बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ 

Babaji Datey Kala & Vanijya Mahavidyalaya, Yavatmal

(वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ ट्रस्ट रजि. क्र. ई-३२ द्वारा संचालित)

NAAC Accredited B++ Grade with CGPA 2.82

कनिष्ठ महाविद्यालय – “जनजाती गौरव पंधरवडा”

दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे कनिष्ठ विभागातर्फे शासन निर्देशाप्रमाणे "जनजाती गौरव पंधरवडा" अंतर्गत आपल्या महाविद्यालयामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या अंतर्गत दिनांक 1 नोव्हेंबर पासून ते 15 नोव्हेंबर पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते, त्यामध्ये वारली चित्रकला स्पर्धा, आदिवासी वेशभूषा स्पर्धा, आदिवासी नृत्य स्पर्धा, "भगवान बिरसा मुंडा” यांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धा, इत्यादी वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. 14 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या आदिवासी वेशभूषा आणि नृत्य स्पर्धेच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका डॉ. स्वाती जोशी तर प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. वैशाली बेडेकर या होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मीनाक्षी मोरे यांनी केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता अकरावीची विद्यार्थ्यांनी कु. धन्वी वसानी यांनी केले तर आभार प्रदर्शन इयत्ता अकरावीचा विद्यार्थी जय खंडरे यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. अजय राठोड, प्रा. नितेश गेडाम, प्रा. शुभम काजळे, प्रा. सारिका नंदे, प्रा. सुषमा दुधे, प्रा. गायत्री उबाळकर, प्रा. योगेश निखार इत्यादी प्राध्यापकांनी सहकार्य केले.

जिल्हा व्यवसाय तंत्र प्रदर्शनी

जिल्हा उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यास क्रमांतर्गत, जिल्हा व्यवसाय तंत्र प्रदर्शनी चे आयोजन मुंगसाजी महाराज कॉलेज दारव्हा येथे करण्यात आले होते. त्यात तांत्रिक गट =25 प्रतिकृति, वाणिज्य गट =7, कृषि गट=18 असे उपस्थित मॉडेल होते, त्यात आपल्या महाविद्यायाचे तांत्रिक गट=1 व वाणिज्य गट =1 यांनी सहभाग घेतला होता, त्यात वाणिज्य गटातून द्वितीय क्रमांक प्राप्त झाला असुन प्रमाणपत्र, गौरव चिन्ह देण्यात आले व आपल्या दोन विभागानी सहभाग घेतला यांचे प्रमाणपत्र ही मिळाले. सर्व विद्यार्थ्यांचे भरपूर अभिनंदन !

टी.डी.आर.एफ. यांच्यामार्फतआपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे राष्ट्रीय सेवा योजना व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 7/12/23 रोजी टी डी आर एफ यांच्यामार्फतआपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले टी डी आर एफ चे प्रशिक्षक श्री. हरिश्चंद्र राठोड यांनी विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना नैसर्गिकरीत्या व मानवनिर्मित आपत्तीमध्ये बचाव कसा करावा, तसेच पूर, भूकंप या ठिकाणी प्रथमोपचार कसे करावेत याचे प्रशिक्षण दिले.
प्राचार्य डॉ.वर्षा कुलकर्णी यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात सावध राहून काळजी कशी घ्यावी याविषयी सविस्तर सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रा.से.यो कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी तर आभार प्रदर्शन कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका डॉ. वैशाली बेडेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकानी परिश्रम घेतले.

