बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ 

Babaji Datey Kala & Vanijya Mahavidyalaya, Yavatmal

(वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ ट्रस्ट रजि. क्र. ई-३२ द्वारा संचालित)

NAAC Accredited B++ Grade with CGPA 2.82

गृहअर्थशात्र विभाग – इव्हेंट मॅनेजमेंट शिकण्याकरिता बर्थडे पार्टीचे आयोजन

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील गृह अर्थशास्त्र विभागाच्या वतीने दिनांक 27/2/2024 रोजी बी.ए. 3 सेमिस्टर 6 च्या अंतर्गत इव्हेंट मॅनेजमेंट शिकण्याकरिता बर्थडे पार्टीचे आयोजन प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.
गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वैशाली मेश्राम यांनी विद्यार्थिनींना गृह अर्थशास्त्र अंतर्गत इव्हेंट मॅनेजमेंटची भूमिका स्पष्ट करून सांगितली व कार्यक्रमा मागचा उद्देश सांगितला.  कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले श्री विनायक दाते यांनी विद्यार्थिनींना इव्हेंट मॅनेजमेंट चे महत्व सांगून दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळे इव्हेंट कसे साजरे केले जातात हे सांगून हितगुज केले. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर वर्षा कुलकर्णी यांनी विद्यार्थिनींना जिवनामध्ये नियोजनाचे महत्व विषद करून उत्कृष्टरित्या सादर   केलेल्या समारंभाचे कौतुक करून पुढील कार्यक्रमाकरिता शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता प्रा. हेमा गुल्हाणे ह्यांनी परिश्रम घेतले.

कौशल्य विकास अंतर्गत दिवाळी वस्तुची प्रदर्शनी व विक्री

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना व गृहअर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी वस्तुंचे प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे आयोजन दि. 7/11/23 रोजी प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.
प्रदर्शनीचे उद्घाटक म्हणून महाविदयालयाच्या प्राचार्या डॉ. वर्षा कुलकर्णी ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणुन सिनेट सदस्य प्रा हरिदास धुर्वे उपस्थित होते
रा.से. यो. कार्यक्रम अधिकारी व गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वैशाली मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना विविध वस्तु स्वतः तयार करून विकण्यात वेगळा आनंद मिळतो हे सांगुन, स्वयंरोजगाराचे महत्व पटवून दिले. रा.से.यो. सह कार्यक्रम अधिकारी डॉ . सचिन जयस्वाल यांनी प्रदर्शनी लावण्यास मदत करून विक्री कौशल्य शिकवले.
विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराचे महत्व समजण्यासाठी दिवाळी निमित्त वापरण्यात येणाऱ्या विविध वस्तु विद्यार्थ्यांनी बनवुन विक्री केली. यामध्ये आकर्षक दिवे, आकाश दिवे, तोरण, फुलांच्या माळा, रांगोळी, तसेच खाद्य पदार्थांचा समावेश होता.
विद्यार्थ्यांनी विक्री कले द्वारे ग्राहकांना आकर्षित केले. प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी विविध वस्तुची खरेदी करून रा. से. यो. विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
सदर कार्यक्रमासाठी दिपाली ठाकरे ठाकरे रश्मी परसराम, रोहन  गायकवाड, मंगेश लोंढे, वैष्णवी बघमारे, सौजन्या, आदित्य वेळुकार, अर्थराज  राठोड, तुषार दडांजे यांनी परिश्रम घेतले.

विद्यार्थिनींसाठी कापडी टॉईज बनवण्याचे प्रशिक्षण

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे गृह अर्थशास्त्र विभागाच्या वतीने बी.ए.-3 च्या विद्यार्थिनींसाठी कापडी टॉईज बनवण्याचे प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन दिनांक 28-10-2023 रोजी प्राचार्य वर्षा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.
गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वैशाली मेश्राम यांनी विद्यार्थिनींना अर्थार्जनासाठी कापडी बाहुल्या व खेळणे कशी महत्त्वाची भूमिका बजावतात व त्यापासून आपल्याला अर्थार्जण कसे करता येते, हे सविस्तर सांगितले व कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला प्रशिक्षक म्हणून लाभलेल्या सौ. प्रतिभा मारबते यांनी विद्यार्थिनींना वेगवेगळ्या कापडापासून टॉईज बनवण्याचे प्रशिक्षण दिले  विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या आकाराचे टॉईज बनवले.
कार्यक्रमाच्या  यशस्वीते  करिता प्रा. हेमा गुल्हाने, रश्मी परसराम, सपना निमसरकार, सृष्टी येडमे, रेणुका टापरे, भारती छापेकर यांनी परिश्रम घेतले.

