दाते कॉलेज, यवतमाळ

Datey College, Yavatmal

(वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ ट्रस्ट रजि. क्र. ई-३२ द्वारा संचालित)

NAAC Accredited B++ Grade with CGPA 2.82

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात- जिल्हास्तरीय उष्माघात विद्यार्थी मदत कक्षाचे आयोजन

यवतमाळ, दि. ९ मे २०२६ : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग तथा दाते कॉलेज, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय “उष्माघात विद्यार्थी मदत कक्ष” कार्यक्रमाचे आयोजन दाते कॉलेज, यवतमाळ येथे करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजेश सिंगरु हे होते. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांच्या कल्पनेतून आणि विद्यार्थी विकास विभागाचे संयोजक प्रा. डॉ.राजीव बोरकर यांच्या प्रयत्नातून हा अत्यंत स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे, असे उद्गार प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू यांनी यावेळी व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. ताराचंद कंठाळे यांनी केले. त्यांनी वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी, आरोग्य विषयक जनजागृती तसेच मदत कक्षाच्या उद्दिष्टांविषयी माहिती दिली. सावित्री ज्योती समाजकार्य महाविद्यालयाचे तथा समिती सदस्य प्रा. डॉ. विक्रांत जाधव यांनी सुद्धा यावेळी उपस्थितांना येथोचीत मार्गदर्शन केले. या उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन उष्माघात विद्यार्थी मदत कक्षाचे संयोजक प्रा. डॉ. प्रशांत बागडे यांनी केले.
यावेळी जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रतिनिधी म्हणून प्रा. डॉ. वानखेडे, आबासाहेब पारवेकर महाविद्यालयाचे प्रतिनिधी म्हणून प्रा. डॉ. रुपेश कुऱ्हेकर, विद्याभवन महाविद्यालयाचे प्रतिनिधी म्हणून प्रा. अनुप शिरभाते यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना उष्माघातापासून संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना, पुरेसे पाणी पिणे, उन्हात बाहेर पडताना घ्यावयाची खबरदारी याबाबत मार्गदर्शन केले. त्याचबरोबर महाविद्यालयात उष्माघात कक्षाचे उद्घाटन व तेथील सुविधांची पाहणी मान्यवरांनी केली.
कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  उत्साहपूर्ण अशा वातावरणात दाते कॉलेज येथे या जिल्हास्तरीय उष्माघात विद्यार्थी मदत कक्षाचे उद्घाटन पार पडले.

'विकसित भारत शिक्षा अधिष्ठान २०२५' विषयावर चर्चासत्राचे आयोजन

दिनांक ८ एप्रिल २०२६ रोजी दाते कॉलेज, यवतमाळ आणि भारतीय शिक्षण मंडळ, विदर्भ प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने 'विकसित भारत शिक्षा अधिष्ठान' या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर एक दिवसीय परिसंवादाचे (Symposium) आयोजन महाविद्यालयाच्या परिसरात करण्यात आले होते. 'विकसित भारत @२०४७' या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी आणि 'विकसित भारत शिक्षा अधिष्ठान विधेयक, २०२५' मधील विविध तरतुदींवर सखोल चर्चा करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आखण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११:०० वाजता उद्घाटन सत्राने झाली, ज्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून माजी अधिष्ठाता डॉ. अशोक पावडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षपद वाणिज्य महाविद्यालय ट्रस्ट, यवतमाळ चे अध्यक्ष श्री विनायक दाते यांनी भूषवले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरु, उपप्राचार्य डॉ. ताराचंद कंठाळे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सचिन जयस्वाल आणि कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. सचिन तेलखडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
या परिसंवादाच्या मुख्य सत्रात श्री अशोक पावडे यांनी प्रस्तावित विधेयकाचे तांत्रिक आणि धोरणात्मक विश्लेषण केले. भारताच्या शैक्षणिक परिसंस्थेला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्यासाठी तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या उद्दिष्टांशी सुसंगत बदल घडवून आणण्यासाठी या विधेयकाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. चर्चेदरम्यान प्रामुख्याने शैक्षणिक संस्थांची स्वायत्तता, पारदर्शक शासन व्यवस्था आणि उत्तरदायित्व यांमधील समतोल राखण्यावर भर देण्यात आला.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात या विधेयकाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेला कृती आराखडा आणि संभाव्य धोके यावर सविस्तर ऊहापोह झाला. यानंतर उपस्थितांनी वक्त्यांना या विधेयकावर विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरासरण केले. या चर्चासत्राला विविध महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच प्राचार्य उपस्थित होते. यानंतर सर्वांना उपस्थिती प्रमाणपत्र देण्यात आले. चर्चासत्राच्या शेवटी महाविद्यालयाकडून भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरु यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले. आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी या विधेयकाची आवश्यकता का आहे हे समजून सांगितले. उपप्राचार्य डॉ. ताराचंद कंठाळे यांनी उपस्थित पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. राहुल राठोड यांनी केले. शेवटी कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. सचिन तेलखडे यांनी आभार मानले.

भव्य रक्तदान शिबिर संपन्न; शिक्षण महर्षींना 'रक्तांजली' अर्पण

दिनांक २८ मार्च २०२६ रोजी स्थानिक दाते कॉलेज यवतमाळ येथे  शिक्षण महर्षी श्रद्धेय बाबाजी दाते यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन दाते कॉलेज यवतमाळ आणि डॉक्टर हेडगेवार रक्त संकलन केंद्र नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. 'रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान' हा संदेश देत महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी या शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या लाडक्या संस्थापकांना आगळीवेगळी आदरांजली वाहिली.
सकाळी १० वाजता महाविद्यालयाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात शिक्षण महर्षी बाबाजी दाते यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिबिराची सुरुवात करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरु, संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. विनायक दाते, उपाध्यक्ष सौ. सुषमा दाते, सचिव श्री. विजय कासलीकर, उपप्राचार्य डॉ. ताराचंद कंठाळे,  राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सचिन जयस्वाल मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी इतर प्राध्यापक वृंद आणि पदाधिकारी, सोबतच डॉ. हेडगेवार रक्त संकलन केंद्र नागपूर रक्तपेढीचे डॉक्टर आणि कर्मचारी  आणि अर्थातच महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या शिबिराला मिळाला. शिबिराचे मुख्य आकर्षण महाविद्यालयातील युवा वर्ग ठरला. अनेक विद्यार्थ्यांनी आयुष्यात प्रथमच रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. केवळ मुलेच नव्हे तर विद्यार्थिनींनीही मोठ्या संख्येने पुढे येत रक्तदान केले. दुपारपर्यंत 40 हून अधिक रक्त युनिट्सचे संकलन करण्यात आले असून. त्यांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.
याप्रसंगी बोलताना प्राचार्यांनी सांगितले की, "बाबाजी दाते यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजाची सेवा केली. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त अशा विधायक उपक्रमाचे आयोजन करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे. रक्ताच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी तरुणांनी पुढे येणे ही काळाची गरज आहे." या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. ताराचंद कंठाळे यांनी, सूत्रसंचालन प्रा. अजय राठोड यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. सचिन जयस्वाल सर यांनी केले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना (NSS), एन.सी.सी. (NCC) विभाग आणि महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यवतमाळ शहरातील नागरिकांनीही महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले आहे.

दाते महाविद्यालयात पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न

दि. २८ मार्च २०२६ रोजी दाते महाविद्यालय येथे पदवीदान समारंभ मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला. या समारंभात विविध शाखांतील पदवीधर विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. गौरव कडलग, मिथिलेश भाकरे (महाराष्ट्र राज्य अध्यापक प्रशिक्षण संस्था, पुणे) उपप्राचार्य डॉ. ताराचंद कंठाळे,  डॉ. सचिन जयस्वाल राज्यशास्त्र विभाग प्रमुख,  डॉ. अमोल राऊत वाणिज्य विभाग प्रमुख,  डॉ. प्रशांत बागडे संगीत विभाग प्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते. समारंभाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यात प्रामाणिकपणा, परिश्रम आणि सामाजिक बांधिलकी यांचे महत्त्व पटवून दिले. “शिक्षण हे केवळ नोकरीसाठी नसून समाजघडणीसाठीही आवश्यक आहे,” असे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू यांनी नमूद केले.
उपप्राचार्य डॉ. ताराचंद कंठाळे यांनी आपल्या प्रास्ताविकातून महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेत विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त केला. विद्यार्थ्यांनीही आपल्या भावना व्यक्त करत महाविद्यालयीन आठवणींना उजाळा दिला.
समारंभात मोठ्या संख्येने विद्यार्थी व प्राध्यापक वृंद उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रा. शुभम चांभारे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. सचिन जयस्वाल यांनी मानले.

