बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ 

Babaji Datey Kala & Vanijya Mahavidyalaya, Yavatmal

(वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ ट्रस्ट रजि. क्र. ई-३२ द्वारा संचालित )

About us

संस्थेसंबंधी थोडक्यात माहिती

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय ही यवतमाळ जिल्ह्यातील एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था आहे. ही संस्था संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न आहे. विशुद्ध विद्यालय, यवतमाळ या संस्थेचे संस्थापक कै. श्रीकृष्ण दतात्रय (बाबाजी) दाते यांनी वाणिज्य महाविद्यालयाची स्थापना दि. 26 जुलै 1959 मध्ये केली.  कै. बाबाजी दाते हे दूरदृष्टीचे असल्याने त्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘कमवा व शिका’ या योजनेअंतर्गत गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली.

वाणिज्य महाविद्यालयाची सुरुवात १९५९ साली वाणिज्य शिक्षणापासून झाली. त्या नंतर सन 1962-63 मध्ये या महाविद्यालयात कला शाखेची सुरूवात झाली.

या महाविद्यालयाचे सुरूवातीचे नाव ‘वाणिज्य महाविद्यालय’ असे होते. त्यानंतर ‘कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ असे नामकरण करण्यात आले. सन 2009 साली महाविद्यालयाचे पुनःनामकरण होऊन आता ते ‘बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय’ या नावाने ओळखले जाते.

सन 1959 मध्ये महाविद्यालयात वाणिज्य शाखेत एकूण 145 विद्यार्थी शिक्षण घेत होते. हळूहळू या संस्थेचा व्याप वाढत गेला. तेव्हापासून आजपर्यंत हे महाविद्यालय यवतमाळ जिल्हा तसेच आजुबाजूच्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी शिस्तबद्ध आणि संस्कारक्षम शिक्षणाची सोय उपलब्ध करून देत आहे.

सध्या  2,350 चे वर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

सध्या वरिष्ठ महाविद्यालयात वाणिज्य व कला शाखा तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमांतर्गत एम.कॉम., एम.ए. मराठी व एम.ए. इतिहासाचे वर्ग चालवले जातात.

कनिष्ठ महाविद्यालयात  11 वी व 12 वी वाणिज्य विभागाचे वर्ग इंग्रजी व मराठी माध्यमात शिकविले  जातात.  कला शाखेचे वर्ग मराठी माध्यमात शिकविले  जातात.

विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण उपलब्ध व्हावे या हेतुने महाविद्यालयात उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमांतर्गत विमा एम.आर.ई.डी.ए., ऑटो इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे वर्ग चालविले जातात.

ग्रंथालयात वेगवेगळ्या अभ्यासक्रमानुसार पुस्तके उपलब्ध असुन Modern Computer Network व LAN Internet connectivity असलेली सुसज्ज संगणक प्रयोगशाळा महाविद्यालयात आहे. ग्रंथालयात विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र अभ्यासिका आहेत. त्या व्यतिरिक्त सुसज्ज जिम्नॅशियम व प्रशस्त क्रीडा मैदान उपलब्ध आहे.

मुलींकरिता महाविद्यालयात वसतिगृहाची उत्तम सोय उपलब्ध आहे.

वाणिज्य विभागातील विद्यार्थी शिक्षणासोबत Cultural Activities मध्ये हिरीरीने सहभागी होतात. महाविद्यालय शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकासाकडे विशेष लक्ष देते.