रमात प्रात्यक्षिक कार्य अंतर्गत Digital Graph या घटकाचा समावेश करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक कार्य Digital स्वरूपात तयार करण्यासाठी दोन सत्रात कार्यशाळा आयोजित करण्यात आली. पहिल्या सत्रात प्रा. वैभव किनाके यांनी Digital Graph म्हणजे काय, Digital स्वरूपात ते कसे तयार कराता येईल, त्याचे नियम, Graph Maker  मोबाईल अँप आणि संगणकाचा उपयोग कसा होतो, कमी वेळात Graph कसा तयार करता येईल. या विषयी सविस्तर माहिती दिली. प्रा. यशवंत राठोड यांनी Digital Graph व पारंपरिक पद्धतीने काढलेले Graph या मधील फरक, पारंपरिक पद्धतीने काढलेल्या Graph मधील दोष, प्रमाण कसे निवडावे, आणि विविध क्षेत्रात Digital Graph चा वाढता उपयोग या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत विदयार्थ्यांनी प्रत्येक्ष Digital Graph काढले, आणि ऑनलाईन पद्धतीने ते सादर केले. अशा प्रकारच्या उपक्रमा मुळे विद्यार्थी प्रात्यक्षिक कार्यात सहभाग वाढेल, तसेच त्यांची अध्यनात रुची निर्माण होईल. आणि भूगोल विषयातील प्रात्यक्षिक कार्यात आवड निर्माण होईल. कार्यशाळेला बी. ए. भाग I सेम I च्या विद्यार्थ्यांनी कृतियुक्त सहभाग दिला.

GOEC - भूगोल अभ्यास मंडळाचे उदघाट्न

दि.16.09.2025 रोजी भूगोल विभागाने जागतिक ओझोन दिन व भूगोल अभ्यास मंडळ उदघाट्न कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाचे उदघाट्न मा. श्री. महेंद्र गुल्हाने समाजशास्त्रज्ञ् (स्वच्छ भारत मिशन) यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू उपस्थित होते. या प्रसंगी भूगोल विभागाच्या डॉ.शैलजा माथने, प्रा.यशवंत राठोड, प्रा.दिपक हाडके प्रा.वैभव किनाके उपस्थित होते.
मंडळाच्या उदघाटन प्रसंगी मा.श्री. महेंद्र गुल्हाने यांनी विद्यार्थ्यांना जागतिक ओझोन दिना निमित्ताने पर्यावरण आणि स्वछता यांचे आपल्या दैनंदिन जीवनातील महत्व, तसेच पाणी व घन कचरा व्यवस्थापन, पाण्याचा योग्य वापर तसेच जमिनीत पाण्याची पातळी वाढावी म्हणून प्रयासवन प्रकल्पा मार्फत केलेले वृक्षारोपण कामाची सविस्तर माहिती दिली, व प्रयासवन प्रकल्पात विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. अशा प्रकारच्या उपक्रमामुळेच ओझोन वायू सारखी समस्या सोडता येईल. तसेच ओला व सुखा कचरा यांचे योग्य व्यवस्थापन नियोजन करून आपल्या वैयक्तिक स्वछता व आरोग्य विषयक काळजी घेणे आणि पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी आपण स्वतः घ्यावी, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना प्रा. यशवंत राठोड यांनी भूगोल अभ्यास मंडळाचा उद्देश व भूगोल विभागाकडून राबविले जाणारे विविध उपक्रम याविषयी सविस्तर माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू यांनी अभ्यास मंडळाच्या सदस्यांचचे कर्तव्य व जबाबदारी तसेच वर्षभर विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांनी स्वतः व्यक्तिमत्वचा विकास करावा असे आवाहन केले. तसेच जागतिक ओझोन दिनानिमित्त ओझोन वायूचे वातावरणातील महत्व व त्याचा ऱ्हास झाल्यास मानवावर होणारे परिणाम या विषयी आपले विचार व्यक्त केले. प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते अभ्यास मंडळाच्या सर्व सदस्यांना भेट वस्तू देऊन, त्यांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओम ठाकरे व आभार प्रदर्शन दामिनी बुटले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भूगोल विभागाचे प्रा. दिपक हाडके, प्रा. वैभव किनाके व भूगोल विषयाचे सर्व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.

