बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ 

Babaji Datey Kala & Vanijya Mahavidyalaya, Yavatmal

(वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ ट्रस्ट रजि. क्र. ई-३२ द्वारा संचालित )

H.S.C. Result 2018

१२वी कला शाखेचा निकाल ५९.४५ टक्के

१२वी कला शाखेचा निकाल ५९.४५ टक्के लागलेला असून निखील श्याम धुर्वे याने ८९.५४ टक्के गुण प्राप्त करीत महाविद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. कला शाखेत १० विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले असून ३१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

१२वी वाणिज्य शाखेचा निकाल ९७.३६ टक्के

महाविद्यालयाचा १२वी वाणिज्य शाखेचा निकाल ९७.३६ टक्के लागलेला असून अंकुश स्वामी पोर्जेलवार याने ८७.६९ टक्के गुण प्राप्त करीत महाविद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. वाणिज्य शाखेत ३० विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले असून ५२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

१२वी व्यवसाय अभ्यासक्रमाचा निकाल ८२.४५ टक्के

उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमातून ०६ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले असून २९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

बँकिंग फायनान्शियल सर्विस अंड इन्वेस्टमेंट शाखेतून सुमित लक्ष्मण काकडे याने ७७.२३ टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

इलेक्ट्रिकल टेक्नोलॉजी शाखेतून अनिकेत रवींद्र भेदुरकर याने ७९.२३ टक्के गुण प्राप्त करून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.

ऑटो इंजिनीरिंग टेक्नोलौजी शाखेतून आकाश भीमराव ठमके याने ६६.३० टक्के गुण प्राप्त करीत प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.