MSFDA आणि दाते कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय एफ डी पी चे यशस्वी आयोजन

महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमी (MSFDA) आणि दाते कॉलेज, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने “NAVONMESH” या नावाने राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 (NEP 2020) अंतर्गत दोन दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम (FDP) उत्साहात आणि यशस्वीरीत्या संपन्न झाला.
सदर कार्यशाळेचे आयोजन 24 व 25 मार्च 2026 रोजी दाते कॉलेज,  येथे करण्यात आले होते. या उपक्रमात एकूण 46 प्राध्यापक (Delegates) यांनी सक्रिय सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात संस्थेचे अध्यक्ष श्री विनायक दाते यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून शिक्षण क्षेत्रातील बदलत्या प्रवाहात NEP 2020 चे महत्त्व अधोरेखित केले.
तसेच, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू  आणि उपप्राचार्य डॉ. ताराचंद कंठाळे यांचीही विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी शिक्षकांना नव्या शैक्षणिक धोरणाशी जुळवून घेण्याचे आवाहन केले.
या दोन दिवसीय कार्यशाळेमध्ये विविध तज्ञांनी मार्गदर्शन करताना समग्र शिक्षण (Holistic Education), लवचिक शैक्षणिक रचना (Flexibility), परिणामाधारित अध्यापन (Outcome-based Pedagogy), तंत्रज्ञानाधारित शिक्षण (Technology-enabled Learning) आणि कौशल्य विकास (Skill Development) यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान सहभागी प्राध्यापकांना प्रत्यक्ष अध्यापनात उपयोगी पडतील अशा विविध नाविन्यपूर्ण पद्धती आणि उपक्रमांची माहिती देण्यात आली. त्यामुळे शिक्षकांमध्ये नव्या शिक्षण धोरणाबाबत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण झाला.
या उपक्रमाचे समन्वयक डॉ. सचिन जायसवाल यांनी कार्यक्रमाचे प्रभावी नियोजन व अंमलबजावणी करत आयोजक टीमसोबत उत्कृष्ट समन्वय साधला.कार्यक्रमात सहभागी प्राध्यापकांनी समाधान व्यक्त करत, “या कार्यशाळेमुळे आमच्या अध्यापन पद्धतीत निश्चितच सकारात्मक बदल घडेल,” असे मत व्यक्त केले.
समारोप सत्रात सर्व मान्यवर, तज्ञ वक्ते, सहभागी प्राध्यापक तसेच कार्यक्रमाच्या यशामागे कार्यरत असलेल्या आयोजक, शिक्षकेतर कर्मचारी  यांचे आभार मानण्यात आले.
एकूणच, “NAVONMESH” हा उपक्रम शिक्षकांना NEP 2020 च्या दिशेने सक्षम करणारा आणि शिक्षण क्षेत्रात सकारात्मक परिवर्तन घडवणारा ठरला.

विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन परिसरात उभारले पक्षांसाठी पाणी स्टॅण्ड

"एक घोट काऊसाठी
एक घोट चिऊसाठी"
दिनांक 13/03/2026 रोजी दाते कॉलेज हे अनोख्या उपक्रमांमुळे कायम चर्चेत राहत असते. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उन्हाळ्यात पक्षांची पाण्यासाठी वणवण होऊ नये म्हणून महाविद्यालयीन परिसरात पाणी स्टॅण्ड चारा स्टॅण्ड उभारण्यात आले.
बी. ए. भाग-१ च्या विद्यार्थ्यांनी आपल्या खाऊच्या पैशातून हे चारा स्टॅण्ड पाणी स्टॅण्ड उभारले. महाविद्यालयीन परिसरात असलेल्या सर्व झाडांवर हे चारा स्टॅण्ड व पाणी स्टॅण्ड लटकविले असून विद्यार्थी समूहाने या स्टॅण्ड मध्ये पाणी व चाऱ्याची व्यवस्था करणार आहेत. उन्हाळ्यात पाण्यासाठी होणारी पक्षांची वणवण थांबावी या हेतूने विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबविला यामध्ये महाविद्यालयातील दोनशे विद्यार्थी सहभागी झाले होते. परिसरात एकूण 20 स्टॅण्ड बसविण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू सर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात व महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ताराचंद कंठाळे सर तसेच राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ सचिन जयस्वाल सर व वाणिज्य विभाग प्रमुख डॉ अमोल राऊत सर यांच्या नियोजन व मार्गदर्शनात हा उपक्रम राबविण्यात आला. मराठी विभागातील प्रा. नितेश गेडाम, प्रा. अनिरुद्ध नरखेडकर, प्रा. शुभम चांभारे, प्रा. आशिष कांबळे, प्रा. काजल वांढरे, प्रा. स्नेहल सोनटक्के यांनी हा उपक्रम राबविण्यासाठी परिश्रम घेतले. वाणिज्य महाविद्यालय न्यासाचे अध्यक्ष मा. श्री. विनायक दाते सर आणि सौ. सुषमा दाते मॅडम यांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.

Commencement of the New Batch of Language Lab

Dt. 28 Jan 2026 on Datey College, Yavatmal marked a significant milestone in its academic journey with the commencement of the new batch of the Language Laboratory, aimed at enhancing students’ communication and employability skills.
The Language Lab was formally inaugurated in the presence of Dr. Rajesh Singru, Principal of the College, and Dr. Tarachand Kanthale, Vice-Principal and Head of the Department of English. Faculty members and students from various streams attended the inaugural session with great enthusiasm.
Speaking on the occasion, Dr. Rajesh Singru, Principal of the college, emphasized the growing importance of English communication skills in higher education and professional life. He highlighted that the Language Lab would play a vital role in bridging the gap between academic knowledge and practical communication skills, especially for students from rural and semi-urban backgrounds.
Dr. Tarachand Kanthale, vice-principal and head of the English department, elaborated on the objectives and structure of the Language Lab. He explained that the program focuses on listening, speaking, pronunciation, vocabulary building, and confidence enhancement, using interactive and technology-enabled methods. He expressed confidence that the initiative would empower students to face interviews, competitive examinations, and global opportunities with confidence. Dr. Sachin Telkhade, Assistant Professor and IQAC co-ordinator, in his introductory remarks, explained various features of the language lab.
Students expressed their appreciation for the initiative, stating that the Language Lab would help them overcome hesitation and improve fluency in English. The session concluded with an interactive demonstration of Language Lab activities and a motivating address encouraging students to actively participate in the program.
The commencement of the first Language Lab batch reflects the President Mr. Vinayak Datey's commitment to academic innovation and student -centered learning, reinforcing his vision of holistic education and skill development.
Prof. Rahul Rathod hosted the event and Prof.  Nalini Ade proposed a vote of thanks.

संघर्षातून घडलेले बाबासाहेबांचे नेतृत्त्व युवकांना प्रेरणादायी-पायल किनाके

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन इतिहास विभागाने केले. यावेळी सर्वच विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात संगीत विभागाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहणारे गीत सादर केले.

अभिवादन आणि आदरांजली कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरु तर प्रमुख अतिथी दाते कॉलेजच्याच माजी विद्यार्थीनी व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय मंत्री कु. पायल किनाके होत्या. बाबासाहेबांच्या अविश्रांत संघर्षमय जीवनाचा व अत्यंत कठीण प्रसंगावर मात करुन सर्वांना न्याय देणाऱ्या संविधानाच्या विविध पैलूंवर कु. पायल किनाके यांनी प्रकाश टाकला. प्राचार्य सिंगरु यांनी दीक्षाभूमी, चैत्यभूमी सोबतच बडोद्याच्या संकल्पभूमीवर प्रकाश टाकून, मानवजातीच्या मुक्तीचे गाणे गाणारे बाबासाहेब हे भारतमातेला पडलेले एक नितांत सुंदर स्वप्न होते असा उल्लेख केला. उपप्राचार्य डॉ. ताराचंद कंठाळे यांनी बाबासाहेबांच्या जीवनातील अनेक चढउतारांवर, त्यांच्या नवभारताच्या उभारणीतील वैशिष्ट्यपूर्ण घटकांवर थोडक्यात प्रकाश टाकला. यावेळी वाणिज्य महाविद्यालय ट्रस्टचे अध्यक्ष विनायकदादा दाते यांनी बाबासाहेबांची अष्टपैलू मूल्य आपल्या अंगी बाळगण्यासाठी विद्यार्थ्यांनी सदैव तत्पर असले पाहिजे असा संदेश देऊन आजचा विद्यार्थी हाच राष्ट्राचा भारतभाग्यविधाता असल्याचे सांगून बाबासाहेबांना अभिवादन केले. विचारमंचावर आयोजक इतिहास विभाग प्रमुख गजानन लांजेवार याशिवाय कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षक डॉ. स्वाती जोशी होत्या. कार्यक्रमाचे अतिशय भावस्पर्शी आणि ह्दयभेदक सूत्रसंचलन प्रा. स्नेहल सोनटक्के यांनी, प्रस्तावना गजानन लांजेवार यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. रुतिका मेश्राम यांनी मानले.

