बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ 

Babaji Datey Kala & Vanijya Mahavidyalaya, Yavatmal

(वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ ट्रस्ट रजि. क्र. ई-३२ द्वारा संचालित)

NAAC Accredited B++ Grade with CGPA 2.82

वाणिज्य विभाग – दाते महाविद्यालयात आर्थिक साक्षरतेवर सेमिनार

गुंतवणूक ही अभ्यासपूर्वक तसेच महागाई आणि परतावा दर विचारात घेऊन योग्य क्षेत्रात केली पाहिजे. स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवताना जोखमेला विविध क्षेत्रात वळविले पाहिजे. तेव्हा संपत्ती निर्माण होईल. आर्थिक साक्षरता ही सोय नसून ती काळाची गरज आहे.  असे प्रतिपादन प्रमुख मार्गदर्शक TWJ कंपनीचे ट्रेनर श्री हिमांशू सरागे यांनी केले.
बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये इनक्युबेशन सेंटर, वाणिज्य विभाग, IQAC तसेच TWJ कंपनी यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने Financial & Stock Market Awareness या विषयावर सेमिनारचे आयोजन गुरुवार, दिनांक ७ मार्च २०२४ रोजी करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी, प्रमुख उपस्थिती TWJ कंपनीचे एरिया मॅनेजर श्री सुरेश मडगुलवार, TWJ कंपनीचे असिस्टंट मॅनेजर श्री भावेश ठाकरे तर प्रमुख मार्गदर्शक TWJ कंपनीचे कंपनीचे ट्रेनर हिमांशू सरागे, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रदीप दरवरे, प्रा. डॉ. हरिदास धुर्वे व्यवस्थापन परिषद सदस्य संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती, IQAC समन्वयक प्रा. डॉ. सचिन तेलखडे, इंक्युबेशन सेंटर तथा कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. डॉ. अमोल राऊत मंचावर उपस्थित होते.
कमवा शिका आणि गुंतवणूक करा. तुम्हाला TWJ कंपनीच्या माध्यमातून सुवर्णसंधी मिळाली आहे. कष्टातून निर्माण केलेली संपत्ती ही योग्य ठिकाणी गुंतवली की, त्याचा फायदा व्यक्तीला तसेच देशाला होतो. असे मत प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांनी व्यक्त केले. श्री भावेश ठाकरे TWJ कंपनीची माहिती देऊन विद्यार्थ्यांना कंपनीमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अमोल राऊत, संचलन प्रा. डॉ. रवीजीत गावंडे  तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. हरिदास धुर्वे यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक रुंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

दाते कॉलेज मध्ये वाणिज्य अभ्यास मंडळाचे उद्घाटन

महाविद्यालयीन जीवनामध्ये विद्यार्थ्यांनी क्रमिक अभ्यासक्रमासोबतच संदर्भ ग्रंथ, कादंबरी तसेच इतर पुस्तकांचे वाचन केले पाहिजे. वाचनाने माणसाचे व्यक्तिमत्व प्रगल्भ होते असे मत प्रा. विजय दीक्षित यांनी बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात वाणिज्य विभागाच्या वतीने दिनांक ३/१२/२०२२ रोजी शैक्षणिक वर्ष 2022- 23 च्या वाणिज्य अभ्यास मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून व्यक्त केले. ग्रंथालयाच्या सर्व सुविधांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा तसेच वाचन कक्षात येण्याचे आव्हान त्यांनी केले.
प्रत्येकाला सरकारी नोकरी मिळणार नाही म्हणून हताश न होता आपले ध्येय निश्चित करून आपण जे शिकलो त्याचा उपयोग जीवनामध्ये करून यशाचे शिखर गाठले पाहिजे असे मत प्रा. डॉ. हरिदास धुर्वे यांनी प्रमुख अतिथी म्हणून प्रतिपादित केले.
कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. डॉ. अमोल राऊत यांनी कालबाह्य व्यवस्थेत बदल करून युगानुकुल व्यवस्था निर्माण करण्याची जबाबदारी ही आजच्या युवकांची आहे असे विचार मांडले.
वाणिज्य अभ्यास मंडळ कार्यकारिणीचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. तर काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचलन कु. तनुजा उगेमूगे बी.कॉम. भाग १ तर आभार प्रदर्शन कू. वैष्णवी कोकरे बी.कॉम. भाग २ ह्या विद्यार्थिनीने केले. कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

