बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ 

Babaji Datey Kala & Vanijya Mahavidyalaya, Yavatmal

(वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ ट्रस्ट रजि. क्र. ई-३२ द्वारा संचालित )

संस्कृत विभाग – दाते कॉलेज मध्ये “रामायणातील शैक्षणिक मूल्ये” यावर चर्चासत्र

स्थानिक बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील संस्कृत विभागाद्वारे "रामायणातील शैक्षणिक मूल्ये " या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन दि. २०-४-२०२२ रोजी करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.कल्पना देशमुख, प्रमुख वक्ता म्हणून डॉ.वृंदा देशमुख, तसेच संस्कृत विभागातील प्रा.डॉ.वैशाली बेडेकर- जोशी व प्रा.डॉ.मंजुश्री नेव्हल उपस्थित होत्या.
रामायणातील शैक्षणिक मूल्ये आजच्या शिक्षण पद्धतीत सुद्धा कशी आवश्यक आहेत, अजूनही कालबाह्य झाली नाहीत हे वक्त्यांनी सोदाहरण विशद केले.तत्कालिन शिक्षण प्रणालीत ज्ञानाच्या उपयोजनाला कसे महत्व होते हे त्यांनी रामसेतूच्या उदाहरणाद्वारे स्पष्ट केले.शिक्षणात तत्कालीन समस्यांचा अभ्यास विद्यार्थ्यांना राष्ट्राप्रती जागरूक ठेवतो असे त्या म्हणाल्या.प्राचार्या डॉ.कल्पना देशमुख यांनी विद्यार्थ्यांसाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन वेळोवेळी केले जावे अशी सूचना केली व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.आदर्श नेहमीच अनुकरणीय असतात त्यामुळे रामायण कितीही प्राचीन असले तरी त्यातील आदर्श अनुकरणीयच राहतील असे प्रा.डॉ.मंजुश्री नेव्हल यांनी प्रास्ताविकात सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.कार्तिकी गडबडे, परिचय कु.वैष्णवी कोकरे तर आभार गौरव पाटील यांनी संस्कृत भाषेतून केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाच्या संस्कृत विभागातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले.

दाते कॉलेजमध्ये 'संस्कृत आणि स्पर्धा परीक्षा' या विषयावर व्याख्यान

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे संस्कृत विभागाद्वारे 'संस्कृत आणि स्पर्धा परीक्षा' या विषयावर व्याख्यान ११ एप्रिल २०२२ रोजी आयोजित करण्यात आले. .
प्रमुख वक्ता म्हणून शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती येथील संस्कृत विभागाच्या सहाय्यक प्रा.डॉ.रूपाली कविश्वर यांनी आपल्या मार्गदर्शनात स्पर्धा परीक्षेसाठी संस्कृत भाषेतील ज्ञान कसे सहाय्यक ठरु शकते यावर सप्रमाण विवेचन केले. UPSC, MPSC, Indian Forest Service Officer, NET, SET, PET, Bank, Post यांसारख्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये संस्कृत विषयाची निवड करुन यश संपादित करता येते. याकरिता वैदिक गणितसूत्रे, स्मरणकौशल्ये , संशोधन पद्धती यामुख्य घटकांचे त्यांनी स्पर्धापरीक्षेच्या अभ्यासक्रमाच्या आधारे विस्तृत विवेचन केले.
अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ कल्पना देशमुख यांनी कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या यशप्राप्तीसाठी प्रत्येकाने स्वतःत दडलेला राजहंस शोधावा असे सांगितले.
मंचावर उपस्थित असलेल्या प्रा.डॉ.वैशाली बेडेकर जोशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी कॉम भाग एक ची कु.वैष्णवी कोकरे हिने केले. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचा परिचय प्रा.डॉ.मंजुश्री नेव्हल यांनी करुन दिला.
उपस्थितांचे आणि सहकार्य लाभलेल्या सर्वांचे ऋण बी.कॉम. भाग एक चा विद्यार्थी ओम जोगदंड याने मानले.