“डिजिटल इंडिया ते स्मार्ट इंडिया : एआय आणि शाश्वत विकासावर राष्ट्रीय चिंतन चर्चा सत्र संपन्न"

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ येथे २९ नोव्हेंबर २०२५ रोजी “Digital India to Smart India: A Multidisciplinary Study of Education, Artificial Intelligence and Sustainable Development (DISI‑2025)” या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्रात शिक्षण क्षेत्रातील डिजिटल परिवर्तन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शाश्वत विकास यांचे परस्पर संबंध उलगडून दाखविण्यात आले.

परिषदेच्या आयोजनाचा हेतू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरु यांनी आपल्या प्रास्ताविकातून मांडला. कॉन्फरन्सचे उद्घाटन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्रो‑व्हाईस चान्सलर डॉ. महेंद्र ढोरे यांच्या हस्ते झाले. त्यांनी आपल्या भाषणात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या योग्य वापरासाठी अशा प्रकारच्या बहुविषयक परिषदांचे महत्त्व अधोरेखित केले.

उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष श्री. विनायक दाते उपस्थित होते. त्यांनी “डिजिटल इंडिया ते स्मार्ट इंडिया” या प्रवासात ग्रामीण आणि शैक्षणिक संस्थांची भूमिका नेमकी कशी असावी याविषयी आपले विचार मांडले.प्रमुख पाहुणे म्हणून अतुलजी मोघे यांनी जीवनातील वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये झपाट्याने होणारे तांत्रिक बदल आणि त्याला आपण कशाप्रकारे स्वीकारून स्वतःला अद्ययावत ठेवावे, यावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले. याप्रसंगी संस्थेच्या उपाध्यक्ष सौ. सुषमा दाते, सचिव श्री. विजय कासलीकर, अमरावती विद्यापीठाच्या इन्क्युबेशन सेंटरचे समन्वयक डॉ. अजय लाड व धनवटे सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. अखिलेश पेशवे प्रमुख हे व्यासपीठावर उपस्थित होते.

चर्चासत्राचे मुख्य आकर्षण की‑नोट स्पीकर मिलिंद साठे यांनी “आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन ऑटोमोबाईल इंडस्ट्री” या विषयावर सविस्तर सादरीकरण केले. त्यांनी औदोगिक क्षेत्रात वाढती स्वयंचलित प्रणाली, मानवी हस्तक्षेप कमी करणारे एआय‑आधारित तंत्र आणि “डिजिटल ट्विन्स” या संकल्पनेद्वारे उद्योगांतील व वैद्यकीय क्षेत्रातील निर्णयप्रक्रिया कशी बदलते आहे, याचे विस्तृत विवेचन केले.

उद्घाटन सत्राचे संचालन उपप्राचार्य प्रा. डॉ. ताराचंद कंठाळे यांनी केले तर परिषद संयोजक डॉ. सचिन जयस्वाल यांनी उद्घाटन कार्यक्रमाच्या सर्व मान्यवरांचे आभार मानले.
तांत्रिक सत्रांमध्ये शिक्षण, उद्योग, पर्यावरण आणि शाश्वत विकास या विविध उपविषयांवर संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी आपले संशोधनपत्र व अनुभव सादर केले. डिजिटल साधनांच्या माध्यमातून समावेशक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे साध्य होऊ शकते यावरही चिंतन झाले.

उपप्राचार्य डॉ. ताराचंद कंठाळे यांनी आपल्या मनोगतातून महाविद्यालयाच्या शैक्षणिक उद्दिष्टांची रूपरेषा मांडत, या परिषदेमुळे विद्यार्थ्यांमध्ये नवे संशोधनविषय उभे राहतील, असा विश्वास व्यक्त केला. सह‑संयोजक डॉ. अमोल राऊत यांनी उपस्थित सर्व मान्यवर, शैक्षणिक व प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी आणि प्रायोजकांचे आभार मानत चर्चासत्राचा समारोप  केला. तांत्रिक सत्राचे संचालन प्रा. राहुल राठोड यांनी तर समारोपीय सत्राचे संचालन प्रा. आशिष कांबळे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

विद्यापीठाअंतर्गत आयोजित 'कवी केशवसुत काव्यस्पर्धेत' विद्यालयातील विद्यार्थिनींचा सहभाग

11 सप्टेंबर 2025 रोजी विश्वबंधुत्व दिवसानिमित्त संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती येथील मराठी विभागा अंतर्गत कवी केशवसुत काव्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बाबाजी दाते कला व वाणिज्य महाविद्यालयातील दोन विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. सर्वप्रथम महाविद्यालय स्तरावर काव्यस्पर्धेचे आयोजन महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने करण्यात आले यातून  कु.नयना शेंडे, व कु. सानिया निकोडे या दोन विद्यार्थिनींची निवड करून त्यांना महाविद्यालयाच्या वतीने विद्यापीठ स्तरावर काव्यस्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाठवण्यात आले होते. दोन्ही विद्यार्थिनींनी या स्पर्धेत सक्रिय सहभाग नोंदविला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू यांच्या मार्गदर्शनात विभाग प्रमुख डॉ. सचिन जयस्वाल यांच्या प्रभावी नियोजनात या विद्यार्थिनींची निवड करून त्यांना महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी विद्यापीठ स्तरावर पाठवण्यात आले होते. यासाठी मराठी विभागाचे प्रा. नितेश गेडाम, प्रा, स्नेहन सोनटक्के, प्रा. अनिरुद्ध नरखेडकर, प्रा. आशिष कांबळे, प्रा. शुभम चांभारे,  प्रा. काजल वांढरे यांचे सहकार्य लाभले.

स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात दिनांक १५ ऑगस्ट २०२५ शुक्रवार रोजी स्वातंत्र्यदिन उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे व वाणिज्य न्यासाचे अध्यक्ष श्री. विनायक दाते व  प्राचार्य डॉ. राजेश सिंगरु प्रमुख म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयीन प्रार्थना पसायदानाने झाली. प्राचार्यांच्या  हस्ते ध्वजारोहण  करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी राष्ट्रगीताचे गायन करून मातृभूमीला अभिवादन केले. प्राचार्यांनी एन.सी.सी. कॅडेट्सना शपथ दिली.
कनिष्ठ महाविद्यालयाच्या  विद्यार्थ्यांनी 19 वर्षाखालील कबड्डी संघाने तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे. त्याबद्दल अध्यक्ष व प्राचार्यांच्या हस्ते  गुलाबाचे फुल देऊन कबड्डी संघातील विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला.
प्राचार्य डॉ. राजेश सिंगरु यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषण करून स्वातंत्र्याचा इतिहास, त्यामागील बलिदान आणि आजच्या पिढीचे कर्तव्य यावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाचे संचालन शारीरिक शिक्षण विभागचे संचालक प्रा. डॉ. रविजीत गावंडे यांनी प्रभावीपणे केले. या कार्यक्रमात विद्यार्थी, प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगान वंदे मातरम ने झाली .

