बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ 

Babaji Datey Kala & Vanijya Mahavidyalaya, Yavatmal

(वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ ट्रस्ट रजि. क्र. ई-३२ द्वारा संचालित )

Scholarship & General Rules

शिष्यवृत्ती व सवलतप्राप्त विद्यार्थ्यांकरिता शुल्कासंबंधी नियम : -

 • आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांची (ई.बी.सी.) सवलत, तसेच सरकारकडून मिळणारे शुल्क माफी व अन्य सर्व शिष्यवृत्त्या, गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्याला मिळू शकतात. प्रवेश घेतांना त्यासंबधीचा अर्ज भरुन देण्याची जबाबदारी विद्यार्थ्याची आहे.
 • आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांची (ई.बी.सी.) सवलत घेऊन शिकणाऱ्या विद्यार्थ्याला ज्या महिन्यात त्याची उपस्थिती 75 टक्क्यांपेक्षा कमी असेल त्या महिन्याचे पूर्ण शुल्क भरावे लागेल. भारत सरकार शिष्यवृत्ती मिळविणारा विद्यार्थी ज्या महिन्यात 75 टक्क्यांपेक्षा कमी उपस्थित असेल त्या महिन्याचे पूर्ण शुल्क त्याच्याकडून वसूल केले जाईल.
 • शिष्यवृत्ती मंजूर झालेल्या विद्यार्थ्याचे प्रयोगशाळा शुल्क किंवा इतर शुल्क शासनाकडून मिळाले नाही तर ते विद्यार्थ्याला भरावे लागेल.
 • ओळखपत्र दाखविल्याशिवाय कोणत्याही प्रकारची शिष्यवृत्ती मिळणार नाही.
 • भारत शासन शिष्यवृत्ती, ई.बी.सी. सवलत तसेच इतर सवलतींकरिता दिलेल्या मुदतीत अर्ज भरावा.
 • शिक्षणविभागाकडून कोणत्याही कारणास्तव सवलतधारक विद्यार्थ्यांना EBC/PTC/STC/OBC इत्यादि फी सवलती मंजूर न झाल्यास संबंधित विद्यार्थ्याला पूर्ण शुल्क भरावे लागेल. तसेच शासनाने वेळोवेळी वाढवलेले शुल्क विद्यार्थ्याला भरावे लागेल आणि वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे लागेल. शिष्यवृत्ती अर्ज नामंजूर झाल्यास त्याची जबाबदारी महाविद्यालयावर राहणार नाही.
 • आवश्यक अटी व पात्रता पूर्ण करणाऱ्या इतर मागासवर्ग (ओ.बी.सी.) संवर्गातील विद्यार्थ्यांना शासनाकडून शिष्यवृत्ती व फी माफीची सवलत दिली जाईल. त्याकरिता जातीचे प्रमाणपत्र आवश्यक राहील.
 • आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय (ई.बी.सी) सवलत घेणारे विद्यार्थी व शासनाकडून शिष्यवृत्ती घेणारे विद्यार्थी यांना शासनाकडून जे शुल्क मिळणार नाही तेवढेच भरावे लागेल.
 • समाजकल्याण विभागाकडून जी फी सवलत प्राप्त होणार नाही त्याची फी महाविद्यालयात भरावी लागेल.

शासकीय शिष्यवृत्ती आणि सवलतींबाबत नियम व आवश्यक कागदपत्रे

भारत सरकार शिष्यवृत्ती (मागासवर्गीयांकरिता) Government of India (GOI) Scholarship

 1. पालकांचा उत्पन्नाचा दाखला व विद्यार्थ्याचे जातीचे प्रमाणपत्र
 2. पूर्वी शिष्यवृत्ती मिळत असल्यास त्याचा आदेश क्रमांक.
 3. शिक्षणात खंड पडला असल्यास खंड प्रमाणपत्र.
 4. उन्नत व प्रगत गट प्रमाणपत्र (Non-Creamy Layer Certificate)
 5. इ. 10 वी ची गुणपत्रिका व टी.सी. ची झेरॉक्स प्रत
 6. आधार कार्ड बँक खात्याशी जोडणे आवश्यक आहे. Bank Linking पावती जोडणे आवश्यक.
 7. उत्पन्न मर्यादा रू. 1,00,000/- असलेल्या OBC/VJNT/SBC विद्यार्थ्यांकरिता ही शिष्यवृत्ती आहे.
 8. SC व ST विद्यार्थ्यांकरिता उत्पन्न मर्यादा रु. 2,50,000/- राहील. यापेक्षा जास्त उत्पन्न असल्यास Freeship देय राहील.
 9. एकाच पालकाचे फक्त दोन पाल्य शिष्यवृत्तीकरिता पात्र राहतील.
 10. वरील दोन्ही सवलतींचे अर्ज न भरल्यास पूर्ण फी भरावी लागेल.
 11. शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाईन भरावा व त्याची एक प्रत कार्यालयात सादर करावी.
 12. समाजकल्याण विभागाकडून जी जी सवलत प्राप्त होणार नाही ती फी संबंधितांना महिवद्यालयात भरावी लागेल.

