बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ 

Babaji Datey Kala & Vanijya Mahavidyalaya, Yavatmal

(वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ ट्रस्ट रजि. क्र. ई-३२ द्वारा संचालित )

Instructions for Admissions

प्रवेशासंबंधी सूचना

विद्यार्थी-विद्यार्थिनींनी प्रवेशासंबंधीच्या खालील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात :-
इ.११ वी ते पदव्युत्तर अशा सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता dateycollege.edu.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने
प्रवेश-पूर्व अर्ज भरणे अनिवार्य आहे. प्रवेश-पूर्व अर्ज भरला नसल्यास येथे क्लिक करावे.

प्रवेश घेताना खालील कागद-पत्रे सोबत आणावीत :-

  1. ऑनलाईन प्रवेश-पूर्व अर्जाची प्रिंट केलेली प्रत व १०० रुपये भरल्याची पावती
  2. इ. १०वी चे (कनिष्ठ महाविद्यालयातील किंवा एचएससी व्होकेशनलच्या प्रवेशाकरिता) आणि इ. १२वी चे उत्तीर्णता प्रमाणपत्र आणि गुणपत्रिकेची मूळ प्रत आणि एक स्व-स्वाक्षरीकृत (सेल्फ अटेस्टेड) प्रत. कागदपत्रांची सत्यता पडताळणी झाल्यानंतर मूळ गुणपत्रिका परत करण्यात येईल.
  3. शाळा/महाविद्यालय सोडल्याचा दाखला (ट्रान्सफर सर्टिफिकेट) मूळ प्रत आणि एक स्व-स्वाक्षरीकृत (सेल्फ अटेस्टेड) प्रत. प्रवेश निश्चित झाल्यास सदर दाखल्याची मूळ प्रत परत मिळणार नाही.
  4. SC/ST/SBC/VJNT/OBC/EBC च्या विद्यार्थ्यांनी कास्ट सर्टिफिकेटची मूळ प्रत आणि एक स्व-स्वाक्षरीकृत (सेल्फ अटेस्टेड) प्रत सादर करावी. सत्यता पडताळणीनंतर मूळ प्रत परत केली जाईल.
  5. पात्रता परीक्षा खाजगीरीत्या उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्याने जन्मतारखेचा पुरावा म्हणून शाळेचा दाखला व बोर्डाच्या प्रमाणपत्राची प्रमाणित मूळ प्रत जोडावी.
  6. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाव्यतिरिक्त अन्य विद्यापीठातून येणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेशाचे वेळी प्रवजन प्रमाणपत्र (Migration Certificate) सादर करणे आवश्यक आहे.
  7. विद्यार्थ्याचा पासपोर्ट आकाराचा अलीकडील रंगीत फोटो – २ प्रती

टीप :-

  1. महाविद्यालयाचे शुल्क भरून प्रवेश निश्चित केल्यानंतर कोणत्याही कारणास्तव ते शुल्क परत मिळणार नाही.
  2. विद्यापीठ परीक्षेचे शुल्क विद्यापीठाच्या नियमानुसार नंतर देय राहील.