विभाजन - एक विभिषिका स्मृतीदिन १४ ऑगस्ट

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे विभाजन-एक विभिषिका स्मृतीदिन १४ ऑगस्ट या कार्यक्रमाचे आयोजन शारीरिक शिक्षण विभागाने दिनांक १४/०८/२०२५ गुरुवार रोजी ११.०० वाजता करण्यात केले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश शिंगरू होते. तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री. विनायक दाते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्यवस्थापन मंडळाच्या विश्वस्त सौ. सुषमा दाते, उपप्रचार्य डॉ. ताराचंद कंठाळे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती लाभलेली होती.
या कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. रविजीत गावंडे यांनी आपल्या प्रस्तावने मध्ये विभिषिकाचा अर्थ व कार्यक्रमाच्या उद्देशाची माहिती सांगितली. विभाजनाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर त्याचे भीषण परिणाम आणि त्यातून आजच्या पिढीला शिकण्यासारखे काय हे अधोरेखित केले.
श्री विनायक दाते यांनी भारताच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या सामाजिक-राजकीय शोकांतिकांपैकी एक म्हणजे १९४७ साली झालेले भारत-पाकिस्तान विभाजन. लाखो लोकांचे स्थलांतर, विस्थापन आणि लाखो जीवितहानी ही मानवीय इतिहासातील एक अमानवी घटना होती. भारत देश नेहमी करिता अखंडीत राहिला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.
डॉ. ताराचंद कंठाळे यांनी विद्यार्थ्यांना या घटनेतून मानवता, बंधुता आणि राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व समजून घेण्याचे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. राजेश शिंगरू यांनी विभाजन हा केवळ इतिहासातील अध्याय नसून मानवी वेदनेचा दस्तऐवज असल्याचे सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना समाजात शांतता, सहिष्णुता आणि एकात्मतेचा संदेश रुजवण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्नेहल सोनटक्के यांनी उत्स्फूर्तपणे केले. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी सर्व मान्यवरांचे, प्राध्यापकांचे व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

नूतन इमारतीचा भूमिपूजन समारंभ संपन्न

स्थानिक यवतमाळ येथील नामांकित बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयाला प्रधानमंत्री राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (PM-USHA) आणि राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (RUSA) यांचे सौजन्याने पाच कोटी रुपये अनुदान प्राप्त झाले असून त्याअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या नूतन इमारतीचा भूमिपूजन समारंभ दि. ११/०८/२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ न्यासाचे अध्यक्ष श्री. विनायक श्रीकृष्ण दाते व सौ. सुषमा विनायक दाते यांचे हस्ते सपत्नीक पार पडला. याप्रसंगी न्यासाचे सचिव श्री. विजय कासलीकर, कोषाध्यक्ष श्री. मंगेश केळकर, विशुद्ध विद्यालयाच्या विश्वस्त सौ. मीरा मंगेश केळकर, उद्योजक श्री. शशांक देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू, उपप्राचार्य डॉ. ताराचंद कंठाळे, बांधकाम कंत्राटदार श्री. हेमंत अग्रवाल, अभियंता डॉ. महेश नालमवार तसेच घटक संस्थांचे प्रमुख सर्वश्री डॉ. श्रीकांत पर्बत, डॉ. अमोल देशमुख, मुख्याध्यापक श्री. प्रसाद कुलकर्णी, श्रीमती मीनाक्षी काळे, सौ. स्वाती जोशी, सौ. अस्मिता पळसोकर, सौ. देशकर, पर्यवेक्षक श्री. देवेंद्र भिसे, श्री. विवेक अलोणी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. या भूमिपूजन सोहळ्याचे पौरोहित्य श्री. अजित जवळकर यांनी केले.

इंडक्शन कार्यक्रम पार पडला

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात सायन्स विभागाचा इंडक्शन कार्यक्रम दि. 01/08/2025 रोजी पार पडला. बी.एस.सी. भाग-1 च्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील प्रत्येक माहिती व ओळख व्हावी तसेच त्यांना महाविद्यालयाच्या नवीन वातावरणाशी जुळून घेता यावे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. स्वर्गीय बाबाजी दाते व विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने व सरस्वती वंदना या गीताने प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉ. राजेश सिंगरू सर होते. तर प्रमुख अतिथी म्हणून आदरणीय विनायजी दाते सर, तसेच सौ. सुषमा दाते मॅडम आणि डॉ. ताराचंद कंटाळे सर उपस्थित होते. तसेच डॉ. सचिन तेलखेडे सर यांनी राष्ट्रिय शिक्षण धोरण याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील प्रा. डॉ. सारिका गाडवे मॅडम (विभाग-केमिस्टी), प्रा. स्वाती माकोडे मॅडम (विभाग कॉम्पुटर-सायन्स), प्रा. शुभांगी बोबडे मॅडम (विभाग-गणित) व प्रा. सोनल टोंगो मॅडम (विभाग- बायोटेकनोलोजी) या सर्व प्राध्यापकांनी आपल्या विषयाची माहिती देऊन सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालया तर्फे राबविण्यात येणारे इतर उपक्रमाची माहिती देण्यात आली. प्रास्ताविक डॉ. सारिका गाडवे मॅडम यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. स्वाती माकोडे मॅडम यांनी केले आणि आभार प्रा. शुभांगी बोबडे मॅडम यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्फुर्तपणे प्रतिसाद दिला.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर सेमिनारचे आयोजन

बुधवार दिनांक ३०/०७/२०२५ रोजी सकाळी १२:०० वाजता महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावर सेमिनार आयोजित करण्यात आला. या परिसंवादात डॉ. सचिन तेलखडे यांनी मार्गदर्शन केले. आपल्या Power Point Presentation (PPT) मध्ये-

  1. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे काय
  2. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण पद्धतीत होणारे बदल
  3. NEP मध्ये क्रेडिट ही संकल्पना काय आहे
  4. NCRF नुसार शैक्षणिक Levels कशा पडल्या गेल्या आहेत
  5. Passing Criteria
  6. Multiple Entry & Exit option म्हणजे नेमकं काय आणि लागू करायची पद्धत
  7. Academic Bank Credit (ABC) याबद्दल विस्तृत माहिती दिली.
  8. Allowed To Keep Term (ATKT)
  9. Vertical Types

या मुद्द्यांवर डॉ. सचिन तेलखडे यांनी प्रकाश टाकला या चर्चासत्राला संस्थेचे अध्यक्ष श्री विनायक दाते, व्यवस्थापनाच्या सदस्य सौ. सुषमा दाते, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ताराचंद कंठाळे, सर्व विभाग प्रमुख, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

दीक्षारंभ कार्यक्रमाचे आयोजन

उच्च शिक्षणाच्या प्रवासात पहिले पाऊल टाकताना सकारात्मकता आणि आश्वासक सुरुवात व्हावी तसेच महाविद्यालयात सहज रुढता यावे आणि नवीन वातावरणाशी जुळवून घेण्यास मदत व्हावी या दृष्टिकोनातून दाते महाविद्यालयात बी.ए. व बी.कॉम. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांकरीता दीक्षारंभ कार्यक्रम (इंडक्शन प्रोग्राम) चे आयोजन सोमवार दिनांक 24 जुलै 2025 रोजी सकाळी १०:३० वाजता सावरकर सभागृहात करण्यात आले.
याप्रसंगी व्यासपीठावर वाणिज्य महाविद्यालय ट्रस्टचे अध्यक्ष श्री. विनायक दाते हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू, व्यवस्थापन मंडळाच्या सदस्या सौ. सुषमा दाते, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ताराचंद कंठाळे यांची प्रमुख उपस्थिती लाभलेली होती. वाणिज्य व व्यवस्थापन विद्या शाखा समन्वयक डॉ. अमोल राऊत आणि मानव्यविद्या शाखा समन्वयक डॉ. सचिन तेलखडे व्यासपीठावर उपस्थित होते.
आपल्या प्रास्ताविकामध्ये डॉ. राजेश सिंगरू यांनी विषय व अभ्यासक्रम हे शत्रू समजून त्यांच्यासोबत नियोजनात्मक पद्धतीने लढा दिल्यास विजय तुमचाच होतो असा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केला त्याकरिता छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा अभ्यास करण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. मानव्यविद्या शाखा समन्वयक डॉ. सचिन तेलखडे तसेच वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा समन्वयक डॉ. अमोल राऊत यांनी अनुक्रमे विद्यार्थ्यांना NEP-2020 अंतर्गत स्कीम, सिलॅबस, परीक्षेचा पॅटर्न, इंटरनल असेसमेंट इत्यादी संदर्भात सविस्तर माहिती दिली.
क्रीडा विभाग डॉ. रवीजीत गावंडे, NSS विभाग प्रा. दत्तात्रय जोशी, NCC विभाग डॉ. प्रशांत बागडे, करिअर कट्टा प्रा. गजानन लांजेवार तसेच YCMOU डॉ. सचिन जयस्वाल यांनी संबंधित विभागाची माहिती दिली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री. विनायक दाते यांनी महाविद्यालयीन जीवनाचा भरपूर आनंद घ्या, भरपूर अभ्यास करा आणि खूप मोठे व्हा असा विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्नेहल सोनटक्के तर आभार प्रदर्शन डॉ. ताराचंद कंठाळे यांनी केले कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

युवक महोत्सव (तरुणाई २०२५)

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील युवक महोत्सव - तरुणाई २०२५ थाटात संपन्न झाला.