भरडधान्य डिश डेकोरेशन स्पर्धेचे आयोजन

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे गृह-अर्थशास्त्र विभागाच्या वतीने बीए भाग 2 च्या विद्यार्थिनींसाठी भरडधान्य डिश डेकोरेशन स्पर्धेचे आयोजन दि. 27-10- 2023 रोजी प्राचार्य वर्षा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.
गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वैशाली मेश्राम यांनी विद्यार्थिनींना भरडधान्य म्हणजे काय ?  ते सांगून मिळणाऱ्या पोषक घटकांची माहिती दिली. तसेच प्रा. हेमा गुल्हाने यांनी विद्यार्थिनींना वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस कशा बनवायच्या व त्याची मांडणी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता दिपाली ठाकरे, वैष्णवी बगमारे, माधुरी अडाळकर, आचल भोंडे, जयश्री रेकुलवार, आचल भुसारे यांनी परिश्रम घेतले.

फ्रेश व शुष्क पुष्परचना कार्यशाळेचे आयोजन

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे दि.6/10/23रोजी गृह अर्थशास्त्र विभागाच्या वतीने बीए भाग 1 अभ्यासक्रमांतर्गत फ्रेश व शुष्क पुष्परचना कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वैशाली मेश्राम यांनी विद्यार्थिनींना कार्यशाळा घेण्यामागचा उद्देश सांगून अर्थार्जनासाठी ही कार्यशाळा कशी महत्त्वाची आहे हे पटवून दिले, तर महाविदयालयाच्या प्राचार्य डॉ.वर्षा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यीनींना अशा कार्यशाळा विद्यार्थी जीवनामध्ये काय भूमिका बजावतात हे सांगून  कला गुण जोपासून अर्थार्जन करावे असा सल्ला दिला, कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या अंकिता  वांढरे यांनी विद्यार्थिनींना बटर पेपर, वेलवेट  पेपर, सॉक्स पेपर, ऑरगंडी कापड, तसेच वेगवेगळ्या पेपर्स पासून फुले कशी बनवायची हे सविस्तर शिकवले व विविध प्रकारच्या पुष्परचना करून दाखविल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता प्रा. हेमा गुल्हाणे, दिपाली ठाकरे, वैष्णवी कुमरे, दिव्या कुडमेथे,  निंशा नैताम, अंकिता मडावी, सृष्टी येडमे, महेश्वरी आत्राम, निकिता मेश्राम व रश्मी परसराम ह्यांनी परिश्रम घेतले

पोषण आहार सप्ताह - बक्षीस वितरण

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील गृहअर्थशास्त्र विभागाच्या वतीने दिनांक 01ते O7 सप्टेंबर पोषण आहार सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. सप्ताह अंतर्गत अंतिम कार्यक्रम दि. 07/09/2023 रोजी करण्यात आला. त्या अंतर्गत पोषण सुंदरी स्पर्धा व बक्षीस वितरण कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वैशाली मेश्राम यांनी विद्यार्थिनींना स्पर्धा घेण्यामागचा उद्देश सांगुन राबवलेल्या पूर्ण पोषण आहार सप्ताहाच्या आढावा दिला. प्रमुख मार्गदर्शक व परिक्षक  म्हणून उपस्थित असलेल्या डॉ. राऊत यांनी विद्यार्थिनींना रोजच्या त्यातील पोषक घटकातून सौंदर्य कसे जपता येईल हे सविस्तर सांगितले आणि कडधान्यापासून बनवलेल्या दागिन्यांनी नटलेल्या पोषण सौंदर्यवतींनी परिधान केलेले दागिने स्वरूपी पोषक घटक हे आहारात देखील आणणे तेवढेच महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन केले.
झालेल्या स्पर्धांमधून तीन क्रमांक काढण्यात आले  प्रथम क्रमांक रश्मी परसराम  व दिपाली ठाकरे द्वितीय क्रमांक साक्षी कैतवार व प्रिंयका शिरबंदी तृतीय क्रमांक माधुरी अड्याळकर व आचल बोदे   आणि प्रोत्साहनपर बक्षीस अंकिता बुटले व दामिनी गायकवाड  यांना प्राप्त झाला. सप्ताह भर  झालेल्या सर्व स्पर्धेचे बक्षीस वितरण प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी व प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या डॉ. राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली ठाकरे हिने तर आभार प्रदर्शन सायली प्रधान हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता प्रा. सारिका नंदे प्रा. हेमा गुल्हाणे तसेच वैष्णवी बगमारे, प्रतिक्षा काटे, अंजली उईके देवयानी वानखडे इ. विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले.

