बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ 

Babaji Datey Kala & Vanijya Mahavidyalaya, Yavatmal

(वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ ट्रस्ट रजि. क्र. ई-३२ द्वारा संचालित)

NAAC Accredited B++ Grade with CGPA 2.82

NCC

महाविद्यालयामधील एन.सी.सी. ची उज्वल परंपरा : -
बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयामधील एन सी सी विभागाची स्थापना ही महाविद्यालयाच्या स्थापनेनंतर जवळपास १७ वर्षांनंतर म्हणजे १९७६ साली झाली .महाविद्यालयाचे संस्थापक व पहिले प्राचार्य आदरणीय स्वर्गीय बाबाजी दाते यांचे भारतीय सैन्यावर व त्यातील शिस्तीवर  नितांत प्रेम होते. त्यामुळेच जेव्हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये ४७ महाराष्ट्र एन सी सी बटालीयानची स्थापना झाली तेव्हा स्वर्गीय बाबाजी दाते यांच्या प्रयत्नातून संरक्षण मंत्रालय दिल्ली ( DEFENCE MINISTRY DELHI ) यांच्या कडून महाविद्यालयाला एन सी सी चे युनिट प्राप्त होऊन ते सुरु झाले. तेव्हापासूनच एन सी सी च्या उज्वल कॅडेट्सची परंपरा व एन सी सी विभागाचा विकास आजपर्यंत टिकून राहिला आहे. महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी सैन्यात भरती झालेले आहेत.

‘एन.सी.सी. द्वारा रक्तदान शिबीर संपन्न’

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या एन.सी.सी. युनिटद्वारा दिनांक ११ सप्टे. २०१७ रोजी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय बाबाजी दाते यांच्या जयंती निमित्य ४७ महा. बटालियन एन सी सी यवतमाळ  यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या स्वातंत्र वीर सभागृहामध्ये एन सी सी च्या ५०  कॅडेट द्वारा रक्तदान करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ४७ महा. बटालियन एन सी सी यवतमाळ चे कमांडिंग ऑफिसर कर्नल एस रमेश उपस्थित होते. रक्तदान शिबिराचे उद्घाटक म्हणून संस्थेचे विद्यमान अध्यक्ष मा. विनायक दाते तसेच उपाध्यक्ष मा. सतीश फाटक, मा सौ सुषमा वि. दाते, कास्लीकर साहेब  उपस्थित होते, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. रविन्द्र निस्ताने हे होते तसेच उपप्राचार्य डॉ सौ माणिक ना. मेहरे यांची उपस्थित लाभली.

कार्यक्रमाच्या सुरवातिला एन.सी.सी. बटालियनचे कर्नल एस रमेश यांना महाविद्यालयाच्या वतीने गार्ड ऑफ ऑनर ने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर  मा. विनायक दाते व कर्नल एस रमेश व इतर मान्यवरांच्या हस्ते RD व TSC कॅम्प मध्ये उल्लेखनिय कार्य केलेल्या व भारतीय सैन्य सेवेत नियुक्त झालेल्या एन.सी.सी. कॅडेट चे युनिटच्या वतीने सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आले. रक्तदान शिबिरामध्ये कर्नल एस रमेश यांनी स्वत; रक्तदान करून रक्तदान शिबिराची सुरवात केली.

करिअरसाठी एन.सी.सी. ची उपयुक्तता : -
गेल्या अनेक वर्षापासून या महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी या एन सी सी विभागाच्या माद्यमातून भारतीय लष्करी सेवेत आपली सेवा देत आहेत. अनेक कॅडेट्स या युनिटच्या माध्यमातून R D परेड दिल्ली, थल सैनिक कॅम्प दिल्ली,  YOUTH DXCHANGE PROGRAMME CAMP, अश्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तराच्या कॅम्प मध्ये सहभागी झालेली आहेत. आज महाविद्यालयामध्ये एन सी सी चे 100 कॅडेट्स चे युनिट कार्यरत आहे. त्यामध्ये ६5 मुलं व ३5 मुलीना सहभाग घेता येतो. एन सी सी  च्या माध्यमातून रोजगाराच्या अनेक संधी महाविद्यालयीन जीवनामध्ये विध्यार्थ्याना उपलब्ध होतात. उदाहरणार्थ भारतीय सैन्य दलात अधिकारी पदाकरिता  एन सी सी कॅडेट करिता दर वर्षी १०० जागा ऑफिसर ट्रेनिंग अकादमी (OTA) चेन्नई व ६० इंडियन मिलिटरी अकादमी ( IMA ) देहराडून येथे राखीव असतात. शिवाय एन सी सी कॅडेट ला रिटर्न परीक्षा माफ असते. विद्यार्थांना महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्ततावरील कॅम्पमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते. गणतंत्र दिन परेड दिल्ली, थल सैनिक कॅम्प दिल्ली, युथ एकसचेन्ज प्रोग्राम , RD CAMP, TSC CAMP, SSB  CAMP ,  NIC CAMP, ARMY ATTACHMENT CAMP, PARA CAMP, TRACKING CAMP , SKKING CAMP KASHMIR. यासारख्या अनेक कॅम्पमध्ये सहभागी होण्याची तसेच राज्य व देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळते.

आमचे कौतुकास्पद विद्यार्थी : -
आज पर्यंत महाविद्यालयाच्या अनेक विद्यार्थ्यांनी या कॅम्पमध्ये सहभागी होऊन महाविद्यालयाचे तसेच राज्याचे प्रतिनिधित्व करून महाविध्यालायाचे नाव मोठे केले आहे. त्यामध्ये सुधीर सरोदे R D परेड दिल्ली १९८७, धनंजय काबे BLC दिल्ली १९९५, अतुल मातने BLC दिल्ली १९९६,  आशिष बुटे  TSC  दिल्ली १९९८, प्रभाकर पांडे R D परेड  दिल्ली १९९८, धनंजय लोखंडे  TSC  दिल्ली १९९९, मनोज गायकवाड  TSC दिल्ली १९९९, संजय गडपायले TSC दिल्ली १९९९, अमोल पाटील TSC दिल्ली १९९९, प्रशांत झीबल बागडे TSC दिल्ली २०००, राजेंद्र घरात  TSCदिल्ली २००१, कॅडेट जीवन झांबरे (गुलमर्ग) काश्मीर, पंकज भेंडारकर TSC दिल्ली २०१७,  व  भारतीय सैन्य दलामध्ये कॅडेट गोकुल राठोड २०१२, कॅडेट नितीन खडके २०१६, कॅडेट जयंत ताटेवार २०१७, कॅडेट सचिन गाडगे २०१७, बबलू गोसावी २०१७, CRPF  मध्ये कॅडेट साहिल शेख २०१७. सैन्य अधिकारी SSB करिता एन सी सी मधून  शुभम बाराहाते २०१५, रजत तुन्दलवार २०१७ या एन सी सी युनिट चे कॅडेट्स देशाच्या सीमेवर व राष्ट्रीय पातळीवर महाविद्यालयाचे नाव उज्वल करीत आहेत.