बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ 

Babaji Datey Kala & Vanijya Mahavidyalaya, Yavatmal

(वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ ट्रस्ट रजि. क्र. ई-३२ द्वारा संचालित)

NAAC Accredited B++ Grade with CGPA 2.82

विज्ञान विभाग – आर्यभट्ट सायन्स सोसायटी विज्ञान मंडळाचे भव्य उद्घाटन

दाते महाविद्यालयात आर्यभट्ट सायन्स सोसायटीचे उद्घाटन दि. 06/10/2025 ला उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटन वाणिज्य महाविद्यालय न्यासाचे अध्यक्ष श्री. विनायक दाते यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे व्याख्याता डॉ. रमजान विराणी, प्रमुख उपस्थिती सौ. सुषमा दाते, श्री. विजय कासलीकर, व विज्ञान विभाग प्रमुख डॉ. सारिका गाडवे यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात ही दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. स्वाती माकोडे यांनी उपस्थित आदरणीय प्रमुख पाहुणे, मान्यवर, प्राध्यापक वृंद व विद्यार्थ्यांचे शब्दसुमनांनी स्वागत केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविका मधून प्रा. सोनल टोंगो यांनी आर्यभट्ट सायन्स सोसायटीमध्ये तयार केलेल्या नवनवीन मॉडेल्सची व विविध उपक्रमांची माहिती दिली. उद्घाटन प्रसंगी श्री. विनायक दाते यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ केली पाहिजे तसेच विज्ञान शास्त्रातील आधुनिक घडामोडी, औद्योगिक विकास व रोजगाराच्या संधी याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख वक्त्यांचा परिचय डॉ. सारिका गाडवे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता डॉ. रमजान विराणी यांनी जंगल जगतांना या विषयावर भर देत जंगलावरील येणारा ताण व त्यावरील उपाय याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. सायन्स सोसायटी पदाधिकाऱ्यांचे मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू यांनी विद्यार्थ्यांना अध्यक्ष भाषणांने मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. राम पंचभाई यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. शुभांगी बोबडे यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी विज्ञान विभागातील कर्मचारी,  विद्यार्थी आणि महाविद्यालयातील कर्मचारी वृंद प्रामुख्याने उपस्थित होते.

Successful Organization of Seminar Competition

Successful Organization of Seminar Competition by Science Department The newly  created Science Department  of Babaji Datey Kala Ani Vanijya Mahavidyalaya Yavatmal had organized a seminar competition in its Science wing premises under the esteemed guidance of Principal Dr. Rajesh Singru on 26 September 2025.
8 Students from first year have participated in this competition and successfully delivered seminars on various related topics with the help of Power Point Presentation. Dr. Sarika Gadwe and Ms Shubhangi Bobde worked as Judges  for the competition. Samruddhi Sidam, Saniya Nikode and Jagruti Thakare were declared with first, second and third prize respectively. Mrs. Sonal Tongo, Dr. Sarika Gadwe, Mrs. Swati Makode, Ms. Shubhangi Bobde and Ms Madhuri kore took efforts for the success of this event.

एक दिवसीय औद्योगिक भेट

यवतमाळ येथील बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील विज्ञान विभागाची एक दिवसीय औद्योगिक भेट दिनांक १८/९/२०२५ रोजी,ओम ऍग्रो ऑरगॅनिक, एम. आय. डी. सी. लोहारा, यवतमाळ येथे संपन्न झाली.
यावेळी बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे अध्यक्ष मा.विनायक दाते, मा. सुषमा दाते व प्राचार्य डॉ. सिंगरू सर यांच्या हस्ते या सहलीचे उद्घाटन पार पडले.
या भेटीमध्ये इंडस्ट्री मधील रिसर्च अँड डेव्हलपमेंट, गुणवत्ता हमी, गुणवत्ता नियंत्रण, माती परिक्षण, जैविक तसेच सेंद्रिय खते, ॲनिमल टॉपिंग मशीन व इतर शेती संबंधित आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व प्रात्यक्षिक करून दाखविले. या विषयाबद्दल सविस्तर माहिती कु. आर्या तोटे आणि सौ उज्वला तोटे यांनी दिली.
या सहलीचे व्यवस्थापन रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. सारिका गाडवे यांच्या मार्गदर्शना खाली झाले. ही सहल यशस्वी होण्याकरिता प्रा. स्वाती माकोडे, प्रा. शुभांगी बोबडे, प्रा. सोनल टोंगो, व सहकारी माधुरी कोरे यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी उप प्राचार्य डॉ.ताराचंद कंठाळे, प्रा.डॉ. सिंगरू मॅडम तसेच वाणिज्य विभागातील प्राध्यापक वर्ग यांची विशेष उपस्थिती लाभली. या औद्योगिक भेटीला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. औद्योगिक भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना असणारे कुतूहल व शंकाचे निरासन झाले, त्याबद्दल विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे आभार मानले.