बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ 

Babaji Datey Kala & Vanijya Mahavidyalaya, Yavatmal

(वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ ट्रस्ट रजि. क्र. ई-३२ द्वारा संचालित)

NAAC Accredited B++ Grade with CGPA 2.82

क्रीडा विभाग – दाते महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात संपन्न

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथील शारीरिक शिक्षण विभाग अंतर्गत दि २९ ऑगस्ट २०२५ रोजी हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद ह्यांच्या जयंती निमित्य कार्यक्रम घेण्यात आला. शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख व कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. डॉ. रविजीत गावंडे यांनी आपल्या प्रत्सावने मध्ये  विद्यार्थ्यांना तीन दिवस चालणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगून कार्यक्रमाचा उद्देश सविस्तर सांगितला व स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. त्यानंतर खेळाची शपथ सर्व विद्यार्थांना दिली.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या संपूर्ण खेळाची माहिती देऊन त्याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. तसेच मंचावर उपस्थित असलेले मुख्य मार्गदर्शक उप-प्राचार्य डॉ.ताराचंद कंठाळे यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला व  विद्यार्थ्यांना खेळामधून व्यक्तिमत्व, विकास व आरोग्य कसे प्राप्त करता येईल. याविषयी सविस्तर मार्गदर्शन करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी खेळा संबंधित स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवावा असे सांगितले. कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक प्रा. डॉ. स्वाती जोशी यांनी मोबाईलचा गैरवापर टाळून शरीर स्वास्थ्य व मन:स्वास्थ्याकडे लक्ष देण्यास सांगितले. या मध्ये सहसमन्वयक प्रा. अविनाष मसराम यांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन प्रा. आशिष कांबळे यांनी केले. या स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्याच्या हस्ते करण्यात आले. वरिष्ठ महाविद्यालायातील विद्यार्थांनी सकाळच्या सत्रात व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थांनी दुपारच्या सत्रात विविध स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. हे संपूर्ण कार्यक्रम २९ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२५ या दरम्यान घेण्यात आले. यामध्ये योगाची विविध आसणे व प्राणायाम,  रस्सीखेच, बुद्धिबळ, कॅरम, लिंबू चमचा, रोप स्किपींग, अश्या विविध स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यात आला.
या स्पर्धेमधून प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विध्यार्थाना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. मेजर ध्यानचंद यांनी दिलेला मूलमंत्र जोपासण्यात आले व राष्ट्रीय क्रीडा दिनाची रॅलीचे आयोजन प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. रॅली दरम्यान विद्यार्थ्यांनी विविध नारे देऊन सर्वांचे लक्ष वेधले. यावेळी मेजर ध्यानचंद यांच्या पुतळ्याची स्वच्छता करून माल्यार्पण व पुष्प अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता प्रा. शुभम काजळे, प्रा.नितेश गेडाम, प्रा. अजय राठोड, प्रा.शुभम चांभारे, प्रा. मिनाक्षी मोरे, प्रा. राहुल राठोड. प्रा. स्नेहल सोनटक्के यांनी परिश्रम घेतले.