संवैधानिक मूल्य व मानवी मूल्यांवर आधारित जनजागृती

अनुभव शिक्षा केंद्र यांच्या वतीने 'बाबाजी दाते कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय यवतमाळ' येथे दिनांक ४-१०-२०२३ रोजी संवैधानिक मूल्य व मानवी मूल्यांवर आधारित जनजागृती पर कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षक मा.डॉ.वैशाली बेडेकर मॅडम तर प्रमुख मार्गदर्शिका म्हणून अनुभव शिक्षा केंद्राच्या मा.प्रगती राऊत मॅडम उपस्थित होत्या. संविधानाच्या उद्देशपत्रिका वाचनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली.
अनुभव शिक्षा केंद्र यवतमाळच्या प्रमुख मार्गदर्शिका मा.प्रगती राऊत मॅडम विद्यार्थ्यांना संबोधताना म्हणाल्या "आता काळ मोठा कठीण आला आहे, जागोजागी संवैधानिक मूल्यांची पायमल्ली होताना दिसत आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, लोकशाही, गणराज्य, समाजवाद, समानता ही तत्वे पायदळी तुडवल्या जात आहेत. यासाठी तुमच्यासारख्या तरुण विद्यार्थ्यांनी संवैधानिक मूल्यांची जपणूक व रुजवणूक केली पाहिजे; ती काळाची गरज आहे" यासाठी प्रात्यक्षिक करून त्यांनी संवैधानिक मूल्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. आज मानवता व माणुसकी या मूल्यांचा ऱ्हास होताना दिसत आहे. मानवाला संवेदनशील होण्यासाठी काही स्फूर्तीदायी व प्रेरणादायी गीतांचे बहारदार सादरीकरण मा. प्रगती राऊत यांनी केले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना मा.डॉ. वैशाली बेडेकर मॅडम म्हणाल्या की, "आपल्या महाविद्यालयाची विद्यार्थी असलेल्या माननीय प्रगती राऊत या अनुभव शिक्षा केंद्राद्वारे प्रत्येक शाळा- महाविद्यालयात जाऊन संवैधानिक मूल्य व मानवी मूल्य रुजवण्याचे अतिशय महत्त्वपूर्ण कार्य करीत आहे याचा आम्हाला अभिमान आहे. अशा आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांना नक्कीच चांगला फायदा होतो" हे सांगत त्यांनी कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले. मा.प्राध्यापक राम पंचभाई, मा.डॉ.स्वाती जोशी, मा. प्राध्यापक जयश्री चापोरकर यांनी कार्यक्रमाविषयी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.वैभव डब्बावार यांनी केले तर प्रा.सारिका नंदे यांनी आभार व्यक्त केले. महाविद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, तासिका तत्त्वावरील शिक्षक व सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमास भरभरून प्रतिसाद राहिला.

२०२३ च्या उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेत उत्तम यश

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळच्या विद्यार्थ्यांचे २०२३ च्या उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेत उत्तम यश
उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेचा निकाल २५ मे २०२३ रोजी जाहीर झाला. यात बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. वाणिज्य शाखा (इंग्रजी माध्यम) चे ९०%, वाणिज्य शाखा (मराठी माध्यम) चे ८४.८०%, कला शाखा (मराठी माध्यम) चे ६९.८९% व व्यवसाय अभ्यासक्रमाचे (MCVC) ९४.८२% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखा (इंग्रजी माध्यम) ची कु. साक्षी किशोर चारमुले ही ९१.६७% मिळवून, वाणिज्य शाखा (मराठी माध्यम) चे कुणाल संतोष मेटकर व राहुल अनिल भिसनकर- हे ८३.१७% मिळवून, कला शाखा (मराठी माध्यम) ची कु. वैष्णवी विजय चारमोडे ही ८२.८३% मिळवून व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाची कु. गौरी अजय सहारे ही ७४.३३% मिळवून आपापल्या शाखेत प्रथम क्रमांकावर आले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे पदाधिकारी व विद्यालयाचे शिक्षक यांनी अभिनंदन व कौतुक केले.

लसीकरण शिबिराचे आयोजन

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे, राष्ट्रीय सेवा योजना व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दी.२७/१/२०२२ ते २८/१/२०२२ असे २ दिवस १५ ते २५ वयो गटासाठी लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम ह्यांनी लसीकरणाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले तर सहकार्यक्रम अधिकारी डॉ.जयस्वाल ह्यांनी लसीकरणाचे फायदे सांगून लस घेण्याचे आव्हान केले.
कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.पंचभाई ह्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थी लसीकरणाला येतील यांची व्यवस्था करून लसीकरण कोविड पासून वाचण्याचे कसे सुरक्षा कवच आहे हे सांगितले.
जिल्हा परिषद आरोग्य विभागा तर्फे डॉ. शिवराज दरारे, नर्स दिक्षा डंभारे, व मेरी कोरील, प्रोजेक्ट कॉरडीनेटर संदिप घोडे या कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले तर राष्ट्रीय सेवा योजनेच्या निशांत मडावी, कोमल काळे, मनीषा मोकाशे, खुशी नंदनवार, साक्षी चव्हाण, रश्मी परसराम, कुणाल बेंद्रे ह्यांनी सहकार्य केले.