बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ 

Babaji Datey Kala & Vanijya Mahavidyalaya, Yavatmal

(वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ ट्रस्ट रजि. क्र. ई-३२ द्वारा संचालित )

राष्ट्रीय सेवा योजना – संविधान दिन साजरा

26 नोव्हेंबर 2021 रोजी बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात येथे राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ वर्षा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ वैशाली मेश्राम तर प्रमुख वक्ते डॉ सचिन जयस्वाल होते सर्वप्रथम उद्देशपत्रिकेचे वाचन करण्यात आले प्रमुख वक्त्यांनी आपल्या भाषणात म्हटले की संविधान प्रत्येक विद्यार्थ्यांने वाचले पाहिजे संविधान जाणून घेणे प्रत्यकाचे कर्तव्य आहे भारतीय संविधान निर्मिती कार्य होऊन आज 72 वर्षे झाली तरीही जनतेमध्ये संविधाना बद्दल जाणीव आणि जागृती नाही  ही जाणीव जागृती होणे गरजेचे आहे सोबतच संविधानात कोणत्या तरतुदी आहे आपले अधिकार व कर्तव्य या संदर्भात आढावा घेऊन संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले
प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा स्मिता देशमुख व प्रा वैशाली सोनकुसरे होते कार्यक्रमा च्या यशस्वीते साठी कु रश्मी परशराम ,प्रार्थना इंगोले ,कल्याणी कुडमते, रोहन गायकवाड,रोशन पारधी यांनी परिश्रम घेतले

नागरिकांना रक्तदानाचे आवाहन

महाराष्ट्र शासनाच्या  आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. तेव्हा राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत नागरिकांना रक्तदान करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. महाविद्यालयाच्या वतीने कॉलेज प्रांगणात तसेच बस स्टँड वर दर्शनीय ठिकाणी अशाप्रकारचे  बॅनर लागले आहेत.
डॉ बाबासाहेब आंबेडकर - महापरिनिर्वाण दिन
बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत ६ डिसेंबर २०२०, महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करताना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. ताराचंद कंठाळे

संविधान एक आदर्श आचारसंहिता -प्रा.डॉ.गजानन हेरोळे

दिनांक 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय  राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत संविधान दिवस आभासी पद्धतीने साजरा करण्यात आला. कार्यक्रमात प्रा. डॉ.गजानन हेरोळे व मराठी विभाग प्रमुख कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालय, दर्यापूर हे प्रमुख मार्गदर्शक तर अध्यक्ष कार्यकारी प्राचार्य डॉ प्रदीप दरवरे होते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्षमय इतिहास वाचून प्रेरणा घ्यावी. भारतीय संविधान एक आदर्श आचारसंहिता आहे तिचे पालन होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन डॉ. हेरोळे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. दरवरे म्हणाले की भारत हा बहुधर्मीय देश असून केवळ संविधानाने एका सूत्रात बांधल्या गेला आहे. सुरुवातीला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व संविधान ग्रंथांचे पूजन करून हारार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन  व आभारप्रदर्शन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.ताराचंद कंठाळे  यांनी केले. कार्यक्रमास बहुसंख्य रासेयो स्वयंसेवक उपस्थित होते.

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय शिक्षण दिवस साजरा

दिनांक ११ नोव्हेंबर 2020 रोजी बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय शिक्षण दिवस अर्थात भारताचे प्रथम शिक्षण मंत्री डॉ. मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत  साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रदीप दरवरे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून यवतमाळ येथील सुप्रसिध्द वऱ्हाडी कवी श्री जयंत चावरे उपस्थित होते. डॉ. मौलाना आझाद यांचा देशाच्या विकासात आणि शिक्षण क्षेत्रात मोठा सहभाग असून त्यांनी भारतीय शिक्षण पद्धतीत आमूलाग्र परिवर्तन केले. तसेच त्यांनी विश्व विद्यालय अनुदान आयोग स्थापन करण्यात मोठी कामगिरी बजावली असे प्रतिपादन श्री जयंत चावरे यांनी केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. प्रदीप दरवरे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयम् सेवकांनी डॉ. मौलाना आझाद यांच्या विचारांचा अंगीकार करून सदैव मानवता जोपासण्याचा प्रयत्न करावा असे प्रतिपादन केले. सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक  प्रा डॉ. ताराचंद  कंठाळे यांनी केलें. या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेचे बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

वाचन प्रेरणा दिन - १५ ऑक्टोबर २०२०

आज दिनांक १५ ऑक्टोबर २०२०ला बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती विज्ञानऋषि डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त वाचन प्रेरणा दिनाचा कार्यक्रम आभासी पद्धतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्यकारी प्राचार्य डॉ. प्रदीप दरवरे तर मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ.हरिदास आखरे, मराठी विभाग, श्रीमती कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालय, दर्यापूर होते.
डॉ.कलामांनी भारतीय युवकांमध्ये स्वप्न पेरण्याचे काम करून देशाला महासत्तेकडे नेण्याचा प्रयत्न केला. विज्ञान क्षेत्रात  त्यांनी केलेली प्रगती विस्मयकारक आहे. गरिबीचा सामना करत अनेक उच्च पदे भूषविली परंतु सदैव देशसेवा म्हणजेच विज्ञान सेवा हा मंत्र संपूर्ण जीवनभर अंगिकारला. त्यांची सर्वच पुस्तके ऊर्जा प्रदान करतात आणि नेहमी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करत राहतील. त्यांची जयंती ही सर्वत्र वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी केली जाते. युवकांनी ग्रंथालयांना नित्य भेट द्यावी. आज ग्रंथालये ओस पडत असून पुस्तके टाहो फोडीत आहेत.  वाचन दिनानिमित्त वाचनाचा  ध्यास घेऊन सार्वांनी आपले व्यक्तिमत्त्व उदात्त उज्वल बनवावे असे प्रतिपादन डॉ. आखरे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ दरवरे यांनी आपल्या मनोगतातून स्वयंसेवकांनी मनोरंजना सोबतच ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत. युवक या देशाचे आधारस्तंभ आहेत. त्यांनी डॉ. कलामांच्या जीवनातून काही आदर्श घेऊन वाचन सवय अंगिकारावी असे मनोगत व्यक्त केले. कोणतीही शाखा ही कमी महत्त्वाची असत नाही कारण देशातील सर्वोत्तम डोके हे सर्वात शेवटच्या बाकावर सापडते, असा महत्त्वाचा सल्ला त्यांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांना दिला.
सुरुवातीला डॉ.कलाम, संस्थापक बाबाजी दाते आणि कर्मयोगी गाडगे बाबा यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचलन, प्रास्ताविक, पाहुण्यांचा परिचय  आणि आभार प्रदर्शन कार्यक्रम  अधिकारी प्रा.डॉ. ताराचंद कंठाळे  यांनी मानले. या वाचन प्रेरणा दिनानिमित्त ऑनलाईन कार्यक्रमात सर्व प्राध्यापक वर्ग आणि बहुसंख्य विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.