"Geology and Geography Relation" या विषयावर मार्गदर्शन

दि. 08.09.2025 रोजी प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू यांच्या मार्गदर्शनात भूगोल विभागाने प्रा.यशवंत राठोड यांनी GOEC "Geology and Geography Ralation" या विषयावर विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. 2020 NEP च्या नवीन शैक्षणिक धोरणा नुसार कला शाखेतील Geography व इतर विषय निवडणाऱ्या विदयार्थ्यांनी Science and Technology च्या Basket मधून GOEC साठी Geology विषयाची निवड करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भूगोल विभागाकडून मार्गदर्शन करण्यात आले. Geology या विषया मध्ये प्रत्येकी 50 मार्कांचे दोन पेपर असून,  Paper-I "Introduction of Geology" Paper-II "Physical Geology" या दोन पेपर चा अभ्यास मराठी भाषेतून करावयाचा असून, DSC Geography व इतर विषय निवडणाऱ्या विदयार्थ्यांना Geology विषयाचा Geograpgy विषयाशी असणारा संबंध, आणि भविष्यात स्पर्धा परीक्षा व इतर क्षेत्रातील उपयोग या विषयी प्रा.यशवंत राठोड यांनी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. वैभव किनाके व बी.ए.भाग I  सेम I मधील विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

गूगल अर्थ - उपयोग व फायदे

भूगोल विभागा कडून "गूगल अर्थ - उपयोग व फायदे" या विषयावर विद्यार्थ्यांशी सवांद दिनांक : 02/09/2025 रोजी भूगोल विभागाने प्राचार्य डॉ.राजेश सिंगरू यांच्या मार्गदशनात प्रा. यशवंत प्र. राठोड व प्रा. वैभव किनाके यांनी "गूगल अर्थ - उपयोग व फायदे" या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद केला, गूगल अर्थ चा याचा उपयोग कशा साठी केल्या जातो आणि भूगोल विषयातील अक्षवृत्त व रेखावृत्त या काल्पनिक संकल्पना प्रत्येक्षात समजून घेण्यासाठी याचा उपयोग कसा होतो. याचे प्रात्यक्षिक करून माहिती दिली. पृथ्वी वरील एखाद्या ठिकाणाचे स्थान निश्चित करण्यासाठी गूगल अर्थ या मोबाईल अँपचा उपयोग करून ते कसे निश्चित करता येते याची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी गुगल अर्थ अँप डाउनलोड करून कृतीयुक्त पद्धतीने सहभाग दिला. या शिक्षक व विद्यार्थी कृतियुक्त संवादातून गूगल अर्थ अँप चा उपयोग व फायदे समजण्यासाठी प्रा. यशवंत प्र. राठोड व प्रा. वैभव किनाके यांचे मार्गदर्शन आणि बी. ए. भाग १, सत्र १ मधील विद्यार्थ्यांचा कृतियुक्त सक्रिय सहभाग महत्त्वाचा ठरला.

GOEC या विषयावर मार्गदर्शन

दिनांक :19/08/2025 रोजी भूगोल विभागा तर्फे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू यांच्या मार्गदर्शनात प्रा. डॉ. सचिन तेलखडे यांनी GOEC या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी भूगोल विषयाच्या विदर्थ्यांना GOEC म्हणजे काय? व त्यासाठी कोणत्या विषयाची निवड करावी यासाठी उपलब्ध पर्याय कोणते, आणि भूगोल विषयाच्या विद्यार्थ्यांना GOEC साठी Geology आणि Environmental Studies  हे पर्याय Science & Technology मध्ये उपलब्ध असून, या पैकी Geology हा विषय भूगोल विषयाशी बऱ्याच प्रमाणात संबंधित आहे. त्यामुळे आपण पर्याय म्हणून Geology या विषयाची निवड करावी, या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन प्रा. डॉ. सचिन तेलखडे यांनी केले. आणि भूगोल विषया च्या सर्व विद्यार्थ्यांनी GOEC साठी Geology या विषयाची निवड करण्याचे आवाहन केले. या प्रसंगी मराठी विभागातील प्रा. अनिरुद्ध नरखेडकर भूगोल विभागातून प्रा. यशवंत राठोड. प्रा. दिपक हाडके, प्रा. वैभव किनाके व बी. ए. भूगोल चे विद्यार्थी उपस्थित होते.