दाते कॉलेज मध्ये वाणिज्य अभ्यास मंडळाचे उद्घाटन

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथिल वाणिज्य विभागातर्फे शैक्षणिक सत्र २०२१-२०२२ करिता वाणिज्य अभ्यास मंडळाचे उद्घाटन  दि. २२-१२-२०२१ रोजी करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी चांगल्या गोष्टींची मागणी करावी त्याचा पुरवठा निश्चितच प्राध्यापक वर्ग करेल. पुस्तकांचा फायदा घ्या व आपले आयुष्य समृद्ध बनवा असे विचार महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वर्षा कुलकर्णी यांनी उद्घाटनपार भाषणात व्यक्त केले. वाणिज्य शाखेच्या  विद्यार्थ्यांनी स्वयंरोजगाराची कास धरावी असे मत वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. प्रदीप दरवरे यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. शैलेष राउत, मोईन सय्यद, रक्षा जयस्वाल, पियुष फुलकर या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कु. हर्षदा चव्हाण, कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. अमोल राऊत तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. हरिदास धुर्वे यांनी केले.

दाते महाविद्यालयातील वाणिज्य विभागाचे विद्यार्थ्यांना इ-लेक्चर द्वारे मार्गदर्शन

कोरोनासारख्या राष्ट्रीय आपदेच्या वेळेत देशाच्या अर्थव्यवस्थेसोबतच आपल्या देशातील तरुण युवकाचे सर्वात जास्त नुकसान होत आहे. जे तरुण विद्यार्थी शिक्षणाचे अगदी अंतिम टप्प्यात आहेत, त्यांचे  शैक्षणिक हानी सोबतच बेरोजगारीचे संकट समोर असल्याची भीती त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. परीक्षेच्या तोंडावर शिक्षकांचे मार्गदर्शनापासून व वर्गमित्राचे आधारापासून ते वंचित झालेले आहेत. Social Distancing मुळे विद्यार्थी आणि शिक्षक याच्यातील निर्माण झालेला दुरावा दूर करून विदयार्थ्यांना आधार देणे आवश्यक आहे.

 या सामाजिक जाणीवेतून वाणिज्य विभागातील प्राध्यापकांनी महाविद्यालयातील विद्यार्थाकरिता e-Content- Social  मिडियाच्या माध्यमातून झूम app चा वापर करून वर्ग घेणे चालू आहे. यातूनच विद्यार्थांचा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण केला जात आहे. Home assignment, MCQ, PPT, E-Class, E-mail किंवा whatsapp च्या माध्यमातून परीक्षेचे साहित्य विद्यार्थ्यांपर्यत पोहोचविली जात आहे. याकरिता वाणिज्य विभागातील सर्वच शिक्षक सतत प्रयत्न करीत आहेत.

श्री. मिथिलेश शेरेकर हा विद्यार्थी सेट परीक्षा कॉमर्स या विषयात उत्तीर्ण

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनी बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे श्री. मिथिलेश शेरेकर हा विद्यार्थी सेट परीक्षा कॉमर्स या विषयात उत्तीर्ण केल्याबद्दल मा. विनायक दाते अध्यक्ष यांचे हस्ते पुस्तक भेट देऊन अभिनंदन करण्यात आले. या प्रसंगी प्रा. डॉ. अनंत सूर्यकार अमोलकचंद महाविद्यालय, यवतमाळ, आणि दाते महाविद्यालयातील प्रा. डॉ. हरिदास धुर्वे, प्रा. डॉ. ताराचंद कंठाळे, प्रा. विजय दीक्षित, प्रा. अमोल राऊत, प्रा. डॉ. सचिन जैस्वाल उपस्थित होते. श्री. मिथिलेश हा याच महाविद्यालयाचा बी.कॉम. आणि एम.कॉम. चा विद्यार्थी असुन तो सर्वच वर्षात, सर्व वर्गात प्रथम होता.

दाते महाविद्यालयात रोजगार मेळाव्याचे आयोजन

दि. 7-10-2019 रोजी बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात रोजगार व स्वयं रोजगार मार्गदर्शन विभागातर्फे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी नागपूर येथील उत्कर्ष बँकेचे  अधिकारी उपस्थित होते. यात आपल्या महाविद्यालयतील 50 विद्यार्थयांनी नोंदणी केली होती. त्यातील 18 विद्यार्थ्यांची  निवड झालेली आहे. कार्यक्रमाचे समन्वयक प्रा डॉ हरिदास धुर्वे हे होते. उत्कर्ष बँकेच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबद्दल समाधान व्यक्त केले.

