बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ 

Babaji Datey Kala & Vanijya Mahavidyalaya, Yavatmal

(वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ ट्रस्ट रजि. क्र. ई-३२ द्वारा संचालित )

Mission

संस्थेचे ध्येय

 1. यवतमाळ शहर व आसपासच्या ग्रामीण परिसरातील विद्यार्थ्यांना गुणात्मक शिक्षण देणे.
 2. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, ऐक्याची भावना व जिज्ञासा वृद्धिंगत करणे.
 3. सांस्कृतिक वारशाचे संवर्धन करून राष्ट्रीय मूल्ये व ऐक्य टिकविणे.
 4. आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना मदत करणे.
 5. अभ्यासक्रमातील पूरक घटकांच्या माध्यमातून श्रमप्रतिष्ठा व श्रमसंस्कृती विकसित करणे.

संस्थेचे ठळक उद्देश

 1. ग्रामीण क्षेत्रातील होतकरू व हुशार तरुणांना उच्चशिक्षणाकरिता प्रोत्साहित करून त्यांना वाणिज्य व कला शाखेतील पदवी व पदव्युत्तरपर्यंतचे विद्यापिठीय शिक्षण प्रयत्नपूर्वक उपलब्ध करून देणे.
 2. आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकात मोडणार्‍या तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता ग्रंथालयात पुस्तकपेढी योजना राबविणे.
 3. शहरी तथा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यायामवर्गाचे महत्त्व पटवून देऊन त्यांना विविध क्रीडाप्रकारांमध्ये प्राविण्य प्राप्त करण्याच्या दृष्टिने प्रोत्साहन देणे. विद्यार्थ्यांना सुसज्ज क्रीडांगण व इतर सोयींसह क्रीडा सुविधा उपलब्ध करून देणे.
 4. पदवी वर्गांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी होण्यास प्रवृत्त करून त्यांचेमध्ये श्रमदान, समाजसेवा, ग्राम स्वच्छता, गोरगरीबांची सेवा करणे इ. सद्गुणांची जोपासना करणे. श्रमदानाबद्दल त्यांच्यात आस्था निर्माण करून विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे महत्त्व पटवून देणे.
 5. विद्यार्थी/विद्यार्थिनींना भारतीय संगीताचे शिक्षण देऊन त्यांच्यातील अभिजात कलागुणांना वाव देणे.
 6. विद्यार्थिनींना अन्नशास्त्र, बालविकासशास्त्र, गृहअर्थशास्त्र इ. विषयांचे शिक्षण देऊन भावी आयुष्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करणे. गृहअर्थशास्त्र विषयाशी निगडीत असलेल्या वेगवेगळ्या रोजगारांबद्दल मुलींना सखोल माहिती पुरविणे.
 7. उच्च माध्यमिक व्यवसाय H.S.C. Vocational अभ्यासक्रमातील विमा व्यवसाय, घरगुती विद्युत उपकरणे दुरुस्ती, ऑटो इंजिनिअरिंग टेक्नीशियन बाबतचे ज्ञान याद्वारे तरुणांना भविष्यात स्वयंरोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहित करणे.