महाविद्यालय दरवर्षी युवक महोत्सव साजरा होतो. यावर्षी देखील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उदात्त हेतूने दिनांक  १९,२०,२१ फेब्रुवारीला युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. महोत्सवाच्या दोन दिवसा अगोदर १७ व १८ क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. त्यामध्ये मुला-मुलींकरिता क्रिकेट, हॉलीबॉल, लिंबू चमचा, रस्सीखेच अशा विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांसह, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी  यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. तरुणाई २०२५ स्नेहसंमेलना च्या उद्घाटन समारंभाला उद्घाटक म्हणून वाणिज्य महाविद्यालय न्यास चे अध्यक्ष मा. विनायकजी दाते उपस्थित होते. त्यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात- बक्षीस मिळवण्यासाठीच नव्हे तर खेळीमेळीच्या वातावरणात जीवन जगण्याची कला आपल्याला आत्मसात करता येईल का? याकडे सर्वांनी लक्ष द्यावे असे विद्यार्थ्यांना आवाहन  केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरु उपस्थित होते. व प्रमुख पाहुणे म्हणून खास अमेरिकेवरून आलेल्या मीराताई बावडेकर उपस्थित होत्या.

दिनांक १९,२०,२१ फेब्रुवारी युवक महोत्सव तरुणाई २०२५ या या कार्यक्रमाद्वारे विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, डिश डेकोरेशन, पुष्परचना, सुगम संगीत, बचाव स्पर्धा, ट्विन्स स्पर्धा, वेशभूषा, कवी संमेलन, विविध सांस्कृतिक कार्यक्रम व आनंद मेळाव्याचा समावेश करण्यात आला. विविध स्पर्धेमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन उत्तमोत्तम कलागुणांचे सादरीकरण केले. सांघिकतेने कार्य करतांना अनेकांशी जुळवून घेऊन कशा रीतीने आपण उत्तम प्रदर्शन करू शकतो याचे प्रत्यय विद्यार्थ्यानी आत्मसात करावा. तरुणाई २०२५ च्या निमित्ताने ओसंडून वाहणारा आनंद साजरा करताना समाजभान जोपासण्याचा सल्ला सुद्धा आपल्या अध्यक्ष भाषणातून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेश सिंगरू यांनी विद्यार्थ्यांना दिला. उपप्राचार्य डॉ. ताराचंद कंठाळे यांनी याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन म्हणून एक उत्तम पोवाडा सादर केला व पाहुण्यांचा परिचय करून दिला.

सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत प्रयागराज येथील  कुंभमेळा यावर आधारित महाकाली चे सादरीकरण टाळ्यांच्या कडकडाटासह अग्रेसर ठरला. तरुणाई २०२५ युवक महोत्सवाचे उद्घाटन संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी विभाग प्रमुख डॉ. प्रशांत बागडे यांच्या मार्गदर्शनात  उद्घाटनाची फीती कापल्यानंतर एका आगळा वेगळ्या पद्धतीने पारंपारिक फोक ऑर्केस्ट्रा द्वारे २० मिनिटांचे सादरीकरण करून स्नेहसंमेलनाची एक भन्नाट सुरुवात केली. विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या मीराताई बावडेकर यांनी खास विद्यार्थ्यांशी संवाद साधून विद्यार्थ्यांना बोलके केले, व फोक ऑर्केस्ट्राचे सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे  कौतुक केले.  यावर्षीच्या युवक महोत्सव- तरुणाई २०२५ चे समन्वयक म्हणून प्रा. डॉ. प्रशांत बागडे तर सह-समन्वयक म्हणून प्रा. अविनाश रामपाल मसराम  यांनी समर्थपणे जबाबदारी सांभाळली.

युवक महोत्सवाला विश्वस्त सौ. सुषमा दाते, सौ. मनीषाताई साठे, सौ. मीराताई बावडेकर आणि  कु.  तेजल बावडेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मैत्रीला भाषेचे बंधन नसते याचा प्रत्यय अमेरिकेतील कु. तेजल बावडेकर यांनी विद्यार्थ्यांना दिला. फावल्या वेळात महाविद्यालयातील अनेक मुलींशी मैत्री करून मंचावर हिंदी फिल्म गीतावर नृत्य सादरीकरणात प्रत्यक्ष सहभाग घेऊन अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. दोन दिवसात केलेल्या सरावाच्या बळावर मनात इच्छा असेल तर भाषा अडथळा ठरत नाही याचे प्रत्यक्ष उदाहरण कुमारी तेजल हिने विद्यार्थ्यांना दाखवून दिले.

युवक महोत्सवासाठी  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरु उपप्राचार्य डॉ. ताराचंद कंठाळे  यांच्या मार्गदर्शनात सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेऊन युवक महोत्सव यशस्वी करण्यासाठी मनापासून प्रयत्न केले.

रोजगार भरती मेळावा

जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय यवतमाळ आणि बाबाजी दाते कला आणी वाणिज्य महाविद्यालय उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने आमच्या महाविद्यालयात जिल्हास्तरीय शिकाऊ उमेदवार रोजगार भरती मेळाव्याचे आयोजन दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी वेळ 11 वाजता आयोजित करण्यात आले होते. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील विविध 14 आस्थापनांनी सहभाग नोंदविला. मागील तीन वर्षातील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रोजगार संधी मिळण्याकरिता आयोजकांना बोलाविले होते. मेळाव्यात एकूण 119 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली त्यातील 102 विद्यार्थ्यांची शिकाऊ उमेदवारी आणि रोजगारासाठी निवड करण्यात आली.

मेळाव्याकरिता उपस्थित नागपूरचे विनीत एंटरप्राइजेस चे मयूर उजवणे संभाजीनगर येथील स्काय प्लेसमेंटचे विजय तांदळे राजवी होंडा यवतमाळ येथील कुमारी साक्षी शेरजे हिमालय बजाज यवतमाळचे अमोल गाढवेकर रानडे डेअरी यवतमाळचे आनंद रानडे तसेच मॅक मोटर्स यवतमाळ येथील स्वप्नील सावरकर आणि भारतीय जीवन विमा महामंडळाचे विकास अधिकारी सचिन अवधूत इत्यादी अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊन 102 विद्यार्थ्यांची शिकाऊ उमेदवारी आणि रोजगारासाठी निवड करण्यात आली.

या कार्यक्रमाकरिता  अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजेश सिंगरु तर विशेष उपस्थिती म्हणून संस्थेचे अध्यक्ष विनायकराव दाते, विश्वस्त सुषमा दाते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे आयआयएल संचालक अजय लाड उद्घाटक म्हणून श्री आर पी कोडापे बीटीआरआय सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार किशोर वाडेकर अधीक्षक जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय यवतमाळ प्रामुख्याने उपस्थित होते 14 आस्थापनातील व्यवसाय अभ्यासक्रमांतर्गत असणारे शिक्षक यांची आवर्जून उपस्थिती होती महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष सहकार्य केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय त्रिवेदी यांनी तर कार्यक्रमाचे संचालन अविनाश मसराम यांनी केले

दाते महाविद्यालयात NEP स्कूल कनेक्ट २.० संपन्न

बुधवार दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी महाविद्यालयामध्ये आय.क्यू.ए.सी. तर्फे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 वर आधारित शासनाच्या स्कूल कनेक्ट २.० प्रोग्राम अंतर्गत कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेमध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून डॉ. अजय लाड प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू उपस्थित होते. वाणिज्य महाविद्यालय ट्रस्टचे अध्यक्ष श्री विनायक दाते तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ताराचंद कंठाळे यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभलेली होती. सर्वप्रथम दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीत गायनाने झाली. कार्यशाळेच्या प्रास्ताविकामध्ये डॉ. सचिन तेलखडे यांनी कार्यशाळेची आवश्यकता आणि  NEP चे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. अजय लाड, इनक्युबेशन सेंटर अमरावती विद्यापीठ चे प्रमुख यांनी आपल्या भाषणात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे महत्त्व आणि भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये त्याची आवश्यकता यावर भर दिला. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे शिक्षणातील आमुलाग्र बदल आहे, हे पण विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू यांनी NEP मध्ये इंडियन नॉलेज सिस्टीम या विषयाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. NEP मधून आपल्याला भारतीय तत्त्वज्ञानाशी कसे अवगत होता येईल, हे पण याप्रसंगी सांगितले. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ. सचिन तेलखडे यांनी काम पाहिले.

या कार्यशाळेचे संचलन प्रा. नलिनी आडे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत गायनाने झाली. या कार्यक्रमाला बी.ए. व बी.कॉम. भाग ३ तसेच ११ वी व १२ वी चे  विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुद्धा कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.