पी.एच.डी. रिसर्च सेंटरची मान्यता

यवतमाळ येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती मार्फत बाबाजी दाते महाविद्यालयाला वाणिज्य विषयाकरिता पी.एच.डी. रिसर्च सेंटरची मान्यता प्रदान करण्यात आली.  त्या आधी महाविद्यालयातील सोई सुविधाची तपासणी करिता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती तर्फे वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. दिनेश निचत यांचे अध्यक्षतेखाली कमिटीने महाविद्यालयाला भेट दिली होती.
त्यामुळे महाविद्यालयात वाणिज्य विषयाचे विद्यार्थ्याना संशोधन कार्य करण्याची संधी प्राप्त झाली आहे. तरी वाणिज्य विषयाचे इच्छूक संशोधकांनी महाविद्यालयातील वाणिज्य विद्याशाखेचे विभागप्रमुख व पी.एच.डी. सुपरवायझर प्रा. डॉ. प्रदीप दरवरे यांचेशी त्वरीत संपर्क साधावा असे महाविद्यालयातर्फे सांगितले आहे.

“स्पर्धा परीक्षेत कसे उत्तीर्ण व्हावे ?”

दि.11-02-2019 रोजी महाविद्यालयात “स्पर्धा परीक्षेत कसे उत्तीर्ण व्हावे ?” या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मा. डॉ. जयराज फाटक (माजी आय.ए.एस) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ जयराज फाटक यांनी MPSC, UPSC आणि बँकिंग या परीक्षांची तयारी कशी करावी आणि स्पर्धेच्या युगात त्या साठी कोणत्या बारकाव्याकडे लक्ष द्यावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
ह्या कार्यक्रमास महाविद्यालयातील 300 विद्यार्थी हजर होते. विद्यार्थ्यांना डॉ जयराज फाटक यांचे मार्गदर्शन खूप उपयुक्त वाटले.

‘इमर्जिंग ट्रेंड्स इन कॉमर्स’ या विषयावर राष्ट्रीय सेमिनार

दिनांक २३ जानेवारी २०१९ रोजी बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयाद्वारे ‘इमर्जिंग ट्रेड इन कॉमर्स’ या विषयावर राष्ट्रीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले.  डॉ. दिनेशजी निचित  अधिष्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती  यांच्या शुभहस्ते या राष्ट्रीय सेमिनारचे उद्घाटन  करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ वाणिज्य न्यासाचे अध्यक्ष मा. श्री. विनायकजी दाते व उपाध्यक्ष मा. श्री. सतीशजी फाटक उपस्थित होते. तसेच की-नोट स्पीकर म्हणून आर. बी. अटल आर्टस्, सायन्स आणि कॉमर्स, गेवराई जि. बीड येथील डॉ. संदीप वंजारी हे होते. उद्घाटनपर भाषणात डॉ. दिनेशजी निचित वाणिज्य शिक्षणातील बदलत्या प्रवाहाचा आढावा घेतला. देशाच्या व समाजाच्या प्रगतीत वाणिज्य विद्याशाखेची  भूमिका विषद केली. बदलत्या परिस्थितीत वाणिज्य शाखेचे अभ्यासक्रमात कोणता बदल करावा लागेल या विषयी माहिती देवून शिक्षकांनी आधूनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रभावीपणे रोजगारक्षम शिक्षण द्यावे. शिक्षकांनी अभ्यासक्रमातील बदलत्या परिस्थितीला यशस्वीपणे सामना करावा, असे आव्हान डॉ. दिनेशजी निचित यांनी केले.

राष्ट्रीय सेमिनारचे की-नोट स्पीकर डॉ. संदीप वंजारी यांनी आपल्या भाषणातून वाणिज्य शिक्षणातील बदलत्या प्रवाहाचा आढावा घेताना ‘कौशल्य विकास’ या विषयासंबधी PPT द्वारे सविस्तर विवेचन केले. वाणिज्य अभ्यासक्रमातील बदल व  रोजगारपूरक शिक्षण यामुळे प्रवेशित इच्छूक विद्यार्थी संख्या वाढत आहे. त्यामुळे वाणिज्य शाखेचे महत्त्व वाढत आहे. कौशल्य विकासामुळे वाणिज्य शाखेचे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होण्यास मदत झाली आहे. असे प्रतिपादन केले.
प्रास्ताविक सेमिनारचे संयोजक प्रा. डॉ. प्रदीप दरवरे यांनी केले. वाणिज्य महाविद्यालय न्यासाचे अध्यक्ष व राष्ट्रीय सेमिनारचे अध्यक्ष श्री. विनायक दाते, न्यासाचे उपाध्यक्ष श्री. सतीशजी फाटक व प्राचार्य, सौ. प्रेरणा पुराणिक यांनी मनोगत व्यक्त केले.
राष्ट्रीय सेमिनार करिता एकूण ६९ delegates हजर होते. त्यापैकी ६८ संशोधकांचे रिसर्च पेपर प्राप्त झाले. त्यानुसार संबधित संशोधकांचे रिसर्च पेपर विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे मान्यताप्राप्त जर्नल (Impact Factor 5.5) मधून प्रकाशित झाले. व या सोविनिअरचे विमोचन पाहुण्यांचे हस्ते करण्यात आले. डी. लिट. पदवी मिळविल्याबद्दल प्रा. डॉ. हरिदास धुर्वे यांचा पाहुणे व न्यासाचे अध्यक्ष श्री. विनायकदादा दाते यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
सेमिनारचे दुसऱ्या सत्रात अध्यक्ष म्हणून केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावती येथील प्राचार्य, डॉ. विजय भांगडिया तर वक्ते म्हणून प्रा. डॉ. मार्तंड खुपसे उपस्थित होते. या सत्रात रोजगारक्षम शिक्षण देण्याकरिता वाणिज्य अभ्यासक्रमातील बदल व अध्यापन आधूनिक तंत्राचा वापर’ याचा उहापोह करण्यात आला. तिसरे सत्रात अमोलकचंद महाविद्यालयाचे वाणिज्य विभागाचे प्रा. डॉ. प्रफ्फुल गुडधे हे प्रमुख अतिथी होते. दुसऱ्या आणि तिसरे सत्रात विषयांतर्गत प्राध्यापकानी शोध निबंधाचे वाचन (पेपर प्रेझेंटेशन) करण्यात आले.