दाते कॉलेजमध्ये संस्कृत विषयाचे online वर्ग

कोरोनाच्या विनाशकारी साथीमुळे विद्यार्थ्यांचे अतिशय शैक्षणिक नुकसान होत आहे. यावर उपाय म्हणून बाबाजी दाते कला आणि वाणिज्य या महाविद्यालयातील संस्कृत  विभागाने विद्यार्थ्यांकरिता Zoom Online Classes दि.२२/०४/२०२० पासून  सुरू केलेले आहेत. त्यानुसार बी.ए. व बी.कॉम. या वर्गाचे संस्कृत या विषयाचे  Online अभ्यासवर्ग सुरू आहेत. विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा खूप उपयोग होत आहे.


भक्ती जोशी आणि सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ च्या विद्यार्थ्यांचा संस्कृत विषयाच्या राज्यस्तरीय शोधनिबंध स्पर्धेत दिनांक २० फेब्रुवारी २०२० रोजी सहभाग. स्व. मदनलाल मुंदडा कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चांदुररेल्वे आणि शासकिय ज्ञान विज्ञान महाविद्यालय औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शोधनिबंध स्पर्धेचे आयोजन दिनांक २० फेब्रुवारी २०२० रोजी आयोजित करण्यात आले.  ह्या कार्यक्रमाचे उद्घाटन कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक च्या अधिष्ठाता प्रा.डॉ.नंदापुरी होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयंत कारमोरे, विशेष अतिथी मा.डॉ.रोहिणी कुळकर्णी प्राचार्य शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय औरंगाबाद होत्या.
या स्पर्धेत 'संस्कृत नाटकांमधून संस्कृतिदर्शन' या विषयावर ५० शोध निबंध वाचक आले होते. यवतमाळ जिल्ह्यातून स्थानिक बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ च्या सहा विद्यार्थ्यांनी आपले शोध निबंध सादर केले. भक्ती महेश जोशी 'अभिज्ञानशाकुन्तल नाटकाच्या आधारे पंचमहायज्ञ या संस्काराचे  दर्शन'  हा शोधनिबंध सादर केला. या स्पर्धेत  तृतीय क्रमांकाचे पारितोषिक कु.भक्ती जोशीने मिळविले. या सर्व शोधार्थींना बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त प्रा.डॉ.शैलजा रानडे व प्रा.डॉ.मंजुश्री श्रीपाद नेव्हल यांनी मार्गदर्शन केले.


दाते महाविद्यालयात राज्यस्तरीय एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन

10 मार्च 2019 रोजी कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या वतीने " संस्कृत भाषासंवर्धने समाजस्य भूमिका" या विषयावर एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात करण्यात आले. ह्या एकदिवसीय चर्चासत्राचे उद्घाटक विस्तारसेवा मंडळाचे निदेशक आचार्य डॉ. कृष्णकुमार पाण्डेय होते. बीजभाषक क. का. सं. विद्यापीठाच्या अधिष्ठाता प्रो. डॉ. नंदा पुरी होत्या. उद्घाटनसोहळ्याच्या  अध्यक्षस्थानी वाणिज्य महाविद्यालय न्यासाचे विश्वस्त प्रा. विवेक देशमुख होते. क.का.सं.विद्यापिठाचे राज्यसमन्वयक प्रा. डॉ. प्रसाद गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली  हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले.