"AI आणि भूगोल" विषयावरील वसुंधरा भिंतीपत्रकाचे उदघाट्न

15 ऑगस्ट 2025 रोजी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भूगोल विभागाने AI आणि भूगोल या विषयावर आधारित वसुंधरा भिंतीपत्रकाचे उदघाट्न केले. या प्रसंगी उदघाट्क म्हणून महाविदयालयचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरु, प्रमुख अतिथी वाणिज्य महाविद्यालय ट्रस्ट चे अध्यक्ष मा .श्री .विनायक दाते, मा. सौ. सुषमा दाते, मा. श्री. विजय कासलीकर राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. सचिन जयस्वाल उपस्थित होते.
आजचे युग तंत्रज्ञानाचे असून भविष्यात AI हा मानवी जीवनाचा मूलभूत भाग असणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला हे तंत्रज्ञान आत्मसाद करावेच लागेल, ही गरज लक्षात घेता सर्व विषय आता AI च्या माध्यमातून शिकविल्या जाणार आहेत. त्यामुळे भूगोल विषयात भविष्यात अनेक अभ्यासक्रम AI सोबत जोडून Geospatial AI नावाची एक नवीन शाखा उदयास आली असून या क्षेत्रात भूगोल विषयाच्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहे. याचे महत्व ओळखून भूगोल विभागाने भिंतीपत्रका साठी "AI आणि भूगोल" विषयाची निवड केली. यासाठी भूगोल विभागाचे प्रा.यशवंत राठोड प्रा. डॉ.शैलजा माथने, प्रा. दिपक हाडके, प्रा. वैभव किनाके यांनी मार्गदर्शन केले, भिंतीपत्रकाचे लेखन कु.सोनाली ठाकरे चित्रकार ओम ठाकरे, सजावट कु. आदिती कुळसंगे, कु. ख़ुशी शिवणकर, कु. पूनम सिडाम आणि भूगोल अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रणिल कुमार येलवेनवार, उपाध्यक्ष सुरज शिंदे, सचिव ओम ठाकरे, कु.साक्षी धैयस्कर, कु.रजनी आत्राम, कु.दुर्गा मेंडके, कु.पूनम सिडाम, कु. कोमल पेंदोर, कु. अनुराधा भैयसनकर, कृष्णा लगून, गुरुदेव खडसे, आ"AI आणि भूगोल" विषयावरील वसुंधरा भिंतीपत्रकाचे उदघाट्नदित्य काटपिलवार आणि बी. ए. भूगोल चे विध्यार्थी उपस्थित होते.

“भूगोल: करिअर व संधी” विषयावर एक दिवशीय परिसंवाद

दिनांक 21 जुलै 2025 रोजी भूगोल विभागाने ”भूगोल: करिअर व संधी” या विषयावरील एक दिवशीय परिसंवादाचे आयोजन केले. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. डॉ. शैलजा माथने तसेच मार्गदर्शक म्हणून प्रा. यशवंत राठोड व प्रा. दिपक हाडके उपस्थित होते. प्रा. डॉ. शैलजा माथने यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना भूगोल विषयात पी.एच.डी संशोधन करून, भविष्यात पर्यावरण व इतर अनेक क्षेत्रात सल्लागार आणि मार्गदर्शक म्हणून कार्य करता येते. या विषयी माहिती दिली.
प्रा. यशवंत राठोड यांनी पदवी नंतर भूगोल विषयात करिअरच्या विविध संधी आणि उपलब्ध कोर्सेसची सखोल माहिती दिली. त्यांनी PPT सादरीकरणाद्वारे विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्था व विविध विद्यापिठाद्वारे सुरु असणाऱ्या Remote Sensing, Geographical Information System, Geoinformatics या सारख्या क्षेत्रातील पदव्युत्तर आणि पदविका अभ्यासक्रमाविषयी विस्तृत माहिती दिली. तसेच नगररचना, पर्यटन, सर्वेक्षक, नकाशाशास्त्र, हवामानशास्त्र व लोकसंख्याशास्त्र, पर्यावरण सल्लागार, आणि पत्रकारिता या सारख्या विविध क्षेत्रात नोकरीच्या संधी भूगोल विषयाच्या अभ्यासातून मिळवता येईल. याविषयी मार्गदर्शन केले. प्रा. दिपक हाडके यांनी स्पर्धा परीक्षेद्वारे UPSC, MPSC,NET,SET यासारख्या परीक्षेत भूगोल विषय महत्वाचा असून, यामधून शासकीय व खाजगी क्षेत्रात अधिकारी, शिक्षक व प्राध्यापक म्हणून महत्वपूर्ण पदावर निवड होते, याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
या परिसंवादाला बी.ए.भाग 1 व 3 मधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन, परिसंवादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्र संचलन प्रा. यशवंत राठोड व आभार प्रा. दिपक हाडके यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. शैलजा माथने यांनी सहकार्य केले.