अँटी रॅगिंग साप्ताह जनजागृती कार्यक्रम संपन्न

अँटी रॅगिंग जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे शारीरिक शिक्षण व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १२-०८-२०२५ मंगळवार रोजी करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरु होते. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून श्री.बाळकृष्ण सरकटे, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा.दत्तात्रय जोशी, डॉ. वैशाली मेश्राम, प्रा. गजानन लांजेवार हे मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे समन्वयक शारीरिक शिक्षण विभाग चे संचालक  प्रा. डॉ. रविजित गावंडे यांनी प्रस्तावना मध्ये अँटी रॅगिंगच्या उद्दिष्टाबद्दल माहिती दिली व नियम सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये सद्भावना, आदर आणि एकात्मता रुजवणे किती महत्त्वाचे आहे हे सांगितले. त्यांनी भारत सरकार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अँटी रॅगिंग धोरणाची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
प्रमुख पाहुणे श्री.बाळकृष्ण सरकटे यांनी आपल्या भाषणात रॅगिंग हा केवळ कायद्याने दंडनीय गुन्हा नाही तर तो मानवी मूल्यांना हरवणारा कृत्य आहे. रॅगिंगला आपण सर्वांनी मिळून पूर्णपणे थांबवले पाहिजे. चला, आपण सकारात्मक वातावरण निर्माण करून महाविद्यालयाचा गौरव वाढविण्याचे आवाहन केले. आणि त्यांनी रॅगिंगच्या मानसिक आणि सामाजिक परिणामांवर चर्चा केली, प्राचार्य डॉ. राजेश सिंगरु यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात रॅगिंग हा एक गंभीर सामाजिक व कायदेशीर गुन्हा असल्याचे सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना रॅगिंगविरुद्ध शून्य सहनशीलतेची भूमिका घेण्याचे आवाहन केले आणि प्रत्येक विद्यार्थ्याने सुरक्षित, आदरयुक्त व मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी योगदान द्यावे असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज कांबळे ह्या विद्यार्थाने केले. आभार प्रदर्शन प्रा. लांजेवार यांनी केले. या कार्यक्रमात महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये अँटी रॅगिंग विषयी जागरूकता आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम यशस्वी ठरला.

आंतरराष्ट्रीय योग दिन

स्थानिक बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे दिनांक २१ जून 2025 शनिवार रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ताराचंद कंठाळे यांनी या कार्यक्रमाचे मुख्य प्रवक्ता डॉ. सूर्यप्रकाश जयस्वाल यांचा परिचय करून दिला. महाविद्यालयाचे व वाणिज्य न्यासाचे अध्यक्ष मा. श्री विनायक दाते यांनी डॉ. सूर्यप्रकाश जयस्वाल यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. रवीजीत गावंडे यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून डॉ. सूर्यप्रकाश जयस्वाल यांनी उपस्थितांना योगाचे शास्त्रीय आणि व्यावहारिक महत्त्व विशद केले. त्यांनी योगाच्या विविध अंगावर सविस्तर मार्गदर्शन केले. विशेषतः विद्यार्थ्यांनी योग नियमितपणे केल्यास शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुधारते यावर भर दिला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरु होते त्यांनी विद्यार्थ्यांना योग ही जीवनशैली म्हणून आत्मसात करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे अध्यक्ष मा. श्री विनायक दाते व महाविद्यालयाचे विश्वस्त मा. सुषमा दाते यांची विशेष उपस्थिती लाभली त्यांनी महाविद्यालयामार्फत योग प्रसाराच्या कार्यासाठी सातत्याने पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.
जागतिक योग दिनानिमित्त शासनाच्या निर्देशानुसार मागील पंधरा दिवसात विद्यार्थ्यांमध्ये योगाद्वारे आरोग्य हा संदेश पोहोचविण्याकरिता रासेयोच्या वतीने स्केच स्पर्धा, निबंध स्पर्धा व रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. परीक्षेचा काळ असूनही या स्पर्धेमध्ये 22 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला त्यापैकी स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरता संस्थेचे अध्यक्ष, प्राचार्य व शारीरिक शिक्षण विभागाचे विभाग प्रमुख डॉ. गावंडे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना प्रोत्साहित केले व पुरस्कार प्रदान केले. या स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक कुमारी पायल सुरपाम हिला देण्यात आला. स्केच स्पर्धेमध्ये अतिशय सुंदर योगाचे विविध प्रकार रेखाटून द्वितीय क्रमांक अमेय मेश्राम याने प्राप्त केला तर योगाचे महत्त्व मोजक्या व सुंदर हस्ताक्षरमध्ये रेखाटले. तो तिसरा क्रमांक प्राप्त केला सुहानी राठोड हिने. सर्व मान्यवरांनी आमच्या विद्यार्थ्यांचे या प्रसंगी कौतुक केले. या कार्यक्रमाचे आयोजन शारीरिक शिक्षण विभाग व राष्ट्रीय सेवा योजना या दोन विभागाद्वारे करण्यात आले होते. प्रा.डॉ रवीजीत गावंडे व रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. दत्तात्रय जोशी यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन अत्यंत सुरेखपणे पार पाडले. या कार्यक्रमात महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी प्राध्यापक वर शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या योग दिवशी सूर्यनमस्कार, विविध योगासने, प्राणायाम, ध्यान करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