.बी.सी. सवलत (कनिष्ठ महाविद्यालय)

 1. इ.बी.सी. सवलत पुढे चालू ठेवण्यासाठी शैक्षणिक सत्र 2017-18 चे अर्ज दोन प्रतीत
 2. उत्पन्नासंबंधीचा दाखला 15,000/- चे आत असावा.
 3. मागील सत्रातील अपत्यासंबंधीचा दाखला वडिलांची सही व सरपंचाची किंवा दंडाधिकारी यांचे सही व शिक्क्यासह दोन प्रतीत.
 4. वडील मरण पावल्यास मृत्यूचा दाखला.
 5. मागील वर्षीचे इ.बी.सी. मंजुरीचे आदेश क्र. व दिनांक, प्राचार्यांची स्वाक्षरी व शिक्क्यासहित दोन प्रतीत सादर करावे.

.बी.सी. सवलत (वरिष्ठ महाविद्यालय)

 1. इ.बी.सी. सवलतीचा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरावा.
 2. रेशन कार्ड
 3. रु. 1,00,000/-च्या आत उत्पन्न असल्याचा दाखला (तहसीलदाराच्या स्वाक्षरीचा)
 4. आधार कार्ड
 5. मागील वर्षाची गुणपत्रिका, टी.सी.
 6. चालू वर्षाची प्रवेश पावती
 7. शिक्षणक्रमात खंड पडला असेल तर त्या कालावधीतील खंड प्रमाणपत्र (दंडाधिकारी यांचे स्वाक्षरीचे)