गृहअर्थशात्र विभाग - पोषण सप्ताह

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील गृहअर्थशास्त्र विभागाच्या वतीने दिनांक 01ते O7 सप्टेंबर पोषण सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.
सप्ताह अंतर्गत दुसरा कार्यक्रम दि. 04/09/2023 रोजी करण्यात आला. त्या अंतर्गत पोषक घटकापासून बनवलेल्या डिश डेकोरेशन स्पर्धा व कडधान्यापासून बनवलेल्या विविध रांगोळी स्पर्धा चे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वैशाली मेश्राम यांनी विद्यार्थिनींना स्पर्धा घेण्यामागचा उद्देश सांगून कार्यक्रमाचे महत्त्व सविस्तर सांगितले. प्रमुख मार्गदर्शक व परिक्षक  म्हणून उपस्थित असलेल्या डॉ. सारिका शहा व रोटरी क्लबच्या सरिता वाधवाणी यांनी विद्यार्थिनींना पोषक रेसिपी विषयी सविस्तर माहिती सांगितली व त्याचे रोजच्या आहारात काय महत्त्व आहे हे पटवून दिले.
झालेल्या स्पर्धांमधून प्रत्येकी तीन क्रमांक काढण्यात आले डिश डेकोरेशन स्पर्धेत प्रथम क्रमांक दिपाली ठाकरे, द्वितीय क्रमांक नम्रता मराठे, तृतीय क्रमांक अंजली उईके, यांना प्राप्त झाला तर रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक अंजली उईके,  द्वितीय क्रमांक देवयानी बरडे ,व तृतीय क्रमांक दिपाली ठाकरे यांना प्राप्त झाला.
कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता प्रा. सारिका नंदे प्रा. हेमा गुल्हाणे तसेच  देवयानी वानखडे पायल सुरपाम , रश्मी परसराम वैष्णवी बगमारे इ. विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले.

 

रक्षाबंधन निमीत्य राखी मेंकींग  प्रदर्शनी व विक्री तसेच मेहंदीस्पर्धेचे आयोजन

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे, दि. २९/८/२३ रोजी गृह अर्थशास्त्र विभागाच्या वतिने रक्षाबंधन निमीत्य राखी मेंकींग  प्रदर्शनी व विक्री तसेच मेहंदीस्पर्धेचे आयोजन प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.
गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वैशाली मेश्राम ह्यांनी विद्यार्थीनींना स्पर्धेमागचा उद्देश सांगुन, विद्यार्थ्यांनी बनविलेल्या राख्यांचे कौतुक केले तसेच प्रा.हेमा गुल्हाने यांनी विद्यार्थींनीना अश्या स्पर्धा विदयार्थी दशेत कश्या महत्वाच्या आहेत हे सांगून, त्यांचे मनोबल वाढविण्यात आले. आलेल्या राख्यांमधुन पहिला क्रमांक  देवयानी बरडे, दुसरा क्रमांक  खुशी नंदनवार तर तिसरा क्रमाक देवयानी वानखडे हिचा काढण्यात आला तर मेहंदी स्पर्धेत प्रथम क्रमांक दामिनी बुटले,  दुसरा वैष्णवी शिकराम, तिसरा राजनंदिनी आडे हिचा आला स्पर्धेचे परिक्षण भुगोल विभाग प्रमुख डॉ. कल्पना देशमुख ह्यांनी केले, यावेळी विद्यार्थीनींनी राख्या विकुन अर्थाजन केले. कार्यक्रमांच्या यशस्वीतेकरिता  रश्मी परसराम, भाग्यश्री राठोड, वेदिका भिलाये, ह्यांनी परिश्रम घेतले.

गृहअर्थशात्र विभाग - अभ्यास मंडळ 2023-2024

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील गृह अर्थशास्त्र विभागातर्फे अभ्यास मंडळाचे उद्घाटन  दि. 28/07/2023 रोजी करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वैशाली मेश्राम यांनी विषयाचे महत्त्व सांगून अभ्यास मंडळ स्थापनेचा उद्देश सविस्तर सांगितला. तसेच प्रा. हेमा गुल्हाने यांनी विद्यार्थिनींना वर्षभर करावयाच्या विविध उपक्रमाची माहिती देऊन उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवा असे आवाहन केले. अभ्यास मंडळाचे उद्घाटक तसेच अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.वर्षा कुलकर्णी ह्या होत्या, यांनी अभ्यास मंडळाचे उद्घाटन करून विद्यार्थिनींना गृह अर्थशास्त्र विभाग हा महाविद्यालयाचा अविभाज्य घटक कसा आहे हे सविस्तर सांगितले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अभ्यास मंडळाच्या अध्यक्षस्थानी रश्मी परसराम,  उपाध्यक्ष दिपाली ठाकरे,  कोषाध्यक्ष रेणुका टापरे,  सचिव पल्लवी कुमरे व एकूण दहा विद्यार्थिनींची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. अभ्यास मंडळात नियुक्त झालेल्या विद्यार्थिनींनी  आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली ठाकरे हिने तर आभार प्रदर्शन रेणुका टापरे हिने केले. कार्यक्रमाचे यशस्वी ते करिता काजल पोहनकर, प्रत्युषा पाटील, सपना निमसरकार, भारती छापेकर, गायत्री दुबे आणि पायल सुरपाम यांनी परिश्रम घेतले