इम्पॉर्टन्स ऑफ न्यूट्रिशन इन ह्युमन हेल्थ या विषयावर चर्चासत्र संपन्न

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे गुरुवार दि. २७ मार्च २०२५ रोजी, महाविद्यालयातील सावरकर  सभागृहात "इम्पॉर्टन्स ऑफ न्यूट्रिशन इन ह्युमन हेल्थ" या विषयावर एक दिवसीय सेमिनार आयोजित करण्यात आला. या सेमिनारमध्ये अनेक विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

सकाळी १०.०० वाजता सेमिनारची सुरुवात झाली. या सेमिनारचे अध्यक्ष, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश एन. सिंगरू सर होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात पोषणाच्या घटकावर प्रकाश टाकला. त्यांनी मानवाच्या जीवनातील संतुलित आहार आणि पोषणाचे महत्व सांगितले. तसेच या सेमिनारच्या आयोजनासाठी आयोजकांचे आभार व्यक्त केले.
त्यानंतर, प्रमुख वक्ता म्हणून श्रीमती. राखी राऊत यांनी "पोषणाचे महत्त्व आणि त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम" या विषयावर आपल्या विचारांची मांडणी केली. त्यांनी पोषणाच्या विविध अंगे आणि जीवनशैलीवर त्याच्या प्रभावाबद्दल माहिती दिली. विद्यार्थ्यांनी ते मोठ्या उत्साहाने ऐकले.

यानंतर, प्रमुख डॉ. वैशाली मेश्राम यांनी शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग्य पोषण कसे महत्वाचे आहे, याबद्दल सांगितले. त्याचबरोबर, त्यांनी पोषणाच्या विविध प्रकारांमध्ये जीवनशैली आणि पर्यावरणाचा समावेश कसा करावा यावर चर्चा केली.
समारोपाच्या वेळी,  हा कार्यक्रम शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. रविजीत गावंडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यांनी सेमिनारच्या उद्देशाचा आढावा घेतला आणि विद्यार्थी व प्राध्यापक वृंद यांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्र-संचालन कु. दिपाली ठाकरे ने उत्तमरीत्या केले.

“करिअर ऑपॉर्च्युनिटी इन फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स’’ या विषयावर कार्यशाळा संपन्न

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने पी.एम–उषा अंतर्गत “करिअर ऑपॉर्च्युनिटी इन फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स" या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन शुक्रवार, दि.२१-०३-२०२५ रोजी करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालायचे उप-प्राचार्य डॉ. ताराचंद कंठाळे यांनी भूषविले. यांनी क्रीडा आणि शारीरिक शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाची संधी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता व्यक्त केली. शारीरिक शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक आकर्षक करियर संधी उपलब्ध आहेत आणि विद्यार्थ्यांना त्याबाबत मार्गदर्शन मिळणे अत्यंत आवश्यक आहे. वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. अमोल राऊत यांनी विद्यार्थांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजक शरीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. रविजीत गावंडे यांनी प्रास्ताविक केले.
या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक मुंगसाजी महाराज महाविद्यालय, दारव्हा येथील प्रा. सुनील डंभारे यांनी या कार्यशाळेतील विषयावर विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली. त्यांनी या क्षेत्रातील शैक्षणिक पात्रता, नोकरीच्या संधी तसेच खेळाडूंना उपलब्ध असलेल्या विविध सुविधा आणि शिष्यवृत्ती बाबत मार्गदर्शन केले. शाळा, महाविद्यालय, पोलीस, सैन्य आणि इतर सरकारी खाजगी क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधी, स्पोर्ट्स आणि फिटनेस, उद्योग जिम ट्रेनर, फिटनेस कोच स्पोर्ट मॅनेजमेंट, स्वतंत्र व्यवसाय आणि उद्योजकता स्पोर्ट्स अकादमी फिटनेस सेंटर योगा प्रशिक्षण केंद्र, या सर्व बाबीवर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. अशोक साळवे यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला विद्यार्थ्यांनी या चर्चासत्रात मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि मार्गदर्शक प्राध्यापकांना उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारले या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरसाठी नवीन दृष्टी मिळाली.

