बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय येथील गृह अर्थशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 20-10 -2024 रोजी भद्रावती चंद्रपुर शैक्षणिक सहलीचे आयोजन प्राचार्य डॉ. राजेश शिंगरू यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वैशाली मेश्राम यांनी विद्यार्थिनींना शैक्षणिक सहली मागचा उद्देश समजून सांगीतला तेथील स्थळाचे महत्त्व सांगितले व सहलीमध्ये घ्यावयाच्या नोंदीची संपूर्ण माहिती दिली. सहल प्रथम भद्रावती येथील प्राचीन लेण्या व जैन मंदिर येथे गेली त्या ठिकाणी प्राचीन लेण्या या आपलं नाविन्य कसे जपून आहेत व तेथील कलाकृतीचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला तसेच जैन मंदिर मध्ये प्राचीन हस्तकला व सुंदर कलाकृती मनमोहुन घेत होत्या, त्याचप्रमाणे सेवाभाव कसा जपावा याची माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेतली त्यानंतर सहल चंद्रपूर येथे बॉटनिकल गार्डन मध्ये नेण्यात आली त्या ठिकाणी 108 एकर मध्ये साकारलेले .मनमोहक देखावे व वातावरण मन मोहून टाकत होते. तसेच थ्रीडी शोच्या माध्यमातून मिळालेली ऐतिहासिक माहिती प्राचीन अवशेष समुद्रातून मिळालेला नैसर्गिक साठा त्यातील स्टोनचे प्रकार ऐतिहासिक स्थळांची माहिती 'पोषक अन्नाची माहिती पोषण अन्नाचे पोस्टर लाकडापासून बनवलेल्या कलाकृती झाडांना दिलेले वेगवेगळे आकार तसेच तयार केलेले नैसर्गिक देखावे व सायन्सचे विविध प्रोजेक्ट विद्यार्थ्यांनी जवळून अनुभवले. त्यानंतर महाकाली मंदिर येथून दर्शन घेऊन परतीचा प्रवास सुरू करण्यात आला. गृहअर्थशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांनी .संपूर्ण सहलीचे नियोजन केले तसेच पोषक घटक व सजावट खान-पानाच्या विविध पद्धती व गृह उद्योग उभारण्यासाठी लागणारे स्किल अभ्यासले तर राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी परिसर स्वच्छता प्राचीन लेण्याची परंपरागत सेवाभाव त्याचप्रमाणे विविध विषयाचे अध्ययन केले. संपूर्ण सहलीच्या आयोजना मध्ये रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. दत्तात्रय जोशी तसेच प्रा. हेमा गुल्हाणे प्रा. स्नेहलता घाटे तसेच अंकुश मेश्राम यांनी परिश्रम घेतले
मतदार जनजागृती अभियान 2023-2024
बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृती अभियान दि. 25/4/24 रोजी प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी ह्यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आले
रा.से.यो कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम ह्यांनी स्वयंसेवकाना मतदान करणे कसे महत्वांचे आहे हे सांगुन सर्वसामान्य जनतेला प्रोत्साहित करण्यासाठी काय करायचे हे सांगीतले. सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल ह्यांनी स्वयंसेवकांना दत्त चौक, एलआयसी चौक, बस स्थानक, दाते कॉलेज चौक, आर्णी नाका, या ठिकाणी उभे राहून सर्वसामान्य जनतेला मतदानाविषयी जागृतीचा संदेश देण्याचे आवाहन केले. यासाठी रोहन गायकवाड, रश्मी परसराम, वैष्णवी बगमारे, विठ्ठल कुहाडकर, तुषार दडांजे, प्रशिक भस्मे, जोत्स्ना भोयर, माधुरी अड्याळकर, अनिषा वाडगुरे, मंगेश लोढें ह्यांनी विविध चौकात उभे राहुन मतदान करण्याचा संदेश दिला.
जागतिक महिला दिन साजरा
बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे राष्ट्रीय सेवा योजना व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.11/3/2024 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान करण्याकरिता कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वर्षा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी महिला दिन साजरा करण्यामागची भूमिका स्पष्ट करून महिला ह्या कशा सर्व गुणांनी संपन्न आहेत व त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेतला तसेच उपस्थित अतिथींचा परिचय करून दिला. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या सायकॉलॉजिस्ट तसेच फॉरेन्सिक अधिकारी म्हणून काम करणाऱ्या राही ठाकूर यांनी विद्यार्थिनींना महिलांविषयी असलेले पूर्वग्रह व समाजामध्ये वावरताना येणाऱ्या अडचणी यावर मात कशी करायची हे सविस्तर सांगितले त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असलेल्या डॉ. सारिका शहा यांनी विद्यार्थिनींना बदलत्या समाजाच्या अपेक्षा व महिलांची आजची स्थिती याविषयी चर्चा केली त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती असलेल्या सन्माननिय सौ.सुषमा दाते यांनी पूर्वी पार चालत आलेल्या रूढी परंपरा व आजची सामाजिक स्थिती यावर प्रकाश टाकला तसेच स्त्री व पुरुष दोघेही कमावते असल्यामुळे दोघांनीही घरातील कामाचा भार सांभाळावा असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वर्षा कुलकर्णी यांनी आई-वडिलांचा विश्वास हा विद्यार्थी जिवनात कसा संपादन करून विविध क्षेत्र कसे बळकावता येतात, याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले, महिलांनी वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊन नावलौकिक मिळवावे अश्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिषा वाडगुरे हिने तर आभार प्रदर्शन दामिनी बुटले हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतते करिता राज्यशास्त्र,गृहअर्थशास्त्र व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
वैराग्यमूर्ती गाडगे महाराज जयंती
बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत दिनांक 25/2/24 रोजी वैराग्यमूर्ती गाडगे महाराज जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ.वर्षा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना गाडगे महाराजांच्या जीवन विषयक संकल्पना उलगडून दाखवून त्यांनी केलेले कार्य हे समस्त मानवी जीवनासाठी आदर्श आहेत हे सांगितले, तसेच राष्ट्रीय सेवा योजना सहकार्यक्रम अधिकारी डॉ.सचिन जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व सांगून परिसर स्वच्छ करून परिसरातील लोकांना गाडगे महाराजांनी सांगितलेल्या दशसूत्रीचे दैनंदिन जीवनामध्ये पालन केल्यास खऱ्या अर्थाने मानवी जीवन सफल होईल असे सांगून परिसर स्वच्छता करण्यास प्रवृत्त केले.
