बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ 

Babaji Datey Kala & Vanijya Mahavidyalaya, Yavatmal

(वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ ट्रस्ट रजि. क्र. ई-३२ द्वारा संचालित)

NAAC Accredited B++ Grade with CGPA 2.82

ग्रंथालय विभाग : “National Digital Library” या विषयावर डॉ. संजय शेणमारे यांचे online lecture

ग्रंथालय विभागातर्फे शुक्रवार दि.8 मे 2020 रोजी zoom guest lecture चे आयोजन करण्यात आले. डॉ. संजय शेणमारे, ग्रंथालय विभाग प्रमुख, शिवशक्ती महाविद्यालय, बाभूळगाव यांनी National Digital Library of India या विषयावर अत्यंत समर्पक माहिती विद्यार्थ्यांना दिली. चौसष्ट लाखांपेक्षा अधिक ग्रंथ आणि ग्रंथेतर साहित्य digital form मध्ये या ठिकाणी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व भाषांमधील सर्व प्रकारच्या या उपलब्ध साहित्याचा विद्यार्थ्यांनी अधिकतम उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
महाविद्यालयातील कला आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.ग्रंथालय विभाग प्रमुख विजय दीक्षित यांनी प्रारंभी वक्त्यांचा परीचय करून दिला.श्री. अनूज रेचे यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले.

 

E-learning : Need of the hour

ग्रंथालय विभागा तर्फे शुक्रवार दिनांक 24एप्रिल2020 रोजी सायंकाळी E-lecture चे आयोजन करण्यात आले.बी.ए.भाग 2 आणि 3 चे विद्यार्थी निमंत्रित होते. ग्रंथालय विभाग प्रमुख विजय दीक्षित यांनी E-learning : Need of the hour या विषयावर संबोधित केले. विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी देतांना त्यांनी नमूद केले की बी.ए.च्या अभ्यासक्रमाची पुस्तके (text books) सुद्धा pdf form मधे उपलब्ध होउ लागली आहेत. अशा उपलब्ध पुस्तकांची माहिती त्यांनी विशेषत्वाने दिली. या शिवाय लाँकडाउन कालावधीमधे विद्यार्थ्यांना ग्रंथालयीन पुस्तके कशाप्रकारे उपलब्ध होतील, या बद्दल चर्चा केली. या चर्चेत सहभागी असलेले श्री. संजयसिंह बैस यांनी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्रा.डॉ. सौ.माणिक मेहरे यांनी सुद्धा या उपक्रमामध्ये उत्स्फूर्त उपस्थिती नोंदविली. कार्यक्रमाचा शेवट करतांना त्यांनी विद्यार्थ्यांना स्वतःची काळजी घेउन अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.
ग्रंथालय विभागातर्फे श्री अनूज रेचे यांनी सर्वांचे आभार मानले.

E-Resources and Library या विषयावर दाते कॉलेजमध्ये चर्चासत्र

दाते कॉलेजमध्ये ग्रंथालय विभागातर्फे दि. 19 एप्रिल 2020 रोजी सायंकाळी 05.00 वाजता बी.काँम 3 च्या विद्यार्थ्यांना Zoom App च्या माध्यमातून संवादासाठी निमंत्रित करण्यात आले. अनूज रेचे, संजयसिंग बैस यांच्यासह 22 विद्यार्थ्यांनी या संवादामधे सहभाग घेतला.
E-Resources and Library या विषयावर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. प्रारंभी या विषयावर प्रा विजय दिक्षित यांनी मार्गदर्शन केल्या नंतर विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यात आली. त्यांच्या अडचणी, शंका जाणून घेण्यात आल्या. ग्रंथालयातर्फे घेण्यात आलेल्या या उपक्रमाचे विद्यार्थ्यांनी आनंदाने स्वागत केले. अधिकाधिक विद्य्यार्थ्यांनी या मधे सहभागी व्हावे या आवाहनानंतर संवादाला विराम देण्यात आला.

विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय उपयोक्ता प्रशिक्षण

दाते कॉलेजचा ग्रंथालय विभाग आणि राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने "ग्रंथालय उपयोक्ता प्रशिक्षण" कार्यक्रम दि. ६-३-२०२० रोजी आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाद्वारे ग्रंथालयातील विविध सुविधा, विविध संदर्भ ग्रंथ आणि अनेक नवीन उपक्रमाबद्दल ग्रंथपाल विजय दीक्षित यांनी PPT च्या माध्यमातून सविस्तर मार्गदर्शन केले.

ग्रंथालयाच्या संगणकीकरणाबद्दल विशेषत्वाने माहिती देण्यात आली. OPAC (Online public access catalogue) आणि N-list या विषयावर प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. e-journals आणि e-books बद्दल माहिती देण्यात आली. N-list च्या माध्यमातून 6,000 e-journals आणि लाखोंच्या संख्येने e-books उपलब्ध असल्याची जाणीव करून देण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. सचिन जयस्वाल यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमासाठी अनुज रेचे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रम संपन्न झाला.