बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ 

Babaji Datey Kala & Vanijya Mahavidyalaya, Yavatmal

(वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ ट्रस्ट रजि. क्र. ई-३२ द्वारा संचालित)

NAAC Accredited B++ Grade with CGPA 2.82

Prayer

पसायदान

आता विश्‍वात्मके देवे । येणे वाग्यज्ञे तोषावे
तोषोनि मज द्यावे । पसायदान हे ॥1॥
जे खळाची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो
भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचे ॥2॥
दुरिताचे तिमिर जावो । विश्‍व स्वधर्म सूर्ये पाहो ।
जो जे वांछील तो ते लाहो । प्राणिजात ॥3॥
वर्षत सकळमंगळी । ईश्‍वरनिष्ठांची मांदियाळी
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥4॥
चला कल्पतरुंचे आरव । चेतनाचिंतामणीचे गाव
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥5॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥6॥
किंबहुना सर्वसुखी । पूर्ण होऊनि तिही लोकी
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥7॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषी लोकी इये
दृष्टादृष्टविजये । होआवे जी ॥8॥
येथ म्हणे श्री विश्‍वेश्‍वरावो । हा होईल दान पसावो
येणे वरे ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥9॥