द्वीतीय सत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त प्राचार्या डॉ. अनुपमा डोंगरे होत्या. तर प्रमुख वक्ता प्रा. डॉ.स्वानंद पुंड, लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे संस्कृत विभाग प्रमुख हे होते. त्यांनी  आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, संस्कृतच्या अभ्यासकाला रोजगार प्राप्ती नाही हा गैरसमज आहे. जर एकाच विषयाला धरून 4 ते 5 वर्ष अध्ययन केले तर ते शक्य आहे. मग तो कला शाखेचा असो वा अन्य कोणत्याही शाखेचा. एका विषयाला धरून संपूर्ण अभ्यासाला संस्कृतची जोड द्यावी. त्या दिशेने नवनवीन संशोधन करावे.
तृतीय सत्र हे परिसंवादाचे होते. या सत्रात डा. मा. म. आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्रा.पुष्पा नार्लावार यांनी संस्कृत शिक्षक व विद्यार्थी यांची जबाबदारी स्पष्ट केली.
आचार्य डॉ.कृष्णकुमार पाण्डेय यांनी विद्यापीठाची भूमिका स्पष्ट केली. विशेषीकृत अभ्यासासाठी परिसंस्था (RISS) म्हणून मान्यता प्राप्त करून देणे, सहयोग करार (MOU),  महाविद्यालयाचे संलग्निकरण ह्या शिवाय प्राचीन गुरूकुलपद्धती प्रमाणे संगीत, योग, संस्कृत शिक्षण, वेदशाळा यांच्या अभ्यासक्रमास मान्यता देण्यास तत्पर आहे.  प्रा. मंजुश्री नेव्हल  विदर्भप्रान्ताच्या समन्वयिकेसह संपूर्ण महाराष्ट्रभर प्रान्तसमन्वयकांची नियुक्ती केली असल्याची माहिती दिली.
परिसंवादात लो. बा. अणे महिला महाविद्यालयाच्या प्रा. दर्शना सायम, संस्कृतचे सर्व प्राध्यापक, अभ्यासक, संस्कृत स्नेही व विद्यार्थी वर्ग अशा 135 संस्कृतोपासकांचा सहभाग होता. उद्घाटन सत्राचे सुत्रसंचालन प्रा. डॉ. वैशाली बेडेकर आणि सत्रांचे सुत्रसंचालन प्रा. शिल्पा धर्मे यांनी केले. तर आभारप्रदर्शन प्रा. मंजुश्री नेव्हल यांनी केले.  ह्या चर्चासत्रासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ. प्रेरणा पुराणिक व उपप्राचार्य प्रा. डॉ. माणिक मेहरे यांचे सहकार्य लाभले. ह्या चर्चासत्राचे आयोजनात महाविद्यालयात संस्कृतविभागात कार्यरत असणाऱ्या प्रा. मंजुश्री नेव्हल, डॉ. वैशाली बेडेकर, प्रा. शिल्पा धर्मे, प्रा. मंजिरी गंजिवाले, प्रा.वैदेही मोहरिल यांनी परिश्रम घेतले.


भंडारा येथील संस्कृत विदर्भप्रान्त संमेलनात दाते महाविद्यालयाचा सहभाग

भंडारा येथील स्प्रिंग डेल स्कुल मध्ये  2 व 3 फरवरीला झालेल्या या  संमेलनाचे उद्घाटन भंडारा नगरीचे  आमदार श्री. रामचन्द्र अवसरे यांनी केले. यावेळी  कु. भक्ती जोशी व कु. हर्षा कातकडे यांनी संस्कृत सरस्वती वंदनेचे सुस्वर गायन केले. बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय व संस्कृतभारती यवतमाळ शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने संस्कृत वस्तुप्रदर्शिनी व विज्ञानप्रदर्शिनीचे आयोजन  प्रा. मंजुश्री नेव्हल व श्री मोरेश्वर पुंड यांनी केले. संस्कृत विषयाच्या प्रा. डॉ. वैशाली बेडेकर-जोशी यांनी आचार्य पदवी प्राप्त केल्याबद्दल यांचा भंडारा नगरीचे मा. नगराध्यक्ष श्री मेंढे यांच्या हस्ते व संस्कृत भारती यवतमाळ शाखेच्या विद्यमान अध्यक्ष व महाविद्यालयाच्या निवृत्त प्राध्यापिका डॉ. शैलजा रानडे यांचा महाराष्ट्र शासनाचा कवि कुलगुरु कालिदास  संस्कृत साधना पुरस्कार मिळाल्या बद्दल विदर्भप्रान्ताचे उपाध्यक्ष श्रीनिवास वर्णेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ह्या सम्मेलनात महाविद्यालयातील संस्कृत विषयाचे विद्यार्थी प्रसाद तऱ्हाळकर, भक्ती जोशी, हर्षा कातकडे या शिवाय प्रा.मंजुश्री नेव्हल व डॉ. वैशाली बेडेकर-जोशी यांचा सहभाग होता.