दाते महाविद्यालयात राज्य क्रीडा दिन संपन्न

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ येथे १५ जानेवारी २०२५ रोजी जगप्रसिद्ध कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जन्मदिनी राज्य क्रीडा दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त महाविद्यालयात हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेच्या आयोजनाकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे उप-प्राचार्य डॉ. ताराचंद कंठाळे यांनी केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात खाशाबा जाधव हे भारत स्वतंत्र झाल्यानंतर ऑलम्पिक कुस्तीमध्ये कास्यपदक प्राप्त करणारे पहिले भारतीय खेळाडू राहिले अशी माहिती दिली. त्यांनी नवीन खेळाडू समोर एक नवीन आदर्श निर्माण केला. तीच प्रेरणा घेऊन आपले खेळाडू ऑलम्पिक स्पर्धेमधे चांगल्या प्रकारे प्राविण्य प्राप्त करत आहेत.
या राज्य क्रीडा दिनानिमित्त व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले. त्यामध्ये बी.ए. भाग-एक, दोन व तीन आणि बी.कॉम-भाग एक, दोन व तीन या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत बी.ए-भाग तीन संघ विजयी तर बी.कॉम. भाग-दोन हा संघ उपविजेता राहिला. या स्पर्धेचे व कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. रविजीत गावंडे यांनी केले. सदर स्पर्धेकरिता महाविद्यालय व बाहेरील परिसरातील बहुसंख्य क्रीडा रसिकांनी उपस्थिती दर्शविली होती.

दाते महाविद्यालयात येथे २१ जून २०२४ शुक्रवार रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे २१ जून २०२४ शुक्रवार रोजी सकाळी ठीक ८.०० वाजता आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन शारीरिक शिक्षण विभाग व आय.क्यू.ए.सी. यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचलन शा.शि. संचालक प्रा. डॉ. रविजीत गावंडे यांनी केले. या कार्यक्रमामध्ये योगासने आणि प्राणायाम यांचे प्रात्यक्षिके घेण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री विनायक दाते यांनी योग केल्याने एकाग्रता वाढते, आत्मविश्वास बळावतो, वेगवेगळ्या योगासनामुळे शरीर लवचिक होते, स्नायूंची बळकटी वाढते, आजच्या या व्यस्त जीवन शैलीमधे योगासन करणे किती महत्वाचे आहे, हे त्यांनी या प्रसंगी पटवून दिले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. रविजीत गावंडे यांनी केले. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाच्या विश्वस्त सौ. सुषमाताई दाते, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. ताराचंद कंठाळे, वाणिज्य विभागप्रमुख डॉ. प्रदीप दरवरे, प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी हे उपस्थित होते.