यावेळी महाविद्यालय परिसर स्वच्छ करून रस्त्यावरील प्लास्टिक व कचरा गोळा करून परिसरातील नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीतून वेगवेगळे नारे व स्वच्छतेचे संदेश देण्यात आले नागरिकांना गाडगे महाराजांची खरी शिकवण सांगण्यात आली व प्रबोधन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता राष्ट्रीय सेवा योजनेच्या संपूर्ण स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले
मनोरुग्णांची सेवा ही ईश्वर सेवा आहे
बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने दि.15/02/2024. रोजी मनोरुग्णांची सेवा करण्यासाठी नंदादीप फाउंडेशन येथे एक दिवशीय भेटीचे आयोजन प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी स्वयंसेवकांना मनोरुग्णांची सेवा ही ईश्वर सेवा आहे असे सांगून मनोरुग्णांना खरी मानवतेची गरज असते असे सांगितले.
रा. से.यो. स्वयंसेवकांनी संपूर्ण परिसर स्वच्छ करून मनोरुग्नाशी संवाद साधला तसेच त्याच्या मनोरंजन साठी स्फुर्ती गिते सादर केली या ठिकाणी असलेल्या एकुण 150 मनोरुग्नाना चिवडा व बिस्कीट चे वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. सचिन जयस्वाल व प्रा. सारिका नंदे यांनी परिश्रम घेतले.
बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील राष्ट्रीय सेवा योजना द्वारे विशेष श्रमसंस्कार निवासी सात दिवसीय शिबिर दि.28 जानेवारी 2024 ते 3 फेब्रुअरी 2024 या कालावधीत दत्तक ग्राम चापर्डा ता. कळंब जि. यवतमाळ येथे संपन्न झाले. शिबिराचे उद्घाटक म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्री विनायक दाते प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी, सं.गा.बा.अमरावती विद्यापीठ अमरावती चे व्यवस्थापन कमिटीचे सदस्य डॉ. हरिदास धुर्वे हे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी मागील वर्षात विद्यार्थ्यांनी केलेल्या गौरवपूर्ण कार्याचा आढावा घेऊन शिबिरा अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या उपक्रमाची माहिती सांगितली.
शिबिरातील स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांनी शिबिरादरम्यान पाळल्या जाणाऱ्या शिस्तीचे महत्व सांगितले. तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री विनायक दाते यांनी स्वयंसेवकांना केलेल्या कामाबद्दल प्रशंसा करून या सात दिवसांमध्ये स्वयंसेवकांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करून 21 व्या शतकाच्या दृष्टीने वाटचाल करावी अशा शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. दिपाली ठाकरे हिने तर आभार प्रदर्शन सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांनी केले.
सायंकाळच्या सत्रामध्ये स्वयंसेवकांसाठी उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले यामध्ये विद्यार्थी प्रतिनिधी रोहन गायकवाड आणि विद्यार्थिनी प्रतिनिधी कु. रश्मी परसराम यांनी स्वयंसेवकांना सात दिवसांमध्ये करावयाच्या विविध उपक्रमांची माहिती सविस्तर सांगून प्रत्येक स्वयंसेवकांनी सहभागी होऊन आपला व्यक्ती महत्त्व विकास करावा असे आवाहन केले. तसेच ग्रामस्थ महिलांसाठी महिला मेळाव्याचे आयोजन करून महिलांना भेटवस्तू देऊन विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यामध्ये ग्रामस्थ महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
दिनांक 29 /01/2024 रोजी योगासनाने दिवसाची सुरुवात झाली, प्रभात फेरी काढून ग्रामस्थांना विविध संदेश देण्यात आले, त्याचप्रमाणे गाव स्वच्छता पथनाट्य सादर करून ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यात आले तसेच श्रमसंस्कार करण्याकरिता रेन वॉटर हार्वेस्टिंग चे उद्घाटन व शोष खड्डा निर्मितीचे नियोजन करण्यात आले, तसेच दुपारच्या सत्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून प्रा. वर्भे सर व रुपेश वानखेडे सर यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रयोगातून अंधश्रद्धा कशी पसरवली जाते व सर्वसामान्य नागरिक त्याला बळी कसा पडतो याचे सविस्तर विवेचन केले यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्या गावात व आजूबाजूच्या परिसरात सुरू असलेली बुवाबाजी याची माहिती सांगून त्यातून मार्ग कसा काढायचा याविषयी सविस्तर चर्चा केली, सायंकाळच्या सत्रामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी डॉ. रविजीत गावंडे यांच्या अध्यक्षते खाली विविध सांस्कृतिक कार्यक्रमांर्गत एकपात्री प्रयोग सादर करण्यात आले यामध्ये शेतकरी, गरीब महिला , विविध नेते व भुताचे कॉमेंट्री करून गावकऱ्यांची मने जिंकली तसेच विविध प्रकारचे नाट्य करून गावागावात चालणारी विविध प्रकारच्या अंधश्रद्धा विषयक बाबींचा पर्दाफाश कसा करायचा व सत्य परिस्थिती कशी ओळखायची याचे सविस्तर नाट्यीकरण करण्यात आले. वरील सर्व कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकारी डॉ. वैशाली मेश्राम व सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांचे मार्गदर्शन लाभले संपूर्ण कार्यक्रमा साठी द शिल्ड गृप ने परिश्रम घेतले .