 

गृहअर्थशास्त्र विभागाच्या वतीने मॉड्युलर घराला भेटीचे आयोजन

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय येथील गृहअर्थशास्त्र विभागाच्या वतीने मॉड्युलर घराला भेटीचे आयोजन दि. 03/04/2023 रोजी प्राचार्य डॉ. विवेक देशमुख यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.
गृह अर्थशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थिनींना मॉडुलर घराची संकल्पना समजण्यासाठी तसेच मॉड्युलर किचन, इंटेरियर डेकोरेशन कशा पद्धतीचे असते  हे जाणून घेण्यासाठी सदर भेटीच्या आयोजन करण्यात आले.
गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वैशाली मेश्राम यांनी विद्यार्थिनींना भेटी मागचा  हेतू सांगून आधुनिक युगात मॉडुलर घर कशी महत्वाची भूमिका बजावते हे सविस्तर सांगुन अहवालामध्ये कोणकोणते घटक समाविष्ट करावे याची सविस्तर माहिती दिली तसेच प्रा. हेमा गुल्हाने यांनी विद्यार्थिनींना मॉड्युलर घरामध्ये कोणत्या कोणत्या नवीन बाबी समाविष्ट करण्यात आल्या हे सांगून उद्योजकतेच्या दृष्टिकोनातून ह्या कशा महत्त्वाच्या आहे हे सांगितले, तसेच ज्यांच्या घराला भेट देण्यात आली अशा जोत्स्ना भाटपुरे यांनी विद्यार्थिनींना घराची संकल्पना, दिशेचे ज्ञान व रंगसंगती या करताना कोणत्या अडचणी आल्या व त्याची निराकरण  कश्या पध्दतीने झाले हे सविस्तर सांगितले.
सदर भेटीमध्ये विद्यार्थिनींनी अशी सर्व माहिती ग्रहण करून अहवालाचे लेखन केले.

अभ्यास मंडळ उद्घाटन कार्यक्रम

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील  गृहअर्थशास्त्र विभागाच्या वतीने गृहअर्थशास्त्र अभ्यास मंडळ उद्घाटन कार्यक्रम व केक चॉकलेट प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 03/12/2022  रोजी करण्यात आले सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या प्रा. अनिता येंडे  यांच्या हस्ते गृहअर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे उद्घाटन करण्यात आले व त्यांनी गृहअर्थशास्त्राचे महत्व सांगुन विद्यार्थिनींना केक चॉकलेटचे प्रशिक्षण दिले. तसेच केक व चॉकेलेट  घरच्या घरी बनवून अर्थार्जन कसे करता येईल हे सागितले
गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वैशाली मेश्राम यांनी विद्यार्थिनींना अभ्यास मंडळ स्थापने मागचे उद्दिष्ट सांगून वर्षभर करावयाच्या कार्याचा आढावा दिला. अभ्यास मंडळाचे अध्यक्ष म्हणून रश्मी परसराम उपाध्यक्ष म्हणून शिवाणी पुसनाके कोषाध्यक्ष कोमल काळे व सचिव म्हणून जुई काळे यांची निवड करण्यात आली.
कनिष्ठ महाविद्यालयातील गृह अर्थशास्त्रच्या प्रा. आशा गादे यांनी विद्यार्थिनींना कार्यशाळा घेण्यामागचे उद्दिष्टे सांगितले तसेच प्रा. सारिका नंदे यांनी विद्यार्थिनींना गृह अर्थशास्त्र हा विषय अर्थार्जनासाठी कसा उपयोगी आहे हे स्पष्ट करून सांगितले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रेरणा पाटील, दिपाली ठाकरे, प्रिया दोनाडकर यांनी परिश्रम घेतले.