दाते महाविद्यालयात ‘क्रीडा महोत्सव तरुणाई २०२४’ संपन्न

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ येथे क्रीडा महोत्सव तरुणाई २०२४ दि. ६, ७ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आला. या क्रीडा महोत्सवामध्ये मुलांसाठी क्रिकेट व व्हॉलीबॉल तर मुलींसाठी रस्सीखेच स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. क्रिकेट मध्ये एकूण १८ संघ सहभागी झाले तसेच व्हॉलीबॉल मध्ये ८ संघ सहभागी झाले होते तर रस्सीखेच मध्ये ८ संघ सहभागी झाले.
व्हॉलीबॉल मध्ये प्रथम क्रमांक बी. कॉम भाग २ च्या विद्यार्थ्यांनी पटकावला दुसरा क्रमांक बी. ए. भाग २ ने तर तृतीय क्रमांकावर एन.एस.एस. संघ राहिला.
रस्सीखेच मध्ये ८ संघ सहभागी झाले होते. त्यामध्ये प्रथम क्रमांक बी. ए. भाग १ ने पटकाविला दुसरा क्रमांक एन.एस.एस. ने तर तृतीय क्रमांक एन.सी.सी च्या विद्यार्थ्यांनी पटकावला.
क्रिकेट मध्ये १८ संघ सहभागी झाले होते त्यामध्ये प्रथम क्रमांक बी. कॉम. भाग १ च्या विद्यार्थ्यांनी पटकावला दुसरा क्रमांक एम. कॉम. ने तर तृतीय क्रमांक बी. कॉम भाग ३ ने पटकाविला. क्रीडामहोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वर्षा कुळकर्णी होत्या. तर उद्घाटक म्हणून यवतमाळ जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव श्री. प्रमोद धुर्वे व क्रिकेटचे प्रशिक्षक श्री. विजय मालवी हे होते. प्रमुख अतिथी म्हणून वाणिज्य महाविद्यालय न्यासाचे अध्यक्ष मा. श्री विनायक दाते व महाविद्यालयाच्या विश्वस्त सौ. सुषमा दाते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. रविजीत गावंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन वाणिज्य विभागाचे प्रा.डॉ. अमोल राऊत यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंग्रजी विभागाचे प्रा. डॉ. सचिन तेलखडे यांनी केले.

दाते महाविद्यालयात आंतर महाविद्यालयीन हॉकी (पुरुष) स्पर्धा संपन्न

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत 28/11/2022 ते 30/11/2022 आंतर महाविद्यालयीन हॉकी स्पर्धेचे आयोजन बाबाजी दाते कला आणी वाणिज्य महाविद्यालया तर्फे पोलीस मुख्यालय (तहसील जवळ) मैदानावर करण्यात आले. या कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेविका मीरा फडणीस यांनी हॉकी स्पर्धेचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून अनिल नायडू, बबलू यादव, मनीषा आखरे, व प्रा. डॉ. मार्कस लाकडे हे होते. या कार्यक्रमाचे प्रास्तावीक शारीरिक शिक्षक डॉ. रविजीत गावंडे यांनी केले. अध्यक्षीय भाषण अमरावती विद्यापीठ सिनेट सदस्य प्रा. डॉ. हरिदास धुर्वे यांनी केले. या कार्यक्रमाचे संचलन प्रा. डॉ. सचिन तेलखेडे यांनी केले. अंतर महाविद्यालयीन हॉकी स्पर्धेचा पहिला सामना विद्याभारती महाविद्यालय अमरावती विरुद्ध राजर्षी शाहू विज्ञान महाविद्यालय चांदुर रेल्वे यांच्या मध्ये पहिला सामना झाला. या सामन्यामध्ये राजर्षी शाहू विज्ञान महाविद्यालय चांदुर रेल्वे विजय झाले.
स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी अंतिम सामना केशरबाई लाहोटी विरुद्ध राजर्षी शाहू विज्ञान महाविद्यालय चांदुर रेल्वे यांच्यामध्ये झाला. या सामन्यात केशरबाई लाहोटी संघ विजेता तर उपविजेता राजर्षी शाहू विज्ञान महाविद्यालय चांदुर रेल्वे राहिला समारोपीय कार्यक्रमा मध्ये यवतमाळ जिल्हा अधिकारी श्रीमती नंदा खुरपुरे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद प्रा. डॉ. हरिदास धुर्वे यांनी भूषविले प्रा.डॉ. सचिन तेलखडे यांनी संचालन तर शारीरिक शिक्षक डॉ. रविजीत गावंडे यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

दाते कॉलेज मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळ येथे दि. 21/06/2022 रोजी शारीरिक शिक्षण विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री विनायक दाते हे होते त्यांनी योगाभ्यास व प्राणायाम दैनंदिन जीवनासाठी कसे आवश्यक आहे हे सांगून योगाभ्यासाचे महत्त्व स्पष्ट करून सांगितले. शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. रविजीत गावंडे यांनी प्राणायाम तसेच योगाभ्यास घेतला. प्रस्तुत कार्यक्रमाला शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता रोहन गायकवाड , उमेश कांबळे, कोमल काळे , निशांत मडावी यांनी परिश्रम घेतले.

राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेकरिता दाते कॉलेजच्या वैष्णवी शंकर वाढईची निवड

महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटना (अमरावती विभाग ) च्या वतीने "युथ" (21 वर्षाखालील ) मुले / मुली संघ निवड चाचणी दिनांक 10/04/2022 ला फ्रेंड्स व्हॉलिबॉल क्रीडा मंडळ, पहुर ( दाभा पहूर) ता. बाभुळगाव जि. यवतमाळ येथील मैदानावर आयोजित केली होती. सदर निवड चाचणीमध्ये बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील वर्ग १२ वी वाणिज्य शाखेतील उत्कृष्ट व्हॉलीबॉल खेळाडू वैष्णवी शंकर वाढई हिची निवड २१ वर्षाचे आतील राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेकरिता करण्यात आली. विशूद्ध विघालय व वाणिज्य महाविद्यालय न्यासाचे अध्यक्ष मा.श्री. विनायक दाते, न्यासाच्या सदसस्या सौ. सुषमा दाते , प्रशिक्षक प्रा.अभिजीत पवार, संचालक डॉ. रविजीत गावंडे, राहुल कराळे, निखिल गुजर, राहुल कराळे, राणाप्रताप क्रीडा मंडळ यांना तिचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

क्रीडा संमेलनाचा बक्षीस वितरण समारंभ

आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत घेण्यात आलेल्या क्रीडा भारती व बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रीडा संमेलनाचा बक्षीस वितरण समारंभ 6 मार्च २०२२ रोजी सायंकाळी अभ्यंकर कन्या शाळेत उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून वुमेन्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. अमरचंद दर्डा होते. सोबतच क्रीडा भारतीचे यवतमाळ जिल्हध्यक्ष सतीश फाटक, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते विजय मुनिश्वर, क्रीडा उपसंचालक विजय संतान, क्रीडा भारती चे प्रांत उपाध्यक्ष डॉ. प्रकाश नंदुरकर, विशुद्ध विद्यालय न्यासाचे अध्यक्ष विनायक दाते, वुमेन्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव रमेश मुणोत, जयहिंद क्रीडा मंडळाचे प्रदीप वानखडे, क्रीडा भारतीचे प्रांत मंत्री संजय खळतकर, क्रीडा भारती चे नगर अध्यक्ष अजय म्हैसाळकर व अभ्यंकर कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका मोहना गंगमवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
ध्वजारोहण, दीप प्रज्वलन व क्रीडा गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सतीश फाटक यांनी क्रीडा भारतीच्या जिल्हा व नगर कार्यकारणी चा परिचय करून दिला व प्रास्ताविक केले. त्यानंतर मैदानी स्पर्धेत प्राविण्य प्राप्त खेळाडूंना आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.
खो-खो स्पर्धेतील विजय संघ लोकनायक बापूजी अणे विद्यालय यवतमाळ व उपविजयी महर्षी विद्यालय यवतमाळ तसेच, मुलींच्या गटातील विजय संघ अभ्यंकर कन्या शाळा यवतमाळ व उपविजयी संघ मातोश्री रमाबाई आंबेडकर कन्या शाळा यवतमाळ यांनाही आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. कबड्डी स्पर्धेतील मुलांचा विजय संघ बाबाजी दाते कला वाणिज्य महाविद्यालय यवतमाळ, उपविजेता संघ केंद्रीय विद्यालय यवतमाळ, मुलींचा विजयी संघ अभ्यंकर कन्या शाळा यवतमाळ व उपविजयी संघ विद्यावर्धिनी स्कॉलर स्कूल लोणबेहळ यांना आकर्षक चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
सर्व खेळातील उत्कृष्ट खेळाडूंना वैयक्तिक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे मुख्य संचालन राजेश गढीकर यांनी केले. विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरणाचे संचालन अनंत पांडे, महेश जोशी, प्रा. प्रेमेन्द्र रामपूरकर व राहुल ढोणे यांनी केले आभार प्रदर्शन प्राजक्ता टिकले यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विविध संघटनांचे पदाधिकारी व मुख्याध्यापक वर्ग तसेच खेळाडू पालक व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