दि. 30/1/23 रोजी योगासनाने दिवसाची सुरुवात झाली, प्रभात फेरी काढून विविध नारे देवून ग्रामस्थांना विविध संदेश देण्यात आले, त्याचप्रमाणे गाव स्वच्छता पथनाट्य सादर करून ग्रामस्थांचे लक्ष वेधण्यात आले गाडगे महाराजांच्या वेशभुषेत असलेल्या स्वयंसेवकाने सर्व ग्रामस्थांचे लक्ष वेधुन घेतले तसेच श्रमसंस्कार करण्याकरिता बंधाऱ्यावर पोती तयार करण्यात आली, तसेच दुपारच्या बौद्धीक सत्रामध्ये शेतीवर आधारीत विविध व्यवसायीक संधी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून मृणालिनी दहिकर ह्या मंचावर उपस्थित होत्या त्यानी विद्यार्थ्यांना नौकरीच्या मागे न लागता शेती विषयक व्यवसाय सुरु करून स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करावे असे सुचविले तसेच विविध शेती पिका विषयी सविस्तर चर्चा केली, सायंकाळच्या सत्रामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी डॉ. वैशाली मेश्राम यांच्या अध्यक्षते खाली विविध सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये युवा कवी संमेलन आयोजीत करून गावकऱ्यांची मने जिंकली तसेच मोबाईलचे फायदे व दुष्परिणाम या विषयावर वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आली त्यानंतर राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी युवा संसद आयोजित करून विविध विषयावर चर्चा घडवून आणली सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांचे मार्गदर्शन लाभले.
दि. 31/01/23 रोजी योगासन प्राणायम करून दिवसाची सुरुवात झाली, प्रभात फेरी काढून विविध नारे देवून ग्रामस्थांना विविध संदेश देण्यात आले, गाव स्वच्छता विषयावर पथनाट्य सादर करून ग्रामस्थांना अंधश्रद्धा निर्मुलन व प्लॉस्टीक निर्मुलनाचा संदेश देण्यात आला तसेच श्रमसंस्कार करण्याकरिता बंधाऱ्यावर काम करण्यात आले, दुपारच्या बौद्धीक सत्रामध्ये व्यक्तीमत्व विकास काळाची गरज ह्या विषयावर प्रा. प्रिया वाकडे ह्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले त्यांनी स्वयंसेवकांना व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलु उलगडुन दाखविले. सायंकाळच्या सत्रामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा मोटघरे यांच्या अध्यक्षते खाली विविध सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये प्रबोधनात्मक भजन, भारूड व किर्तन सादर करून गावकऱ्यांना मंत्रमुग्ध केले संत तुकाराम महाराजाच्या वेशभुषेने गावकऱ्यांची मने जिंकली वरील संपूर्ण कार्यक्रम हा कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम व सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आला.
दि. 01/02/2024 रोजी योगासन प्राणायम करून दिवसाची सुरुवात झाली प्रभात फेरी काढून विविध नारे देवून ग्रामस्थांना विविध संदेश देण्यात आले. महिला सुरक्षा विषयावर पथनाट्य सादर करून ग्रामस्थांना सेल्फ डिफेन्स चा संदेश देण्यात आला तसेच प्लास्टीक निर्मुलन विषयावर पथनाट्य सादर करण्यात, श्रमसंस्कार करण्याकरिता बंधाऱ्यावर काम करण्यात आले. दुपारच्या बौद्धीक सत्रामध्ये भारतीय संविधान व लोकशाही ह्या विषयावर श्री. नानाभाऊ रोमतकार ह्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले त्यांनी स्वयंसेवकांना भारताचे संविधान स्वयंसेवकासाठी कसे लागु होते यावर विस्तृत मार्गदर्शन केले सायंकाळच्या सत्रामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी डॉ. अमोल राऊत व डॉ. सचिन तेलखडे यांच्या अध्यक्षते खाली विविध सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये वन मिनीट शो चे आयोजन करून नकला, नृत्य, गायन, मिमीक्री इ. कलाप्रकार सादर करून गावकऱ्यांना मंत्रमुग्ध केले वरील संपूर्ण कार्यक्रमासाठी चॅम्पीयम गृपने परिश्रम घेतले.
दि. 02/02/ 2024 रोजी योगाभ्यास करून दिवसाची सुरुवात करण्यात आली स्वयंसेवकांनी श्रमदानांतर्गत बंधारा पूर्ण केला तसेच ग्रामस्थांसाठी सांस्कृतीक रॅलीचे आयोजन करण्यात आले यामध्ये विशेषतः आदिवासी, कोळी, वारकरी, शेतकरी व गवळी संस्कृती चे दर्शन करून देण्यात आले विविध वेशभुषा व नारे देऊन ग्रामस्थाचे लक्ष वेधुन घेण्यात आले शाळेतील विद्यार्थ्यांना यावेळी विविध संस्कृतीची माहिती देण्यात आली व प्रार्थना घेवून रॅली चे विसर्जन करण्यात आले दुपारच्या सत्रात स्वयंसेवकांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प पूर्ण केला तसेच शोष खड्ड्याचे काम देखील पूर्णत्वास नेले त्यानंतर सायंकाळच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची चर्चा करून घेण्यात येणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी केली ही संपूर्ण तयारी विद्यार्थी प्रतिनिधी रोहन गायकवाड व विद्यार्थिनी प्रतिनिधी रश्मी परसराम यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. सायंकाळच्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांसमोर विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम प्रा.संजय त्रिवेदी यांच्या अध्यक्षते खाली आयोजित करून सर्वांची वाह वाह मिळवली यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
या कार्यक्रमाच्या यशस्वी ते करता युनिटी ग्रुप ने परिश्रम घेतले.