गृहअर्थशात्र विभागांतर्गत प्रकल्प भेट

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील गृहअर्थशास्त्र विभागांतर्गत प्रकल्प भेट दिनांक 18/11/2022 आयोजित करण्यात आली.
गृहअर्थशास्त्र विषयाच्या विद्यार्थिनींना स्वयंरोजगार व गृह उद्योग करण्याकरिता प्रोत्साहन देण्यासाठी सृजन प्रकल्प पांढरकवडा येथे एक दिवशीय शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले या प्रकल्पामध्ये  बांबू शेती मार्गदर्शन विषयक माहिती देऊन विद्यार्थिनींना बांबुचे एकुण 80 प्रकार दाखविण्यात आले व या द्वारे विविध कलात्मक वस्तु बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्याच बरोबर विविध गृह उद्योगाची माहिती सृजन प्रकल्प प्रमुख अजय डोळस यांनी दिली  व विद्यार्थिनींना पारंपारिक शेती न करता बांबू शेती  हा पर्याय सांगितला.
आयोजित प्रकल्पामध्ये गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वैशाली मेश्राम यांनी विद्यार्थिनींना प्रकल्प घेण्यामागचा हेतू सांगून बांबूद्वारे विविध वस्तू बनवून रोजगार कसा मिळतात हे सविस्तर सांगितले तसेच प्रा. सारिका नंदे यांनी विद्यार्थिनींना अर्थार्जनासाठी फक्त नोकरी पर्याय न ठेवता स्वयंरोजगार करा असे आवाहन केले.
सदर प्रकल्प भेटीमध्ये विद्यार्थिनींनी सहभोजनाचा आनंद लुटला व मनोरंजनात्मक शिक्षण घेतले.

फुलांचे विविध प्रकार व त्यांची मांडणी

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील गृहअर्थशास्त्र विभाग यांच्या वतीने फुलांचे विविध प्रकार व त्यांची मांडणी ही एक दिवशीय कार्यशाळा दिनांक 16/11/2022 रोजी आयोजित करण्यात आली.
प्रस्तुत कार्यशाळेत विभाग प्रमुख डॉ. वैशाली मेश्राम यांनी विद्यार्थिनींना फुलांचे विविध प्रकार सांगून त्याद्वारे करण्यात येणारी रंग योजना व आकर्षक मांडणी हे प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितले विद्यार्थिनींनी कल्पकतेतून फुलांची मांडणी केली व कलात्मक रांगोळी रेखाटल्या.
प्रस्तुत कार्यशाळेच्या यशस्वी ते करिता दिपाली ठाकरे वैष्णवी बुल्ले, प्रिया डोनादकर, राखी मैंद, पलक तेलंग यांनी परिश्रम घेतले.

कौशल्य विकास अंतर्गत दिवाळी वस्तुची प्रदर्शनी व विक्री

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना व गृहअर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी वस्तुंचे प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे आयोजन दि.१९/१०/२०२२ प्राचार्य डॉ. कल्पना देशमुख यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.
प्रदर्शनीचे उद्घाटक म्हणून माजी सिनेट सदस्य व इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. विवेक देशमुख हे होते. रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी व गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वैशाली मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना विविध वस्तु बनवण्यासाठी मदत केली व स्वयंरोजगाराचे महत्व सांगितले. रा.से.यो. सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांनी प्रदर्शनी  कशी लावायची हे सांगुन विक्री कौशल्य शिकविले
विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराचे महत्व समजण्यासाठी दिवाळी निमित्त वापरण्यात येणाऱ्या विविध वस्तु विद्यार्थ्यांनी बनवुन विक्री केली. यामध्ये आकर्षक दिवे, आकाश दिवे, तोरण, फुलांच्या माळा तसेच खाद्य पदार्थांचा समावेश होता.
विद्यार्थ्यांनी विक्री कले द्वारे ग्राहकांना आकर्षित केले. प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी विविध वस्तुची खरेदी करून रा.से.यो. विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सदर कार्यक्रमासाठी सुज्वल खंडारकर, निखिल होलगरे, मंगेश लोंढे, शौकत, अखिल सय्यद, रंजित वाघमारे, खुशी सहारे, सेजल भजगवळे, जयश्री रेकुलवार, सायली प्रधान, कृतिका चिंटे, स्नेहल यांनी परिश्रम घेतले.

रान भाजी, वन औषधी व पोषक अन्न प्रदर्शनी

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील गृहअर्थशास्त्र विभाग व राष्ट्रीय योजना यांच्या संयुक्त विद्यमाने पोषण महिन्या अंतर्गत दि. 30/09/2022 रोजी रान भाजी, वन औषधी, व पोषक अन्न प्रदर्शनी व माहिती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
रा. से.यो.कार्यक्रम अधिकारी तथा गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वैशाली मेश्राम यांनी विद्यार्थी व आलेल्या पाहुण्यांना रान भाज्यांचे महत्व तसेच वन औषधी घेतल्याने कसा फायदा होतो हे सांगुन प्रदर्शना मागची भुमिका स्पष्ट केली. रा.से.यो. सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांना सुदृढ राहण्यासाठी सकस आहार कसा गरजेचा आहे हे सांगुन विद्यार्थ्यांनी लावलेल्या प्रदर्शनीचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता दिपाली ठाकरे, राखी मैंद, रश्मी परसराम, प्रार्थना इंगोले, संपना निमसरकार, प्रेरणा पाटील, सृष्टी येडमे, खुशी नंदनवार, पलक भगत यांनी परिश्रम घेतले.