२ ऑक्टोबर- महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

दिनांक २ ऑक्टोबर २०२० ला राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती चे औचित्य साधून बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय तथा जाजू कॉलेज यांचे संयुक्त विद्यमाने ऑनलाईन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य चांडक तर प्रमुख वक्ते कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. ताराचंद कंठाळे होते.
सुरुवातीला गांधीजी आणि शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा.योगेश पाटील यांनी केले. महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी संपूर्ण आयुष्य वाहून सत्य, अहिंसा या मूल्यांची जोपासना केली. आपल्या हातून घडलेल्या चुकांची कबुली देणारा  एकमेव महात्मा  म्हणजे गांधीजी. लालबहादूर शास्त्री यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या काळात सुचीर्भुत राजकारण केले. तसेच जय जवान जय किसान हा महामंत्र देऊन देशाचा पोशिंदा शेतकरी आणि सीमांचे संरक्षण करणारे जवान यांना मानवंदना दिली. या दोन्ही महापुरुषाचे जीवन आदर्शवत होते. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात त्यांचे आदर्श जोपासण्याचा प्रयत्न करावा असे प्रतिपादन मार्गदर्शक डॉ. ताराचंद कंठाळे यांनी केले. त्यानंतर प्रा.शिंगरवाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी खरा तो एकची धर्म या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

“संवेदना आणि सहवेदना राष्ट्रीय सेवा योजना शिकविते” प्रा. डॉ.कल्पना देशमुख

२४ सप्टेंबर २०२० रोजी स्थानिक बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनाचे औचित्य साधून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सुरुवातीला श्रद्धेय बाबाजी दाते आणि कर्मयोगी गाडगे बाबा यांच्या प्रतिमांचे पूजन करून हारार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्यकारी प्राचार्य डॉ.प्रदीप दरवरे, विशेष उपस्थिती म्हणून वाणिज्य महाविद्यालय न्यासाचे अध्यक्ष श्री विनायक दाते तर प्रमुख मार्गदर्शक भूगोल विभाग प्रमुख तथा विश्वस्त प्रा.डॉ. कल्पना देशमुख होत्या.
२४ सप्टेंबर १९६९ हा संपूर्ण भारतात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हा दिवस सर्वत्र साजरा करण्यात येतो. गाडगे बाबा यांची दशसुत्री लक्षात घेऊन समाजात वावरत असताना संवेदना आणि सहवेदना सदैव जीवंत ठेवणे गरजेचे आहे आणि हे शिकविण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजना व्यासपीठ करते असे प्रतिपादन डॉ.देशमुख यांनी केले. स्वयंसेवकांनी नेहमी सजग राहून देश, आई-वडील आणि समाजाप्रती कृतज्ञता बाळगावी असे मनोगत संस्थाध्यक्ष श्री विनायक दाते यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय सेवा योजना हा महाविद्यालयांचा महत्त्वाचा घटक असून विद्यार्थ्यांनी सेवाभाव जोपासून  राष्ट्रीय आपत्ती, रक्तदान शिबिर,पल्स पोलिओ अशा प्रकारच्या राष्ट्रीय कार्यात सहभागी होत राहावे जेणेकरून उपक्रमशीलता आपणास शिकता येईल, तसेच आपले मन, मन गट आणि मेंदू  विधायक कार्यासाठी वापरावा असे मनोगत कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. दरवरे यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक रासे यो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.ताराचंद कंठाळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ.अमोल राऊत यांनी केले. या कार्यक्रमाला इंग्रजी विभाग प्रमुख तथा विश्वस्त प्रा. डॉ.विवेक देशमुख, सह कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. आशालता आसुटकर,प्रा.डॉ.प्रशांत बागडे,प्रा.दत्तात्रय जोशी,प्रा. डॉ.स्नेहल डहाळे,प्रा. डॉ. मंजुश्री नेव्हल,प्रा.डॉ.सचिन जयस्वाल आणि बहुसंख्य रा सेयों  विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.

पर्यावरण पूरक गणेश विसर्जन

दिनांक १ सप्टेंबर ला अनंत चतुर्दशी निमित्त प्रयास संस्थेच्या वतीने आयोजित पर्यावरण पूरक गणेश विसर्जन प्रयास वनात करण्यात आले. विसर्जना साठी मोठमोठे तळे करण्यात आले होते जेणेकरून मूर्तींची अवहेलना होणार नाही. या स्तुत्य उपक्रमात बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी दिवसभर सेवा दिली तसेच विद्यार्थ्यांना प्रयासचे वतीने प्रमाणपत्र देण्यात आले. डॉ. विजय कावलकर, विजय देशपांडे, प्रशांत बनगीनवार या वेळी प्रामुख्याने उपस्थित होते. हा एक यवतमाळ शहरातील आदर्श उपक्रम असून सर्वत्र कौतुक होत आहे.

व्यक्तिमत्त्व विकास ह्यावर ऑनलाईन वेबिनार

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, अमोलकचंद महाविद्यालय आणि श्रीमती नानकीबाई  वाधवाणी महाविद्यालय यवतमाळ या महाविद्यालयांचे राष्ट्रीय सेवा योजनेचे युनिट आणि  Stentorian Skill Development Academy, Mumbai यांच्या संयुक्त विद्यमाने ' Personality Development ' या विषयावर ९ ऑगस्ट २०२० क्रांती दिनी ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले. या वेबिनारमध्ये वरील तीनही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला. वेबिनारासाठी प्रमुख मार्गदर्शक Stentorian Skill चे प्रमुख श्री महेश सावळे सर हे होते. या वेबिनारच्या आयोजनात प्रा. डॉ. ताराचंद कंठाळे ( रासेयो कार्यक्रम अधिकारी बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय ) प्रा. डॉ. अनंत सूर्यकार ( रासेयो कार्यक्रम अधिकारी अमोलकचंद महाविद्यालय ) प्रा. डॉ. संजय राचलवार ( रासेयों कार्यक्रम अधिकारी श्रीमती नानकिबाई वाधवाणी महाविद्यालय ) यांचा होता. कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांना बौद्धिक खाद्य मिळावे या उदात्त हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन आहे असे प्रा. कंठाळे यांनी सांगितले.
श्री महेश सावळे सर यांनी Personality Development या विषयावर विद्यार्थ्यांना  सुरेख मार्गदर्शन केले. या जगात जीवन जगत असताना स्वतःचे व्यक्तिमत्त्व हे नेहमी उंचावण्याचा प्रयत्न करावा आणि वक्तृत्व शैली मध्ये बदल करून इतरांना आपल्याकडे आकर्षित करता येऊ शकते, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. प्रा. डॉ. संजय राचलवार यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले आणि प्रा. डॉ. अनंत सूर्यकार यांनी सर्वांचे आभार मानले.

स्वातंत्र्यवीर सावरकर प्रायोपवेषण दिन संपन्न

दिनांक २६ फेब्रुवारी २०२० ला महान देशभक्त, स्वातंत्र्य सेनानी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी अर्थात प्रायोपवेषण दिवस बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ.ताराचंद कंठाळे, कार्यक्रम अधिकारी तर प्रमुख मार्गदर्शक प्रा.अमोल राऊत होते. तसेच प्रमुख  उपस्थिती प्रा.सचिन तेलखडे होते.