दि.03/02/2024 रोजी प्रार्थना, योगासन घेवून स्वयंसेवकांनी स्वच्छता केली प्रभात फेरी व पथनाट्याव्दारे ग्रामस्थाना प्रबोधन करण्यात आले. समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्तावीक करतांना कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम ह्यांनी मागील 6 दिवस राबविलेल्या उपक्रमाचा आढावा घेतला व स्वयंसेवकानी केलेल्या उत्तम कामाची स्तुती केली त्याचप्रमाणे आलेल्या अतिथींना राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध संधी व उपक्रमाची माहिती दिली कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख मार्गदर्शक व अतिथी श्री शैलेंद्र मोठघरे यांनी राष्ट्रीय सेवा योजना हे स्वयंसेवकांना व्यक्तिमत्व घडविण्याची उत्तम संधी देते असे सांगून स्वयंसेवकांचे कौतुक केले तसेच मंचावर उपस्थित असलेले डॉ. किशोर बनसोड यांनी स्वयंसेवकांनी केलेल्या उपक्रमाची स्तुती करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणामध्ये महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांनी स्वयंसेवकांनी स्तुत्य असे उपक्रम राबवून सर्वांना मंत्रमुग्ध तर केलेच शिवाय महाविद्यालयाचे नाव राज्यस्तरीय व राष्ट्रस्तरीय स्तरावर भूषविले हे सांगून विद्यार्थी हा महाविद्यालयाच्या नावलौकिकात महत्त्वाचा भाग असतो असे सांगितले सहकार्यक्रम अधिकारी डॉ.सचिन जयस्वाल यांनी यावेळी सात दिवसात विविध उपक्रमामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्वयंसेवकांना मिळालेले पारितोषिक वितरण केले व उत्कृष्ट ग्रुप म्हणून चॅम्पियन ग्रुप व दुसरा शिल्ड ग्रुप याला विशेष गौरवण्यात आले त्याचप्रमाणे उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून मंगेश लोंढे, उत्कृष्ट नृत्यांगना म्हणून रश्मी परसराम, ग्राफिक डिझायनर म्हणून रोहन गायकवाड, उत्कृष्ट ॲक्टर म्हणून आदित्य वेळुकर, उत्कृष्ट गायक म्हणून देवयानी बरडे तर उत्कृष्ठ मनोरंजन करणारा म्हणून तुषार दडांजे त्याचप्रमाणे उत्कृष्ट ढोलकी वादक म्हणून विठ्ठल कुराडकर, यांना मोमेंटो देऊन गौरवण्यात आले ग्रामस्थांनी सारे दिवस आपला सहभाग नोंदविल्यामुळे त्यांना सुद्धा यावेळी गौरवण्यात आले कार्यक्रमालासंपूर्ण प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध स्पर्धा तसेच राष्ट्रस्तरीय व राज्यस्तरीय' शिबिरामध्ये सहभागी विद्यार्थ्यांचा सत्कार
बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचा दि. 26/1/2024 प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध स्पर्धा तसेच राष्ट्रस्तरीय व राज्यस्तरीय ' शिबिरामध्ये सहभागी विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री विनायक दाते व प्राचार्या डॉ. वर्षा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मोमेंटों, ट्रॅक सूट व सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात आले राष्ट्रीय सेवा योजनेचे एकूण 14 विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील शिबिरामध्ये सहभागी होऊन महाविद्यालयाचे नावलौकिक केले तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा प्रकारांमध्ये प्राविण्य मिळवून बक्षिसांची लय लूट केली यामध्ये रोहन गायकवाड रश्मी परसराम दिपाली ठाकरे, आदित्य वेळुकर मंगेश लोंढे, सायली प्रधान, माधुरी अडाळकर, विठ्ठल कुऱ्हाडकर, हर्षदीप कोरंगे, रोशन गायकवाड, सिद्धार्थ पाटील, सिद्धेश माहुलकर इत्यादी विद्यार्थ्यांचा समावेश होता विशेष म्हणजे यावेळी स्वयंसेवकानी केलेली परेड सर्वांचे लक्ष वेधून घेणारी होती रा.से.यो कार्यक्रमाधिकारी डॉ.वैशाली मेश्राम व सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले
राष्ट्रीय मतदार दिवस साजरा
बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील राष्ट्रीय सेवा योजना आणि गृह अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 23/01/2024 रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्याच्या हेतूने रांगोळी व चित्रकला स्पर्धेचे आयोजन प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी व गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वेशाली मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा घेण्यामागचा हेतू सांगून आपल एक मत कसं महत्त्वाचं आहे हे सांगून स्पर्धेसाठी प्रोत्साहित केले.
सहकार्यक्रम अधिकारी व राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सचिन जयस्वाल यांनी मतदान हा लोकशाहीचा पाया आहे व हा पाया आपण आपल्या एका मताद्वारे भक्कम करत असतो असे प्रतिपादन केले व सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
रागोळी स्पर्धेत एकुण 5 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला त्यात प्रथम दिपाली ठाकरे बी.ए.भाग 2, द्वितीय अनिषा वाडगुरे बी.ए.भाग 2 नैना रामदास शेंडे तसेच मतदान जन जागृती साठी चित्रकला आयोजित करण्यात आली यामध्ये स्पर्धेत एकूण 8 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यात प्रथम क्रमांक आदित्य वेळुकार द्वितीय नैना शेंडे क्रमांक व तृतीय क्रमांक दिपाली ठाकरे यांना प्राप्त झाला.
दोन्ही स्पर्धेचे परीक्षक म्हणुन प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी व IQAC समन्वयक डॉ. सचिन तेलखडे यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता रोहन गायकवाड ,रश्मी परसराम , रोशन गायकवाड , हर्ष कोरांगे वैष्णवी बगमारे यांनी परिश्रम घेतले.
पाणी संवर्धन या विषयावर वक्तृत्व स्पर्धा
बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने दि.05/01/2024 रोजी सावित्री बाई फुले जयंती निमीत्त पाणी संवर्धन या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रा.से.यो. डॉ. वैशाली मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व सांगून स्पर्धा घेण्यामागचा उद्देश सांगितला रा. से.यो. सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्व सांगून पाणी हेच जीवन आहे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना पाणी बचतीचे वेगवेगळे माध्यम सांगून पाण्याची बचत ही काळाची गरज आहे असे सांगितले.