दीक्षारंभ कार्यक्रम

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये सोमवार दि. ०२/०७/२०२४ ते शुक्रवार ०५/०७/२०२४ दरम्यान दीक्षारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मंगळवार ०२ जुलै रोजी सकाळी 11 वाजता दीक्षारंभ कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला. सर्वप्रथम मंचावर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजक प्रा. डॉ. प्रदीप दरवरे यांनी आपल्या प्रस्ताविकातून दीक्षारंभ कार्यक्रमा मागील भूमिका स्पष्ट केली. त्यांनी महाविद्यालयातील विविध उपलब्ध सुविधांबद्दल विस्तृत माहिती दिली तसेच महाविद्यालयातील विविध विभाग तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा परिचय करून दिला. प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले अध्यक्ष, वाणिज्य महाविद्यालय न्यास मा.श्री. विनायक दाते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. तुषार कोटक S. P. M. गिलानी महाविद्यालय, घाटंजी यांनी विद्यार्थ्यांना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तसेच करिअर बद्दल मार्गदर्शन केले. यावेळी मंचावर सौ. सुषमाताई दाते उपस्थित होत्या. दीक्षारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ताराचंद कंठाळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात जीवनात शिक्षणाचे महत्त्व किती आहे हे
पटवून दिले. तसेच विद्यार्थ्यांना कुठल्याही अडचणी आल्यास त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले. डॉ. वैशाली मेश्राम यांनी महाविद्यालयामध्ये सुरू झालेल्या कौशल्य विकास केंद्राबद्दल माहिती दिली व विद्यार्थ्यांना कौशल्य विकास, केंद्र अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या विविध कोर्सेस ला प्रवेश घेण्याचे आवाहन केले. प्रा. रुकेश पंचभाई यांनी महाविद्यालयामध्ये नव्याने सुरू होत असलेल्या The Comprehensive English Course बद्दल माहिती दिली व कोर्सला प्रवेश घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला प्रथम वर्षाचे कला आणि वाणिज्य शाखेचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. डॉ. सचिन तेलखडे यांनी काम पाहिले तसेच आभारप्रदर्शन प्रा. डॉ. रविजीत गावंडे यांनी केले. दीक्षारंभ कार्यक्रम संपल्यानंतर विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. दीक्षारंभ कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवार दिनांक ०३/०७/२०२४ ला विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन परिसराची माहिती तसेच प्रत्यक्ष ओळख करून देण्यात आली. गुरुवार दिनांक ०४/०७/२०२४   विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील विविध विभागांची माहिती देण्यात आली. शुक्रवार दिनांक ०५/०७/२०२४ रोजी विद्यार्थ्यांना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विषय कसे निवडावे याबद्दल महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ताराचंद कंठाळे डॉ. प्रशांत बागडे डॉ. वैशाली मेश्राम व डॉ. सचिन तेलखडे यांनी मार्गदर्शन केले.

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात पालकसभा संपन्न

स्थानिक बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये शनिवार दिनांक ०६ एप्रिल २०२४  रोजी सावरकर सभागृहामध्ये पालक सभा संपन्न झाली. या  सभेचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वर्षा कुळकर्णी, प्रमुख अतिथी प्रा.डॉ.हरिदास धुर्वे व कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. डॉ. रविजीत गावंडे तर पालक प्रतिनिधी म्हणून संजय वानखडे, सुनील कळसइतकर, व्यासपीठावर उपस्थित होते. प्राचार्य डॉ. वर्षा कुळकर्णी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यार्थांचा सर्वांगीण विकास होण्याकरिता महाविद्यालयात विविध उपक्रम राबविले जातात असे प्रतिपादन केले. प्रमुख अतिथी अमरावती विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य वाणिज्य विभागाचे प्रा.डॉ. हरिदास धुर्वे यांनी पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये सुसंवाद व्हावा जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाल्यास भविष्यात विद्यार्थ्यांसमोर मोठे आव्हाने किंवा समस्या राहतील त्यांना समर्थपणे त्यांचे निराकरण करण्यात मदत होईल, असे स्पष्ट केले. पालक प्रतीनिधी म्हणून सुनील वानखडे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना  या महाविद्यालयात प्रवेश घेतल्या नंतर आपल्या मुलीमधे सकारात्मक बदल झाला आहे. त्या मुळे आम्ही समाधानी आहोत, असे सांगीतले. संजय गायकवाड  यांनी मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयात  तासिका नियमित होतात.   तसेच विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याकरिता ग्रंथालयामधे उत्तम वाचन सुविधा आहे, असे आवर्जून नमूद केले. कार्यक्रमाच्या प्रास्तविकातून शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये सुसंवाद असणे आवश्यक आहे. विद्यार्थांच्या समस्या जणून घेणे, पालकांना शिक्षकांकडून अध्यापनाबाबत काय अपेक्षित आहे हे समजून घेणे हा या पालक सभेचा उद्देश आहे असे प्रा.डॉ.रविजीत गावंडे यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन बि.ए. भाग २ ची विद्यार्थिनी कु. दिपाली ठाकरे हीने.तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ.रविजीत गावंडे यांनी केले.  या कार्यक्रमाला प्रा.विजय दीक्षित, प्रा.डॉ. ताराचंद कंठाळे, प्रा.डॉ. सचिन जयस्वाल, प्रा.दत्तात्रय जोशी, प्रा.डॉ. सचिन तेलखेडे  प्रा.डॉ. वैशाली मेश्राम, प्रा. गजानन लांजेवार ई. उपस्थित होते.

ग्रामगीता जीवन विकास परीक्षा संपन्न.

अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज आश्रम द्वारा संचालित बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन केंद्र मार्फत 20/02/2024 रोजी महाविद्यालयात ग्रामगीता जीवन विकास परीक्षेचे आयोजन करण्यात आले. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता “आधुनिक युगाची संजीवनी बुटी” मानल्या जाते. राष्ट्रसंतांच्या साहित्यावर आधारित ही परीक्षा 2014 पासून महाविद्यालयात आयोजित करण्यात येते. महाविद्यालयाची “बेस्ट प्रॅक्टिस” म्हणून ही परीक्षा अत्यंत उत्साहाने दरवर्षी महाविद्यालयात प्रा. डॉ. ताराचंद कंठाळे, समन्वयक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन केंद्र, यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येते. राष्ट्रसंतांच्या साहित्याचा अधिकाधिक प्रचार आणि प्रसार होण्याच्या दृष्टिकोनातून आणि विद्यार्थ्यांमध्ये मूल्य संस्कारांची रुजवणूक होण्याच्या दृष्टीने ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची मानली जाते.  राष्ट्रसंत म्हणतात, “ग्रामगीता नव्हे पारायणासि ! वाचता वाट दावी जनासि ! समूळ बदलवी जीवनासि ! मनी घेता अर्थ तिचा !” या अर्थाने  विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रसंतांच्या साहित्याची रुची निर्माण व्हावी या हेतूने सदर परीक्षेला दरवर्षी महाविद्यालयातून विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत असतो. ह्या परीक्षेचे यशस्वीरित्या आयोजन करण्यासाठी प्रा. डॉ. ताराचंद कंठाळे आणि प्रा. डॉ. सचिन तेलखडे यांनी परिश्रम घेतले.

युवा पिढीने समाजभान ठेवण्याची गरज - प्राचार्य डॉ. अविनाश मोहरील

कर्तुत्ववान पिढी घडवायची असेल तर युवकांमध्ये समाजभान असण्याची गरज आहे. स्वतःच्या जीवनात प्रचंड मेहनत, आशावाद, संयम आणि उच्चप्रतीची गुणवत्ता या चतु:सूत्रीचा तरुणांनी अवलंब करणे अत्यंत  आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. अविनाश मोहरील यांनी केले. बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात आयोजित युवा महोत्सव तरुणाई २०२४ चे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. "आई-वडिलांनी आपल्याला लहानाचे मोठे केले, सर्व सुविधा पुरविल्या तसेच गुरुजनांनी दिलेली शिकवण याबद्दल जीवनभर कृतज्ञ असले पाहिजे. या सर्वांचा आदर कसा ठेवावा हे त्यांनी अनेक दाखले देऊन विद्यार्थ्यांना समजावून  सांगितले. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांनी महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली आणि विद्यार्थ्यांना शिस्तीचे महत्व पटवून दिले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री  विनायक दाते यांनी विद्यार्थ्यांना समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने झाली. संगीत विभागा तर्फे सरस्वती स्तवन आणि स्वागत गीत सादर करण्यात आले. व्यासपीठावर  विशुद्ध विद्यालय संस्थेचे सचिव श्री विजय कासलीकर, सदस्य श्री महेश जोशी, विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. डॉ. हरिदास धुर्वे, सहसमन्वयक श्री संजय त्रिवेदी आणि विद्यार्थी प्रतिनिधी रोहन गायकवाड  उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील नव्याने आचार्य मार्गदर्शक म्हणून नियुक्त झालेल्या प्रा. डॉ. ताराचंद कंठाळे, प्रा. डॉ. प्रशांत बागडे आणि प्रा. डॉ. रवीजीत गावंडे तसेच विशेष पुरस्कार प्राप्त प्रा. डॉ. हरिदास धुर्वे, प्रा. डॉ. सचिन जयस्वाल आणि प्रा. डॉ. वैशाली मेश्राम यांचा शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सर्व विद्यार्थी वर्ग प्रतिनिधींचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवक महोत्सव तरुणाई २०२४ चे समन्वयक प्रा डॉ.  ताराचंद कंठाळे यांनी केले उत्कृष्ट संचलन प्रा. वैशाली बेडेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. सचिन तेलखडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता एनएसएस, एनसीसी आणि इतर स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता प्रा. डॉ. स्वाती जोशी यांनी सादर केलेल्या पसायदानाने झाली