हा देश अनेक समाजसेवक, समाजसुधारक, देशभक्त आणि क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांचे बलिदान केल्यामुळेच  स्वतंत्र झाला आहे. त्यापैकी सावरकर हे क्रांतिकारकांचे मुकुटमणी होते असे प्रतिपादन प्रा.राऊत यांनी केले. दोन वेळा जन्मठेप मिळणारा हा देशभक्त जगात विरळाच असावा हा विचार त्यांनी मांडला. अध्यक्ष डॉ. कंठाळे यांनी अध्यक्षीय मनोगतात सांगितले की देशाच्या स्वातंत्र्यासाठी सावरकर घराण्याच्या तीन पिढ्या अर्थात विनायक सावरकर, त्यांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर तसेच लहान बंधू डॉ.नारायण सावरकर यांनी मातृभूमीच्या स्वातंत्र्य यज्ञात आपल्या प्राणाच्या समिधा अर्पण केल्या आहेत. ते एक उच्च दर्जाचे कवी, लेखक, वक्ता तसेच मराठीचे उत्तम जाणकार होते. त्यांनी “कमला”, “माझी जन्मठेप”, ”१८५७ चे स्वातंत्र्य समर”, इत्यादी साहित्य लिहून अनेक अजरामर देशभक्ती पर गीते रचलीत. सुरुवातीला त्यांच्या.प्रतिमेला हारार्पण करून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. शेवटी डॉ. कंठाळे यांनी “ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला” या गीताने  समारोप केला.

गाडगे बाबा जयंती साजरी

२४-२-२०२० रोजी स्थानिक बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय येथे स्वच्छता तपस्वी विदर्भाचे दीपस्तंभ, विदर्भ केसरी, वैराग्य मूर्ती संत गाडगे बाबा यांची जयंती  राष्ट्रीय सेवा योजना विभागा मार्फत साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपप्राचार्य डॉ. माणिक मेहरे तर प्रमुख वक्ता प्रा. डॉ.राजेश आदे, मराठी विभा ग प्रमुख, इंदिरा महाविद्यालय, कळंब उपस्थित होते.

संत गाडगे बाबांचे संपूर्ण आयुष्य हे स्वच्छता व समाज सुधारणेसाठी खर्ची झाले. समाजातील अनेक कुप्रथांवर त्यांनी प्रबोधनाच्या व कीर्तनाच्या माध्यमातून आसूड ओढलेत. तसेच रंजल्या  गांजल्या साठी धर्मशाळा, दवाखाने, गोरक्षण बांधले. परंतु आपल्या घराण्यातील एकही व्यक्ती  त्या संस्थांवर नियुक्त केला नाही हे फक्त असामान्य माणसेच करू शकतात, असे प्रतिपादन  डॉ. आदे यांनी केले. अध्यक्ष डॉ.मेहरे यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या चरित्रातून चांगल्या गोष्टींचे अनुकरण करावे व केवळ  स्वतःसाठी न  जगता समाजासाठी जगता आले पाहिजे असा मोलाचा सल्ला दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.ताराचंद कंठाळे यांनी, संचलन हर्षदा चव्हाण तर आभार कु. पायघडे हिने मानले. सुरुवातीला दिप्रजवलान करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

महात्मा गांधी पुणयतिथी

30 जानेवारी २०२० रोजी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत महात्मा गांधी पुणयतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.अमोल राऊत तर प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. हरिदास  धूर्वें तसेच नगर परिषद येथील श्री पातोडे साहेब उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले. देशाच्या इतिहासात रक्त न सांडता स्वातंत्र्य प्राप्त करून देणारा अवलिया म्हणजे गांधीजी असे विचार डॉ. धूरवे यांनी व्यक्त केले. तसेच महात्मा गांधी हे सत्य अहिंसा पाळणारे उत्तुंग  व्यक्तिमत्व होते असे अध्यक्षीय भाषणात श्री राऊत म्हणाले. या प्रसंगी प्रास्ताविक व संचालन कार्यक्रम अधिकारी डॉ. ताराचंद कंठाळे यांनी तर आभार पायल किनाके यांनी मानले.

 

राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्र उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावते -शिबिराचा समारोप

शिबिराचा समारोप दिनांक ५ जानेवारी २०२० ला दत्तक ग्राम पांढरी येथे संपन्न  झाला. या समारोपीय सत्राच्या अध्यक्ष उपप्राचार्य डॉ.माणिक मेहरे तर प्रमुख उपस्थिती म्हणून वाणिज्य महाविद्यालय न्यासाचे उपाध्यक्ष श्री सतीश फाटक, सौ.शर्मिला फाटक, श्री विजय कासलीकर प्रामुख्याने उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्थापनेपासून राष्ट्राच्या उभारणीत तरुणांचा सहभाग राहिला आहे. राष्ट्र आणि युवकांमध्ये दुवा म्हणून राष्ट्रीय सेवा योजना काम करते. तर युवकांच्या सुप्त गुणांना अभिव्यक्त होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना हे एक आदर्श व्यासपीठ आहे असे प्रतिपादन श्री सतीश फाटक यांनी केले.
तत्पूर्वी सात दिवसीय शिबिराचा आढावा म्हणून विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आम्ही या शिबिराच्या माध्यमातून अनेक मूल्यवान गोष्टी तथा संचलन, व्याख्यान, ग्राम स्वच्छता, ग्रामीण संस्कृती, अंधश्रध्दा निर्मूलन इत्यादी बाबी शिकलो अशा बोलक्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी  व्यक्त केल्यात. या समारोपीय सत्राचे प्रास्ताविक व मनोगत कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.ताराचंद कंठाळे यांनी तर बहारदार संचलन कु.जयश्री मानकर बी. ए. भाग २ यांनी केले.

 

राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर उद्घाटन संपन्न

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय  द्वारा संचालित राष्ट्रीय सेवा  योजना विशेष शिबिर  उद्घाटन सोहळा दत्तक ग्राम पांढरी_घोडखिंडी येथे दिनांक ३० डिसेंबर २०१९ ला संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ.माणिक मेहरे तर उद्घाटक म्हणून वाणिज्य महाविद्यालय न्यासाचे उपाध्यक्ष श्री सतीश फाटक उपस्थित होते. सात दिवसीय निवासी  शिबिर ग्रामीण जीवनाशी नाळ जोडून ठेवण्याची उत्तम संधी आहे व  विद्यार्थी यायोगे सेवा, श्रम संस्कार यांचे धडे या शिबिरात निश्चित घेतील  असे प्रतिपादन श्री फाटक यांनी केले. प्रमुख पाहुणे प्रा.विवेक देशमुख यांनी व्यक्तिमत्त्व विकासाची गुरुकिल्ली म्हणजे  ही शिबिरे असतात आणि येथे स्वयंशिस्त, अनौपचारिक शिक्षण निसर्गाच्या  सान्निध्यात शिकता येते असे महत्त्वाचे मार्गदर्शन केले.
या प्रसंगी मंचावर भूगोल विभाग प्रमुख  प्रा.डॉ.कल्पना देशमुख, प्रा डॉ. हरिदास धुर्व तथा संचालक सौ.शर्मिला फाटक आणि मुख्याध्यापक श्री मुकुंद बावणे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.ताराचंद कंठाळे यांनी प्रास्ताविक केले. सुरुवातीला मान्यवरांनी दीपप्रज्वलन करून त्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी खरा  तो  एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे हे गीत सादर केले. संचालन महेश सिरसाठ याने तर आभार  पवन देशमुख यांनी मानले. शेवटी राष्ट्र वंदना म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.