यावेळी महाविद्यालयीन स्तरावर 1) प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी 2) डॉ. वैशाली मेश्राम 3) डॉ. सचिन जयस्वाल यांची निवड करून समितीचे गठन करण्यात आले
तसेच वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. गायत्री जोशी आणि प्रा. हेमा गुल्हाणे यांनी काम पाहाले सदर वक्तृत्व स्पर्धेमध्ये 11 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला यातील प्रथम क्रमांक दिपाली ठाकरे द्वितीय क्रमांक तुषार दडांजे तृतीय क्रमांक स्वीटी वालकोंडे तर प्रोत्साहन पर रोहन गायकवाड यांना प्राप्त झाला.
एच.आय.व्ही. एड्स जनजागृती कार्यक्रम
बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने दि. 22/12/2023 रोजी एच.आय.व्ही. एड्स जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ.वैशाली मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रम आयोजना मागचा हेतू सांगून, कार्यक्रमाची गांभीर्यता लक्षात आणून दिली. त्याचप्रमाणे सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थी जीवनामध्ये हा कार्यक्रम कसा महत्त्वाचा आहे हे सांगुन विद्यार्थ्यांनी एच.आय.व्ही. प्रति जागरूक असावे असे सांगितले, प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या डॉक्टर कांबळे यांनी विद्यार्थ्यांना एच.आय.व्ही.ची लागण कशी होते व त्यापासून बचाव कसा करता येतो हे सविस्तर सांगीतले तसेच मंचावर उपस्थित असलेल्या डॉ. अर्चना पांडे यांनी विद्यार्थ्यांना एच.आय.व्ही. पासून वाचविण्यासाठी टेस्ट करणे किती महत्त्वाचे आहे हे सांगून लग्नाच्या वेळी कुंडली न पाहता एच.आय.व्ही.चा रिपोर्ट बघावा असा मोलाचा सल्ला दिला. यावेळी एकूण 50 विद्यार्थ्यांनी एच.आय.व्ही. टेस्ट करून घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली ठाकरे हिने तर आभार प्रदर्शन आदित्य वेळुकर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता रोहन, तुषार, अर्थराज, प्रशिक रश्मी यांनी परिश्रम घेतले.
संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त उद्बोधन कार्यक्रम
बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने कर्मयोगी संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त दिनांक 20-12-2023 रोजी उद्बोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रम आयोजना मागचा हेतू सांगून, विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे महत्त्व पटवून सांगितले व उद्बोधनातून प्रेरणा घेण्यास सुचविले.
कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले डॉ. रवीजीत गावंडे यांनी विद्यार्थ्यांना संत गाडगे महाराज यांचे कार्य उलगडून दाखवले व विद्यार्थी जीवनामध्ये त्यांचा संदेश कसा महत्त्वाचा आहे हे सविस्तर सांगितले तसेच कार्यक्रमाला उपस्थित असलेले रा.से.यो.चे सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांना संत गाडगे महाराज यांचे कार्य प्रत्यक्ष अंगीकृत करावे व विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेमध्ये अंधश्रद्धेपासून दूर राहून विज्ञानवादी दृष्टीकोन बाळगावा असे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वर्षा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचा मंत्र देऊन कृतीतून गाडगे महाराजांचे कार्य आत्मसात करण्याचे आवाहन केले. तुषार दडांजे व सृष्टी येडमे ह्या विद्यार्थ्यांनी संत गाडगे महाराजांच्या स्मृतींना उजाळा देत विचार व्यक्त केले तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परीसर स्वच्छ करून स्वच्छेतेचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली ठाकरे हिने तर आभार रोहण गायकवाड ह्यांने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता रश्मी परसराम, विठ्ठल कुऱ्हाडकर, अर्थराज राठोड, स्नेहा येंड्रावार, निषा छापेकर, मंगेश, वेदिका भिलाये, प्रशिक भस्मे ह्यांनी परिश्रम घेतले.
टी.डी.आर.एफ. यांच्यामार्फतआपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा
बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे राष्ट्रीय सेवा योजना व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 7/12/23 रोजी टी डी आर एफ यांच्यामार्फतआपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले टी डी आर एफ चे प्रशिक्षक श्री. हरिश्चंद्र राठोड यांनी विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना नैसर्गिकरीत्या व मानवनिर्मित आपत्तीमध्ये बचाव कसा करावा, तसेच पूर, भूकंप या ठिकाणी प्रथमोपचार कसे करावेत याचे प्रशिक्षण दिले.
प्राचार्य डॉ.वर्षा कुलकर्णी यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात सावध राहून काळजी कशी घ्यावी याविषयी सविस्तर सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रा.से.यो कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी तर आभार प्रदर्शन कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका डॉ. वैशाली बेडेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकानी परिश्रम घेतले.
कौशल्य विकास अंतर्गत दिवाळी वस्तुची प्रदर्शनी व विक्री
बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना व गृहअर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी वस्तुंचे प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे आयोजन दि. 7/11/23 रोजी प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.
प्रदर्शनीचे उद्घाटक म्हणून महाविदयालयाच्या प्राचार्या डॉ. वर्षा कुलकर्णी ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणुन सिनेट सदस्य प्रा हरिदास धुर्वे उपस्थित होते
रा.से. यो. कार्यक्रम अधिकारी व गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वैशाली मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना विविध वस्तु स्वतः तयार करून विकण्यात वेगळा आनंद मिळतो हे सांगुन, स्वयंरोजगाराचे महत्व पटवून दिले. रा.से.यो. सह कार्यक्रम अधिकारी डॉ . सचिन जयस्वाल यांनी प्रदर्शनी लावण्यास मदत करून विक्री कौशल्य शिकवले.
विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराचे महत्व समजण्यासाठी दिवाळी निमित्त वापरण्यात येणाऱ्या विविध वस्तु विद्यार्थ्यांनी बनवुन विक्री केली. यामध्ये आकर्षक दिवे, आकाश दिवे, तोरण, फुलांच्या माळा, रांगोळी, तसेच खाद्य पदार्थांचा समावेश होता.