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर कार्यशाळा

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ मधील आय. क्यू. ए. सी.  विभागाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२० च्या अंमलबजवणीमुळे होणाऱ्या विद्यार्थी उपयोगी बदलांबाबत विद्यार्थ्यांना माहिती  उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने शनिवार, दि. २०/०१/२०२४ रोजी स्वा. सावरकर सभागृहात  School Connect (NEP Connect) हा संपर्क अभियानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.  कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने झाली.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वर्षा ध. कुलकर्णी, प्रमुख उपस्थिती व्यवस्थापनाचे प्रतिनिधी वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ ट्रस्टचे अध्यक्ष श्री.  विनायक दाते, संस्थेच्या विश्वस्त सौ. सुषमा दाते, विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे सदस्य म्हणून डॉ. हरिदास धुर्वे, व्यवस्थापन परिषद सदस्य, स.गा.बा. अ. विद्यापीठ आणि डॉ. ताराचंद कंठाळे, सदस्य वाणिज्य भाषा  मंडळ, आय. क़्यु. ए. सी. समन्वयक डॉ. सचिन तेलखडे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी विद्यापीठाद्वारे प्रशिक्षित साधन व्यक्ती म्हणून प्रा. डॉ. तुषार कोटक, सहयोगी प्राध्यापक, वाणिज्य एस.पी.एम. सायन्स,  गिलानी आर्ट्स, कॉमर्स कॉलेज, घाटंजी हे उपस्थित होते.  त्यांनी विद्यार्थ्यांना एन. ई. पी. बद्दल उत्कृष्ट मार्गदर्शन केले. विद्यार्थांनी एन. ई. पी. बद्दल प्रश्न विचारून शंकानिरसन केले. प्रमुख वक्ते डॉ. तुषार कोटक यांना प्राचार्य व  उपस्थितांचे हस्ते Certificate of Appreciation प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे संचलन डॉ. अमोल राऊत यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. सचिन जैस्वाल यांनी केले.  कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.   कार्यक्रमाला वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील १६४ विद्यार्थी तसेच वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

महाविद्यालयात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ, करियर कौन्सिलिंग अँड प्लेसमेंट सेल, जिल्हा उद्योग केंद्र आणि मिटकॉन यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10.30  वाजता सावरकर सभागृहामध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (जनजागृती अभियान) आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वर्षा कुळकर्णी, मार्गदर्शक मा. प्रतीक्षा नक्षणे,  व्यवस्थापक, डी. आय. सी. यवतमाळ, मा. श्री संदीप कोरडे, प्रकल्प अधिकारी, मिटकॉन, मा. श्री प्रवीण रंगारी, इन्स्पेक्टर डी. आय. सी.यवतमाळ तथा समन्वयक म्हणून प्रा. डॉ. ताराचंद कंठाळे आणि प्रा. डॉ. सचिन  तेलखडे मंचावर उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. स्वागत समारंभा नंतर समन्वयक प्रा. डॉ. सचिन तेलखडे यांनी प्रास्ताविक केले. आज राज्य व केंद्र शासनाच्या वतीने ज्या ज्या योजना  राबविण्यात येतात त्या समाजाभिमुख आणि विद्यार्थीभिमुख व्हाव्यात. विद्यार्थ्यांना जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून राबविला जाणाऱ्या योजना अवगत होण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीचा ध्यास न करता रोजगार निर्मिती करून इतरांना रोजगार देण्याचे प्रयत्न करावे असे मनोगत प्राचार्य डॉ. वर्षा कुळकर्णी यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अमोल राऊत तर आभार  प्रदर्शन प्रा.डॉ. रविजीत गावंडे, शारीरिक शिक्षण संचालक यांनी केले. या कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थी आणि प्राध्यापक वृंद उपस्थित होते.

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयचा युवा प्रेरणा शिबिरामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग

महाविद्यालयामधील करिअर कौन्सिलिंग अँड प्लेसमेंट सेल व स्वामी विवेकानंद केंद्र यवतमाळ यांच्यात झालेल्या सामंजस्य करारा अंतर्गत विद्यार्थी विकसन उपक्रम राबविला जातो.  या उपक्रमांतर्गत विद्यार्थी स्वामी  विवेकानंदांच्या जीवनावर आयोजित परीक्षेमध्ये तसेच विविध शिबिरांमध्ये दरवर्षी सहभाग घेतात. यावर्षी सुद्धा स्वामी विवेकानंद केंद्र कन्याकुमारी, विदर्भ विभाग द्वारा आयोजित युवा प्रेरणा शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग  घेतला होता.  हे शिबिर श्री सदानंद मठ सालोड जिल्हा वर्धा येथे ४ ते ७ जानेवारी २०२४ दरम्यान आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कृती, समाज, देश याबद्दल जाणीव निर्माण झाली.  तसेच  विविध खेळांमधून विद्यार्थ्यांना सेल्फ मॅनेजमेंट, टीम वर्क कसे करायचे याचे प्रशिक्षण मिळाले.

महाविद्यालयचा युवा महोत्सवामध्ये सक्रिय सहभाग

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांनी, अमरावती विद्यापीठ दि. 10/10/2023 ते 13/10/2023 दरम्यान चाललेल्या युवा महोत्सवामध्ये विविध कार्यक्रमांमध्ये प्राचार्य वर्षा  कुलकर्णी तसेच डॉ. वैशाली मेश्राम व डॉ. रविजीत गावंडे यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी  सक्रिय सहभाग नोंदवला. प्रश्नमंजुषा स्पर्धेत रोहन गायकवाड, दिपाली ठाकरे, आचल वरझडकर व्यंगचित्र व स्पॉट पेंटिंग  स्पर्धेत आदित्य वेरूळकर वकृत्व स्पर्धेत तुषार  दडांजे वाद-विवाद स्पर्धेत मयुरी बोंद्रे व अर्थराज राठोड उत्कृष्ट सादरीकरण केले. रांगोळी स्पर्धेत दिपाली ठाकरे तर मेहंदी स्पर्धेत दामिनी बुटले यांनी कलाकृती सादर केली. त्याचप्रमाणे  स्कीट, मुकनाट्य व एकांकीका मध्ये आदित्य सोनटक्के ओम जोगदंड मोहीम सय्यद सिद्धेश माहुलकर वैष्णवी बगमारे वेदिका भिलाई यांनी उत्कृष्ट कामगिरी केली तसेच स्थळ स्थापनेमध्ये अविनाश ढेरे व ग्रुप यांनी जन्म  या विषयावर प्रतिकृती उभारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तसेच समुहगान मध्ये वैष्णवी व गृपने उत्कृष्ट गायन सादर केले. त्याच प्रमाणे लोकनृत्य स्पर्धेमध्ये रश्मी परसराम आणि ग्रुप यांनी उत्कृष्ट प्रकारे डांगी लोकनृत्य सादर  करून सर्वांची वाहवाह मिळवली.