वैराग्यमुर्ती गाडगे बाबा लोकशिक्षक :- प्रा. डॉ.हरिदास धूर्वे

दिनांक २० डिसेंबर २०१९ ला बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे दैवत विदर्भ केसरी संत गाडगे बाबा  यांची पुण्यतिथी संपन्न झाली. या प्रसंगी अध्यक्ष म्हणून प्रा.अमोल राऊत तर मार्गदर्शक प्रा.डॉ.धुर्वे उपस्थित होते. संत गाडगे बाबा एक खऱ्या अर्थाने लोकशिक्षक होते असे प्रतिपादन डॉ. धूर्व यांनी केले. प्रा.राऊत म्हणाले की गाडगे महाराज यांचे विचार अक्षय असून रा. से. यो. स्वयम् सेवकांनी त्यांचे आचरण करावे. कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. ताराचंद कंठाळे यांनी संचालन तर डॉ. आसुटकर यांनी आभार मानले.

वैचारिक अभिवादन प्रश्र्नोत्तरी स्पर्धा परिक्षा संपन्न :-

भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बानाई, नागपूर द्वारा आयोजित केली जाणारी राज्यस्तरीय वैचारिक अभिवादन प्रश्र्नोत्तरी परिक्षा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन केंद्र, बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे आज दि.६ डिसेंबर २०१९ रोजी घेण्यात आली. या परिक्षेला प्रवेशित झालेल्या ७० विद्यार्थ्यांपैकी ४५ विद्यार्थी उपस्थित होते. बानाई नागपूर चे मा.खापर्डे साहेब व यवतमाळ येथील परिक्षेचे नियंत्रक मा.वानखेडे साहेबांनी परीक्षा केंद्राला भेट दिली.
सुरुवातीला उपप्राचार्य डॉ.माणिक मेहरे यांनी दीपप्रज्वलन  करून मार्गदर्शन केले. या वेळी महाविद्यालयातील डॉ.आसुटकर, डॉ.हरिश धुर्वे, प्रा.प्रशांत बागडे डॉ.ताराचंद कठांळे, प्रा. अमोल राऊत इ. प्राध्यापक उपस्थित होते.

एड्स जनजागृती रॅली

दिनांक 3 डिसेंबर 2019 ला कलेक्टर ऑफिस व नगर परिषद द्वारा आयोजित एड्स जनजागृती रॅली मध्ये बाबाजी  दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

डॉ. कलाम संपूर्ण देशासाठी प्रेरक -डॉ. सूर्यकार

स्थानिक बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात आज दिनांक १५ ऑक्टोबर २०१९ ला भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन राष्ट्रीय सेवा योजना विभाग व ग्रंथालय मार्फत साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विनायक दाते तर प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. अनंत सूर्यकार, अमोलक चंद महाविद्यालय तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून उपप्राचार्य डॉ. माणिक मेहरे, प्रा.विजय दीक्षित, ग्रंथपाल व कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. ताराचंद कंठाळे व सर्व प्राध्यापक उपस्थित होते. डॉ.कलाम यांचे जीवन अत्यंत संघर्षमय होते. त्यांनी गरिबीवर मात करून यशाचे शिखर गाठून राष्ट्रपती झालेत व देशाला विज्ञानाच्या क्षेत्रात वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. विद्यार्थ्यांनी वाचनात सातत्य ठेऊन ग्रंथांशी सोबत करावी कारण वाचन माणसाला समृध्द बनविते आणि पुस्तके कधीच धोका देत नाहीत असे प्रतिपादन डॉ. सूर्यकार यांनी केले. प्रा.दीक्षित यांनी पुस्तके व ग्रंथालयाचे महत्व विशद करून अभ्यासिकेचा उपयोग जरूर करावा असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. अध्यक्ष श्री विनायक दाते यांनी नियमित ग्रंथांसोबतच इ-पुस्तकांचा लाभ घ्यावा कारण भविष्यात इलेक्ट्रॉनिक मीडिया आजच्या पेक्षाही अधिक क्रांती करणार असे प्रतिपादन केले. या प्रसंगी राहुल गायकवाड बी. कॉम. भाग तीन याला ग्रंथालय मित्र पुरस्कार २०१९ ने सन्मानित करण्यात आले.

दाते महाविद्यालयांत आरोग्य तपासणी शिबीर

स्थानिक बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात दिनांक १० ऑक्टोबर २०१९ ला राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले. माधव बाग या  आयुर्वेदिक संस्थेच्या संचालिका डॉ. वांगे प्रमुख पाहुणे महोत्या. संस्थेचे उपाध्यक्ष श्री सतीश फाटक कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. शरीराशी संभाषण ही आता काळाची  गरज बनली आहे. आपण या धकाधकीच्या जीवनात वावरताना आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये असे प्रतिपादन श्री फाटक यांनी केले. डॉ. वांगे व डॉ. माणिक मेहरे, उपप्राचार्य यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक भुगोल विभाग प्रमुख डॉ. कल्पना देशमुख, संचालन कु. हर्षदा राऊत हिने तर आभार डॉ. हरिदास धुर्वे यांनी मानले. त्यानंतर कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वेगवेगळ्या तपासण्या करण्यात आल्या.

दाते महाविद्यालयात गांधी जयंती उत्साहात

दिनांक 2 ऑक्टोबर २०१९ ला बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्ष म्हणून वाणिज्य महाविद्यालय न्यासाचे विश्वस्त प्रा. हरिदास धुर्वे तर वक्ते म्हणून प्रा. अमोल राऊत उपस्थित होते. महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण केले. शांती, सत्य व अहिंसा ही मूल्यवान तत्वे जगाला बहाल केली, असे प्रतिपादन प्रा. राऊत यांनी केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. धुर्वे म्हणाले की गांधी आणि त्यांचे विचार सूर्य चंद्र आहेत तोपर्यंत देशाला मार्गदर्शन करत राहतील. विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गावर चालून सत्यासाठी जीवन  मार्गक्रमण करावे. मंचावर प्रमुख उपस्थिती डॉ. आशालता आसुटकर होत्या. कार्यक्रमाचे संचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ. ताराचंद कंठाळे यांनी केले. कु.हर्षदा राऊत हिने आभार मानले.

दाते महाविद्यालय प्लास्टिक निर्मूलन कार्यक्रमात सहभागी

नगर परिषद यवतमाळ द्वारा आयोजित प्लास्टिक निर्मूलन शपथ विधी कार्यक्रम दिनांक  1 ऑक्टोबर 2019 ला स्थानिक पोस्टल ग्राउंड येथे संपन्न झाला. महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त यवतमाळ नगर परिषद यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी डॉ. अजय गुल्हाने तर उद्घाटक नगराध्यक्ष कांचन चौधरी होत्या.या वेळी शहरातील अनेक महाविद्यालयाचे विद्यार्थी, पालक व शिक्षक सहभागी झाले होते. या वेळी विद्यार्थ्यांना प्लास्टिक वापरू नये याबद्दल शपथ देण्यात आली. तसेच शहरातून रॅली काढून जनजागृती करण्यात आली. दाते कॉलेजचे विद्यार्थी व प्राध्यापक या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

बाबाजी दाते महाविद्यालयात रक्तदान शिबिर

दिनांक २४ सप्टेंबर २०१९ रोजी बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व रोटरी क्लब, यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रसिध्द वास्तू शिल्पी श्री सतीश फाटक, उपाध्यक्ष वाणिज्य महाविद्यालय न्यास तर मंचावर उपस्थित प्रमुख अतिथी श्री राजेश भामरे, प्रांतपाल, श्री जलालुद्दिन गिलानी, उप प्रांत पाल, श्री राजेश गढीकर, अध्यक्ष रोटरी क्लब यवतमाळ, विश्वस्त सौ. शर्मिला फाटक व उपप्राचार्य डॉ. माणिक मेहरे होते. रक्तदान म्हणजे आपल्या समाजाप्रती कृतज्ञता आहे व तरुणांनी नेहमी आपली ऊर्जा अशा प्रकारच्या विधायक कार्यात लावावी असे महत्त्वाचे प्रतिपादन प्रांतपाल श्री भामरे यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात राजेश गढीकर व रासेयो कार्यक्रम अधिकारी यांनी अनुक्रमे रोटरी क्लब व राष्ट्रीय सेवा योजनेची भूमिका विशद केली . या शिबिरात एकूण ९८ पैकी ५४ राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमास सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.