विद्यार्थ्यांनी विक्री कले द्वारे ग्राहकांना आकर्षित केले. प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी विविध वस्तुची खरेदी करून रा. से. यो. विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
सदर कार्यक्रमासाठी दिपाली ठाकरे ठाकरे रश्मी परसराम, रोहन गायकवाड, मंगेश लोंढे, वैष्णवी बघमारे, सौजन्या, आदित्य वेळुकार, अर्थराज राठोड, तुषार दडांजे यांनी परिश्रम घेतले.
शेतकऱ्यांसाठी डिजीटल पीक पाहणी व माहिती भरणे
बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील राष्ट्रीय योजना अंतर्गत दि.15/10/2023 रोजी विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना डिजीटल पीक पाहणी व माहिती ॲपद्वारे भरणे या मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन डॉ. वैशाली मेश्राम व डॉ. सचिन जयस्वाल ह्यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले
महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी डिजीटल पीक पाहणी व माहिती भरणे मोहिम सुरू केली आहे परंतु अजुनही बऱ्याच शेतकऱ्यांना ही माहिती भरता येत नाही त्यामुळे त्यांना अनेक अडचणी येताना दिसून आल्या राष्ट्रीय सेवा योजनाच्या अंतर्गत शेतकऱ्यांना या सर्व बाबींची माहिती मडकोणा या गावी देण्यात आली. प्रत्यक्ष शेतात जावून पाहणी करून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले
प्रशिक्षणा दरम्यान गावाच्या तलाठी आंबेकर तर सरपंच नरेश ढोरे ह्याचे मार्गदर्शन लाभले. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना ग्रामपंचायती कडुन सर्टिफिकेट 1 देवून गौरवण्यात आले
सदर कार्यक्रमा करिता रोहन गायकवाड, दिपाली ठाकरे, वैष्णवी बगमारे, तुषार दडांजे, विठ्ठल कुऱ्हाडकर, अर्थराज राठोड, रोशन गायकवाड यांनी परिश्रम घेतले.
बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविदयालय येथील राष्ट्रीय सेवा योजना व युनिटी फॉउंडेशन तर्फे रस्त्यावरील मोकाट श्वानांन साठी एक मदतीचा हात म्हणून दि 24/9/23 रोजी राष्टीय सेवा योजना वर्धापन दिन वेगळ्या पद्धतीने प्राचार्य डॉ वर्षा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात साजरा करण्यात आला.
रा.से.यो कार्यक्रमाधिकारी डॉ. वैशाली मेश्राम ह्यांनी विद्यार्थ्याना समाजसेवेसोबत मुक्या जनावरांची सेवा हे देखील राष्ट्रीय-सेवा योजनेचे एक व्रत आहे हे सांगुन ही जनावरे आपले मित्र होवू शकतात असे सांगीतले तर सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल ह्यानी विद्यार्थ्यांना मुक्या जनावरांची सेवा म्हणजे खरी ईश्वर सेवा होय हे सांगुन प्रोत्साहित केले.
दाते कॉलेज चौक ते शिवाजी गार्डन परिसरातील सर्व रस्त्यावरील मोकाट श्वानांना एक मदतीचा हात म्हणून त्यांच्या चाऱ्या पाण्याची सोय करण्यात आली, युनिटी फॉउंडेशनचे अध्यक्ष प्रतीक तराळकर ह्यांनी विद्यार्थ्यांना मुक्या प्राण्यांची सेवा कशी करायची हे प्रात्यक्षिका व्दारे सांगीतले तर सचिव अमृता टेवाणी ह्यांनी विदयार्थ्यांना मुक्या प्राण्यांवर औषधोपचार कसे करायचे हे सांगुन घरच्या घरी करता येणाऱ्या उपचाराची माहिती दिली.
सदर कार्यक्रमा करीता सर्व विद्यार्थ्यानी परिश्रम घेतले.
"मेरी माटी मेरा देश" अंतर्गत "अमृत कलश"
बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे राष्ट्रीय सेवा योजना व शारीरिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 'मेरी माटी मेरा देश' या शासकीय उपक्रमांतर्गत माती संकलन कार्यक्रमाचे आयोजन दि. 20/09/2023 रोजी प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना आपापल्या गावांतून माती आणून अमृत कलशामध्ये टाकण्याचे महत्व समजावून सांगितले व प्रत्येक विद्यार्थ्यांना सेल्फी काढून ठराविक संकेतस्थळावर अपलोड करावे असे आवाहन केले.
राष्ट्रीय सेवा योजना सहकार्यक्रम अधिकारी डॉ.सचिन जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांना सेल्फी अपलोड करणाऱ्या संकेतस्थळाची सविस्तर माहिती देऊन संकेतस्थळावरच्या तांत्रिक बाबी समजावून सांगितल्या.
तसेच शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. रवीजीत गावंडे यांनी विद्यार्थ्यांना अमृत कलशामधील माती दिल्लीतील अमृत वाटिका तयार करण्यासाठी काय भूमिका बजावते हे सविस्तर समजावून सांगितले व शिस्तीत कलशात माती टाकण्याचे आवाहन केले.
सदर कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अमृत कलशामध्ये माती टाकून पंचक्रोशातील मातीचा गौरव केला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
दत्तक ग्राम चापर्डा येथे स्वच्छता आणि वृक्षारोपण
बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या चमुने दत्तक ग्राम चापर्डा येथे दि. 12/09/2023 रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजना दत्तक ग्राम चापर्डा येथे स्वयंसेवकांनी गावाची स्वच्छता करून गावात वृक्षारोपण केले, यावेळी रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना वृक्षारोपण व ग्राम स्वच्छते मागचा उद्देश सांगून मेरी माटी मेरा देश मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांना दत्तक ग्रामात राबविल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली व स्वयंसेवकांना विविध उपक्रमांसाठी प्रोत्साहित केले.