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे दि. 14/09/2022 राष्ट्रीय सेवा योजना व गृह अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पोषण महीना अंतर्गत पोषण विषयक माहिती व पोषक अन्नाचे वाटप मडकोणा या गावी करण्यात आले.
रा.से.यो. विद्यार्थ्यांनी शालेय विद्यार्थ्यांना व बालकांना संस्कार गीते गाऊन पोषक अन्नाचे वाटप केले. रो. से.यो. कार्यक्रम अधिकारी व गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वैशाली मेश्राम यांनी गर्भवती महिलांना व विद्यार्थ्यांना पोषणाचे महत्व सांगुन आहार विषयक मार्गदर्शन केले. सह क्रार्यकम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील समस्या समजुन सांगुन राबवायच्या उपक्रमाची माहिती दिली.
यावेळी विद्यार्थ्यांनी कडधान्याच्या रांगोळी काढून कडधान्याचे महत्व व स्वतःहा तयार केलेल्या पोषक अन्नाचे महत्व सांगीतले व पोषक आहाराची अन्नातील भुमिका स्पष्ट केली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता रोहन गायकवाड , रश्मी परसराम, प्रार्थना इंगोले, कोमल काळे, सृष्टी येडमे, खुशी नंदनवार, रागीणी रिठे, निशा पेंदोर, दिपाली ठाकरे, प्रिया दोनाडकर, उल्हास चव्हाण, योगेश महाजनकर यांनी परिश्रम घेतले

स्तनपान सप्ताह आणि राखी प्रदर्शन

बाबाजी दाते कलाआणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे गृह अर्थशास्त्र विभागाच्या अंतर्गत स्तनपान सप्ताहानिमित्य राबवलेल्या विविध उपक्रमाची प्रदर्शनी तसेच राखी प्रदर्शनी चे आयोजन दि.10/8/22 रोजी करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. कल्पना देशमुख होत्या. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. स्नेहल डहाळे, डॉ वर्षा कुलकर्णी, डॉ. आशालता आसुटकर ह्या होत्या.
गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वैशाली मेश्राम ह्यानी स्तनपान सप्ताह राबविण्यामागची भूमीका स्पष्ट केली, तसेच राखी बनविणे ही एक कला असून उद्योजकता या उपक्रमातून कशा पद्धतीने निर्माण करता येते हे सविस्तर सांगीतले. उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवून कौतुक केले. सदर प्रदर्शनी मधुन प्रत्येकी तिन क्रमांक काढण्यात आले व राख्याची विक्री करण्यात आली. प्रदर्शन यशस्वी करण्याकारीता रश्मी परसराम, जुई काळे, चैताली जाधव, दिपाली ठाकरे, वैष्णवी ठाकरे, वैष्णवी बुल्ले, राखी मैद ह्यांनी परिश्रम घेतले.

दाते कॉलेज मध्ये गृह अर्थशास्त्र विभागाचा चहा पानाचा कार्यक्रम

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील गृह अर्थशास्त्र विभागाच्या वतीने दि. २०/०४/२०२२ रोजी  चहा पानाचे आयोजन करण्यात आले.
बी.ए भाग ३ सेमीस्टर ६ च्या सत्र कार्यांतर्गत व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शन व विकास ह्या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. कल्पना देशमुख यांनी विद्यार्थ्यांना  व्यक्तिमत्व विकासासाठी अशा कार्यक्रमाची काय भुमिका असते हे सांगितले. गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वैशाली मेश्राम यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाचा उद्देश सांगितला.
सदर कार्यक्रमामध्ये सर्व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांशी हितगुज केले व चहापानाचा आनंद घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता बी.ए. भाग ३ च्या विद्यार्थीनींनी परिश्रम घेतले.