यंग इंडिया फोरम आणि रासेयो च्या संयुक्त विद्यमाने प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न

दिनांक ११ सप्टेंबर २०१९ रोजी स्वामी विवेकानंद दिग्विजय दिनाचे निमित्त साधून बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात यंग इंडिया फोरम तथा राष्ट्रीय सेवा योजना यांचे संयुक्त विद्यमाने Powers of Mind ह्या स्वामी विवेकानंद यांच्या चरित्रावर आधारित प्रश्न मंजुषा स्पर्धा संपन्न झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ. माणिक मेहरे तथा कु. शरयू शिवणकर व प्रथमेश पंडलवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रम अधिकारी डॉ. ताराचंद कंठाळे यांनी प्रास्ताविक तर डॉ. आसुटकर यांनी आभार मानले. तत्पूर्वी स्वामी विवेकानंद, गाडगे बाबा व श्री बाबाजी दाते यांच्या प्रतिमांचे पूजन करून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. या स्पर्धेसाठी एकूण ४८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.

दाते कॉलेजचे समाजाचे देणे - मतिमंद मुलांना खाऊ वाटप

दि. २८ ऑगष्ट २०१९ ला बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी कृतज्ञता  म्हणून,  तसेच श्री  रामेश्वर प्रकाश राउत, गटप्रमुख  यांच्या वाढदिवसा निमित्त जीवन विकास मंदिर येथे  मतिमंद मुलांना खाऊ वाटप केला. या प्रसंगी वाणिज्य विभागाचे रासेयो माजी कार्यक्रम अधिकारी प्रा. अमोल राउत, कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. ताराचंद कंठाळे, गौरव बावणे, रामेश्वर राउत, ऋतू सव्वालाखे, शुभम राउत उपस्थित होते. हा प्रसंग अत्यंत भावस्पर्शी होता व जीवनात कृतज्ञता काय असते हे सांगून गेला. या प्रसंगी प्रा.राउत व जीवन विकास मंदिरचे संचालक यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

उद्बोधन वर्ग संपन्न : 26-8-2019

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय शिवाजी नगर यवतमाळ येथे दिनांक 26 ऑगस्ट २०१९ ला राष्ट्रीय सेवा योजनेचा उद्बोधन वर्ग संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ माणिक मेहरे होत्या तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून भुगोल विभाग प्रमुख डॉ कल्पना देशमुख होत्या. राष्ट्रीय सेवा योजना  ही  व्यक्तिमत्व विकासाची चावी आहे. ग्रामीण व शहरी संस्कृती मधील फरक रासेयो शिकविते असे प्रतिपादन डॉ देशमुख यांनी केले. रासेयो जीवनात श्रम व कर्तव्य जबाबदारी शिकविते असे मत अध्यक्ष डॉ मेहरे व्यक्त केले. माजी कार्यक्रम अधिकारी  प्रा जोशी व प्रा राऊत यांनी NSS गीत सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. या वर्गाचे प्रास्ताविक डॉ आसुटकर, संचालन कु हर्षदा राऊत तर आभार महेश शिरसाट यांनी मानले. विशेष उपस्थितीत प्रा विवेक देशमुख, प्रा हरिदास धुर्वे विश्वस्त, वाणिज्य महाविद्यालय न्यास, तसेच डॉ रविजित गावंडे हे उपस्थित होते. शेवटी राष्ट्रवंदना म्हणून सांगता झाली.

दाते कॉलेज मध्ये परिसर स्वच्छता अभियान

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात परिसर स्वच्छता  रासेयो  युनिट कडून दिनांक 14 ऑगस्ट 2019  स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला करण्यात आली. महाविद्यालयाचे मुख्य मैदान, आतील स्टेज, समोरील गवत व केरकचरा, तसेच नवीन इमारती समोरील गाजर गवत काढण्यात आले. तसेच रासेयो विद्यार्थ्यांनी मागील व या वर्षी जी झाडे लावलीत त्यांना आळे करून स्वच्छता करण्यात आली. या  मोहिमेत कार्यक्रम अधिकारी व सहकार्यक्रम अधिकारी यांचेसह एकूण 42 विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला.

युवा माहिती दूत कार्यशाळा

 दिनांक  २९  जुलै २०१९ रोजी स्थानिक बाबाजी दाते कला आणि वाणिज्य  महाविद्यालय, यवतमाळ येथे महाराष्ट्र  शासन पुरस्कृत युवा माहितीदूत कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून जिल्हा माहिती अधिकारी श्री राजेश येसन कर होते. शासनाच्या विविध योजना रासेयो स्वयंसेवकांनी गरजूंपर्यंत पोहचवून महितीदूत म्हणून काम करावे असे आवाहन केले. रासेयो स्वयंसेवक हा जबाबदार  नागरिक व नवमतदार म्हणून समाजाचे ऋण फेडण्याचे काम करेल असे मत प्रमुख पाहुणे श्री आशिष भागडकर यांनी व्यक्त केले. श्री सुरज भाकरे यांनी माहिती दूत अँप कसे डाउनलोड करावे व आपण समाजातील घटकांना कसे योजनांचा  लाभ घ्यावा याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ माणिक मेहरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संचालन कार्यक्रम अधिकारी डॉ ताराचंद कंठाळे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ आशालता आसुटकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रासेयो स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

वृक्ष लागवड कार्यक्रम : -
दिनांक 17 जुलै 2019 ला बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत महाविद्यालाच्या पटांगणात वृक्षारोपण करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे वतीने हा कार्यक्रम राबविण्यात आला. विदयार्थ्यांना वृक्ष लागवडीचे महत्व सांगण्यात आले.
या प्रसंगी उपप्राचार्य प्रा डॉ माणिक मेहरे, प्रा विवेक देशमुख, प्रा डॉ कल्पना देशमुख, प्रा डॉ सचिन जयस्वाल, प्रा डॉ रविजित गावंडे, प्रा विनोद तलांडे, प्रा प्रशांत बागडे, कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ ताराचंद कंठाळे, सहकार्यक्रम अधिकारी प्रा डॉ आशालता आसुटकर, तसेच रासेयोचे विद्यार्थी उपस्थित होते.