जि.प.प्राथमिक मराठी शाळा चापर्डा येथील इयत्ता १ ते ७ मधल्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी डॉ. स्वाती पाटील व डॉ. सारीका शहा यांनी करून विद्यार्थ्यांना औषधीचे वाटप केले. तसेच शाळेतील गरजु विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले व शाळेतील विद्यार्थ्यांना आणि संबंधित परिसरातील महिलांना पोषक पदार्थ वाटप करून त्याचे महत्त्व सांगण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. डगवार, अंगणवाडी शिक्षिका प्रतिज्ञा मोटघरे, प्राथमिक शिक्षिका प्रेमलता आत्राम, ज्ञानभुमी व्यवस्थापक प्रकाश कांबळे व रा.से.यो. स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन
बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी वाघाडी परिसर येथे दि.10/09/2023 रोजी प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी स्वयंसेवकांना श्रमदानाचे महत्त्व सांगून देशाप्रती त्यांची असलेली भूमिका त्यांना पटवून दिली. तसेच सह कार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रम घेण्यामागचा हेतू सांगून संबंधित परिसरात करावयाच्या कामाचा आढावा दिला.
संबंधित परिसरामध्ये रा.से.यो. च्या स्वयंसेवकांनी स्वच्छता केली व संबंधित परिसरातील वाघाडी नदीच्या पात्रा मध्ये दोन ते अडीच हजार मुर्ती चुकिच्या पद्धतीने विसर्जीत झाल्या होत्या. भग्नावस्थेतील मुर्ती, पाण्यात कुजलेले निर्माल्य, प्लास्टीक, कचरा अशा मोठ्या प्रमाणात स्वच्छतेची धुरा राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी पार पडली आणि येत्या काळामध्ये विसर्जनासाठी हौद उभारण्याचे आश्वासन दिले.
सोबतच वाघाडी परिसरामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी सिडबॉल फेकून झाडे लावा झाडे जगवा असा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता प्रा. हेमा गुल्हाणे, रोहन गायकवाड, दिपाली ठाकरे, रश्मी परसराम, तुषार धडांजे, विठ्ठल कुर्हाडकर, ह्यांनी परीश्रम घेतले.
"मेरी माटी मेरा देश" अंतर्गत शहिदो को नमन
बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविदयालय यवतमाळ येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी दि. 14/8/23 "मेरी माटी मेरा देश" अंतर्गत शहिदो को नमन करण्यासाठी रॅली चे आयोजन प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले, रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी विद्यार्थांना रॅलीमागचा उद्देश सांगुन हे एक सामाजीक कर्तव्य असल्याचे सांगीतले, सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांनी हुतात्म्यांना स्मरण करणे आपले कर्तव्य असुन सर्वांनी देशाप्रती आपली जबाबदारी ओळखावी हे सांगीतले, शाररीक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. रविजीत गावंडे ह्यांनी युवकांनी शिस्तीचे पालन करून देशसेवा हीच इश्वर सेवा मानावी असे आव्हान केले. सदर रॅलीसाठी प्रा. गुल्हाणे प्रा. मेश्राम ह्यानी सहकार्य केले
स्वामी विवेकानंद चरित्र व संदेश आणि व्यक्तिमत्व विकास या विषयावर व्याख्यान
बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने दिनांक 12-8-2023 रोजी आंतरराष्ट्रीय युवा दिन निमित्य स्वामी विवेकानंद चरित्र व संदेश आणि व्यक्तिमत्व विकास या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमांचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांनी स्वामी विवेकानंदांनी युवकांना दिलेला संदेश सांगून, पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले श्री दीपक केसकर यांनी विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंदाचे चरित्र उलगडून दाखवून त्यांनी युवा वर्गाला त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव करून दिली. तसेच व्यक्तिमत्व विकासासाठी स्वामींची विचारधारा त्यांची पुस्तके कसे सहाय्य करतात हे सविस्तर सांगितले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित झालेले अॅड. गटलेवार उपाध्यक्ष रामकृष्ण मिशन आश्रम यवतमाळ यांनी विद्यार्थ्यांना पुस्तक रथाची माहिती देऊन पुस्तके व्यक्तिमत्व घडविण्यासाठी कसे उपयोगाची आहे हे सांगितले. तसेच मंचावर अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेल्या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना विवेकानंदांची विचार युवा पिढी घडविण्यासाठी प्रेरक भूमिका बजावत असून विद्यार्थी जीवनात दिशा देण्याचे काम करतात. हे पटवून दिले. संपूर्ण कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांच्या मार्गदर्शनात पार पडला.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली ठाकरे हिने तर आभार प्रदर्शन पायल सुरपाम हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता प्रा. हेमा गुल्हाने, रोहन गायकवाड, रोशन गायकवाड, तुषार दडांजे, प्रशिक भस्मे, गोपाल राठोड यांनी परिश्रम घेतले
बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील राष्ट्रीय सेवा योजनाचा उद्बोधन वर्ग दिनांक 02/08/2023 रोजी घेण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना उद्बोधन वर्ग घेण्या मागचा हेतू सांगून मार्गदर्शक पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले अमर अनिल कतोरे यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेतून करण्यात येणाऱ्या कार्याच्या विविध संधी व विविध उपक्रमांच्या सविस्तर माहिती देऊन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्य समाज घडवण्यासाठी कसे उपयुक्त आहे हे सांगितले.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून इतिहास विभाग प्रमुख प्रा. गजानन लांजेवार यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी जीवनासाठी एक शिस्त लावण्याचे माध्यम असून त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांची प्रगती साधल्या जाते हे सांगितले . रा.से.यो. सहकार्यक्रम अधिकारी डॉ.सचिन जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेचे नियम समजावून सांगितले मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. हेमा गुल्हाने उपस्थित होत्या.
याच वेळी विविध स्पर्धेमध्ये विजयी स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले तसेच राष्ट्रीय सेवा योजना डायरी व बॅचेस चे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी कोकरे हिने तर आभार प्रदर्शन तनुजा उगेमुगे हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता रश्मी परसराम, दिपाली ठाकरे ,वैष्णवी बगमारे ,भाग्यश्री राठोड , रोहन गायकवाड ,तुषार दंडाजे , विठ्ठल कुऱ्हाडकर यांनी परिश्रम घेतले.