दाते कॉलेज मध्ये Group Discussion आणि प्रात्यक्षिकाद्वारे भुगोलाचे प्रशिक्षण

सत्र 2021-22 मधे भूगोल विभागाच्या 10-10 विद्यार्थ्यांचे गृप तयार करण्यात आले. प्रत्येक गृप मधील विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमावर आधारित अनेक भौगोलिक संकल्पना स्पष्ट करणारे विविध चार्ट्स आणि मॉडेल्स तयार केले. तसेच या सर्व विद्यार्थ्यांचे Group Discussion घेण्यात आले.
यामध्ये BA – Sem II, Sem lV, Sem Vl या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अशा उपक्रमामुळे अभ्यासक्रमातील अनेक विषयांची तयारी होते. विद्यार्थी मिळून मिसळून अतिशय उत्साहाने सहभागी होतात. त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो. आणि त्यांच्या संबंधित विषयातील काही अडचणी असतील तर त्या चर्चेतून समजाऊन सांगता येतात.
हा उपक्रम राबविण्या करीता 10 दिवसांचा कालावधी देण्यात आला. आणि दि. 19/5/2022 ते 20(5/2022 या कालावधित Group Discussion घेण्यात आले.

दाते कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे प्रयासवन येथे श्रमदान

भूगोल विभागाने प्रयास सोबत केलेल्या MOU अंतर्गत रविवार दि. 8/5/2022 रोजी सकाळी 6 वाजता भूगोल विभागाचे 52 विद्यार्थी, प्रयासवन येथे श्रमदान मोहीमेत सहभागी झाले. झाडांना आळे करून ठिबक सिंचनाची सुविधा व्यवस्थित कार्यरत आहे, याची खात्री करून घेतली. दोन तास श्रमदान करून सहकार्य केले. गेली चार वर्ष भूगोल विभाग प्रयास सामजिक संघटने सोबत जोडले गेले आहे. सोबत भूगोल विभाग प्रमुख डॉ. कल्पना देशमुख व सहकारी प्राध्यापक प्रकाश जुमनाके सहभागी झाले.

BA IIl SEM VI या वर्गाच्या Field Survey चे आयोजन

विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार शुक्रवार दि. 6/5/2022 रोजी भूगोल विभागाने BA IIl SEM VI या वर्गाच्या Field Survey चे आयोजन केले. 2021-22 या सत्रातील हा सर्वे मातोश्री वृद्धाश्रम गोधनी, यवतमाळ. येथे आयोजित करण्यात आला. या सर्वेक्षणात BA Sem Vl या वर्गाचे 46 विद्यार्थी सहभागी झाले.
या सर्वेक्षणात विद्यार्थ्यांनी सर्व वृद्धांच्या खोल्यांची व बाजूच्या परिसराची स्वच्छता केली. वृद्धाश्रमातील वृद्धांच्या मुलाखती घेऊन, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, अडचणी, त्याची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
सर्व विद्यार्थ्यांनी मिळून वृध्दांना आवश्यक वस्तूंचे वाटप केले. या सर्वेक्षणात संपूर्ण पार्श्वभूमीवर आधारीत अभ्यासपूर्ण अहवाल लेखन करून भूगोल विभागात सादर केला जातो.
विद्यार्थ्यांसोबत भूगोल विभाग प्रमुख डॉ. कल्पना देशमुख आणि सहकारी प्राध्यापक प्रकाश जुमनके सहभागी झाले.

दाते कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे प्रयासवन येथे श्रमदान

रविवार दि. 9/1/2022 रोजी सकाळी भूगोल विभागाच्या विद्यार्थ्यांनी श्रमदानातून 'प्रयास वन ' या प्रकल्पात, झाडांना आळे करणे, गवत काढणे, ड्रीप एरिगेशन ची व्यवस्था नीट कार्यरत होते आहे की नाही हे काम करून परिसर स्वच्छता केली.

विद्यार्थ्यांनी PPT च्या माध्यमाने सेमिनार सादर

3 व 4 जानेवारी 2022 रोजी B.A. Sem V च्या भूगोल विभागाच्या विद्यार्थ्यांनी PPT च्या माध्यमाने सेमिनार सादर केले.

दाते कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे प्रयासवन येथे श्रमदान

रविवार दि.2/1/2022 रोजी सकाळी भूगोल विभागाच्या विद्यार्थ्यांनी प्रयासवन येथे श्रमदान केले. परिसर स्वच्छ केला व रोपे लावण्यात आली.