दाते महाविद्यालयात तंबाखू मुक्त अभियानांतर्गत शपथ ग्रहण सोहळा संपन्न

दिनांक 16 जुलै २०१९ ला राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत तंबाखू मुक्त अभियानांतर्गत शपथग्रहण सोहळा संपन्न झाला. शासनाच्या तंबाखू मुक्त अभियानांतर्गत भावी पिढी निरोगी व सुदृढ राहावी या उदात्त हेतूने प्रेरित होऊन संपूर्ण भारतभर हे अभियान राबविण्यात येत आहे त्याचाच भाग म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ माणिक मेहरे व कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ ताराचंद कंठाळे व डॉ राविजित गावंडे  यांनी विद्यार्थ्याना शपथ दिली. या वेळेस महाविद्यालयातील  प्राध्यापक वर्ग व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

पल्स पोलिओ कार्यक्रमात सहभाग

दिनांक 10 मार्च २०१९ ला बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील रासेयोचे विद्यार्थी वेगवेगळ्या पाच बूथवर ५-५ च्या गटाने पल्स पोलिओ अभियानात सहभागी झाले होते. लहान बालकांना पल्स पोलिओचे डोस देण्यात विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

महिलांनी आत्मनिर्भर व्हावे - प्रभारी प्राचार्य प्रेरणा पुराणिक

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात दिनांक 8 मार्च २०१९ ला जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले. सुरुवातीला गाडगे बाबा व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना हारार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक प्रा.सौ.प्रेरणा पुराणिक यांनी महिलांनी आत्मनिर्भर व्हावे तसेच आपल्या हक्कांसाठी सदैव तत्पर असावे असे प्रतिपादन केले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. कल्पना देशमुख यांनी सांगितले की पौराणिक काळात कैकयीने राजा दशरथासोबत युद्धावर जाऊन पराक्रम गाजविला आणि नंतर मध्ययुगीन काळात स्त्री उंबरठ्याच्या आत राहिली, याचे कारण नित्य होणारे परकीय आक्रमण व अत्याचार हे होते. पुन्हा समाजसुधारकांनी स्त्री ही शिकून पुढे येण्यासाठी प्रयत्न केले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. ताराचंद कंठाळे यांनी सांगितले की आज स्त्री चौफेर प्रगतीचे गौरीशंकर गाठत आहे. कार्यक्रमाचे संचालन प्रांजली केळकर केले तर आभार प्रदर्शन मेघा शेंदरे हिने केले. रासेयो विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.

रक्तदान हे एक राष्ट्रीय कार्य आहे--प्रा. डॉ. माणिक मेहरे

दिनांक 2 मार्च  २०१९ ला बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना  व संस्कार भारती  शाखा यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून उपप्राचार्य डॉ माणिक मेहरे, कार्यक्रम अधिकारी डॉ ताराचंद कंठाळे, सहकार्यक्रम अधिकारी डॉ आसुटकर, प्रा तलांडे व अन्य प्राध्यापक व रासेयो विद्यार्थी हजर होते. या राष्ट्रीय कार्यात तरुणांनी सदैव सहभाग नोंदवून आपण रासेयो स्वयंसेवक आहोत याचा परिचय द्यावा असे प्रतिपादन डॉ माणिक मेहरे यांनी केले. विशेष म्हणजे या कार्यक्रमात प्रा डॉ सचिन जयस्वाल, प्रा जोशी व प्रा बागडे  सह एकूण 48 विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा चमू सहभागी झाला होता. संस्कार भारतीचे अनेक पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते व त्यांनी सुद्धा रक्तदान करून आपला सहभाग नोंदविला. क्षेत्रीय समन्वयक प्रा डॉ बाळकृष्ण सरकटे यांनी शिबिराला भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

वाहतूक नियम व विविध शस्त्रे यांची ओळख

दिनांक ४ जानेवारी २०१९ ला पोलीस अधिक्षक कार्यालय येथे पोलीस वर्धापन दिनानिमित्त  वाहतूक नियम व विविध शस्त्रे यांची ओळख परिचय करून देण्यात आला. आपण समाजात वावरत असताना जसे इतर गोष्टींबाबत चौकस असतो तसेच वाहतूक नियम काटेकोरपणे पाळणे हा आपला धर्मच आहे असे मानायला हरकत नाही. गाडी चालवताना आजकाल तरुण मोबाईल वापरतात हे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे असे प्रतिपादन वाहतूक निरीक्षक श्री राठोड यांनी केले. कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजना कार्येक्रमअ धिकारी डॉ. ताराचंद कंठाळे, डॉ. आसुटक, प्रा. हरिदास धुरवे, डॉ. गावंडे उपस्थित होते.

क्रांती ज्योती सावित्रबार्इं यांची जयंती

दिनांक ३ जानेवारी २०१९ ला राष्ट्रीय सेवा योजना कार्यालयात मुक्तिदिनाचे औचित्य साधून क्रांती ज्योती सावित्रबाई यांची जयंती व मतदान जनजागृती कार्यक्रम  महाविद्यालयात राबविण्यात आला. अत्याधुनिक VV PAD मशीनचे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. येणाऱ्या काळात तरुणांना मतदान  नीट करण्यात यावे हा या कार्यक्रमाचा हेतू आहे असे श्री कंठाळे यांनी सांगितले. प्रा. धूर्वें यांनी सावित्रबार्इंचे विचार व्यक्त केले. कार्यक्रमास प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.

राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन व समारोप

यवतमाळ येथील बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर दिनांक २१ ते २८ डिसेंबर २०१८ पर्यंत दत्तक ग्राम पांढरी घोडखिंडी येथे थाटात संपन्न झाले. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी वाणिज्य महाविद्यालय न्यासाचे अध्यक्ष श्री विनायक दाते म्हणाले राष्ट्रीय सेवा योजना हे व्यक्तिमत्व विकासाचे व्यासपीठ आहे, तेव्हा विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त कलागुणांना येथे प्रकट करावे. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे हे गीत विद्यार्थ्यांनी सादर केले. संचलन कु.पायल किना के तर प्रास्ताविक डॉ. कंठाळे यांनी केले. राष्ट्र वंदना म्हणून उद्घाटन कार्यक्रमाची सांगता झाली.
उद्याचा उज्वल नागरिक व समाजाची बांधिलकी जोपासणारे कर्तव्य दक्ष नागरिक या प्रकारच्या शिबिरातून घडतात असे प्रतिपादन यवतमाळच्या प्रथम नागरिक नगराध्यक्ष सौ.कांचनताई बाळासाहेब चौधरी शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमास केले. टेक्सास विद्यापीठ येथून डी.लिट. प्राप्त प्राध्यापक श्री हरिदास धुर्वे यांचा या प्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य सौ.प्रेरणा पुराणिक, श्री फाटक साहेब व श्री देशमुख यांची समयोचीत भाषणे झाली. शिबिरातील विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. कंठाळे यांनी तर संचालन कु प्रांजली केळकर हिने केले. उद्घाटन व समारोपाच्या दोन्ही कार्यक्रमास संस्थेचे सर्व मान्यवर, प्राध्यापक वर्ग माजी विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. शेवटी राष्ट्र वंदना गाऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