"नवीन शैक्षणिक धोरण 2020" या विषयाअंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन
बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना यांच्या विद्यमाने दिनांक 24-7-2023 ते 29-7-2023 या कालावधीमध्ये "नवीन शैक्षणिक धोरण 2020" या विषयाअंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.
नवीन शैक्षणिक धोरणावर आधारित घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचा विषय "नव शैक्षणिक धोरण फायद्याचे की तोट्याचे" हा होता. यामध्ये एकूण 23 निबंध प्राप्त झालेले होते. त्यामध्ये प्रथम क्रमांक भारती छापेकर (बीए भाग 3), द्वितीय क्रमांक पायल सुरपाम (बीए भाग २), तृतीय क्रमांक रश्मी परसराम (बीए भाग 3) व प्रोत्साहन पर बक्षीस गायत्री दुबे (बीए भाग 1)हिने पटकावले. पोस्टर स्पर्धेचा विषय "नव शैक्षणिक धोरण" हा होता यामध्ये एकूण 20 स्पर्धकांनी भाग घेतला. त्यामध्ये प्रथम क्रमांक प्रशिक भस्मे (बीए भाग 1), द्वितीय क्रमांक रोहन गायकवाड (बीए भाग 3), तृतीय क्रमांक दिपाली ठाकरे (बीए भाग 2) तर प्रोत्साहन पर बक्षीस देवयानी वानखडे (बीए भाग 1) हिने पटकावला.
वकृत्व स्पर्धेचा विषय "नवीन शैक्षणिक धोरण 2020" हा ठेवण्यात आला होता. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक तुषार हंडाजे (बीए भाग 1), द्वितीय क्रमांक रोहन गायकवाड (बीए भाग 3), आणि तृतीय क्रमांक दिपाली ठाकरे (बीए भाग 2) यांनी पटकावला. वकृत्व स्पर्धेचे परीक्षण प्राध्यापक हेमा गुल्हाने यांनी केले.
त्याचप्रमाणे रिल्स व शॉट व्हिडिओ स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये चॅम्पियन ग्रुपने पारितोषिक पटकावले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी या स्पर्धा घेण्यामागचा उद्देश विद्यार्थ्यांना सांगून स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रेरित केले तर सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरणाविषयी सविस्तर माहिती देऊन स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले. स्पर्धेत विजयी स्पर्धकांना पारितोषिके वितरण करण्यात आली.
राष्ट्रीय सेवा योजनेची ओवी ट्रस्ट ला भेट
रा.से.यो. विद्यार्थ्यांना सामाजिक कार्याचे महत्त्व समजावून सांगण्याकरिता दि२८/३/२०२३ रोजी प्राचार्य डॉ. विवेक देशमुख यांच्या मार्गदर्शनात धनगरवाडी येथे ओवी ट्रस्ट चालवत असलेल्या बालनगरी या सामाजिक उपक्रमाला भेट आयोजीत करण्यात आली व ज्ञानरचनावादातून शिक्षण कसे दिले जाते हे विद्यार्थ्यांनी समजून घेतले तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व फळांचे वाटप करण्यात आले. ओवी ट्रस्ट च्या संचालिका प्रणाली बोंदाडे यांनी विद्यार्थ्यांना ट्रस्ट स्थापनेमागचे उद्दिष्टे सांगितले व ज्ञानरचनावादातून विद्यार्थ्यांना कसे ज्ञान दिले जाते याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. तसेच धम्मानंद सर यांनी विद्यार्थ्यांना विविध खेळा द्वारे शिक्षण कसे दिले जाते हे सांगितले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकारी डॉ. वैशाली मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना भेटी मागचा उद्देश सांगून प्रत्येकाने अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम आपल्या गाव स्तरावर राबवावे असा संदेश दिला, सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांना हा उपक्रम राबविण्यासाठी प्रेरणा देऊन खेळातून शिक्षण ही संकल्पना समजवून सांगीतली, तसेच प्रा. सारिका नंदे यांनी विद्यार्थ्यांना आशा उपक्रमाद्वारे समाजामध्ये मानाचे स्थान कसे मिळू शकते हे सविस्तर समजावून सांगितले.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी या भेटीतुन स्फूर्ती घेऊन असे उपक्रम राबवण्याचे आश्वासन देऊन धनगर वाडीचा निरोप घेतला.
कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता रोहन गायकवाड, रश्मी परसराम, सृष्टी येडमे, दिपाली ठाकरे, उल्हास चव्हाण, सिद्देश माहुलकर यांनी परिश्रम घेतले.
सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमाचे आयोजन
बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील राष्ट्रीय सेवा योजना व गृहअर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमाचे आयोजन दि. 03/01/ 2023 रोजी प्राचार्य डॉ कल्पना देशमुख यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी व गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वैशाली मेश्राम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यांवर प्रकाश टाकला व विद्यार्थ्यांना त्यांनी केलेल्या संघर्षाची माहिती देवून शिक्षणाचा मूलमंत्र जपावा असा संदेश दिला.
प्रमुख वक्ता म्हणून बोलताना इतिहास विभाग प्रमुख प्रा.गजानन लांजेवार यांनी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांनी उभारलेल्या पहिल्या शाळेचा इतिहास उलगडून सांगितला व विद्यार्थ्यांनी त्यांनी केलेल्या परिश्रमाचे फलित करावे असे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषण करतांना रा.से.यो. सहकार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन जयस्वाल यांनी विद्यार्थिनींनी विविध क्षेत्र काबीज करून सावित्रीबाई फुले यांचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार केले असे म्हणून महिलांना समाजामध्ये कसे विशेष स्थान आहे हे विविध उदाहरणांनी उलगडून सांगितले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तनुजा उगेमुगे हिने तर आभार प्रदर्शन काजल पोहनकर हिने केले. कार्यक्रमाचे यशस्वीते करिता रोहन गायकवाड, मंगेश लोंढे, रंजित वाघमारे, निर्जला द्विवेदी, प्रत्युशा पाटील व वैष्णवी बुल्ले यांनी परिश्रम घेतले.