कमवा आणि शिका या योजने अंतर्गत दाते कॉलेज मध्ये आनंद मेळावा

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ, येथे गृहअर्थशास्त्र विभागातर्फे नव वर्षाचे स्वागत म्हणून दिनांक १/०१/२०२२ रोजी गृहअर्थशास्त्र विभागातर्फे कमवा व शिका या योजने अंतर्गत प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
आनंद मेळाव्यामध्ये विविध खाद्यपदार्थ आणि वस्तूंची विक्री करण्यात आली.  विद्यार्थिनींनी बनविलेले पदार्थ कसे पौष्टिक आहेत हे विभाग प्रमुख डॉ.वैशाली मेश्राम यांनी पटवून दिले. विद्यार्थिनींनी शिक्षणातून स्वतःच्या कलागुणांद्वारे कशी प्रगती करता येईल हे सविस्तर सांगून आनंद मेळाव्याची सुरुवात करण्यात आली. मेळाव्याचे उदघाटन प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी आणि प्रा. डॉ. विवेक देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. एकूण 15 stalls लावण्यात आले होते.  विद्यार्थिनी आणि प्राध्यापकानी विविध पदार्थांचा आस्वाद घेतला. विद्यार्थिनींनी बनविलेल्या विविध वस्तू विकत घेवून विद्यार्थिनींना उत्तेजन देण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता खुशी नंदनवार, प्रार्थना इंगोले, रश्मी परसरल, साक्षी चव्हाण, दिव्या डोमे, दिक्षा आडे, ह्यांनी परिश्रम घेतले.

दाते कॉलेजच्या विद्यार्थिनींची वर्धा येथे शैक्षणिक सहल

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ च्या गृहअर्थशास्त्र विभागा तर्फे  एक दिवसीय शैक्षणिक सहलीचे आयोजन वर्धा येथे  दि. २४/१२/२०२१ रोजी करण्यात आले.
शैक्षणिक प्रकल्प भेटी अंतर्गत मगध संग्रालय येथे वस्त्रउदयोगाला भेट देण्यात आली. गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.वैशाली मेश्राम यांनी वस्त्र कसे तयार होते, तसेच प्रिंटिंग व रंगाई कशी केली जाते यांची माहिती दिली. तेथील अश्विनी मॅडम यांनी प्रात्याक्षिक दाखविले. त्यानंतर ग्रामविज्ञान केंद्राला भेट देण्यात आली. तेथील प्रमुख श्री आशिष यांनी ग्रामउदयोग व नैसर्गिक रित्या खत आणि फवारणीसाठी वापरल्या जाणाऱ्या कीटक नाशकांची  निर्मिती प्रक्रिया समजाऊन सांगितली.
कागद निर्मिती, रंग निर्मिती व फेकलेले कापड व कागद यापासून नवीन कागद व पुठ्ठा निर्मितीचे प्रशिक्षण विद्यार्थिनींना देण्यात आले. विद्यार्थिनी मध्ये दयाभाव व सेवावृत्ती निर्माण होण्यासाठी करुणाश्रम येथे भेट देण्यात आली. जखमी वन्यप्राणी दाखविण्यात आले व त्यांचा इलाज झाल्यानंतर त्यांना कशा प्रकारे जंगलात सोडून दिल्या जाते हे तेथील मेघा ताई यांनी समजावून सांगितले.
प्रा. डॉ वैशाली मेश्राम मॅडम व प्रा.सारिका नंदे ह्यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देऊन शैक्षणीक सहलीचे यशस्वी आयोजन केले. या सहली करिता नेहा पवार, रश्मी परसराम, साक्षी चव्हाण, प्रार्थना इंगोले, दिशा आडे, खुशी नंदनवार, दिव्या डोमे,  पूजा डंभारे, यांनी सहकार्य केले.

दाते कॉलेज मधे एक दिवसीय पुष्परचना कार्यशाळेचे आयोजन

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे १० डिसेंबर २०२१ रोजी एक दिवसीय पुष्परचना कार्यशाळेचे आयोजन गृह अर्थशास्त्र व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमान करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी होत्या. अध्यक्षीय भाषणात सौन्दर्य निर्मितीसाठी पुष्परचना कशी महत्वाची आहे यावर प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.  गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी महाविद्यालयात कार्यक्रमासाठी बुके आणि हार लागतात त्यावर विद्यार्थ्यांनी बनविलेले बुके वापरून वर्षभराचा खर्च कसा वाचवता येईल, तसेच टाकावू सामानांपासून सुंदर पुष्परचना कशा तयार करता येतील हे प्रशिक्षणाद्वारे शिकविले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कनिष्ठ महाविद्यालय गृहअर्थशास्त्रच्या प्रा. सारिका नंदे उपस्थित होत्या.  कु. प्रणाली अगलधरे यांनी पुष्परचना आणि बुके विकून स्वयंरोजगार कसा करता येईल याचे सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे आयोजक व मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे सह कार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांनी परिश्रम घेतले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी रश्मी परसराम, दिव्या भगत, साक्षी चव्हाण, कोमल काळे, स्नेहल किनाके यांनी परिश्रम घेतले.