संत गाडगे बाबा खरे लोकशिक्षक

दिनांक २० डिसेंबर २०१८ ला स्थानिक बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महा .राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत संत गाडगे बाबा पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ.माणिक मेहरे तर प्रमुख मार्गदर्शक श्री महेश डहाके, नंदुरकर विद्यालय हे होते. गाडगे बाबांनी  दिन  दुबळ्यांची सेवा करून आदर्श निर्माण केला. आधी श्रम व नंतर मिळेल ती माधुकरी  मागून जीवन व्यतीत करणारा लोकोत्तर महापुरुष गाडगे बाबा असे श्री डहाके म्हणाले. राष्ट्रीय सेवा योजना जगण्याचा विषय आहे, विद्यार्थ्यांनी या महापुरुषांच्या जीवन कार्यातून  काहीतरी आदर्श घ्यावा तरच पुण्यतिथी साजरी झाली समजावे असे उद्गार डॉ.माणिक मेहरे यांनी काढले. प्रास्ताविक डॉ. आसुटकर यांनी तर पाहुण्यांचा परिचय  कार्यक्रम अधिकारी डॉ. ताराचंद कंठाळे यांनी केला. संचलन कू. खवले तर आभारप्रदर्शन प्रतीक गेडाम यांनी केले. प्रा. डॉ. वर्षा कुलकर्णी व प्रा.विनोद तलांडे प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमानंतर स्वच्छता मोहीम  बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महा. च्या राष्ट्रीय सेवा योजना मार्फत राबविण्यात आली. संत गाडगे बाबांनी संपूर्ण जीवन स्वच्छतेच्या कामी लावले असून त्यांचा आदर्श घेऊन रा से यो विद्यार्थी यांनी मार्गक्रमण करावे  असे मनोगत प्रा.राऊत यांनी व्यक्त केले.

देशाचा प्रत्येक नागरिक सैनिक आहे

 स्थानिक बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महा.यवतमाळ येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने लेफ्टनंट कमांडींग ऑफिसर श्री वैभव कासलीकर यांचे प्रेरक भाषण आयोजित करण्यात आले. या देशाचा प्रत्येक नागरिक हा सैनिक असावा असे   मत त्यांनी व्यक्त केले. या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी  अनेकांनी रक्त सांडले आहे. याचे  नित्यस्मरण असू द्यावे, नाही तर इतिहास आपणास माफ करणार नाही, असे उद्गार विशाखा पट्टणं येथे कार्यरत असलेले श्री वैभव कासलिकर यांनी काढले. अध्यक्ष म्हणून प्राचार्य प्रेरणा पुराणिक तर प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य डॉ.माणिक मेहरे व श्री विजय कासलीकर् तसेच प्रा.विवेक देशमुख उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ.ताराचंद कंठाळे यांनी केले. डॉ. असुटकार व रा से यों विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. प्राचार्य पुराणिक यांनी सभेला संबोधित केले. शेवटी राष्ट्र वंदना घेऊन सांगता करण्यात आली.

सरदार पटेल अखंड भारताचे शिल्पकार -डॉ. नितीन खर्चे

आज दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ ला स्थानिक बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महा. येथे सरदार वल्लभ भाई पटेल  यांची जयंती अर्थात राष्ट्रीय ऐक्य दिवस तसेच दिवंगत पंतप्रधान प्रियदर्शिनी इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. लोहपुरुष सरदार पटेल यांनी गृहमंत्री असताना अनेक देशोपयोगी निर्णय घेतलेत तसेच ५५० संस्थानिकांना भारतात विलीन  करून भारताला अखंड ठेवण्याचा  प्रण पूर्ण केला.असे प्रतिपादन प्रमुख वक्ते मा. डॉ. नितीन  खर्चे यांनी केले. त्यांनी सरदार पटेल यांच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकला. इंदिरा गांधी यांनी कठीण काळात देशाच्या हितासाठी हौतात्म्य पत्करले असे उद्गार प्रमुख पाहुणे क्षेत्रीय समन्वयक प्रा. डॉ. सरकटे  यांनी काढले. देश सरदार पटेल यांचा त्याग विसरू शकत नाही.तरुणांनी या दोन्ही देशभक्त नेत्यांच्या जीवन चरित्रातून बोध घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. अध्यक्ष प्राचार्य प्रेरणा पुराणिक होत्या.प्रास्ताविक सह कार्यक्रम अधिकारी  प्रा. डॉ. आशालता आसुटकर  यांनी तर संचलन कु.  गोडसे हिने केले. आभार शुभम राऊत याने केले व राष्ट्र वंदना म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.

आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन

स्थानिक बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ येथे आज दिनांक १३ ऑक्टोबर २०१८ ला राष्ट्रीय सेवा योजना  विभागामार्फत आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य सौ. प्रेरणा पुराणिक कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे श्री सतीश फाटक ,प्रसिद्ध वास्तुशिल्पी  तथा उपाध्यक्ष वाणिज्य महाविद्यालय न्यास, यवतमाळ तर प्रमुख मार्गदर्शक  म्हणून प्रा. विवेक देशमुख, इंग्रजी विभाग प्रमुख तथा सदस्य, विद्वद परिषद, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती हे उपस्थित होते.
जीवनात वेळ काळ कुणालाच सांगून येत नसते. तेव्हा वैयक्तिक, सामाजिक वा राष्ट्रीय आपत्ती असो माणसाने नियोजन हे केलेच पाहिजे. आपत्ती हा जीवनाचा एक भागच आहे. त्यामुळे खचून न जाता जो धैर्याने आपत्तीचा सामना करतो तोच खरा रासेयो स्वयमसेवक म्हणता येईल. तामिळनाडू मधील एका राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीमती अंजू  जॉर्ज यांनी किती कौशल्याने प्रशासन सांभाळले व काय काय प्राथमिक जबाबदाऱ्या आपत्ती ग्रस्तांना उपलब्ध करून दिल्या या वर प्रा.विवेक देशमुख यांनी  प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. श्री सतीश फाटक यांनी मार्गदर्शनात सांगितले की राष्ट्रीय सेवा योजनेचे ब्रीदवाक्य हे सेवा आहे. तेव्हा या देशावर जेव्हा जेव्हा राष्ट्रीय आपत्ती आली तेव्हा  तेव्हा रासेयो, एन .सी .सी. सारख्या शासनेतर संस्थांनी नेहमी सेवा प्रदान करून सामाजिक बांधीलकीचा व संवेदनेचा परिचय दिला आहे. सरकार् म्हणजे  दुसरे तिसरे कुणीच नसून आपणच आहोत हि भावना मनाशी बाळगून त्सुनामी, किल्लाराचा भूकंप, गुजरात, अलीकडील पुणे येथील घटना   व इतर अनेक संकट  वेळी  स्वयम सेवकांनी पुढाकार घेतला याचा इतिहास साक्षी आहे. असे प्रतिपादन प्राचार्य पुराणिक यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ आशालता आसुटकर यांनी तर पाहुण्यांचा परिचय व “खरा तो एकची धर्म ,जगाला प्रेम अर्पावे” हे रासेयो गीत कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. ताराचंद कंठाळे  यांनी केले. संचलन कु.धनश्री कापशीकर बी .ए .भाग २ तर आभार कु.आरती जिभकाटे हिने केले.

राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस आचारसंहिता दिन

दिनांक २४/९/१८ ला राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन  साजरा करण्यात आला. अध्यक्ष स्थानी प्रा. डॉ. माणिक मेहरे तर प्रमुख अतिथी जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. कमल राठोड होते.  प्रमुख वक्ते प्रा. डॉ. कमल राठोड यांनी खालील माहिती दिली.