संस्कृत वस्तुप्रदर्शनाचे आयोजन

भारतीयसंविधानाच्या आठव्या अनुसूचीत क्रमांक 14 वर संस्कृत भाषेचा उल्लेख आहे. दैनंदिन वापरातील वस्तुंचा परिचय संस्कृत भाषेतून व्हावा यासाठी 26 जानेवारी 2019 ला बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील संस्कृत विभागाने वस्तुप्रदर्शनाचे आयोजन केले. यात धान्य, सुकामेवा, मसाल्याचे पदार्थ, प्राणी, अलंकार, वाहने, कार्यालयीन कामकाजाच्या वस्तु, फळे, नित्य वापरातील वस्तु, संस्कृत विवाह पत्रिका अशा 225 वस्तुंचा परिचय आणि संस्कृतोपलब्धी, मुस्लिमसंस्कृत सेवक, प्रकाशित होणाऱ्या  संस्कृत पत्रिकांचा परिचय भित्तीपत्रकांच्या माध्यमातून करून देण्यात आला.
ह्या प्रदर्शनीचे उद्घाटन वाणिज्य महाविद्यालय न्यासाचे अध्यक्ष मा. श्री. विनायक दाते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. सतीश फाटक, मा. सौ. सुषमाताई दाते, मा. सौ. फाटक, मा. श्री. मंगेश केळकर, प्राचार्य सौ. प्रेरणा पुराणिक, विश्वस्त प्रा. विवेक देशमुख, उपप्राचार्य डॉ. माणिक मेहरे, प्राध्यापक वृन्द आणि विद्यार्थी समुदाय उपस्थित होता. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा.मंजुश्री श्री.नेव्हल, प्रा.डॉ.वैशाली बेडेकर, प्रा.मंजिरी गंजीवाले,प्रा.शिल्पा धर्मे आणि विद्यार्थी शुभम् राऊत, गौरव बावने, रामेश्वर राऊत, ऋतु सव्वालाखे, कु. भक्ती जोशी, कु. हर्षा कातकडे, प्रसाद तऱ्हाळकर  यांनी प्रयत्न केले


सौ.वैशाली बेडेकर-जोशी यांना आचार्य पदवी प्राप्त

दि.२१ डिसेंबर २०१८ रोजी बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ येथील कनिष्ठ विभागातील संस्कृत विषयाच्या अध्यापिका सौ.वैशाली बेडेकर-जोशी यांचा आचार्य पदवी प्राप्त केल्याबद्दल संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.त्यांच्या प्रबंधाचा विषय "आर्षमहाकाव्ये व पंचमहाकाव्यातील शासनविषयक विचारांची वर्तमानकालीन उपादेयता: एक चिकित्सक अध्ययन "हा आहे. नुकत्याच झालेल्या दीक्षांत समारंभात त्यांनाही पदवी प्रदान करण्यात आली. संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या सत्कारप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.विनायक दाते, उपाध्यक्ष मा.श्री.सतीश फाटक, प्राचार्या सौ. पुराणिक, मा.सौ.सुषमा दाते, मा. विद्याताई केळकर, मा.श्री.कासलीकर, प्रा.विवेक देशमुख अश्या विश्वस्तांसह महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग उपस्थित होता. डॉ.वैशाली बेडेकर यांनी आपल्या यशाचे श्रेय त्यांचे कुटुंबीय, मार्गदर्शिका डॉ.सौ.शैलजा रानडे, संस्थेचे पदाधिकारी व सहकारी प्राध्यापकांना दिले आहे.


संभाषण वर्ग

दि. २७ ऑगस्ट २०१८ रोजी स्थानिक बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय व संस्कृत भारती, यवतमाळ शाखेच्या संयुक्त विद्यमाने संस्कृत-संभाषण वर्गाचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून वाणिज्य महाविद्यालय न्यासाचे अध्यश मा. श्री. विनायक दाते, विशेष अतिथी  म्हणून वाणिज्य महाविद्यालय न्यासाच्या सदस्या मा. सौ. सुषमा दाते, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्कृत भारतीय यवतमाळ शाखेच्या अध्यक्ष मा. प्रा. डॉ. सौ. रानडे, उपस्थित होत्या.
संस्कृत हि अनेक भाषाची जननी आहे. या भाषेला पुनरुज्जीवित करून ती राष्ट्रभाषा व्हावी याकरिता संस्कृत प्रेमींनी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मत मा. श्री. विनायक दाते यांनी मांडले मा. सौ. सुषमा दाते यांनी संस्कृत विषयात रुची निर्माण करण्यात शिक्षकाचे योगदान किती महत्वाचे असते हे सांगून संभाषण वर्गासाठी शुभेच्छा दिल्या. अध्यक्ष मा. डॉ. सौ. रानडे यांनी सुरवाणी म्हणून गौरविल्या गेलेल्या संस्कृत भाषेचे अनन्यसाधारण महत्व कथन केले. संस्कृत शिकण्यासाठी विद्यार्थिनी श्रवण, वाचन, लेखन व संभाषण हि चारही कौशल्ये आत्मसात करावी असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, कला स्नातक दिव्तीय वर्षाची विद्यार्थिनी कु. भक्ती महेश जोशी हिने केले संभाषण वर्गाच्या आयोजिका प्रा. वैशाली बेडेकर यांनी प्रास्ताविक केले तर आभार प्रदर्शन प्रा. शिल्पा धर्मे यांनी केले. संभाषण वर्गाचे संचालन प्रा. मंजुश्री नेव्हल करणार आहेत.