General Rules :-

 1. महाविद्यालयातील विद्यार्थी हा चोवीस तास विद्यार्थी समजला जाईल. महाविद्यालयात व अन्यत्र त्याची वर्तणूक योग्यच असली पाहिजे. ती अयोग्य राहिल्यास त्याला महाविद्यालयातून काढून टाकण्यात येईल.
 2. अभ्यासक्रम सुरु होण्यापूर्वीच्या प्रार्थनेला प्रत्येक विद्यार्थ्याने आपली उपस्थिती पत्रिका घेऊन हजर असले पाहिजे आणि प्रार्थना म्हणण्यात सहभागी झाले पाहिजे.
 3. महाविद्यालयात येताना विद्यार्थ्याने महाविद्यालयीन गणवेश घालणे तसेच आपले ओळखपत्र (Identity Card) बाळगणे अनिवार्य आहे. कर्मचारी वर्गापैकी कोणीही मागणी केल्यास ओळखपत्र दाखविले पाहिजे.
 4. उपस्थिती -
  1. विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे प्रत्येक विषयात 75% उपस्थिती आवश्यक आहे.
  2. सुट्टी घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याने तसा अर्ज किमान दोन दिवस आधी प्राचार्यांना दिला पाहिजे व त्यावर पालकाची स्वाक्षरी असली पाहिजे.
  3. पूर्व परवानगीशिवाय सतत आठ दिवस अनुपस्थित राहिल्यास त्याचे नाव हजेरीपटावरुन काढून टाकण्यात येईल. हजेरीपटावर पुन्हा नाव घेण्यासाठी 100 रु. शुल्क भरावे लागेल. असा पुन्हा प्रवेश फक्त एकदाच देण्यात येईल.
 5. वर्ग चालू असताना व्हरांड्यात आरडाओरड करणे योग्य नाही. परिसरात सदैव शांतता राखावी.
 6. महाविद्यालयाचे साहित्य, विद्युत उपकरणे किंवा इतर नुकसानीबद्दल सामूहिक दंड केला जाईल.
 7. महाविद्यालयाच्या परिसरातील इमारतीवर काहीही लिहू नये किंवा त्या खराब करु नयेत, अन्यथा सामूहिक दंड करण्यात येईल.
 8. उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांला वर्गात प्रवेश मिळणार नाही. अनुपस्थिती मांडली जाईल. प्राध्यापक वर्गात जाण्यापूर्वी विद्यार्थी आपल्या वर्गात, आपल्या जागेवर असावा.
 9. महाविद्यालयाचे सर्व अभ्यासपूरक कार्यक्रम प्राध्यापकांच्या नियंत्रणाखालीच चालतील व प्राचार्यांच्या संमतीनेच ठरतील.
 10. कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींसाठी सलवार-कुर्ता हाच गणवेश निश्चित करण्यात आलेला आहे. इतर कुठलाही पेहराव चालणार नाही.
 11. विद्यार्थ्यांनी 15 ऑगस्ट, 26 जानेवारी इ. राष्ट्रीय दिवशी शुभ्र वेषात उपस्थित राहणे आवश्यक आहे. अन्यथा दंड आकारण्यात येईल.
 12. विद्यार्थ्यांनी प्रार्थनेची उपस्थिती, तासांची उपस्थिती, व्यायाम वर्गाची उपस्थिती व इतर आवश्यक उपस्थितीबाबत स्वतः जागरुक असले पाहिजे.
 13. मोर्चे, संप, अन्य राजकीय आंदोलने व हिंसक कृत्ये, प्राध्यापक व मुलामुलींशी असभ्य वागणूक इ. प्रकारात भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांस महाविद्यालयातून ताबडतोब काढून टाकण्यात येईल.
 14. विद्यार्थ्यांनी नेहमीच योग्य अनुशासन पाळले पाहिजे. महाविद्यालयाचे वातावरण सभ्य, सुसंस्कृत व खऱ्या अर्थाने शैक्षणिक राहावे यासाठी झटले पाहिजे. वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे व नियमांचे पालन प्रत्येक विद्यार्थ्याने केले पाहिजे.
 15. ज्या विद्यार्थ्यांचे आचरण महाविद्यालयाच्या अनुशासनाला घातक ठरेल, त्याला ताबडतोब काढून टाकण्याचा अधिकार प्राचार्यांना राहील.
 16. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत दृष्टीने निरनिराळ्या कार्यक्रमांचे आयोजन विविध मंडळाद्वारे संबंधित प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली केले जाईल. त्या त्या विषयात रस असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यात नेतृत्व दिल्या जाईल.
 17. उच्च माध्यमिक शालांत परीक्षा किंवा विद्यापिठाच्या परीक्षेचा निकाल लागून गुणपत्रिका/प्रमाणपत्रे कार्यालयात प्राप्त झाल्याच्या तारखेपासून तीन दिवसांच्या आत विद्यार्थ्याने आपली गुणपत्रिका/ प्रमाणपत्र कार्यालयातून नेली पाहिजे. त्यानंतर गुणपत्रिका/प्रमाणपत्रे जपून ठेवण्याची जबाबदारी महाविद्यालयाची राहणार नाही.
 18. विद्यार्थ्याने महाविद्यालयात प्रवेश घेतला याचा अर्थ, त्याला व त्याच्या पालकाला वरील सर्व नियम मान्य आहेत, तसेच त्यात किंवा विद्यापीठाच्या/शासनाच्या नियमांत वेळोवेळी होणारे फेरबदलही मान्य राहतील असा केला जाईल व सर्व नियम त्याला बंधनकारक राहतील.
 19. विद्यार्थ्याचे वर्षभरातील आचरण महाविद्यालयाच्या प्रशासनाला बाधक ठरत असल्यास त्याला महाविद्यालयातून काढून टाकण्यात येईल, याची पालकांनी नोंद घ्यावी.
 20. महाविद्यालयाच्या परिसरात तंबाखू, गुटका इ. मादक पदार्थ बाळगण्यास/सेवन करण्यास सक्त मनाई आहे. मादक पदार्थ जवळ बाळगणे अथवा मादक पदार्थांचे सेवन करणे हा कायद्याने गुन्हा असून तसे नियमबाह्य कृत्य विद्यार्थ्यांकडून घडल्यास संबंधित विद्यार्थ्यांवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल.
 21. 11वी तील विद्यार्थ्यांच्या पालकांनी वर्षभरात सवडीनुसार प्राचार्यांना भेटून वेळोवेळी आपल्या पाल्याच्या अभ्यासविषयक प्रगतीबाबत जागरूक राहिले पाहिजे.
 22. ओळखपत्र दाखविल्याशिवाय कोणत्याही प्रकारची शिष्यवृत्ती मिळणार नाही.
 23. प्रवेशाचे वेळीच विद्यार्थ्यांनी ओळखपत्र महाविद्यालयातून घेणे अनिवार्य राहील. त्याशिवाय प्रवेश कायम समजला जाणार नाही. ओळखपत्राकरिता विद्यार्थ्याने प्रवेशाचे वेळीच फोटो तयार ठेवावे.
 24. महाविद्यालयाच्या संपूर्ण परिसरात विद्यार्थ्यांना मोबाईल वापरण्यास परवानगी नाही.
 25. एम.कॉम. आणि एम.ए. च्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचा गणवेश आवश्यक राहील.
 26. विद्यापीठ युवक महोत्सवात सहभागी होण्यासाठी महाविद्यालयातर्फे कार्यक्रम ठरविल्या जातील व त्यात विद्यार्थ्यांना भाग घेता येईल. विद्यापीठ युवक महोत्सवात सहभागी होण्यासाठी महाविद्यालयीन निवड समितीचा निर्णय अंतिम राहील. कोणते कार्यक्रम सहभागी होण्यास पात्र आहेत ते ही समिती ठरवील. जास्तीत जास्त दोनच दिवसांचा खर्च मिळू शकेल.
 27. विद्यार्थ्यांनी शाखानिहाय स्थापन केलेल्या स्वाध्याय मंडळामार्फत विविध शैक्षणिक उपक्रम, बचाव स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, गायन स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम व इतर अनेक उपक्रम विभागामार्फत स्वतंत्रपणे चालविले जातील.
 28. महिन्यातील दोन शनिवारी विविध विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येईल.