बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ 

Babaji Datey Kala & Vanijya Mahavidyalaya, Yavatmal

(वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ ट्रस्ट रजि. क्र. ई-३२ द्वारा संचालित)

NAAC Accredited B++ Grade with CGPA 2.82

Music – संगीत

संगीत

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात संगीत विभागाची सुसज्ज अशी प्रयोगशाळा आहे.  संगीत विभाग प्रमुख प्रा. वर्षा कुलकर्णी आहेत. वरिष्ट व कनिष्ठ या दोन्ही महाविद्यालयात संगीत विषय शिकविला जातो. संगीत विषयाच्या प्रात्यक्षीकाकरिता सर्व संगीत साधने उपलब्ध आहेत.

सर्व विद्यार्थ्यांना तज्ञ शिक्षकांद्वारे संगीताचे मार्गदर्शन केले जाते. सध्या महाविद्यालयात संगीत विभागात ४ शिक्षक कार्यरत आहेत.

प्रत्येक वर्गाकरिता स्वतंत्र वर्गखोल्या असून थियरी व प्रात्यक्षिक शिकविले जाते. महाविद्यालयीन क्षेत्रात व इतर सांस्कृतिक क्षेत्रात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे योगदान सतत असते.

विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत आपल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी  स्थान मिळविलेले आहे. तबला, पेटी व इतर साहित्य संगीत विभागात उपलब्ध आहे.

महाविद्यालयाच्या प्रत्येक कार्यक्रमात संगीत विभाग सहभाग नोंदवत असतो.