"महाविद्यालयात ग्राहक जागृकता व वित्तीय साक्षरता कार्यक्रम संपन्न"

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ व कन्झ्यूमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडिया, मुंबईच्या संयुक्त विद्यमानाने महाविद्यालयातील  सावरकर सभागृहात  विद्यार्थ्यांकरिता दि.७ सप्टेंबर २०१८ रोजी "ग्राहक जागरूकता व वित्तीय साक्षरता" या विषवार सकाळी ८ ते १.३० या वेळात ३ सत्रामध्ये सेमिनार चे आयोजन करण्यात आले.
या सेमिनार मध्ये "ग्राहक जागरूकता" या विषयावर कन्झ्यूमर गायडन्स सोसायटीच्या प्रोजेक्ट डायरेक्टर सौ. मिलन मेस्त्री यांनी मार्गदर्शन केले तर वित्तीय साक्षरता या विषयावर याच संस्थेच्या सौ. प्राची मयेकर यांनी मार्गदर्शन केले. ग्राहक जागरूकता या विषयावर बोलतांना सौ. मिलन मेस्त्री यांनी विविध अन्न पदार्थांमध्ये केली जाणारी भेसळ या संदर्भातील लघुपट दाखवून तसेच आर्थिक व्यवहारात होणारी फसवणूक या बाबत ग्राहक म्हणून आपण कसे सजग रहावे या विषयाचे महत्व विषद केले.तर सौ. प्राची मयेकर यांनी वित्तीय साक्षरता या विषयावर बोलतांना प्रत्येकांनी आपल्या खर्चाचे नियाजन करून आपल्या उत्पन्नाचा किमान २५ ते ३० भाग बचत करून तो गुंतविला पाहिजे आणि हि गुंतवणूक विविध योजनांमध्ये केली पाहिजे, केवळ बँकामध्ये मुदत ठेवीच्या रूपात पैसे न ठेवता महागाईच्या निर्देशांकावर मात करणारी, किमान परतावा आपणास मिळाला पाहिजे या दृष्टीने म्युच्यूअल फंड, स्टॉक मार्केट, अशा संस्थामध्ये केलेली गुंतवणूक कशी फायदेशीर ठरते या संबधी सविस्तर मार्गदर्शन केले. या सेमिनारमध्ये महाविद्यालयातील ३५० विद्यार्थी व प्राध्यापक सहभागी झाले होते.
सुरूवातीला दिप प्रज्वलन व बाबाजींच्या प्रतिमेला माल्यार्पन करून कार्यक्रमाचे रीतसर उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. प्रेरणा पुराणिक तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्या डॉ.माणिक मेहरे, सिनेट सदस्य तथा इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.विवेक देशमुख, मुंबई संस्थेच्या सौ. मिलन मेस्त्री व सौ. प्राची मयेकर हे मान्यवर उपस्थित होते. प्रा. विवेक देशमुख सरांनी आपल्या भाषणातू या कार्यक्रमाची भूमिका विषद केली. मा.प्राचार्यांनी अध्यक्षीय भाषणातून या विषयाचे महत्व पटवून दिले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.विनोद तलांडे तर आभार प्रदर्शन वाणिज्य विभागाचे प्रा. अमोल राऊत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता डॉ. प्रदिप दरवरे, प्रा.हरिदास धुर्वे, डॉ.सचिन जयस्वाल व डॉ.ताराचंद कंठाळे यांनी सहकार्य केले.