बाबाजी दाते महाविद्यालयात दि. १४/०७/२०२३ रोजी दिक्षारंभ कार्यक्रमाचे आयोजन

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये शुक्रवार दि. १४/०७/२०२३ रोजी सकाळी ०९:०० वाजता दीक्षारंभ कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे संयोजक प्रा. डॉ. हरिदास धुर्वे यांनी  आपल्या प्रस्ताविकातून दीक्षारंभ कार्यक्रमा मागील भूमिका स्पष्ट केली. त्यांनी महाविद्यालयातील विविध उपलब्ध सुविधांबद्दल विस्तृत माहिती दिली तसेच शासनाच्या वेगवेगळ्या उपलब्ध शिष्यवृत्तींबद्दल मार्गदर्शन केले.  डॉ. सचिन तेलखडे यांनी महाविद्यालयातील विविध विभाग तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा परिचय करून दिला. दीक्षारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्ष, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांनी आपल्या  अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाच्या विकासासाठी विद्यार्थ्यांची भूमिका कशी महत्त्वाची आहे हे पटवून दिले. तसेच विद्यार्थ्यांना कुठल्याही अडचणी आल्यास त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले.  कार्यक्रमाला प्रथम वर्षाचे कला आणि वाणिज्य शाखेचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून वाणिज्य शाखेकडून  प्रा. डॉ. हरिदास धुर्वे आणि कला शाखेकडून प्रा. डॉ. सचिन तेलखडे यांनी काम पाहिले. NSS  विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. वैशाली मेश्राम तसेच विद्यार्थी यांचे कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन प्रा. डॉ. मंजुश्री नेवल यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. डॉ. रविजीत गावंडे यांनी केले. दीक्षारंभ कार्यक्रम संपल्यानंतर प्रा. गजानन लांजेवार यांनी सर्व विभागांचा परिचय करून दिला तसेच महाविद्यालयाचा परिसर विद्यार्थ्यांना दाखवला. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

स्थानिक बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये गुरुवार दि. ८/१२/२०२२ रोजी सावरकर सभागृहामध्ये पालक सभा संपन्न झाली. पालक सभेचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. कल्पना  देशमुख, प्रमुख अतिथी प्रा. डॉ. विवेक देशमुख, कार्यक्रमाचे समन्वयक  प्रा. डॉ. रविजीत गावंडे, सह-समन्वयक प्रा. डॉ.अमोल राऊत तर पालक प्रतिनीधी म्हनुण श्री. ढाले, श्री. चिंते व सौ. रंजना परसराम व्यासपिठावर  उपस्थित होते. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. कल्पना देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये शिक्षण, कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सर्वगुण संपन्न विद्यार्थी कसा घडेल. यासाठी दाते महाविद्यालय नेहमी  प्रयत्नरत असते असे विचार व्यक्त करून महाविद्यालयातील सर्व सुविधांचा आढावा घेतला. प्रमुख वक्ते प्रा. डॉ. विवेक देशमुख यांनी पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये संवाद व्हावा जेणेकरून शिक्षण व्यवस्था  अधिक बळकट होईल व विचारू पद्धतीने अध्ययन व अध्यापनाचे काम सोयीस्कर होईल असे विचार व्यक्त केले. श्री. ढाले यांनी महाविद्यालयीन शिक्षण केवळ नोकरीसाठीच नव्हे तर विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व सुसंस्कारी  व्हावे यासाठी शिक्षण घेतले पाहिजे. सामाजिक उपक्रमामध्ये दाते महाविद्यालय नेहमीच सहभागी होण्याकरिता अग्रेसर असते, असे मत पालक प्रतिनिधी म्हणून त्यांनी व्यक्त केले. सौ. रंजना परसराम यांनी मानवी मूल्यांची  जोपासना करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते, असे प्रतिपादन पालक प्रतिनिधी म्हणून केले. या कार्यक्रमाच्या प्रास्तविकातून शिक्षक, विद्यार्थी, व्यवस्थापन आणि पालक हे  महाविद्यालयाचे महत्त्वाचे आधारस्तंभ असून विद्यार्थ्यावर योग्य संस्कार करण्याकरिता शिक्षकांबरोबरच पालकांची भूमिका तेवढीच महत्त्वाची असते, असे विचार प्रा. डॉ. अमोल राऊत यांनी मांडले. या कार्यक्रमाचे उकृष्ट सूत्र संचलन प्रा. डॉ. सचिन  तेलखडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ. रविजीत गावंडे यांनी केले. या कार्यक्रमाला डॉ. हरिदास धुर्वे, डॉ. स्नेहल डहाळे, डॉ. स्मिता शेंडे, प्रा. विनोद तलांडे, प्रा डॉ. सचिन जयस्वाल, प्रा. विजय दीक्षित, प्रा.गजानन लांजेवार प्रा. डॉ. वैशाली मेश्राम तसेच प्रा. डॉ. ताराचंद कंठाळे उपस्थित होते.

दाते कॉलेज मध्ये २०२२ युवक महोत्सव साजरा

गुरुवार  दि.२८/०४/२०२२ रोजी युवक महोत्सवाचे विधिवत उद्घाटन करण्यात आले. उद्घाटक म्हणून यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक मा. डॉ. दिलीप पाटील भुजबळ लाभले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री.  विनायक दाते तर प्रमुख अतिथी म्हणून श्री. सतिश फाटक, मा. सौ. सुषमा दाते, सौ. शर्मिलाताई फाटक, श्री. विजय कासलीकर उपस्थित होते. तसेच प्राचार्य डॉ. कल्पना देशमुख, प्रा. डॉ. विवेक देशमुख, प्रा. डॉ.  हरिदास धुर्वे, प्रा. दत्तात्रय जोशी, समन्वयक, युवक महोत्सव तसेच महेश शिरसाट, अध्यक्ष, विद्यार्थी परिषद यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या  प्रारंभी संगीत विभागाच्या चमूने शारदा स्तवन आणि स्वागत गीत  सादर केले. महाविद्यालयाची प्रार्थना “पसायदान”  प्रा.डॉ. स्वाती जोशी यांनी सादर केली. याच समारंभामध्ये दरवर्षी प्रकाशित होत असलेल्या “प्रतिबिंब” या वार्षिकांकाचे प्रकाशन मा. उद्घाटक डॉ. दिलीप पाटील  भुजबळ आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थांनी आपल्या समोर उदात्त ध्येय ठेवावे व त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करून यशाचे शिखर गाठावे” असे प्रतिपादन डॉ. दिलीप पाटील भुजबळ,जिल्हा  पोलीस अधिक्षक, यांनी केले. प्रा.डॉ.कल्पना देशमुख यांनी विद्यार्थ्यांना युवक महोत्सवाचा मनमुराद आनंद लुटावा परंतु जीवनातील लक्ष्मण रेषेचे कायम पालन करावे असे आवाहन केले. संस्थेचे उपाध्यक्ष श्री. सतीश  फाटक यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये जीवनामध्ये यशाचा कुठलाही शॅार्टकट नाही, तर चिकाटी आणि कठोर परिश्रम याला पर्याय नाही, हे पटवून दिले. सिनेट सदस्य प्रा.डॉ. विवेक देशमुख यांनी आपल्या शेरोशायरीयुक्त  भाषणामधून विद्यार्थ्यांनी  सातत्य आणि चिकाटीने प्रगतीचे गौरीशंकर गाठावे, असे आवाहन केले. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये मा. श्री. विनायक दाते यांनी विद्यार्थ्यांना जीवनात अभ्यास, व्यायाम आणि शिस्तपालन  कसे आवश्यक आहे, हे हसत खेळत पटवून दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक प्रा. दत्तात्रय जोशी, संचालन प्रा.डॉ. ताराचंद कंठाळे तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. सचिन तेलखडे यांनी केले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची  सांगता झाली. दि. २७/०४/२०२२ रोजी रांगोळी स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये पोस्टर डिझाईन, संस्कारभारती व थेंबाची रांगोळी इत्यादी प्रकारच्या रांगोळ्यांचा समावेश होता. दिनांक २८ रोजी घेण्यात आलेल्या डिश डेकोरेशन, आणि  पुष्परचनेचे उद्घाटन यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक मा. डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. याच दिवशी भावगीत स्पर्धा आणि बचाव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

शुक्रवार दि. २९/०४/२०२२ रोजी ट्वीन्स स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळे कला प्रकार सादर केले. ग्रुप डान्स, रिमिक्स डान्स, पथनाट्य , ड्युयेट  डान्स, गोंडी डान्स, लघुनाटिका, गोंधळ, मसा नृत्य , पंजाबी नृत्य, लावणी नृत्य आणि योगानृत्य  इत्यादी सादर करण्यात आले. शनिवार दि. ३०/०४/२०२२ रोजी  कविसंमेलन, वादविवाद स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वादविवाद स्पर्धेचा विषय:-  सभागृहाच्या मते, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात भ्रमणध्वनी  (मोबाईल) चे स्थान मोलाचे आहे” हा होता. रविवार दि.  ०१/०५/२०२२ रोजी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अनेक विद्यार्थ्यांनी यामध्ये स्टॉल्स लावले. महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांनी आनंद  मेळाव्याला प्रतिसाद दिला. आनंद मेळाव्यानंतर विविध  स्पर्धेतील विजेत्यांना  मान्यवरांच्या हस्ते स्मृती चिन्ह व प्रशस्ती पत्रक देऊन गौरविण्यात आले. बक्षीस  वितरणाने  या युवक महोत्सवाची सांगता झाली.