बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ 

Babaji Datey Kala & Vanijya Mahavidyalaya, Yavatmal

(वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ ट्रस्ट रजि. क्र. ई-३२ द्वारा संचालित )

Academic Excellence National Award ने प्रा. हरीदास धुर्वे दुसऱ्यांदा सन्मानित

प्रा. हरीदास धुर्वे दुसऱ्यांदा सन्मानित - क्रिष्ट फाउंडेशन बंगलोरतर्फे

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील वाणिज्य विभागातील प्रा. हरिदास मा. धुर्वे. यांचे उत्कृष्ट संशोधनाला दुसऱ्यांदा पुरस्कृत करण्यात आले आहे. त्यांच्या संशोधनाचा विषय मॉल संस्कृतीचा भारतीय तरुणाईवर झालेला परिणाम हा होता. याच संशोधनाकरिता जून २०१८ मधे त्यांना इंटरनॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट बंगलोर यांचेकडून सन्मानित करण्यात आले होते. याच विषयाकरिता क्रिष्ट फाउंडेशन बंगलोर यांचेतर्फे उत्कृष्ट शैक्षणिक राष्ट्रीय पुरस्काराने दुसऱ्यांदा सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार कन्नड चित्रपटाचे भीष्म तथा दादासाहेब फाळके पुरस्कारप्राप्त निर्देशक श्री. दोराई भगवान, चित्रपट निर्माते व दिग्दर्शक श्री. राजू कोठारी, सुप्रसिद्ध कन्नड अभिनेत्री पद्मा राव, बंगलोरचे आमदार नरसिंह स्वामी, क्रिष्ट फाउंडेशनचे अध्यक्ष आणि केंद्रीय नीती आयोगाचे सदस्य डॉ. शिवप्पा ह्यांचे उपस्थितीत देण्यात आला. त्यावेळी प्रा धुर्वे यांना शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात आले.

वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ ट्रस्टचे अध्यक्ष विनायक दाते, सर्व पदाधिकारी, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी ह्यांनी धुर्वे सरांचे अभिनंदन केले.

प्रा. हरिदास माणिकराव धुर्वे (एम.कॉम., एम.फिल.) -

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जीवन गौरव राष्ट्रीय पुरस्कार

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात वाणिज्य विभागात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. संशोधन कार्यात आवड असल्यामुळे डिसेंबर २०१७ ला यु.एस.ए.च्या आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये Online Research Paper पाठविला होता. त्यांचा Impact of Mall Culture on Indian Youth या विषयावरील संशोधन लेख जागतिक स्तरावरून प्रकाशित करण्यात येवून Excellence म्हणून अवार्ड करण्यात आला. तसेच संबधित संशोधन लेख प्रा. धुर्वे यांचे नावासह या जागतिक journal चे मुखपृष्ठावर घेवून त्याची दखल घेण्यात आली. बंगलोर येथील International Institute for Social And Economic Reforms, Bengaluru ह्या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेने त्यांना Teaching, Publication and Research ह्या कार्यासाठी “डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जीवन गौरव राष्ट्रीय पुरस्कार” जाहीर केला.

दि. ०२ जून २०१८ रोजी बंगलोर येथे मा. डी. एच. शंकरमूर्ती, कर्नाटक विधानसभा अध्यक्ष, मा. डॉ. व्ही. एच. शिवाप्पा सदस्य, नीती आयोग, भारत सरकार, सुप्रसिद्ध फिल्म निदेशक श्री. नरेंद्र मगडी, आणि सुप्रसिद्ध कन्नड फिल्म अभिनेत्री कु. राजेश्वरी अन्नाके यांच्या हस्ते व उपस्थितीत या पुरस्काराचे प्रदान करण्यात आले.

वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ ट्रस्टचे अध्यक्ष विनायक दाते, सर्व पदाधिकारी, प्राध्यापक वर्ग  ह्यांनी धुर्वे सरांचे अभिनंदन केले.