अभ्यास मंडळ अंतर्गत उदघाटन व व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमाचे आयोजन...

३ डिसेंबर २०२१ रोजी स्थानिक बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ येथे गृहअर्थशास्त्र विभागाच्या वतीने गृहअर्थशास्त्र अभ्यासमंडळाची स्थापना, उदघाटन आणि व्यक्तिमत्व विकास उद्बोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
स्थानिक बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयमध्ये शैक्षणिक दृष्टीकोनातून वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते ज्या मधून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले जाते. व्यक्तिमत्व विकासासाठी कोणते कला गुण अंगी असावे तसेच कलागुण जोपासण्यासाठी काय प्रयत्न करावे यावर कार्यक्रमाचे उद्घाटक तसेच मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आयोजन तथा गृहशास्त्रविभाग प्रमुख डॉ. वैशाली मेश्राम यांनी अभ्यासमंडळाची आवश्यकता आणि अभ्यासमंडळाची उद्दिष्ट्ये सांगितली तसेच व्यक्तिमत्व विकास करताना प्रामुख्याने कोणत्या बाबींकडे लक्ष द्यावे ह्या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले
गृहअर्थशास्त्र अभ्यासमंडळामध्ये अध्यक्ष दिव्या भगत, उपाध्यक्ष स्नेहल किन्नांके, सचिव साक्षी चव्हाण, कोषाध्यक्ष कोमल काळे आणि 10 मुलींची सदस्या  म्हणून निवड करून बॅनरचे रीतसर उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रश्मी परसराम हिने तसेच आभारप्रदर्शन देवयानी बरडे हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता खुशी नंदनवार, लतीका लुटे, पूजा डंभारे व अंकिता वांडरे आदींनी परिश्रम घेतले आहे

महिलाची दिशा आणि दशा

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य माहाविद्यालय गृह अर्थशास्त्र विभाग यांच्या माध्यमातुन महिलाची दिशा आणि दशा या विषयावर  बी. ए. भाग एक च्या विद्यार्थीनीसाठी डॉ. कल्पना कोरडे, शिवशक्ती कॉलेज बाभुळगाव यांचे मागादर्शन पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ कोरडे यांनी अत्याचाराला प्रतिबंध कसा करावा. गरज पडल्यास दामिनी पथकाची कशी मदत घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले.  मित्र असावा परन्तु मित्राचा आई वडिलां सोबत परिचय करून द्यावा असे त्यांनी सांगितले. मित्रांना गैरफायदा घेऊ देऊ नये. नोकरीच्या मागे न लागता स्वंयरोजगार कसा करावा यासाठी सरकारी योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाला प्रभारी प्राचार्य प्रा.पुराणिक  अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या.
आचार्य पदवी प्राप्त केल्याबद्दल डॉ .कल्पना कोरडे  आणि डॉ. सरिता देशमुख यांचा  गृह अर्थशास्त्र विभागातर्फे  प्राचार्य प्रा.पुराणिक यांनी पुष्पगुच्छ आणि भेट देऊन सत्कार केला. या कार्यक्रमाला प्रा. प्रणिता थुल तसेच डॉ सरिता देशमुख या उपस्थित होत्या.

“आरोग्य आणि किशोर अवस्थेतील विविध समस्या”

दिनांक 26 नोव्हेंबर २०१८ रोजी गृहअर्थशात्र विभागा तर्फे माध्यामिक शाळेतील विद्यार्थिनींसाठी “आरोग्य आणि किशोर अवस्थेतील विविध समस्या” या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. सौ. विजया दाते ह्यांनी मागदर्शन केले. त्यांनी सांगितले की स्त्री ही अबला नाही. सरस्वतीदेवी, दुर्गामाता, लक्ष्मीदेवी इत्यादी उदाहरणे देऊन स्त्री पूर्णपणे सक्षम आहे हे पटवून दिले. डॉ विजया दाते यांनी विद्यार्थिनींना त्यांच्या पौंगडावस्थेत होणाऱ्या शारीरिक व मानसिक बदलाची माहिती सांगितली. Good touch व Bad touch यामधील फरक सांगितला व Bad touch ला विरोध करायला शिकविले. या वयात हार्मोन्स मधील होणारे बदलाची माहिती सांगितली. विद्यार्थिनींना संपूर्ण माहिती खूपच उपयुक्त वाटली.
अध्यक्षस्थानी विभाग प्रमुख व प्रभारी प्राचार्य प्रेरणा पुराणिक, संस्थेच्या विश्वस्त सौ. सुषमा दाते उपस्थित होत्या.