राष्ट्रीय सेवा योजना स्थापना  दिन २४/९/१९६९ ला संपूर्ण भारतभर  महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दी  वर्षापासून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. महाविद्यालयीन विद्यार्थी हे सेवाभावी व्हावे व त्यायोगे त्यांच्यात नेतृत्व गुणाचा विकास व्हावा या उदात्त हेतूने रासेयो ची स्थापना करण्यात आली. समाजसेवेचे काम हे ग्रामीण भागात  रासेयोचे विद्यार्थी स्वच्छता दूत म्हणून काम करतील अशी प्रांजळ अपेक्षा विद्यापीठ आयोगाचे अध्यक्ष डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी केली होती. २४/९/१९६९ ला तत्कालीन शिक्षणमंत्री डॉ. व्ही. के. राव यांनी राष्ट्रीय सेवा योजना सुरू केल्याची घोषणा केली.

आर्मी मध्ये सेवा करणे ही सर्वोच्च देशसेवा-- कर्नल अभय पटवर्धन

दिनांक 19 सप्टेंबर २०१८ ला स्थानिक बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे कर्नल अभय पटवर्धन, नागपूर यांनी आर्मी मध्ये युवकांना सेवेची संधी या विषयावर उपयुक्त मार्गदर्शन केले . राष्ट्रीय सेवा योजना  मार्फत आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

कर्नल अभय पटवर्धन म्हणाले की आर्मी मध्ये सेवा करण्यासाठी विद्यार्थ्यानी पुढाकार घ्यावा. आर्मी मध्ये कुशाग्र बुद्धिमत्तेची आवश्यकता नसते तर कॉमन सेन्स व लॉजिकची फार गरज असते. आर्मी मध्ये सिलेक्शन होण्यासाठी मुलाखतीची तयारी कशी करावी व प्रश्न पत्रिकेचे स्वरूप कसे असते या वर त्यांनी प्रकाश टाकला. आर्मी मध्ये  वेतन व रजेच्या उत्तम सुविधा असतात. मुली सुद्धा आर्मी मध्ये प्रवेश घेऊ शकतात. UPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत मुलाखत देऊन आपण पदोन्नतीच्या कर्नल पदापर्यंत पोहचू शकतो.

"अवयव दान:युवकांची भूमिका"

 दिनांक 6/9/18 यवतमाळ - अवयव दान महा दान--डॉ. सारिका शहा
स्थानिक बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजने द्वारा आयोजीत *अवयव दान - युवकांची भूमिका*  या विषयावर कार्यक्रम संपन्न झाला  अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य सौ प्रेरणा पुराणिक तर अतिथी डॉ मनोज पवार,राज्यस्तरीय प्रशिक्षक तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ सारिका शहा उपस्थित होत्या .  अवयव दान केल्याने मरणोत्तर जीवन जगण्याची संधी प्राप्त होते असे डॉ शहा म्हणाल्या. प्राचार्य पुराणिक मॅडम यांनी सुद्धा यावेळी विद्यार्थ्याना  संबोधित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहकार्यक्रम अधिकारी डॉ आशालता आसुटकर यांनी तर आभार कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ ताराचंद कंठाळे यांनी केले

राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे उदबोधन वर्ग

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने उदबोधन वर्गाचे आयोजन  दिनांक 29 सप्टेंबर २०१८ ला करण्यात आले. अध्यक्ष म्हणून प्राचार्य  प्रेरणा पुराणिक तर प्रमुख पाहुणे  म्हणून  वाणिज्य महाविद्यालय न्यासाचे  अध्यक्ष  श्री विनायक दाते होते.

प्रमुख मार्गदर्शक म्हणून जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयचे  प्राचार्य डॉ अविनाश कोल्हटकर उपस्थित होते. मार्गदर्शनपर भाषणात ते म्हणाले राष्ट्रीय सेवा योजना हे त्याग व समर्पण चे व्यासपीठ आहे. व्यक्तिमत्त्व विकास घडविण्याची पाठशाळा राष्ट्रीय सेवा योजना आहे. अतिशय सोप्या आणि सुंदररित्या राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्व त्यांनी विद्यार्थ्यांना समजवून सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ ताराचंद कंठाळे यांनी केले तसेच सुत्रसंचलन कु. नंदिनी बनकर  तर आभार कु. पायल किनाके हिने केले. डॉ माणिक मेहरे यांनी  पसायदानाने कार्यक्रमाची सांगता केली

वृक्षारोपण कार्यक्रम

राष्ट्रीय सेवा योजनेचा कौतुकास्पद उपक्रम :- दिनांक 20 जुलै २०१८ला बाबाजी दाते कला आणि वाणिज्य  महाविद्यालय  येथे राष्ट्रीय सेवा योजना मार्फत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष विनायक दाते, सदस्या सुषमा दाते, प्रभारी प्राचार्य प्रेरणा पुराणिक, कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. ताराचंद कंठाळे तसेच अनेक प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. सर्व झाडे जगवण्याची व वाढविण्याची जबाबदारी प्राध्यापकानी घेतली असून प्रत्येक प्राध्यापकानी एका झाडाचे पालकत्व स्वीकारले आहे.

कु.गायत्री देवराव माने - महाविद्यालयातील बी.ए. भाग २ ची विद्यार्थिनी व राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेवक कु. गायत्री देवराव माने हिची मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन संचलन -२०१८ करीता निवड झालेली आहे.  महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे तिचे हार्दिक अभिनंदन.

विषबाधित शेतकऱ्यांची विचारपुस - यवतमाळ जिल्ह्यात कीटक नाशक फवारणीत अनेक शेतकरी विषबाधित झाले. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार चालु आहेत. दाते कॉलेजच्या रासेयो विभागाने प्रा. डॉ. कल्पना देशमुख व प्रा. अमोल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय रुग्णालयात जाऊन विष बाधित रुग्णांची विचारपुस केली व त्यांना चादरी व फळे यांचे वाटप केले. संस्थेच्या व्यवस्थापनाने या उपक्रमाबद्दल  विद्यार्थ्यांचे व प्राध्यापकांचे अभिनंदन केले.

वाचन प्रेरणादिन साजरा - भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थे त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणादिन म्हणून रासेयोतर्फे साजरा करण्यात आला. प्रा. डॉ. कल्पना देशमुख यांनी प्रास्ताविकात या कार्यक्रमाचे महत्व सांगितले. काही विद्यार्थ्यानी त्यांचे विचार व्यक्त केले. आयुष्यातील एकटेपणा दूर करायचा असेल तर वाचन हा एक चांगला छंद आहे असे मत प्रमुख अतिथी सुषमा दाते यांनी व्यक्त केले. प्रमुख वक्ते श्री. विवेक कवठेकर यांनी आयुष्यात प्रेरणा मिळवण्यासाठी वाचनाचे महत्व सांगितले. संस्थेचे अध्यक्ष श्री. विनायक दाते यांनी सांगितले की ज्ञान मिळविण्यासाठी अनेक साधने आहेत त्यात वाचन हे महत्वाचे साधन आहे. प्रा. अमोल राऊत यांनी आभार मानले.

स्वच्छता उपक्रम - दाते महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या प्रसंगी रासेयोच्या स्वयंसेवकांनी महाविद्यालयाच्या मैदानावरील गाजर गवत कापणे, प्लास्टिक केरकचरा याची विल्हेवाट लावणे, रोपट्यांना पाणी घालणे इत्यादी कामे मोठ्या उत्साहात पार पाडली. प्राचार्य डॉ. निस्ताने यांच्या मार्गदर्शनात रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. अमोल राऊत सहकार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. कल्पना देशमुख यांनी स्वच्छता मोहिमेचे नेतृत्व केले.