सामुहिक सूर्यनमस्कार अभियान

बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय IQAC अंतर्गत शारिरीक शिक्षण विभाग, क्रीडा भारती, यवतमाळ, राष्ट्रीय छात्रसेना आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १४ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ८:३० वा. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ कोटी सूर्य नमस्कार या अभियाना अंतर्गत सामुहिक सूर्यनमस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडा भारती ही अखिल भारतीय स्तरावर सामाजिक कार्य करणारी संस्था असून त्यांनी या वर्षात ७५ कोटी सूर्यनमस्कार योजना घराघरात आणि प्रत्येक संस्थेत, नगरात राबविण्याचा संकल्प केला. या संकल्पामध्ये प्रत्येकाने आपल्या समीधा अर्पण करण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन क्रीडा भारतीच्या वतीने कण्यात आले.
सामुहिक सूर्य नमस्काराचे महत्व या धकाधकीच्या जीवनामध्ये अनन्यसाधारण असून जीवनामध्ये प्रत्येकाने दररोज व्यायम, प्राणायाम आणि सूर्य नमस्कार नित्य नियमाने करुन स्वतः सुद्रुढ राहण्याचा प्रयत्न करावा, असे मत मार्गदर्शक श्री महेश जोशी यांनी व्यक्त केले. सोबतच क्रीडा भारतीचे बोध वाक्य “खेळापासून चारित्र्य निर्मिती आणि चारित्र्य निर्मितीतून राष्ट्रनिर्मिती” या विषयी सुद्धा मौलिक मार्गदर्शन या कार्यक्रमाचे प्रांत संयोजक श्री. महेश जोशी यांनी केले.
सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. ताराचंद कंठाळे यांनी तर तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. रविजीत गावंडे यांनी केले.
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष मा. श्री.विनायक दाते, उपाध्यक्ष श्री. सतिश फाटक, प्रा. डॉ. क्षीरसागर, प्रा. अनंत पांडे, श्री तात्या राखे, श्री. अजय म्हैसाळकर, श्री. अभिजित दाभाळकर, सौ. मीरा फडणीस तसेच या कार्यक्रमाचे प्रांत संयोजक श्री. महेश जोशी, प्रा.डॉ.संतोषी साऊलकर आणि महाविद्यालयातील बहुसंख्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

आंतरविद्यापीठ स्पर्धेत बाबाजी दाते हाँकी अँकडमीच्या खेळाडूची निवड

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने २०२१-२२ सत्रातील अमरावती विद्यापीठ निवड चाचणीचे आयोजन दिनांक ६ ते ७ डिसेंबर २०२२ रोजी अमरावती येथे करण्यात आले होते, त्यामध्ये यवतमाळ मधील बाबाजी दाते अकॅडमी येथील शिव युवराज बोरकर या खेळाडूची निवड ग्वाल्हेर येथे होणाऱ्या १६ ते २० जानेवारी २०२२ रोजी जिवाजी युनिवर्सिटी येथे होणाऱ्या आंतरविद्यापीठ स्पर्धेत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या चमूत खेळण्यासाठी करण्यात आली. हाँकी असोसिएशन ऑफ डिस्ट्रीक्ट यवतमाळ चे सचिव सौ. मनिषा आखरे यांनी शिव बोरकरला मार्गदर्शन केले.
शिव बोरकर यास विशूद्ध विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री विनायक दाते, श्री सतीश फाटक अध्यक्ष हाँकी असोसिएशन यवतमाळ, बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय प्राचार्य. सौ वर्षा कुळकर्णी, प्रा. रवीजीत गावंडे, अभिजीत पवार आदींनी शुभेच्छा दिल्या व त्याचे अभिनंदन केले.