“सरलमानकसंस्कृत” एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय,रामटेक, संस्कृत संवर्धन प्रतिष्ठान नवी दिल्ली व संस्कृत  भरती यांच्या संयुक्त विघमाने स्थानिक बाबाजी दाते काला आणि वाणिज्य महाविद्यालयात  “सरलमानकसंस्कृत” कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. हि कार्यशाळा दिनांक १० आगस्ट २०१८ ला संपन्न झली. कार्यक्रमाचे उद्घाटक वाणिज्य महाविद्यालय न्यासाचे उपाध्यक्ष श्री सतीशजी फाटक होते. मार्गदर्शक म्हणून सी.पी. आणि बेरार महाविद्यालय, नागपूर संस्कृत विभाग प्रमुख डॉ विभा क्षीरसागर आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, नागपूरचे व्याकरणविभाग प्रमुख डॉ विजयकुमार मेनन होते. मंचावर संस्कृतभारती यवतमाळ शाखेच्या अध्यक्षा डॉ शैलजा रानडे, अध्यक्षस्थानी सौ प्राचार्य पुराणिक, उपप्राचार्य डॉ माणिक मेहरे, समारोपीय सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ अनुपमा डोंगरे व मंच्चावर डा. कल्पना देशमुख, होते.

जनगणनेनुसार भारतात संस्कृत भाषा ही बोलणारे लोक असल्याचे लक्षात आले. ही भाषा केवळ पूजापठनाची नाही तर विज्ञानाची आहे. असे उद्घाटकीय भाषण करतांना संस्थेचे उपाध्यक्ष मा श्री. सतीशजी फाटक म्हणाले. आजीच्या बटव्याप्रमाणे ज्ञानाचा खजिना असणारी ही भाषा आहे. अध्यन करणारे युवक हे धर्मसंसकृतीचे दीपशिखावाहक आहेत अशी संस्कृतची माहिती मान्यवरांनी आपल्या शब्दात सांगितली. उद्याघटसत्राचे स्त्रचालन प्रा. मंजुश्री श्रीपाद नेव्हल यांनी केले. तर आभारप्रदर्शन संस्कृतभरतीचे जिल्हा संयोजक श्री. मोरेश्वर पुंड यांनी केले.

संस्कृतभाषेचे सरल व पौढ असे दोन मुख आहेत. संपूर्ण देशातील समानता जाणण्यासाठी भाषांवर असणाऱ्या संस्कृतच्या प्रभावाचे अवलोकन करण्यासाठी, भाषास्तरीय राहासाच्या निवारणासाठी, लेखन आणि भाषण यातील एकरूपता साधण्यासाठी सरल संस्कृतचा उपयोग आपल्या अध्ययनाध्यापनात आवर्जून करावा असे प्रतिपादन सत्राचे प्रमुख वक्ते डॉ  विजयकुमार मेनन यांनी केले. तर सी.पी. आणि  बेरार महाविद्यालय, नागपूरच्या संस्कृत विभाग प्रमुख डॉ विभा श्रीरसागर ह्यांनी सरलसंस्कृतचा उपयोग करतांना सरल व्याकरणाचा कसा उपयोग करावा ह्याचे बारकावे सांगितले.

यशस्वी आयोगन महाविद्यालयतील संस्कृत विभागातील प्रा. मंजुश्री नेव्हाल, प्रा. वैशाली बेडेकर, प्रा. वैदेही मोहरीत, प्रा. मंजिरी गंजीवाले व प्रा. शिल्पा धर्मे यांनी केले.